पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai पोर्तुगीज दर्यावर्दी १४९८ साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली. ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला. तेथेच वसाहत बनवून जवळपास सव्वा दोनशे वर्ष चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर १७३९ साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला. त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतीकडे निघून गेले तर काही लोक कोर्लई चर्चशेजारी वसाहत करून राहू लागले. अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते. कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे 'नॉलिंग' भाषा. नॉलिंग म्हणजेच 'आमची भाषा'. स्थानिक लोक आपल्या ह्या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील संबोधतात. काही अभ्यासक ह्या भाषेला 'क्रिओल पोर्तुगीज' देखील म्हणतात. ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आत्ता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे. सध्याच्या घडीला जवळपास ८००-१००० लोक ही भाषा बोलतात. चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्यावेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया. विशेष आभार: कोर्लई ग्रामस्थ श्री. निलेश नाईक, चौल - अलिबाग छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html वसईतील लग्नसोहळा ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d.html कुपारी संस्कृती ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3.html #korlai #creole #noling #nolingportuguese #indiancluture #culture #languages #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai #culture #portuguese #portugueseindia
पोर्तुगीज संस्कृती आणि भाषा गोव्याच्या आणि दक्षिण कोकणा बाहेर महाराष्ट्रात उत्तर कोकण किनारपट्टीच्या बाजूला आहे हे तुमच्या मुळे माहीत पडले. त्याबद्दल धन्यवाद आणि या लोकांनी त्यांची संस्कृती आणि भाषा अजूनही जपली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
@@suchithraraghavan5335 All Portuguese and Spanish colonies went through the horrible inquisition at that time, it happened when the king of Spain annexed Portugal for almost a century and ruled as one country and ordered an inquisition in all of the realm, not just Hindus, bhudists, muslims, Native Americans, Jews, EVERYBODY at that time we were all under the Spanish crown not Portuguese even though they maintained their presence. That’s why it’s called the Spanish Inquisition not Portuguese inquisition. I’m sure they don’t teach you this in school.
@@thetravelholic6412 whatever didn't atrocities happen against hindus in goa,forcible conversion,destroyed temples.are u justifying all this.its not mythology its recorded.go to portugal.
@@suchithraraghavan5335 I’m not Portuguese but I went to Portugal and there’s tons of Indians there, and seem to like it. I would not be so narrow minded if I were you this is 2024 not the 1600s.
सध्या सगळ्याच भाषांची भेळ होत आहे. खूप दिवसांनी मी मराठी बोलणारा माणूस अख्ख वाक्य पूर्ण मराठीत बोलताना दिसला.. भाषेचं सौंदर्य तुम्ही टिकवून ठेवत आहात. वाह.
I.m Brazilian. At min 10, i understood the lady speaking " Ave Maria", Our Lady. " Ave Maria cheia de graça, o Senhor é Convosco, Bendita sos vós entre as mulheres, bendito é o fruto do vosso ventre, Jesus.". " Aqui vem", "o que ficou". Thank you.
सुनीलजी खूप आनंद झाला हा व्हिडीओ पाहून,नोकरी निमित्ताने या गावाच्या जवळच गेली तीस वर्षांपासून राहतो. कोर्लई गावात माझे खूप मित्र आणि सहकारी आहेत.पारंपरिक पद्धतीने शेती आणि भाजीचा व्यवसाय करतात खूप कष्टाळू आणि प्रेमळ समाज आहे हा.त्यांची भाषा समजत नाही पण ऐकायला गोड वाटते.तुमच्या व्हिडीओत उल्लेख केलेले अल्बर्ट डिसोझा हे माझे सहकारी आहेत. ख्रिश्चन जीवन पद्धतीचा अनुभव ह्याच मित्रांमुळे घेता आला.तुमची भेट झाली असती तर माझा आनंद द्विगुणित झाला असता.
ग्रेट सुनिल.. तुमचं मनापासून कौतुक! अशी काही भाषा मुंबई पासून इतक्या जवळ असणा-या अलिबाग जवळच्या छोट्याश्या गावात बोलली जात असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे ही माहिती समजली. खूप खूप आभार. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली. तुमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला साथ देतं.. त्याकरिता अनिशा आणि एलिन, रायझल ह्यांचेही कौतुक.. अनिशा, तुम्ही दोन्ही लेकींना खूपच छान संस्कार देत आहात. देव बरे करो.. मनापासून शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओ करिता डिमेलो कुटुंबियांचे आभार.
अलिबाग येथे वारंवार जाणे होते, कोरलाई बद्दल बरेच काही ऐकिवात होते त्यामुळे येथे ही एकदा गेलो होतो पण आपल्या सुंदर माहिती पूर्ण ब्लॉग मुळे खूपच माहिती मिळाली👌 नेहमीच उत्तम खजिना👌
Vasai chi language tar majhi khup ch favorite ahe.. ani hi new language aaikaila bhetli aaj...tithli gav pan khup sadi ahet agdi juni ghara vigre tithe pahila bhetli.. really thanks for taking such efforts and making this wonderful video.. Jesus bless you and your team💫
I am now far from India and Portugal, but my heart, soul, and blood is still very connected to both (we have an ancient connection that cannot be broken). Beijinhos❤️🇵🇹❤️
Amalgamation of various cultures results in this beauty!! Thanks much for showing this different culture to a person from plains of mid Maharashtra like me!! ❤️
History and all is alright but main problem is water bro we don't get water on daily basis and electricity is a big issue too. This is why many people prefer living in Mumbai .
Visited this place 3 yrs back. U will get to see people wearing Eastindian Lugra too. Very Loving people. They speak mixed language.Thks Sunil for the coverage.
