खोडवा ऊस व्यवस्थापन | khodwa us niyojan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bh...
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱खोडवा ऊस व्यवस्थापन - एकरी 60 ते 70 टन ऊस उत्पादनाची गॅरंटी👍
    नमस्कार शेतकरी बांधवानो ,आज आपण खोडवा ऊस व्यवस्थापन या संदर्भात माहिती घेत आहोत, महाराष्ट्रात ऊस लागवडचे पूर्व हंगाम ,सुरु ,आडसाली असे तीन हंगाम आहेत. या तीनही हंगामात ऊस तुटून घेल्यानंतर त्या पासून खोडवा धरला जातो. खोडवा पीक घेणे शेतकरी आणि कारखाना या दोघांनाही आर्थिक दृष्ट्या फायदा करून देते. ऊस लागवडसाठी जेवढ लक्ष आपण देतो तेवढ लक्ष खोडवा उसाला दिल्यास, नक्की उत्पादन ऊस लागवडी ऊसापेक्षा खोडव्या ऊसाचे मिळते.
    ✅खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे -
    👉१५ फेब्रुवारी नंतर खोडवा शक्यतो धरू नये .
    👉ऊसाचे पाचट जाळणे.
    👉अपूर्ण पाणी आणि खत नियोजन .
    👉कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव.
    ✅खोडवा पीक घेण्याचे फायदे -
    👉खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करू शकते
    👉लागवड ,बेणेप्रक्रिया, मशागती वरील खर्च वाचतो ,
    👉फुटवा लवकर येतो
    👉पाचट आसल्यामुळे जैविक खत मिळते आणि तणांचा बंदोबस्त होतो .
    ✅खोडवा ऊस राखण्याची योग्य वेळ -
    ऑक्टोम्बर पासून मे पर्यंत तोडणी चालते परंतु १५ फेब्रुवारी नंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास उत्पादनांत घट येते कारण फेब्रुवारी नंतरच्या अधिक तापमानामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पाण्याचा ताण पडल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते .
    ✅खोडवा पीक घेताना काय काळजी घ्यावी -
    1️⃣जाती - अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी. उदा. को-८६०३२, को-एम-२६५, को-८०४०, को-७२१९, को-८०१४, को-युएआय ९८०५ इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.
    2️⃣खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापन - यंत्राच्या साहयाने पाचट बारीक करून घ्यावे किंवा सरीत दाबून द्यावे . एक हेक्टर मधून ८ते १० टन पाचट मिळते .या पाचट मध्ये - नत्र - ४० ते ५० किलो ,स्फुरद -२० ते ३० किलो ,पालाश -७५ते १०० किलो , आणि सेंद्रिय कर्ब - ३००० ते ४००० किलोग्रॅम .
    पाचट कुजवण्यासाठी - युरिया - ८० किलो ,सिंगल सुपर फास्फेट -१०० किलो ,जिवाणू संवर्धन -१० किलो . सम प्रमाणात पसरून पाणी घ्यावे .
    3️⃣बडख्याची छाटणी व काळजी - बुडख्या वरील पाचट बाजूला ओळीत घ्यावे त्यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून कोंब जोमदार फुटण्यास मदत होते जरी एकदा बुडखा मोठा राहिला असेल तर धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत .किंवा यंत्राच्या साहयाने सुद्धा पाचट बारीक आणि बुडखे एकसमान कट करून घेऊ शकतो . छाटणी नंतर बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी.
    4️⃣बगला फोडणे - ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते. त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. नवीन मुळ्याची वाढ होते.
    5️⃣खत व्यवस्थापन -
    👉खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी ऊस तुटल्यावर १५ दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी ७५ किलो युरिया , १५० किलो सिंगल सुपर फास्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६, ५० किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी. खते माती आड करून पाणी द्यावे.
    👉पहिल्या मात्रेनंतर ६ आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी ७५ किलो द्यावी.
    उर्वरित मात्रा एकरी १०० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फास्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६ व ७५ किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी ६० टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा. उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फर्टिगेशन तंत्राने द्यावी.
    👉टीप - दर १५ दिवसांनी एकरी ८ किलो मॅग्नेशियम सल्फेट व २५० ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.
    6️⃣पाणी नियोजन -
    👉खोडवा व्यवस्थापनामध्ये २६ ते २८ पाण्याचा फळ्या पुरेश्या आहे . आधुनिक तंत्रज्ञानामुळे १३ ते १५ पाण्यात ऊस निघतो , कारण नवीन तंत्रज्ञान पाचट आच्छादनामुळे ४० ते ४५ दिवस पीक पाण्याचा तग दारू शकते . .ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.जास्तीचे क्षेत्र ओलिताखाली आणता येते.
    7️⃣ऊस पक्वता व तोडणी -
    खोडवा पीक १२ महिन्यात पक्व होते . ऊस तोडणी पूर्वी १२ ते १५ दिवस अगोदर पाणी देऊ नये , उसाची तोडणी जमिनी लागत करावी आणि तुटलेला ऊस २४ तासाचा आत ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात घट येत नाही . खोडवा ऊसाचे असेच नवीन तंत्रज्ञान वापरून नियोजन केल्यास १४० ते १५० टन उत्पादन निश्चित मिळते .खोडव्यात पाचट ठेवणे ही काळाची नितांत गरज आहे , हे एक शेतकऱ्या साठी वरदान ठरलेले आहे . आज आपण थोडक्यात खोडवा व्यवस्थापन या विषयी माहिती घेतली असच आपण उसमधील कीड व रोग या संदर्भात एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ .
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 118

