खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2024
  • खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan) मामासोबत मी खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो. गावी खाडीत बिळातून खेकडे कसे पकडतात हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. खाडीत समुद्राच्या पाण्याला ओहोटी असते तेव्हा खाजनातले पाणी कमी होते तेव्हा खेकड्यांचा बिळातून खेकडे काढले जातात. गावाला सम्याला खास खेकडी काढायला जातात. एकादशी झाल्यावर पाणी जास्त ओहोटते त्यावेळेस खेकडी जास्त सापडतात. खाजनातली खेकडी भरलेली असतात. खेकड्यांना मेंदा चांगला असतो. खाडीतून खेकडी काढण्याची सुद्धा कला असते. माझे मामा खेकडी काढायला पटाईत आहेत. आम्ही खेकडी काढायला गेलो तेव्हा आईसुद्धा कालवा काढायला आली होती. मामा आणि मी सोबत भरपूर खेकडी पकडली. मामाच्या घरी जाऊन सर्व खेकडी एका टपात काढून दाखवली आहेत. थोडी खेकडी मामाला दिली आणि बाकीची खेकडी आम्ही घेऊन गेलो. आईने घरी जाऊन खेकड्यांचा रस्सा केला. खेकड्यांचा रस्सा खूप भारी लागतो. खाडीतली खेकडी चविष्ट असतात. भरलेली खेकडी खायला खूप मजा येते. खेकडी पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आमच्या गावाकडे अशा पारंपरिक पद्धतीने खाजनातून खेकडी काढली जातात. #MudCrabCatching #KhekdyanchaRassa #GiantMudCrabCatching #sforsatish
    तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाडीतून खेकडी कसे काढतात ते दाखवले आहे आणि आईने कालवण कसे बनवले आहे ते थोडक्यात दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    www.imstagram.com/koknatlamum...

КОМЕНТАРІ • 690

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +43

    बिलातल्या खेकड्याला चव अप्रतिम असते,आणि ते बिळातून काढायला 1वेगळाच जिगर लागतो तो मामा मधे आहे,मामा साठी ❤️🔥🔥🔥👍👍

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 3 роки тому +9

    तुझा मामा बघ किती चांगला आणि मोठया मनाचा आहे , त्याने येवढी रिस्क घेऊन चिखलात घान होऊन खेकडे पकडले आणि स्वतःच्या घरासाठी न ठेवता जास्तीत जास्त तुला दिले.. सर्वच तुला देत होता.. प्रेमळ आणि खुप मोठ्या मनाचा आहे तुझा मामा..
    मामा साठी मनापासून लाईक..
    😊

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +19

    किती कष्ट घेतात गावाकडचे लोक.मामांना सलाम.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 роки тому +7

    लय भारी.... 👌मस्त.. छान.... 👌मामाने भाच्यासाठी खूप मेहनतिने खेकडे पकडून दिले....मामा भाच्याचे नातं खूपच छान असते... मामा ग्रेट 👍 काळजी घ्या.. धन्यवाद.....

  • @selflove6314
    @selflove6314 3 роки тому +5

    Mamakarta ek like👌👌

  • @ramkrishnamuthal990
    @ramkrishnamuthal990 3 роки тому +5

    सतीशभाऊ, तुमचे मामा खूप ग्रेट व मनाने दिलदार आणि अतिशय मेहनती आहेत. कोकणातील जीवन अतिशय परिश्रमाने भरलेले आहे. कोकनातील लोक आहे त्या संसाधनात आनंदाने जगण्याचा आनंद घेतात. तुमचे व्हिडिओ अतिशय सुंदर व मनाला आनंद देणारे असतात.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +2

    खेकडे पकडण्याचा आनंद तोही मामा सोबत फार मस्त . छान गावरान व्हीडीओ . धन्यवाद सतिश दा .