I received this video from a friend. It was such charming experience to watch the entire video. I am from Goa and seeing the Portuguese speaking people of Korlai, their simple, unaffected manner, their candour, their pride in speaking their language "nosling" , gave me a sense of belonging to the place. Also, in the 1950s my uncle (Father Ignatius Fonseca) was a priest in that area; i remember he came for the Exposition of St Francis Xavier in Goa with a group of parishioners who stayed with us and that is when, for the first time, I heard a strange, sing song version of Portuguese that greatly amused everyone. I look forward to your videos, Sunil, and wish you the very best.
सुनीलजी, आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला. आगदी वेगळ्या विषयावर आहे हा व्हिडिओ. गावातल्या नागरिकांना सहज बोलते करण्याची तुमची हातोटी अनोखी आहे. प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असतेच ! इथे तर 2 देशांची संस्कृती एकत्र आली आहे. कोणी भाषा शास्त्राच्या विद्यार्ध्याने यावर P hd केली पाहिजे. त्यामुळे सखोल डॉक्टूमेंटेशन होईल. खूप छान वाटले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा!!
मला तर माहितच नव्हतं की आपल्या देशातील एक गाव पोर्तुगीज भाषा बोलत आहे ,सुनील जी खुपच छान विडिओ आहे धन्यवाद, भाषा ही नेहमी महानच आहे मग ती कुठलीही भाषा असो
Nice information. I am from Goa and as you know Goa is a Portuguese speaking state......but not so much now! Most of the Goan have gone to greener pastures and people from other states have made Gia their home.So death of Goan culture,language and tradition. Thanks to the few who strive hard to keep these alive!
@@nareshshingote8081 they invade with the help of Hindu bamon for their greed by suppressing lower caste people of Goa. If you see now most of the land and temples in Goa belong to Hindu high caste bamon which were grabbed with the help of Portuguese laws .
This should definitely be declared an indigenous & endangered language . Special efforts should be made to preserve this language which is really so unique .
म्हणतात ना वेशी सोडल्या शिवाय अनुभव येत नाही, ते पोर्तुगीज इथे आले राहिले राज्य केलं, स्वतःची संस्कृती मांडली, त्यांचं राहणीमान.... अन् आपण उठलं की जय शिवराय, जय भीम, जय हे,.. जय ते.....💩💩💩
खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही. आणि हा व्लॉगही खूप छान घेतला आहे, या चित्रणात गोडवा आहे, आपुलकी आहे. यांची भाषा कादोडी असो, नोलिंग असो, क्रिओल असो किंवा पोर्तुगीज असो,ही सर्व आपली भारतीय माणसे आहेत. हे भूमीपुत्र आहेत. ही इथेच राहणार. आमचा यांची वेगळी भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांना विरोध नाही, उलट आम्ही त्याचे स्वागतच करतो. या देशात शेकडोवर्षांपुर्वीपासून आम्ही पारसी, ज्यू यांचेही स्वागत केले, त्यानी आम्हाला व आम्हीही त्याना कधीही त्रास दिला नाही. उलट आमच्यात सामावून घेतले. मात्र पोर्तुगीजांची भारतातील वसाहत ही आपल्या देशातील गोवा, वसई, चौल वगैरे भागात जुलमीपणाची होती, मूळ पोर्तुगीज आता कुठेच नाहीत, पण त्यानी जबरदस्तीने छळ करून धर्मपरिवर्तन (inquisition) केले त्याचे हे परिणाम आहेत. या निष्पाप जीवांचा काय दोष ? पोर्तुगीजानी यांच्या हिंदू पूर्वजाना बाटवून ख्रिस्ती बनवले पण त्यांचे रंग रूप युरोपातील पोर्तुगीजांसारखे झाले नाही, धर्म बदलला पण रक्त बदलले नाही, भाषा बदलली पण माणसे तीच राहीली. परमेश्वर त्याना सुखात आनंदात ठेवो हीच प्रार्थना !
वसई सोडून 15 वर्षे झाली पण तुमचा व्हिडीओ बघितला... क्रिस्ती बंधू बघिणी बघितल्या 🙏🏽 भाषा, पोशाख, ते नाक्या नाक्या वरील क्रॉस 🙏🏽 डोळ्यात पाणी आलं....ब्लॅक केक नी वाईन ची आठवण झाली 😍 डिमेलो भाऊ, व्हिडीओ साठी धन्यवाद
सुरेश जी व्हिडिओ सुंदर आहे मनापासून आवडला या निमित्ताने आम्हाला नवनवीन प्रकारच्या लोकांची / एरियाची माहिती मिळाल्याने भटकंती/पर्यटन केल्यासारखे वाटते आपले धन्यवाद
सुनील भाषा जपण्या साठी प्रत्येकाने घरात कटाक्षाने बोलली पाहिजे का ती कुठली हि असो.... त्या भाषेचे माधुर्य आपल्या मुलांना समजावले पाहिजे.. भाषा जपली तर आपल्याला त्या भागाचे वै शिट्य समजेल... प्रत्येक भागाचा एक इतिहास समजता येईल..
