चौपाटी बनवायला पाहिजे/कविता/समाधान इंगळे/Chaipati Banvayla Pahije/Poem/Samadhan Ingle मराठी कविता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • चौपाटी
    ना छोटी बनवायला पाहिजे
    ना मोठी बनवायला पाहिजे
    समुद्र नसला तरी आमच्या शहरात
    एक चौपाटी बनवायला पाहिजे
    कुणीही या कितीही वेळ बसा
    गळ्यात गळे घालून रडा
    नाहीतर गुदगुल्या करून हसा
    'प्रेमवाल्यांसाठी स्पेशल'
    अशी पाटी बनवायला पाहिजे
    आपल्यालाच आपल्या माणसाशी
    मनमोकळं बोलता येत नाही
    हातात हात धरून तर सोडाच
    अंतर ठेवूनही चालता येत नाही
    अशा प्रेम रुग्णांसाठी
    एक 'घाटी' बनवायला पाहिजे
    गार्डनमध्ये चोरून जावं तर
    तिथंही पोलीस पकडतात
    आपल्याच माणसासमोर आपली
    उगाचच इज्जत काढतात
    कुणालाही दिसणार नाही
    अशी ताटी बनवायला पाहिजे
    सिनेमाला चुकून गेलो तरी
    तेव्हाच नेमके ओळखीचे भेटतात
    हसत-खेळत बोलणारेही मग
    मारक्या म्हशीसारखे वाटतात
    बुडत्या प्रेमाला तारणारी
    एक काठी बनवायला पाहिजे
    आमचं शहर सध्या तरी
    प्रेमवीरांसाठी संघर्ष आहे
    लग्नानंतर प्रेम करणाऱ्या
    मायबापांचा आदर्श आहे
    आमच्यासह आमच्या
    मायबापांसाठी बनवायला पाहिजे
    समाधान इंगळे

КОМЕНТАРІ •