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 5 місяців тому +2

    धन्यवाद सर माहिती दिली.❤❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @vikramkale5931
    @vikramkale5931 20 днів тому

    🎉

  • @Gajanankhansolekhansole
    @Gajanankhansolekhansole 6 місяців тому

    Sir march mahinyat ala khodwa rahane babat mahiti

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +3

    चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @dragonfruitsheti5661
    @dragonfruitsheti5661 Рік тому +1

    धन्यवाद खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +2

    खूप छान आणि उपयुक्त माहिती
    धन्यवाद !

  • @nijamshedbale1356
    @nijamshedbale1356 Рік тому +1

    धन्य वाद सर

  • @santajikhade8568
    @santajikhade8568 Рік тому +1

    खूपच छान माहिती पद्धत शीर 🙏धन्यवाद

  • @vikramkale5931
    @vikramkale5931 20 днів тому

    खत व्यवस्थापन पूर्ण माहिती मिळावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  20 днів тому

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून खत व्यवस्थापन बद्दल माहिती पाहू शकता - ua-cam.com/video/JWlGxdYPhnc/v-deo.html

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 Рік тому +2

    छान माहिती दिली आहे सर 🙏🌹🌹

  • @prakashjadhav6354
    @prakashjadhav6354 8 місяців тому

    चांगली माहिती आहे

  • @bharatingal3455
    @bharatingal3455 6 місяців тому

    छान माहिती आहे सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home

  • @siddheshwardiwate
    @siddheshwardiwate 7 місяців тому

    खुप छान मार्गदर्शन

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 2 місяці тому

    10/26/26 मध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रोजन चाले का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपण 100 किलो शेणखत त्या मध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम खालून जर टाकले अति चांगले होईल , धन्यवाद सर !

  • @dagadujodbhave4423
    @dagadujodbhave4423 Рік тому +1

    फारच छान मार्गदर्शन

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Рік тому +1

    एक नंबर माहिती दिली दादा

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 Рік тому +1

    छान माहिती दिली 👌👌👌👌

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому

    खूप छान आणि उपयुक्त माहिती. नक्कीच फायदा होईल.

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 Рік тому +1

    छान

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Рік тому +1

    4,5 futi usachi sari made bharani nantar dreep line 2 takave kay 1 takave sanga sir, plz

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      एका सरीवर एकच ड्रीप असावी

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Рік тому +1

    Unali made paani kami astat tar bagal phodun dreep vaaparlatar chalel kay.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      नक्कीच चालेल. ड्रीप ने तर तुम्हाला आणखीन जास्त उत्पन्न निघेल

  • @mohanpatil182
    @mohanpatil182 Рік тому +1

    Great

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 7 місяців тому

    👌🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @devendraingle6569
    @devendraingle6569 Рік тому +4

    साहेब मका लागवड विषयी माहिती सांगा तुम्ही दिलेल्या माहिती मुळे आमच्या उत्पादनात खूप काही बदल झाला आहे अशी माहिती सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . मका पिकावर देखील आपण एक स्पेशल विडियो बनऊ

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Рік тому

    Sir, mazya usat pandhari mashicha pradurbhav houn us pivda zala aahe tar upay sanga