Very good information.... In Diu also there are some families who speak Portuguese ... But most of the Possibilities speaking families have shifted to Lisbon
कोर्लई गाव छान आहे. सुरुवातीला दाखवलेला चर्च आणि त्याच्या बाजूचा परिसर खूप छान होता.प्रत्येक भाषेचा आपला गोडवा आहे. तो जपण गरजेच आहे.पोर्तुगीज भाषा ऐकायला छान वाटली
सुनीलजी तुम्ही आम्हाला छान माहिती दिली आहे तुमच्या मेहनती बद्दल धन्यवाद तुमचा अभ्यास दांडगा आहे तुमच्या बोलण्याची शैली छान आहे देवाचा आशीर्वाद आपल्या वरती सतत राहो हीच सदिच्छा
I just visited Korlia some days back. Beautiful seashore. I am a Koli. My wife is from Nalla Sopara Gass. Moti Sargodi. Just opposite St. Gonsalio Grassaia church. Only want to inform you as Goan are getting Portuguese Citizens as they were under Portuguese. Are you getting the same benefits? If not Please also get this benefit.
iam from Goa, my father is to speak Portuguese, To keep history n language alive education department must keep second optional language Portuguese,I come to know from this video there is Portuguese other then Goa ,
Been there twice. The language is portuguese creole. Kudos to you for doing the video. The lady from Daman & Silvasa has raised my curiosity. If possible do make videos of portuguese language spoken in those areas.
मराठी भाषा ही खुप प्राचीन भाषा असून आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात बोल्ली जाते. कोकणात कोकणी, मराठवाड़ा मधे दखनी, विदर्भात वरहाडी, जळगावात खानदेशी. भाषेचा विकास व्हायला हवा, विभाजन नको. जय महाराष्ट्र 👍👍👍
कोकणी ही मराठी यात फरक आहे कोकणी एक साहित्यिक भाषा आहे आणि तीचे व्याकरण मराठी पेशा वेगळे आहे ती मराठी ची उपभाषा नाही. मालवणी ,कुडाळी, गोवन कोंकणी ह्या तीच्या उपभाषा आहेत
सुनिल जी, तुमचा आजचा विडिओ पाहून खुप आनंद झाला. कारण मी तुम्ही अशा कोकणपट्टीच्या किनार् यावर असलेल्या एका गावावर विडिओ बनवा अशी माझी इच्छा होती कि जिथे मराठी भाषा बोलली जात नाही. पण.... मी त्या गावाचा संदर्भ सांगू शकलो नाही आणि विषय मागे राहिला. आज मला खुप बरं वाटलं. खुपच माहितीपूर्ण विडिओ झाला. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अनिशा मॅडमचे धन्यवाद. विडिओ थोडा मोठा बनवायला हवा होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻 वसईच्या किल्ल्यानंतरचा BEST विडिओ.
सुनिल जी, असचं एक गाव कोकण किनारपट्टीवर आहे तीथे बरेचसा ज्यू समाज राहतो. त्यांचं प्रार्थना मंदिर सुध्दा आहे. इस्राईलच्या स्थापने नंतर ही ज्यू समाज आपल्या कोकणात रहात आहे. मराठी भाषा बोलतात आणि आपला दैनंदिन व्यवहार करतात. जर तुम्हाला त्यांच्या विषयी काही माहिती मिळाली तर जरूर एक विडिओ बनवा. आपल्या भारत देशाची विविधता समजण्यास मदत होईल. धन्यवाद. 🙏🏻
I am from Cuncolim Goa only Christian Brahmans used to speak portuguese as mother tongue most of whom left for Portugal goans are still leaving my father, uncles studied in Portuguese and spoke portuguese fluently, being portuguese citizens was fun, our mother tongue is konkani, hindus do speak Marathi previously 2nd language optional in schools in Goa
Sunilji you are providing us excellent information thanks for that. Your fluency in different languages is just phenomenal. May God bless you and you continue your good work.
कोर्लाई , एक नितांत सुंदर गाव. सुनिल, व्हिडीओ दोन भागामद्धे केला पाहिजे होता म्हणजे गाव आणि तेथील संस्कृतीविषयी सविस्तर माहिती पहायला आणि ऐकायला मिळाली असती. जनं जीवनही जवळून पाहता आले असते. असे व्हिडीओ विस्तृत रूपात केले पाहिजेत. आणि जर कोर्लाई ला जायचे असेल तर कसं जावं हे देखील कळलं असतं तर अगदी येथील मढ मनोरी सारखा आनंद घेता आला असता. 👍🙏
पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai
पोर्तुगीज दर्यावर्दी १४९८ साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली. ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला. तेथेच वसाहत बनवून जवळपास सव्वा दोनशे वर्ष चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर १७३९ साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला. त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतीकडे निघून गेले तर काही लोक कोर्लई चर्चशेजारी वसाहत करून राहू लागले.
अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते. कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे 'नॉलिंग' भाषा. नॉलिंग म्हणजेच 'आमची भाषा'. स्थानिक लोक आपल्या ह्या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील संबोधतात. काही अभ्यासक ह्या भाषेला 'क्रिओल पोर्तुगीज' देखील म्हणतात. ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आत्ता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे.
सध्याच्या घडीला जवळपास ८००-१००० लोक ही भाषा बोलतात.
चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्यावेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया.
विशेष आभार:
कोर्लई ग्रामस्थ
श्री. निलेश नाईक, चौल - अलिबाग
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ
ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
वसईतील लग्नसोहळा
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d.html
कुपारी संस्कृती
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3.html
#korlai #creole #noling #nolingportuguese #indiancluture #culture #languages
#sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai #culture #portuguese #portugueseindia
Kadhi gelelat Dada date sanga please.
