बलकवडी धरणात तब्बल 24 वर्षे पाण्यात असलेले पुरातन मंदिर | गोकर्णेश्वर | Gokarneshwar Temple

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर खोऱ्यात कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधलेले असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा ४ टी.एम.सी. इतका आहे. धरणाच्या फुगवट्यामुळे तिथल्या गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. त्यात सर्व धरणांतील पाणीसाठा घटला आणि धरणं कोरडी ठक्क पडली. त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडे झाले. बलकवडी धरणात तब्बल २४ वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरे पाहण्यासाठी खुली झाली आहेत. त्यातील पहिल म्हणजे...
    १) श्री धुरेश्वर मंदिर(धुर्जटलिंग), गोळेगाव
    २) श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी
    यंदा धरणात फक्त मृत पाणीसाठा राहिल्यामुळे धरण संपूर्ण कोरड पडलं आणि ही दोन मंदिरे पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.
    * श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी *
    श्री धुरेश्वराचे (धुर्जटलिंग) दर्शन घेतल्यानंतर आम्ही गोकर्णेश्वर मंदिराकडे निघालो. गोळेवाडीतून गोळेगावकडे आलो. श्री कॅम्प रिसॉर्टच्या जवळून पायवाट धरणात उतरते. त्यावाटेने खाली जाऊन श्री गोकर्णेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर धरणाच्या सखल भागात असून इथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता. याला रुद्रतीर्थ देखील म्हटले जाते. स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात अध्याय क्रमांक ४ मध्ये गोकर्णेश्वरचा देखील उल्लेख आलेला आहे.
    गंगाद्वाराचेनिकटी ॥ कृष्णानदी दक्षिणतटी ॥
    चार सहस्त्र धनुष्कोटी ॥ गिरीपासाव गोकर्ण ॥
    हे कृष्णागोकर्णाख्यान ॥ जो करी सकाळी नित्य पठण ॥
    त्यासी शिवाचे संनिधान ॥ सायुज्य सदन मिळतसे ॥
    हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या समोर तीन भग्न वीरगळ आणि दोन समाध्या आहेत. त्यातील एका समाधीच्या वर कासव कोरलेले असून त्यावर शिवपिंड आणि पादुका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून त्यापुढे चौकोनी शिवपिंड ठेवलेली आहे. येथे असलेल्या भिंतीला विटांचे बांधकाम केलेले असून त्याला सिमेंटच्या गिलाव्याने हिंदू धार्मिक शुभ चिन्ह उठवलेली आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूच्या भिंती पडू नये म्हणून, वीटांच्या चौकोनी स्तंभांनी आधार दिलेला आहे. मंदिराच्या शिखराला सिमेंटने गिलावा केलेला आहे. हे कामं सन १९७३ साली केलेले आहे. असे सिमेंटच्या गिलाव्यात उठवलेले दिसते यावरून कळते. मंदिराला गर्भगृह आणि सभामंडप असून सभामंडपाच्या द्वारशाखेला कोरीव स्तंभ आणि वरच्या बाजूस गणेशपट्टी आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर आतील बाजूस अष्टकोनी महिरपी कमानींचे बांधकाम केलेले आहे. मराठा स्थापत्य शैली मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अष्टकोनी बांधकाम पहायला मिळते. गर्भगृह प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात विष्णूची केशवरूपातील सुरेख कोरीवकाम केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये धारण केलेले दिसते. मूर्तीच्या उजव्या पायापाशी गरुड देवता वाटत आहे आणि डाव्या पायापाशी चामर धारीणी अथवा अलसाकन्या असावी पण याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही. डाव्या बाजूच्या देवकोष्ठकात गणपतीची सुरेख कोरीवकाम केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून मागच्या दोन्ही हातामध्ये परशु आणि अंकुश ही दोन शस्त्रे धारण केलेली आहेत. पुढच्या डाव्या हातामध्ये बीजापूरक असून उजव्या हातात भग्नदंत पकडलेला दिसतो. गणपतीच्या पोटाला नागबंध असून डाव्या बाजूला मांडी घातलेली तर उजवा पाय उभा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवपिंडीच्या मागील बाजूस देवकोष्ठक आहे. मंदिराचे शिखर आयताकृती दगड भौमितिक पद्धतीने एकमेकांवर रचून ठेवून तयार केलेले दिसते. शिवपिंडीची शाळुंका गोलाकार असून लिंग हे रुद्राक्ष स्वरूपाचे आहे. एकंदरीत यासुद्धा मंदिराची निर्मिती १६-१७ व्या शतकात शिवकाळ किंवा तद्नंतर झाली असावी असे वाटते. या मंदिरातील विष्णुमूर्ती आणि गणपती मूर्ती शिलाहारकालीन १२ व्या शतकातील असाव्यात. यादवकालीन स्तंभ शैली (हेमाडपंथी) मंदिर स्थापत्य प्रकार या दोन मंदिरामध्ये दिसत नाही. बहुधा १२ व्या शतकातील त्या धाटणीची मंदिरे याजागी असावीत. पण नंतरच्या काळात त्याजागी मंदिराचे पुनर्निर्माण किंवा त्याचा जीर्णोद्धार झाला असावा असे वाटते. खांबाशिवाय, भिंती व घुमटाकार छप्पर असलेल्या मंदिरांना "पोटल" पद्धतीची मंदिरे म्हणतात.
    या वास्तू हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर, सरकारने अशा मंदिरांचे स्थलांतर व त्यानंतर त्याचे जतन पुरातत्व विभागाच्या मार्फत केले पाहिजे.
    ©️ संदर्भ :-
    ⛰️भटकंती सह्याद्रीची परिवार, वाई🚩
    ✍🏻रोहित शिवाजी मुंगसे