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 3 роки тому

    मामा खुपच मेहनती आहेत. खेकडे पकडने तसे रिसकीचं काम आहे. मी पहिल्यांदाच पाहीले. व्हिडीओ खुपच छान झाला आहे.👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +1

    सतीश,खूप मस्त ब्लॉग आहे हा खेकडी पकडण्याचा.मामा खूप धीट आहे.खेकडे पकडण्यात.एक नंबर.केवढे मोठे खेकडे सहज पकडले आहेत.बिनधास्त हात टाकतात. खाजनात.एक थरारक अनुभव.बापरे केवढे केव्हडे हे खेकडे जाम भारी टेस्टी असतात.विकत सुद्धा असे मिळणे अशक्य.मामा तुझा👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Hoy gavi jaam maja asate, mi lahanpani mazya ajoba sobat jaycho, te pan khup khekde pakdayche

  • @smitasalunkhe6007
    @smitasalunkhe6007 3 роки тому +45

    सतिश मी लोटे गावी रहाते मी तुझे सर्व व्हिडीओ बघते व लाईक करते तुझा नेहमीच हसरा चेहरा असतो मी लोटेमाळ शाळेत मुख्याध्यापिका आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +4

      Thank you bai, asech ashirwad asudyat 🙏🙏😊

    • @pankajbandarkar4326
      @pankajbandarkar4326 3 роки тому

      बिळ बांधन म्हणेच काय?

    • @kadamhemant14
      @kadamhemant14 3 роки тому +2

      बिळ बांधने म्हणजे खेकडयांन साठी खड्डा खणून घर तयार करणे जेणेकरून ते तिथे राहतात आणि मग आपल्याला जास्त शोधाशोध न करता बांधलेल्या बिळात खेकडे पकडणे सोपे जाते आणि वेळ ही वाचतो

    • @joyfulltinytrips7661
      @joyfulltinytrips7661 3 роки тому

      ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 роки тому +13

    Mama sathi ak like 👍

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 роки тому +4

    दादा तुझे मामा जाम कष्टाळू आहेत👍👍अगदी तुझ्या आई सारखे..मामांना thank you सांग खेकडे दाखवल्याबद्दल...

  • @sandeshbhanat3349
    @sandeshbhanat3349 3 роки тому +1

    एकदम कडक. झणझणीत.. खेकडे पकडण्याचा थरार.

  • @baalah7
    @baalah7 3 роки тому +5

    मामाला खूप खूप धन्यवाद 🙏
    सतीश एकदम नॅशनल जिओग्राफिक चॅनल सारखं खेकडे पकडण्याचा व्हिडिओ आहे🦀
    अजून चांगले कॅमेरे घ्या हीच इच्छा आणि प्रार्थना 🙌🏼

  • @santoshnachanekar4931
    @santoshnachanekar4931 3 роки тому

    खूप छान सतीश दादा आणि मामाला पण सलाम खूपच मेहनत घेतली खेकडे पकडायला आणि छान मेजवानी. 👌👍

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 роки тому

    छान पध्द्त आहे ही खेखडे पकडण्याची धन्यवाद मामा...👍👌👌

  • @gangeshkhande2223
    @gangeshkhande2223 3 роки тому +4

    खारिगावची खेकङी भारी आणि आजी मामा खुपच भारी....
    गंगेश खंडे (मुलुंड)

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 3 роки тому +1

    मामाची हिम्मत व स्कील कमालीची👏👌👌

  • @9820141451
    @9820141451 3 роки тому +4

    खूप सुंदर episode .. मंगील दारा आणि मंजारला मामा माझा.. हे शब्द आता लोप पावत चाललेत.. आपली संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न खूप छान आहे... खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      होय अगदी खरं आहे ❤️🙏

  • @ganeshshelar1669
    @ganeshshelar1669 3 роки тому +1

    मामा साठी ❤️
    गावची आटवनकरुन तिली भाऊ.... खूप खूप माझ्या येथे.......👍👍👍👍

  • @maheshmane7893
    @maheshmane7893 3 роки тому +2

    मामा साठी एक like👍👍👍

  • @aishwarya2592
    @aishwarya2592 3 роки тому +3

    खूप सुंदर😍😍 माझ गाव निगडी, मंडणगड आहे.. खूप Testy खेकडे असतात... रत्नागिरी सुंदर किती आहे आणि तुमचं गाव अप्रतिम आहे.. ते तुम्ही मस्त गावच्या गोष्टी दाखवतात... गावातली घर खूप मस्तच आहेत अजूनही जुनी घर तशीच आहेत😍😍

  • @supriyaghadi8116
    @supriyaghadi8116 2 роки тому

    तुमचं, तुमच्या मामाच गाव आणि वहिनींच माहेर खूप छान आहे मला तुमचे सगळे विडिओ खूप आवडतात. असेच छान छान विडिओ बनवा दादा 👍

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 3 роки тому

    सलाम तुमच्या मामांना खूप खतरनाक काम
    आमच्या कोल्हापूरला फक्त पावसाळ्यातच भेटतात खेकडी
    ग्रेट व्हिडीओ सतीश भाऊ
    नादखुळाच