Good presentation
Good presentation. I like
दादा तो गाव आपला आगरी कोळी लोकांचा आहे ना 💥❤️
@@touristguideassociationrai5081 जी, मी दिवाळीच्या सुट्टीत गेलो होतो. धन्यवाद
पोर्तुगीज संस्कृती आणि भाषा गोव्याच्या आणि दक्षिण कोकणा बाहेर महाराष्ट्रात उत्तर कोकण किनारपट्टीच्या बाजूला आहे हे तुमच्या मुळे माहीत पडले. त्याबद्दल धन्यवाद आणि या लोकांनी त्यांची संस्कृती आणि भाषा अजूनही जपली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वसंत जी
I’m Brazilian and I understand her singing, they have the sweetest accent 🇧🇷🇮🇳🇵🇹
Thanks a lot
Goan Inquisition. Listen to shefali vadiya
@@suchithraraghavan5335 All Portuguese and Spanish colonies went through the horrible inquisition at that time, it happened when the king of Spain annexed Portugal for almost a century and ruled as one country and ordered an inquisition in all of the realm, not just Hindus, bhudists, muslims, Native Americans, Jews, EVERYBODY at that time we were all under the Spanish crown not Portuguese even though they maintained their presence. That’s why it’s called the Spanish Inquisition not Portuguese inquisition. I’m sure they don’t teach you this in school.
@@thetravelholic6412 whatever didn't atrocities happen against hindus in goa,forcible conversion,destroyed temples.are u justifying all this.its not mythology its recorded.go to portugal.
@@suchithraraghavan5335 I’m not Portuguese but I went to Portugal and there’s tons of Indians there, and seem to like it. I would not be so narrow minded if I were you this is 2024 not the 1600s.
सध्या सगळ्याच भाषांची भेळ होत आहे. खूप दिवसांनी मी मराठी बोलणारा माणूस अख्ख वाक्य पूर्ण मराठीत बोलताना दिसला.. भाषेचं सौंदर्य तुम्ही टिकवून ठेवत आहात. वाह.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुलक्षणा जी
खरच खूप छान वाटतं तुमची मराठी भाषा ऐकून, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील.
छान विडीयो.... अजुनही नवनविन माहिती देत चला
@@krunalkawale5747 जी, खूप खूप धन्यवाद
@@umeshkamble9094 जी, नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
भाषा अनोळखी असली तरी ऐकला गोड वाटते कारण माणसं सरळ स्वभावाची आहेत त्या मुळे जवळीक लौकर साधली जाते.धन्यवाद सुनिल!
अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद
बऱ्याचवेळा कोर्लई किल्ला पाहण्याचा योग आाला पण कोर्लई गावाची ही वेगळी ओळख आपल्यामुळे कळाली. खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी
I.m Brazilian. At min 10, i understood the lady speaking " Ave Maria", Our Lady. " Ave Maria cheia de graça, o Senhor é Convosco, Bendita sos vós entre as mulheres, bendito é o fruto do vosso ventre, Jesus.". " Aqui vem", "o que ficou". Thank you.
That's so nice of you. Thank you Salde Ji
तुमच्या देशात शेतकरी मुलांची लग्न होतात का
Bro it's my village . Like we can understand a little bit Portugese,Spanish and brazillian Portuguese over the years the language is changing.
@@EnriquePlayz6000 It's fantastic. Thanks, very much.
It's hail Mary full of grace the lord is with you blessed are thou amongst women and blessed is the fruit of thy womb jesus
सुनीलजी खूप आनंद झाला हा व्हिडीओ पाहून,नोकरी निमित्ताने या गावाच्या जवळच गेली तीस वर्षांपासून राहतो. कोर्लई गावात माझे खूप मित्र आणि सहकारी आहेत.पारंपरिक पद्धतीने शेती आणि भाजीचा व्यवसाय करतात खूप कष्टाळू आणि प्रेमळ समाज आहे हा.त्यांची भाषा समजत नाही पण ऐकायला गोड वाटते.तुमच्या व्हिडीओत उल्लेख केलेले अल्बर्ट डिसोझा हे माझे सहकारी आहेत. ख्रिश्चन जीवन पद्धतीचा अनुभव ह्याच मित्रांमुळे घेता आला.तुमची भेट झाली असती तर माझा आनंद द्विगुणित झाला असता.
वाह! खूपच छान, संदेश जी. धन्यवाद
भाऊ ते लोक त्यांची भाषा बोलत आहे आणि तू आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिला बस इथं च मन जिंकलं भावा ❤️🫶🏻
धन्यवाद, ऋषी जी
सुनीलजी नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण खूप सुंदर व्हिडिओ तुम्ही ब्लॉग खूप अभ्यासपूर्ण बनवता
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
ग्रेट सुनिल.. तुमचं मनापासून कौतुक! अशी काही भाषा मुंबई पासून इतक्या जवळ असणा-या अलिबाग जवळच्या छोट्याश्या गावात बोलली जात असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे ही माहिती समजली. खूप खूप आभार. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली.
तुमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला साथ देतं.. त्याकरिता अनिशा आणि एलिन, रायझल ह्यांचेही कौतुक..
अनिशा, तुम्ही दोन्ही लेकींना खूपच छान संस्कार देत आहात. देव बरे करो.. मनापासून शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओ करिता डिमेलो कुटुंबियांचे आभार.
आपल्या प्रोत्साहनपर व सकारात्मक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Khup Chan vatle me sudha alibagcha aahe.pan mala he portugij gaav Aaj samjal.khup khup dhanyavaad mahiti dilyabaddal
खुपचं छान 👌👌👌👌👌
This is the unique feature of indian society..... diversity is the strength...