КОМЕНТАРІ • 19

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 17 днів тому

    ओम नमः शिवाय

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 17 днів тому +1

    खूप छान माहिती आणि चित्रिकरण. आवाज व्यवस्थित. अशा ठिकाणी बेतानेच जावे रे बाळांनो. चिखलात काठी घेऊन जा.

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 19 днів тому +2

    Khup chan

  • @Shlok-baheti
    @Shlok-baheti 17 днів тому

    Khoob badhiya

  • @PradipChorage
    @PradipChorage 24 дні тому +3

    मस्त चित्रण आणि माहितीही

  • @user-ed4vt2so2t
    @user-ed4vt2so2t 21 день тому +2

    💐💐💐💐💐💐
    ।।जय भोले।।

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 19 днів тому +1

    खूप खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद तुम्हांला

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 16 днів тому

    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 19 днів тому +1

    Dada khupach chan Sundar chitrikaran Ani mahiti dili

  • @Shlok-baheti
    @Shlok-baheti 17 днів тому

    Khub

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 20 днів тому +1

    खुप सुंदर. माहिती

  • @yogeshmengade.4852
    @yogeshmengade.4852 23 дні тому +1

    Ek no Vedio...chan mahiti dili 👍😊

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 24 дні тому +1

    khup chhan 👌👌👌👍

  • @sunandajadhav2171
    @sunandajadhav2171 19 днів тому

    खुप छान माहीती

  • @rajuparaskar6381
    @rajuparaskar6381 21 день тому +1

    Om namshiway har har mahadew

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha 24 дні тому

    सुंदर व्हिडिओ.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 23 дні тому

    नमोबुध्दाय 🙏 बुद्धही सत्य है... जुनं तेवढं बुध्दकालीन ... बुद्धा शिवाय काहीच नाही.

    • @ramjoshi9294
      @ramjoshi9294 17 днів тому +4

      सनातन हिंदू मंदीर आहे.....हिंदू धर्म अनादी आहे. बुद्ध आणि ह्या मंदिराचा काय संबंध 😮

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 24 дні тому +1

    khup chhan 👌👌👌👍