  • @everythingsolutions3300
    @everythingsolutions3300 Рік тому

    छान माहिती दिली आहे,
    धन्यवाद🙏
    परंतु याच वेळापत्रक मिळाले तर याचा शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात फायदा होईल.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @rahulchougule1328
    @rahulchougule1328 Рік тому

    Sir mothay bharni veliche khad vyavasthapan kase karayche

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      खालील लिंक वर जाऊन आपण हा व्हिडिओ पाहावा -ua-cam.com/video/dGf-o-2ujYw/v-deo.html

  • @suryakantkamble3136
    @suryakantkamble3136 Рік тому +1

    Namskar

  • @ganeshghadge3689
    @ganeshghadge3689 Рік тому

    Nice 👌

  • @ujwalatingare5509
    @ujwalatingare5509 9 місяців тому

    Sir ऊस पिकाचे by-product कोणते

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Рік тому

    Sar khani rogasathi kahi upay ahe ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण विचारलेल्या प्रमाणे ,आपणास कोणत्या रोगाची माहिती पाहिजे ?

  • @dhananjaykupekar6892
    @dhananjaykupekar6892 9 місяців тому +1

    Khodvya baddal far chan mahtvapurn mahiti dili, thank you

  • @PRASAD0713
    @PRASAD0713 9 місяців тому

    Khodvyasathi NPK requirement kiti Kg ahe?

  • @siddharth_dialani
    @siddharth_dialani Рік тому +2

    👏

  • @balasahebwagh1722
    @balasahebwagh1722 9 місяців тому

    ठिबक सिंचन द्वारे खोडवा ऊसाच्या खत व्यवस्थापन सांगावे ही विनंती

  • @user-gv8id6qk7x
    @user-gv8id6qk7x 8 місяців тому

    सर लागवण ऊसाची खत नियोजन

  • @pr3465
    @pr3465 Рік тому

    Dear sir, bagala phodalyamule oosachi vaad kami hothe ani time taking for growth. It is my experience. Please reply

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому

    👍👍

  • @sagarshinde2637
    @sagarshinde2637 Рік тому

    Pachat thevl k undir lagtat sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      पाचट बारीक करून घ्या म्हणजे उंदीर लागणार नाही .

  • @OverallGamer001
    @OverallGamer001 9 місяців тому

    बगला फोडतात खत पेरणी केले तर चालेल का

  • @maheshravale3097
    @maheshravale3097 Рік тому +1

    साहेब माहिती चांगली दिली पण एकरी खर्च आणि उत्पादन किती येईल सांगायला पाहिजे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      खर्च तुम्हाला 30 हजार तर येईल. सर्व

    • @Chawarevenkat
      @Chawarevenkat Рік тому

      10001चालेल का

  • @sat8482
    @sat8482 Рік тому

    जिवाणू खत व संजिवकांचा खरंच फायदा होतो का? आणी होत असेल तर किती % पर्यंत उत्पादन वाढू शकतं...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      जिवाणू खत व संजिवकांचा खरंच फायदा होतो . % नाही पण आपल उत्पादन नक्की वाढणार आपण नियोजन कस करता त्या वर अवलंबून आहे .

  • @vaibhavkadam8671
    @vaibhavkadam8671 Рік тому

    And then 30th

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.

  • @adhikraohajare1124
    @adhikraohajare1124 8 місяців тому

    सर कामगारांनी समाधानकारक बुडके छाटले नाहीत त्यामुळे फुटवा ही समाधानकारक झाला नाही.ऊस जाऊन एक महिना झाला आहे .
    कृपया उपाय सांगाल का?

  • @vinayakpatil8040
    @vinayakpatil8040 Рік тому

    आमच्या जमिनी मध्ये वाळवि चे प्रमाण जास्त आहे त्याला काय करावे लागेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सुपर डी - १ लिटर / २०० लिटर पाण्यात सोडावे !

  • @gorakhgarad58
    @gorakhgarad58 Рік тому +1

    उसात पाचट ठेवल्यावर बगला फोडता येतात का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +2

      एक आड एक सरी मध्ये पाचट दाबावे

  • @kishorkesarkar4467
    @kishorkesarkar4467 Рік тому

    खते + फवारणी ( प्रमाण, variety , time to spray)

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @anandraosuryavanshi1026
    @anandraosuryavanshi1026 Рік тому

    Apply now Sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      मस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.