  • @mangeshraut3732
    @mangeshraut3732 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ आहे मित्रा, आणि मामांची मेहनत खूप भारी,
    मला एक समजले नाही, मामा बिळात हात टाकून खेकडे पकडताना त्यांना तो भावेल ह्याची भीती नाही वाटत, म्हणजे बिळात भिनदास्त कशे हात घालतात, ???
    सलाम बाबा आपल्या मामांना

  • @rashmiadav9732
    @rashmiadav9732 3 роки тому

    खूपच छान मामांनी छान पकडून दाखविले खेकडी छान आहे गाव

  • @prakash9782
    @prakash9782 3 роки тому

    सतीश मामा ग्रेट विडिओ जबरदस्त थरारक
    👍👍👍👌👌☺️☺️

  • @yogeshbharati3830
    @yogeshbharati3830 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ होता...प्रत्यक्ष अनुभव घेतोय अस वाटलं ....I Love Kokan ........पण यायचा योग नाही आला अजून ...........पण एकदा नक्की येऊ

  • @aresgaming6054
    @aresgaming6054 3 роки тому

    Gavchi Manse khup hushar aani khup mehnati 👌👌 mamansathi khup sare likes 👍👍👍👍

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 2 роки тому +1

    जबरदस्त व्हिडिओ. 👍👌👌

  • @sachinb6476
    @sachinb6476 3 роки тому +2

    मस्त भावा मामला नमस्कार सांगा पकडण्याची पद्धत भारी आहे

  • @timeisone6888
    @timeisone6888 3 роки тому +3

    Mazza aali

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 3 роки тому +2

    Aapla like Mamasathi ... :)

  • @renusawaratkar1228
    @renusawaratkar1228 3 роки тому

    सतीश दादा आत्तापर्यंत खेकडी म्हणजेच चिंबोरी गावात गेल्यावर विकत घेऊन खाल्ली आहे पण ती कशी पकडतात हे प्रत्यक्ष पाहिले खरंच तुमच्या मामाचे व तुमचे कौतुक तुम्ही खूपच लकी आहात असा प्रेमळ मामा तुम्हाला लाभला.

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 3 роки тому +1

    तुझ्या तुझ्या मामाने जबरदस्त मेहनत घेतल.मित्रा मित्रा तू पण फार मेहनत घेतली

  • @sandeepwagdare8569
    @sandeepwagdare8569 3 роки тому

    खूप छान .....मला कोकण फार आवडतं..Thanks for this kokan view

  • @swatimandke7140
    @swatimandke7140 3 роки тому +1

    Mi pahilyandach pahila ....bapre .....khup bhariiii

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 роки тому +3

    व्हिडिओ छान आहे पण मेहनत प्रचंड आहे ... Hats off to your Mama ...

  • @vinodsalunke8150
    @vinodsalunke8150 3 роки тому +1

    खुप छान वाटते व्हिडिओ पहायला

  • @vijayrane3050
    @vijayrane3050 3 роки тому +1

    खूप छान विडिओ मजा आली,

  • @yogeshbharati3830
    @yogeshbharati3830 2 роки тому +1

    natural पद्धतीने व्हिडिओ बनवतात खूप छान वाटतात ..

  • @sanjogambildhok5106
    @sanjogambildhok5106 3 роки тому +1

    Aaji....apli ek number ahe bhai.

  • @tanajisuryawanshi9956
    @tanajisuryawanshi9956 3 роки тому +1

    तुमचा साधेपणा मला खूप आवडतो

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 3 роки тому +2

    खूपच मस्त होता व्हिडीओ 👌👌👌👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +6

    मामा मास्टर आहे खेकडी काढण्यामध्ये आणि खेकड्याच्या निमित्ताने आजोळचे प्रेम आले 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      होय अगदी ❤️🙏

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 3 роки тому +6

    Great mama 😍🥰

  • @Rakeshpatil-fn2bd
    @Rakeshpatil-fn2bd 3 роки тому

    दादा खरच तुमच्या मुळे खूप माहिती भेटते आम्हाला

  • @savitalabhde319
    @savitalabhde319 2 роки тому +1

    🤩🤩🤩खुपछानभाऊ

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 роки тому +3

    Mama sathi 👍👍👍👍👍👌👍👌

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 роки тому +7

    मस्त vedio..मामाची मेहेनत खूप..गावचे vedio मस्त असतात दादा तुमचे..जेवण मस्त😂बघून तोंडाला पाणी सुटले.