You said it right, Avinash Ji. Thank you
Your Marathi is much fluent than majority Maharashtrians whose mother tongue is Marathi...Nice video
Thanks a lot, Mahadev Ji
Yes... indeed.... 😂❤
सुनीलसरांची मातृभाषा मराठीच असणार
तुम्ही fluent मराठीत शेवटी कधी बोलला होता
What made you think his mother tongue is not Marathi? He is converted Christian
अलिबाग येथे वारंवार जाणे होते, कोरलाई बद्दल बरेच काही ऐकिवात होते त्यामुळे येथे ही एकदा गेलो होतो पण आपल्या सुंदर माहिती पूर्ण ब्लॉग मुळे खूपच माहिती मिळाली👌
नेहमीच उत्तम खजिना👌
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
Vasai chi language tar majhi khup ch favorite ahe.. ani hi new language aaikaila bhetli aaj...tithli gav pan khup sadi ahet agdi juni ghara vigre tithe pahila bhetli.. really thanks for taking such efforts and making this wonderful video.. Jesus bless you and your team💫
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ऐश्वर्या जी
विवीधतेने नटलेली भारतातील संस्कृती जपलीच पाहिजे.खुपच छान सुनिलजी. Thanks, I am so glad to see such beautiful videos.🙏🙏💐🌹
खूप खूप धन्यवाद, सविता जी
Aaji Bai kiti chhan ahet, typical Indian aaji doesn't matter language or religion. The care is in blood
अगदी बरोबर बोललात, अँडी जी. धन्यवाद
I am now far from India and Portugal, but my heart, soul, and blood is still very connected to both (we have an ancient connection that cannot be broken). Beijinhos❤️🇵🇹❤️
Thanks a lot
Amalgamation of various cultures results in this beauty!!
Thanks much for showing this different culture to a person from plains of mid Maharashtra like me!! ❤️
Thanks a lot, Suyog Ji
खुपच छान माहिती दिली त
धन्यवाद, गणेश जी
Lovely village with interesting history and simple warm hearted people. Hats off to you Sunil for bringing forth such nostalgic videos!!!
Thanks a lot for your kind words, Edgar Ji
History and all is alright but main problem is water bro we don't get water on daily basis and electricity is a big issue too. This is why many people prefer living in Mumbai .
Visited this place 3 yrs back. U will get to see people wearing Eastindian Lugra too. Very Loving people. They speak mixed language.Thks Sunil for the coverage.
Thanks a lot for sharing this information, Cinderella Ji
खुप छान माहिती मिळाली मला हा एपीसोड खुप आवडला आणि नविन संस्कृतची माहीती पण मिळाली.धन्यववाद आपला
खूप खूप धन्यवाद, विजय जी
Good video about the Portuguese Goan & languages. Ok thanks
Thank you, Vijay Ji
khup chhan aj kahitri navin mahiti milali tumchyamule
धन्यवाद, जर्वीस जी
I received this video from a friend. It was such charming experience to watch the entire video. I am from Goa and seeing the Portuguese speaking people of Korlai, their simple, unaffected manner, their candour, their pride in speaking their language "nosling" , gave me a sense of belonging to the place. Also, in the 1950s my uncle (Father Ignatius Fonseca) was a priest in that area; i remember he came for the Exposition of St Francis Xavier in Goa with a group of parishioners who stayed with us and that is when, for the first time, I heard a strange, sing song version of Portuguese that greatly amused everyone. I look forward to your videos, Sunil, and wish you the very best.
Wow, thanks a lot for Sharing the beautiful memories and also for your kind words og appreciation. Thank you, Antonio Ji
Go to portugal.ur ancestors converted for money.sold dharma.ur kuldevta won't spare u
अलिबाग मध्ये स्वागत 💐 korli गावाबद्दल छान माहिती आपल्या माध्यमातून पोहचवली सर्वापर्यंत 👍
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
भारतीय आणि इतर देशातील पद्धतीची सांगड आपल्या चॅनल मार्फत आम्हास पहावयास मिळते.
वा फार छान
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी
फारच सुंदर,,, एक नवं दालन उघडले.. आनंद झाला.... धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
SHRI SUNIL JEE Dhanyawad ! Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!
खूप खूप धन्यवाद, विजया जी
सुनीलजी, आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला. आगदी वेगळ्या विषयावर आहे हा व्हिडिओ. गावातल्या नागरिकांना सहज बोलते करण्याची तुमची हातोटी अनोखी आहे. प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असतेच ! इथे तर 2 देशांची संस्कृती एकत्र आली आहे. कोणी भाषा शास्त्राच्या विद्यार्ध्याने यावर P hd केली पाहिजे. त्यामुळे सखोल डॉक्टूमेंटेशन होईल. खूप छान वाटले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा!!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
कोर्लई गाव आणि तिथल्या लोकांची, त्याच्या संस्कृती, रितीरिवाज व भाषेची फार चांगली ओळख करून दिली...👌 खुप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद
सुनील जी आपण महाराष्ट्रातल्या खास करून ठाणे रायगड मधल्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात आणि त्याकरिता इतकी मेहनत घेतात ते कौतुकास्पद आहे.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
Hi apli sanskruti nahi
खुपच छान माहिती मिळाली....आपल्याच जवळपास असून नव्यानेच माहित झाले...धन्यवाद सुनिलजी....
धन्यवाद, वैभव जी
मला तर माहितच नव्हतं की आपल्या देशातील एक गाव पोर्तुगीज भाषा बोलत आहे ,सुनील जी खुपच छान विडिओ आहे धन्यवाद, भाषा ही नेहमी महानच आहे मग ती कुठलीही भाषा असो
अगदी बरोबर बोललात, साशा जी. धन्यवाद
Wow
मला फारच आवडला हा एपिसोड
या गावाशी भेट करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनीलजी 😊
खूप खूप धन्यवाद
Nice information. I am from Goa and as you know Goa is a Portuguese speaking state......but not so much now!