  • @utkarshkamble3145
    @utkarshkamble3145 Рік тому

    Sir agri job ahe ka kontya compony madhe maz bsc horticulture zal ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      या बद्दल आपण ऑनलाइन शोधावे . धन्यवाद सर !

  • @shrikantswami7720
    @shrikantswami7720 Рік тому

    ऊस पिवळा पडला आहे काय उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      नमस्कार सर काही सूक्ष्म पोषक कमतरता असेल आपण फेरस सल्फेट २.५ किलो +मॅग्नेशिअम सल्फेट २.५ किलो + मिक्रोनिट्रिएंट्स ५ किलो १०० किलो शेणखतात खालून फेकावे व पाणी दयावे . हे सोडून इत्तर काही समस्या असेल तर आपण फोटो टाकू शकता आमचा whats app number -९०७५९०७७३३ . धन्यवाद सर !

  • @allmarathi5709
    @allmarathi5709 Рік тому

    मोठ्या भरनीला खत कोनते वाप्रावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      खालील लिंक वर जाऊन आपण बघू शकता . ua-cam.com/video/dGf-o-2ujYw/v-deo.html

  • @dskalyankar1979
    @dskalyankar1979 Рік тому

    लागणीमध्ये गवताळ रोपे होती . त्यासाठी खोडव्या मध्ये काय काळजी घ्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      गवताळ रोपे काढून टाका , ते गवताळ वाढ व्हायरस रोग आहे .

  • @nanawalekar
    @nanawalekar Рік тому

    फूट वाला.व.नवीन. लागवडी ला.मरा.लागली.उपाय. सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सर खोड कीड आहे का बघा एकदा - सुपर डी -1 लिटर + मॅटको 500 ग्रॅम @200 लिटर एकर आळवणी करा !पानी दिल्यानंतर आळवणी करावी !

  • @sachinlondhe1097
    @sachinlondhe1097 Рік тому

    सर उसाची मोठी बांधणी करताना रासायनिक खतासोबत maykronutriant मिक्स करून डोस टाकता येतो का....

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      पर्याय नाही आपल्या त्या बरोबर मिक्स करू टाकवे लागेल. तुम्ही शेणखतामध्ये भट्टी लावून जर टाकले तर चांगले लागू पडेल !

  • @vishvnathghule7549
    @vishvnathghule7549 Рік тому

    Sir nagya bharane nahii sangital tumhii

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Рік тому +2

    साहेब तुमची माहिती परफेक्ट असते उन्हाळी भेंडी आणि काकडी लागवड याविषयी माहिती द्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +2

      ओके . मी नक्की प्रयत्न करीन

  • @chetanpatil7600
    @chetanpatil7600 Рік тому

    खोडव्याचा फुटला व जाडी याबद्दल माहीत द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर आपण - १२:६१:००-५ग्रॅम + जी ए ०.००१ %-३० मिली +स्टिकर ५ मिली @ १५ लिटर पंप साठी फवारणी करावी . जाडी साठी पोटॅश युक्त खताचा वापर करावा . म्हणजे -००:००:५० , पोटॅशिअम शोनाईट . धन्यवाद सर!

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Рік тому +1

    किती आळवणी आणि फवारणी नंतर बगला फोडायचा त्या वेळी खत कोणतं, किती द्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      बगला फोडण्या आगोदर आपण १ बॅग युरिया +२ बॅग एसएसपी +पोटॅश १० किलो @एकर देऊ शकता धन्यवाद !

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Рік тому

    सर माझि 86032 लागन. पिवळी पडत आहे तर खोडवा चांगला येईल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर , आपल्या जमिनीत लोहाची कमतरता असेल असा अंदाज वाटत आहे आम्हला म्हणजेच केवडा रोग असेल आपण खताचे आणि फवारणी चे नियोजन करून घेऊ शकता . धन्यवाद सर !

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 Рік тому

      @@bharatagrimarathi सर आपला मोबाईल नंबर द्या

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 Рік тому

      Feras salfet che kht kaka

  • @deepakpawar257
    @deepakpawar257 Рік тому +2

    सर आमचा उस खोडवा ८० दिवसांचा झालेला सध्या, आता त्याला मोठी भरणी म्हणजे च फुटवे ना माती लावायची तर कोणते खत वापरावे व कोणते औषध फवारणी करावी 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/Vx7ROo8SEgY-/v-deo.html खत व्यवस्थापन !

  • @tukaramjadhav2398
    @tukaramjadhav2398 Рік тому +1

    सर एक नंबर माहिती दिली