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 роки тому +1

    मज्जाय राव दररोज नॉनव्हेज

  • @deepadivekar1438
    @deepadivekar1438 3 роки тому

    खूप छान, आजीबाई तर खूपच छान., गावाकडचे घर खूपच भारी.

  • @TheJayawant
    @TheJayawant 3 роки тому +2

    खूप छान video सतीश भाऊ. अगदी नॅशनल geographic चॅनेल वाटलं आज. मस्त. असेच आनंदी राहा आणि मजा करा.

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 роки тому +1

    Khup masst dada....mamach Gav pan khup Sundar aahe...Mama hi khup mahanati aahe...Aaji- Baba sarv khup premal aahet...khekade pakadane pan ek Kala aahe...sarvana Nahi jamat te......👍👍

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 роки тому +1

    तुमचे video unique असतात

  • @manishamanjrekar2206
    @manishamanjrekar2206 3 роки тому +2

    very nice video.Your mama is very hard working person 👏🏻👏🏻👏🏻 catching crabs is not easy tasks..

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 3 роки тому +1

    तुमची आजी , मामा पण हौशी आहेत ....सगळे च तुम्हाला खुप सहकार्य करतात......आणि खुप तुमचं सगळे विडिओ रोजच्या जीवनातले असतात ......मुद्दाम हून असं काही नसतं.........

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 роки тому +1

    मामा खेकडे पकण्यात पटाईत आहेत
    मस्तच भरपुर पकडले खेकडे

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 3 роки тому +3

    सतीश बऱ्याच दिवसांनी कमेंट पाठवतोय ,1 नंबर vlog,मामा पण किती उदार बघ म्हणतो सगळे घेऊन जा,great 👌👌👍👍

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 роки тому +3

    Superb crab catching. Felt like watching discovery documentary. Hats off to you nd mama. take care of u nd ur family.

  • @yogeshpandurkar6779
    @yogeshpandurkar6779 3 роки тому +1

    Always wondered how mud crabs are caught. Thank you so much for your beautiful video and great commentary.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +10

    खूप छान व्हिडिओ मामाना सलाम खूप मेहनत आहे 👌👌👍👍

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 3 роки тому +1

    दादा खेकड्या ची रेसिपी चा तुमचा व्हिडीओ बघीतला. फार सुरेख.

  • @latarane3550
    @latarane3550 3 роки тому +1

    जबरदस्त व्हिडिओ ! मामा the ग्रेट 👍 खेकडयाचा रस्सा पाहून तोंडाला पाणी सुटले. गावचे life च अगदी मनमुराद. कॅमेरा खेकडे काढताना पूर्ण मामावर फोकस केल्यामुळे आणि निवेदन कमी असल्यामुळे, व्हिडिओची लज्जत वाढली . Keep it up Satish 👍

  • @sameerkubal3743
    @sameerkubal3743 3 роки тому +5

    Mama sathi ek like ..👍👍

  • @nileshpatil1704
    @nileshpatil1704 3 роки тому

    मी सुद्धा अलिबाग मध्ये रेवस या गावी रहातो.व बिळातुन चिबोंरा कसा पकडायचा याचा मला भरपुर अनुभव आहे..एक आगळी वेगळी मजा असते...

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому +5

    Khub Chan Vlog Satish Dada. The Mud Crab Fishing is not that easy as it seems. Very Good Catch. TC Dada

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +3

    मामा तुम्ही खेकडे काढत होता पण व्हिडिओ पाहताना आम्हाला भिती वाटत होती खरच मामा खूप जोखीम पत्करून काढावे लागत आहे आजी खूप छान आहेत व खरच व्हिडिओ पाहताना भिती वाटत होती सूर्यास्त अप्रतिम 👆🙏🙏🙏

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 роки тому +1

    Very Nice Dadaa👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @dhadasbhopi8705
    @dhadasbhopi8705 3 роки тому

    जबरदस्त मित्रा

  • @maheshyewale1789
    @maheshyewale1789 3 роки тому +1

    असेच विडिओ दाखवत रहा
    मामा 👌👌लय भारी

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 роки тому

    लय भारी, मामा शिवाय आजाेळ नाही

  • @dr.poonamchavan9254
    @dr.poonamchavan9254 3 роки тому +1

    Great video...tumche videos pahun amhala gavi yavese vattey...gavasarkhi majja citymdhe nh...