Most of the Goan have gone to greener pastures and people from other states have made Gia their home.So death of Goan culture,language and tradition. Thanks to the few who strive hard to keep these alive!
Thanks a lot for the information, Tina Ji
What about Portuguese invaders destroyed native culture of GOA
@@nareshshingote8081 they invade with the help of Hindu bamon for their greed by suppressing lower caste people of Goa. If you see now most of the land and temples in Goa belong to Hindu high caste bamon which were grabbed with the help of Portuguese laws .
@@nareshshingote8081 If it was destroyed you wouldn't see any.
That's called being Portuguese slaves of india.
वाह
खुप दिवसांनी चांगला व्हिडिओ पहायला मिळाला....
महत्वाचे म्हणजे सादरीकरण खुप सुंदररित्या केले आहे सुनीलजींनी....
खुप खुप धन्यवाद सुनीलजी...
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
छान माहिती दिली धन्यवाद सुनील डिमेलो जी
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
This should definitely be declared an indigenous & endangered language . Special efforts should be made to preserve this language which is really so unique .
Thank you, Meghan Ji
Beautiful language n history should always be preserved...history is beautiful
Thanks a lot, Mickey Ji
It's foolish to think this history is beautiful.
Chhtrapati shivaji maharaj ki jai 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
धन्यवाद
म्हणतात ना वेशी सोडल्या शिवाय अनुभव येत नाही, ते पोर्तुगीज इथे आले राहिले राज्य केलं, स्वतःची संस्कृती मांडली, त्यांचं राहणीमान.... अन् आपण उठलं की जय शिवराय, जय भीम, जय हे,.. जय ते.....💩💩💩
Don't treat shivaji like a god
Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩
🚩🚩Jay shivray..🚩🚩
variety in variety. we are such a complex cultured but wonderful country thanks for the presentation.
Thanks a lot
Thankuoy sir छान video बनवला आहे तुम्ही
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही. आणि हा व्लॉगही खूप छान घेतला आहे, या चित्रणात गोडवा आहे, आपुलकी आहे. यांची भाषा कादोडी असो, नोलिंग असो, क्रिओल असो किंवा पोर्तुगीज असो,ही सर्व आपली भारतीय माणसे आहेत. हे भूमीपुत्र आहेत. ही इथेच राहणार. आमचा यांची वेगळी भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांना विरोध नाही, उलट आम्ही त्याचे स्वागतच करतो. या देशात शेकडोवर्षांपुर्वीपासून आम्ही पारसी, ज्यू यांचेही स्वागत केले, त्यानी आम्हाला व आम्हीही त्याना कधीही त्रास दिला नाही. उलट आमच्यात सामावून घेतले.
मात्र पोर्तुगीजांची भारतातील वसाहत ही आपल्या देशातील गोवा, वसई, चौल वगैरे भागात जुलमीपणाची होती, मूळ पोर्तुगीज आता कुठेच नाहीत, पण त्यानी जबरदस्तीने छळ करून धर्मपरिवर्तन (inquisition) केले त्याचे हे परिणाम आहेत. या निष्पाप जीवांचा काय दोष ? पोर्तुगीजानी यांच्या हिंदू पूर्वजाना बाटवून ख्रिस्ती बनवले पण त्यांचे रंग रूप युरोपातील पोर्तुगीजांसारखे झाले नाही, धर्म बदलला पण रक्त बदलले नाही, भाषा बदलली पण माणसे तीच राहीली. परमेश्वर त्याना सुखात आनंदात ठेवो हीच प्रार्थना !
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेंद्र जी
खूपच छान सुनील. अजूनही पोर्तुगीज भाषा कोर्लाईसारख्या आडवळणाच्या गावात टिकून आहे. तुम्ही त्याचा शोध घेतला हे खरंच कौतुकास्पद !
Keep it up
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
I learnt Portugese as a kid and I can still quite a few of it..had a chance to sing Portugese song for a Brazilian band...so good to see this video
That's great. Thank you, Sonam Ji
वसई सोडून 15 वर्षे झाली पण तुमचा व्हिडीओ बघितला... क्रिस्ती बंधू बघिणी बघितल्या 🙏🏽 भाषा, पोशाख, ते नाक्या नाक्या वरील क्रॉस 🙏🏽 डोळ्यात पाणी आलं....ब्लॅक केक नी वाईन ची आठवण झाली 😍 डिमेलो भाऊ, व्हिडीओ साठी धन्यवाद
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नवल जी
अतिशय स्वच्छता दिसली
सुनील छान माहिती देतोस
Keep it up
खूप खूप धन्यवाद, अंजू जी
khup divsani kharokhar tumcha video baghitalyacha anadnd zala.
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
Khup ch Sunder aahe gav
अगदी बरोबर बोललात, निखिल जी. धन्यवाद
आपल्या महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे ,मराठी भाषा च पण कीती फिरुन येऊन आज मराठीतच उलगडा होतोय, छान वाटलं ,वसईकर आपण फारच सुंदर व्हिडीओ बनवता.
खूप खूप धन्यवाद, आसावरी जी
माझा जन्म विरार मधला आहे. त्यामुळे तुमचे अर्नाळा, वसई चे विडिओ बघून खूप छान वाटतं.
खूप खूप धन्यवाद, संपदा जी
Hi
Hi
सुरेश जी व्हिडिओ सुंदर आहे मनापासून आवडला या निमित्ताने आम्हाला नवनवीन प्रकारच्या लोकांची / एरियाची माहिती मिळाल्याने भटकंती/पर्यटन केल्यासारखे वाटते
आपले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, वसंत जी
सुनीलजी....
खूप छान व्हिडीओ 👍चांगली माहीती मिळाली.. 👍 धन्यवाद...
Superb sunil sir
Jospin bai mazi sakkhi mawshi
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
खूप खूप धन्यवाद, मोना जी
फार सुंदर व्लाॅग....उत्तम सादरीकरण....ग्रामीण भाग असूनदेखील लोक अगत्यशील वाटतात...गांव सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे....
खूप खूप धन्यवाद, प्रसन्न जी
Super, both ladies were from Gass. I know both ladies nearly 40 years back I went to Dospins house. Very nice
I am from Gass only.
That's great, Elias Ji. Thank you
खूप मस्त सुनील नवीन माहिती दिली तुझा अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
खूप खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
खुपचं छान झाला आहे व्हिडिओ पहिल्यादा नवीन माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद, घनश्याम जी
Language is something that has always evolved over period of time ...good to see this video
Thanks a lot, Swapnil Ji
गाव छोटच असलं तरी पोर्तुगीज colony मध्ये फिरल्या सारखे वाटते . सुंदर संशोधन करून . माहिती आम्हा पर्यंत पोहचवले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐👍🏼👌👌
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
Very nice information about korlai village 👌I had gone there in last month its beautiful village ❤💐
Thanks a lot, Febian Ji
Tumhi khup chhan explain kela atishay mahatvachi mahiti sangitli thank you Sunil sir🙏👍
Thanks a lot for your kind words, Bhakti Ji
खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद....
खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
सुनील भाषा जपण्या साठी प्रत्येकाने घरात कटाक्षाने बोलली पाहिजे का ती कुठली हि असो.... त्या भाषेचे माधुर्य आपल्या मुलांना समजावले पाहिजे.. भाषा जपली तर आपल्याला त्या भागाचे वै शिट्य समजेल... प्रत्येक भागाचा एक इतिहास समजता येईल..
आपण अगदी बरोबर बोललात, संदीप जी. खूप खूप धन्यवाद
This refreshing to watch. Unique place.
Having subtitles in English will multiply your viewers by a big factor. thanks for doing that!
Thanks a lot, Albert Ji
Very nice information.Thanks for your efforts.
Thanks a lot, Shaila Ji
अप्रतिम 👌
सुनील दादा तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात!
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
खूप छान माहिती दिली. धन्यवाद!
धन्यवाद, परब जी
Very good information.... In Diu also there are some families who speak Portuguese ...
But most of the Possibilities speaking families have shifted to Lisbon
Thanks a lot for this valuable information, Janak Ji
कोर्लई गाव छान आहे. सुरुवातीला दाखवलेला चर्च आणि त्याच्या बाजूचा परिसर खूप छान होता.प्रत्येक भाषेचा आपला गोडवा आहे. तो जपण गरजेच आहे.पोर्तुगीज भाषा ऐकायला छान वाटली
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
I was waiting for this video for so long! Thank you so much Sunil Dada !
Thanks a lot for your kind words, Writhgen Ji
Very beautiful n studious work! Thanks Sunilji.
Thank you, Arvind Ji
सुनीलजी तुम्ही आम्हाला छान माहिती दिली आहे तुमच्या मेहनती बद्दल धन्यवाद तुमचा अभ्यास दांडगा आहे तुमच्या बोलण्याची शैली छान आहे देवाचा आशीर्वाद आपल्या वरती सतत राहो हीच सदिच्छा
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अल्बर्ट जी
सुंदर माहिती मिळाली 👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, जर्मन जी
भूतकाळात घेऊन गेलात.
खूप छान, सुनिलजी 👍
खूप खूप धन्यवाद, जगदीश जी
खुप सुंदर व्हिडिओ. आपण चौलला घेऊन गेलात अस वाटल. आपले व्हिडिओ खुप समाधान देतात.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
😊🙏🙏💐💐सुनीलजी.नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण वीडियो.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Wow Sunil. Thanks for the info. V r from Daman (Damao) and speak Portuguese. But v never knew of this town. Thank you so much for this new education👍
Thanks a lot
In Silvassa too , i miss Portuguese mass from Daman.
सुनिल सर , माझ्या आजीचे माहेर कोर्लई गावात आहे.
आम्ही वर्षा दोन वर्षाला कोर्लई गावात मामाकडे जात असतो
गाव आणि माणस खूप छान आहेत
I just visited Korlia some days back. Beautiful seashore. I am a Koli. My wife is from Nalla Sopara Gass. Moti Sargodi. Just opposite St. Gonsalio Grassaia church. Only want to inform you as Goan are getting Portuguese Citizens as they were under Portuguese. Are you getting the same benefits? If not Please also get this benefit.
हो, अगदी बरोबर बोललात, सर्व लोक खूप प्रेमळ आहेत. खूप खूप धन्यवाद, इमिली जी
Thank you for the information, Leonard Ji.
iam from Goa, my father is to speak Portuguese, To keep history n language alive education department must keep second optional language Portuguese,I come to know from this video there is Portuguese other then Goa ,
Thanks a lot for this valuable information
Ghanta konala yet NY Portugese. Ardhi urdhi Portugese bhashe chi vat laun takli Ani kaytari veglich bhasha banavli ahe.