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 3 роки тому +4

    भारीच गावची आठवण आली ❤️👍

  • @karunadalvi4041
    @karunadalvi4041 3 роки тому +1

    Nice video bhau 1 no

  • @prasadsagwekar3018
    @prasadsagwekar3018 3 роки тому +1

    Masst video .. Khekade pn khup milale .. Gavchi aathavan zali .. Aajkal chya concrit chya jamanyat tumchyakadali ghare baghun khup Masst vatate .. Lahanpani gavachya gharachi aathavan ali .. Thank u ..

  • @ashishthorase6174
    @ashishthorase6174 2 роки тому

    Mast khup Maja Ali Baghayla

  • @vinayakpowar9876
    @vinayakpowar9876 3 роки тому +1

    छान आहे राव तुमच

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому +2

    मामाच मनापासून कौतुक

  • @ravikantkamblethesecret4238
    @ravikantkamblethesecret4238 2 роки тому

    मी मंडणगड ला आलो होतो खुप रम्य वातावरण आहे छान

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 роки тому +1

    Khup mast video
    आणि खुप मेहनत आहे☺️👌

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 роки тому +1

    Chan vatla video mast hota aajcha video khup Chan ani mast pakdle mama ne crab 🦀🦀🦀🦀🦀 mama sathi ek 👍 like lai bhari ek number milale ani khup sare 🦀🦀🦀🦀🦀🦀 crab cha rassa kalvan pan khup sunder lai bhari ek number zale mast testy I like it crab 🦀🦀🦀🦀🦀 baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @manishmhatre6363
    @manishmhatre6363 3 роки тому +2

    Superb अप्रतिम 👍

  • @maheshsalunke2071
    @maheshsalunke2071 3 роки тому

    Mama sathi......Lay bhari mama...Nice

  • @maheshyewale1789
    @maheshyewale1789 3 роки тому +2

    मस्त खुप छान 👌👌👌

  • @atharvjoshi1460
    @atharvjoshi1460 3 роки тому +2

    मस्त च दादा हिच गावाकडची खरी मज्या असते

  • @madhavikhot9605
    @madhavikhot9605 3 роки тому +2

    Khup chhan anubhav Mama sathi😎👍

  • @amolgaikwad6436
    @amolgaikwad6436 3 роки тому +1

    You doing great work...Very nice village side feeling

  • @dong17
    @dong17 3 роки тому +3

    Simply Superbbb..

  • @amitdesai3276
    @amitdesai3276 3 роки тому

    Thanks mitra majha covid 19 divas changle gele he video pahunch majha time pass full jhala masth video. Konkan aapl swarg

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    satish .....ekdam jabardast......

  • @darshanaparwadi5777
    @darshanaparwadi5777 3 роки тому

    Lay bhari...dada tu khup enjoy kartoy.....mama khekhde pakadnyat expert ahet....

  • @milindpawar4884
    @milindpawar4884 3 роки тому +7

    मी पण कोकणाची पण खेकडे प्रथमच कसे पकडतात बापरे आपण खुप भाव करत असतो पैसे साठि खुप मेहनत आहे सही भाउ छान माहीती

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому +1

    मस्त व्हिडीओ सतीश. नवीन काहीतरी बघायला मिळाले. धन्यवाद

  • @naynkumarpabarkar
    @naynkumarpabarkar 3 роки тому +3

    Nice bro lay bhari kharch gavche adhvan detoy tu.........................

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 3 роки тому +1

    व्हिडीओ बघून फार छान वाटलं, तुमचं गाव तिथली माणसं फार चांगली आहेत

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +18

    सतीश भाऊ यास अभिवादन..!!🙏
    ❤️अप्रतिम चित्रण,✌️🎥✌️ असे वाटत होते क्षणभर की Survival चॅनेल पहात आहे की काय.. मामा चे चिवट, कणखर, धैर्यशील आणि जिद्दी या गुणांचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. खाडीतली खेकडी त्यांची चव अवर्णनीय अशीच
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 роки тому

    लय भारी खेकडे पकडण्याची विडिओ ♥♥♥♥👌👌👌👌मस्त मोठे मोठे खेकडे पकडलात

  • @rupeshkhadas476
    @rupeshkhadas476 3 роки тому

    खाडीत गेल्यावर असाच अवतार होतो मस्त व्हिडीओ 👌👌

  • @patekarmahesh3906
    @patekarmahesh3906 3 роки тому +2

    Video khup aavdala , prasann vatatt tumacha video pahun🙏🙏🙏🙏🙏