Go to Portugal and save your language and keep there
खूप सुंदर माहिती मिळाली
धन्यवाद, कोमल जी
SO NICE EXCELLENT THOUGH I M A BORN MAHARASHTRIAN BROUGHT UP IN GOA LOVE TO SPEAK MARATHI AND PORTUGUESE
Thanks a lot, Antonio Ji
Appreciate your efforts. This is so informative🤯
Thanks a lot, Jeffrey Ji
Been there twice. The language is portuguese creole. Kudos to you for doing the video. The lady from Daman & Silvasa has raised my curiosity. If possible do make videos of portuguese language spoken in those areas.
Yes, we are planning to visit Silvasa as well. Thank you, Russell Ji
मराठी भाषा ही खुप प्राचीन भाषा असून आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात बोल्ली जाते.
कोकणात कोकणी, मराठवाड़ा मधे दखनी, विदर्भात वरहाडी, जळगावात खानदेशी.
भाषेचा विकास व्हायला हवा, विभाजन नको.
जय महाराष्ट्र 👍👍👍
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मयूर जी.
जय महाराष्ट्र!
शब्दांचे उच्चार, हेल[टोन], हे ही अनेक ठिकाणी वेगवेगळे असतात. आमचा कोल्हापूरी मराठी टोन, पुणेकरांची पुणेरी लकब, कोकणातील मराठी ...
सर्व सुंदर
कोकणी ही मराठी यात फरक आहे कोकणी एक साहित्यिक भाषा आहे आणि तीचे व्याकरण मराठी पेशा वेगळे आहे ती मराठी ची उपभाषा नाही. मालवणी ,कुडाळी, गोवन कोंकणी ह्या तीच्या उपभाषा आहेत
@@CrystalCraft-s6f exactly Malwani is a dialect of konkani.. But people think that it's dialect of Marathi
Wah far chaan Sunil tumhi khup chaan chaan mahiti shodhun kadhta kadhi kadhi aamhala mahit hi naste khup chaan mahiti dilya baddel Dhanyawad 🙏Ashech navnavin video tumhi gheun yave hya sathi Shubhechha 🌹🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
Khup zabardast presentation bhau 👌🏽👌🏽👌🏽
खूप खूप धन्यवाद, राज जी
*Sunil once again unique content* 😎
*Glad you showcased, now more folks will visit this Portuguese speaking village* 🙌🏽
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
सुनिल जी, तुमचा आजचा विडिओ पाहून खुप आनंद झाला. कारण मी तुम्ही अशा कोकणपट्टीच्या किनार् यावर असलेल्या एका गावावर विडिओ बनवा अशी माझी इच्छा होती कि जिथे मराठी भाषा बोलली जात नाही. पण.... मी त्या गावाचा संदर्भ सांगू शकलो नाही आणि विषय मागे राहिला. आज मला खुप बरं वाटलं. खुपच माहितीपूर्ण विडिओ झाला. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अनिशा मॅडमचे धन्यवाद. विडिओ थोडा मोठा बनवायला हवा होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻 वसईच्या किल्ल्यानंतरचा BEST विडिओ.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
सुनिल जी, असचं एक गाव कोकण किनारपट्टीवर आहे तीथे बरेचसा ज्यू समाज राहतो. त्यांचं प्रार्थना मंदिर सुध्दा आहे. इस्राईलच्या स्थापने नंतर ही ज्यू समाज आपल्या कोकणात रहात आहे. मराठी भाषा बोलतात आणि आपला दैनंदिन व्यवहार करतात. जर तुम्हाला त्यांच्या विषयी काही माहिती मिळाली तर जरूर एक विडिओ बनवा. आपल्या भारत देशाची विविधता समजण्यास मदत होईल. धन्यवाद. 🙏🏻
@@sawantvilas5277 जी, हो ह्या विषयावर देखील जरूर व्हिडिओ बनवू. धन्यवाद
Something Great Experience 👍 great coverage
Thank you, Shirke Ji
Chan mahiti milali hya gavavishai he gao mahit navte. Bhashevishai Sundar mahiti dhanyawad sir
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
I am from Cuncolim Goa only Christian Brahmans used to speak portuguese as mother tongue most of whom left for Portugal goans are still leaving my father, uncles studied in Portuguese and spoke portuguese fluently, being portuguese citizens was fun, our mother tongue is konkani, hindus do speak Marathi previously 2nd language optional in schools in Goa
Thanks a lot for this wonderful and valuable information, Indira Ji
My mums Family is from Cuncolim too
Que lindo ela rezando
What is Christian Brahman
Converted by force by portugese @@pratikshad4543
Sunilji you are providing us excellent information thanks for that. Your fluency in different languages is just phenomenal. May God bless you and you continue your good work.
Thanks a lot for your kind words, Hemant Ji
माहिती प्रद सुंदर व्हिडिओ 👌👌
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
आम्ही भेटून आलो आहोत इथे कोरलाई ला.खूप छान आहे ठिकाणं. एकदा तरी पाहावं अस
धन्यवाद, पूजा जी
सुनील फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे. Please keep it up. Wish you all the best
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
कोर्लाई , एक नितांत सुंदर गाव. सुनिल, व्हिडीओ दोन भागामद्धे केला पाहिजे होता म्हणजे गाव आणि तेथील संस्कृतीविषयी सविस्तर माहिती पहायला आणि ऐकायला मिळाली असती. जनं जीवनही जवळून पाहता आले असते. असे व्हिडीओ विस्तृत रूपात केले पाहिजेत. आणि जर कोर्लाई ला जायचे असेल तर कसं जावं हे देखील कळलं असतं तर अगदी येथील मढ मनोरी सारखा आनंद घेता आला असता. 👍🙏
अगदी बरोबर बोललात, संदीप जी मात्र वेळ कमी असल्याने जास्त माहिती घ्यायला जमलं नाही. धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती मिळाली 👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, बेलींडा जी