पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या गावात 🛖 फक्त चार माणसं कशी राहतात बघा | Village life | paayvata

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या गावात 🛖 फक्त चार माणसं कशी राहतात बघा | Village life | paayvata
    #villagelife #dhangarijivan #village
    रोजगाराच्या, शिक्षणाच्या आणि भविष्याच्या शोधात लोकं गावं सोडून शहराकडे धावू लागली तशी गावं ओस पडू लागली.. आपल्या महाराष्ट्रात आज अनेक अशी गावं आहेत जी कधीकाळी माणसांनी फुलून गेलेली होती आणि सुखी संपन्नही होती नंतर मात्र काळाच्या ओघात अशी अनेक गाव निर्जन झालीत.
    मी अशाच्या एका गावाला जे अगदी कोकण कड्यामध्ये स्थित आहे, ज्या गावात फक्त तीन ते चारच लोकं राहतात..
    सध्या गावातील युवा वर्गाने गावाच्या विकासासाठी जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे.
    अनेक सन उत्सव गावी येवून मोठ्या उत्साहात साजरे करतात.
    त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो.
    आणि गाव पुन्हा सोनेरी क्षणांनी बहरो ह्याच शुभेच्छा.
    या दुर्गम आणि निसर्ग संपन्न भागात ही ४ माणसं कशी राहतात हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. कृपया राजकीय कमेंट करू नये.
    अनेक लोकांनी या व्हिडीओ च्या शेवटी कमेंट केल्या आहेत की आपण त्या बाबांना काही आर्थिक स्वरुपात मदत करायला हवी होती.
    तर झाले असे की डिजिटल पेमेंट च्या सवयी मुळे त्यादिवशी माझी कडे एकही रुपया नव्हता.
    पानशेत या ठिकाणी ATM ची सुविधा आहे त्या ठिकाणी आपल्याला काही खर्चा साठी पैसे काढता येईल असे वाटले होते परंतु या गावी जाणारा रस्ता हा पानशेत च्या आधीच आहे आणि त्यामुळे माझे पैसे काढायचे राहून गेले.
    तरीही मि काही खाण्याच्या गोष्टी जसे की बरेचसे बिस्किट्स वगैरे सोबत ठेवलेले होते जेणेकरून करून दुर्गम भागात वाटेत कोणी भेटले तर त्यांना देता येईल.
    आपण काही खायला देतोय हे व्हिडीओ मध्ये दाखवणे मला उचित वाटत नाही. आणि ते गरजेचे देखील आहे.
    त्यामुळे कृपया कोणीही गैसमज करून घेवू नये.
    त्यादिवशी जवळ पैसे नसल्याने आणि ग्रामीण भागात ननेटवर्क नसल्याने स्वत माझी देखील बरीच गैरसोय झाली होती. असो..
    धन्यवाद !
    महेश
    -----------------------------------------
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    -----------------------------------------
    ignore Hashtag:
    #paayvata
    #Maharashtra_village_lifestyle
    #dhangarijivan
    #marathinews
    -----------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    UA-cam Music Library
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @meenakshikhadsare7185
    @meenakshikhadsare7185 Місяць тому +229

    मी संजय खडसरे आरोग्य सहाय्यक म्हणून काम केले आहे 2013 ते 2023 पर्यंत या गावात काम करत होतो माझ्याबरोबर श्री तांबोळी फिरोज हे आरोग्य सेवक म्हणून मागील सात वर्षे काम करीत होतो प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची सुविधा पुरवत होतो सगळ्या लहान मुलांचे लसीकरण शून्य वयोगट ते 10 वयोगटातील सर्व बाळां चे लसीकरण पूर्ण केले आहे एवढ्या खडतर आणि अवघड असणाऱ्या गावांमध्ये आम्ही दर महिन्याला येथील सर्व माणसांना आरोग्य सेवा पुरवत होतो माणसे खूप प्रेमळ आणि माया लावणारे आहेत आरोग्यसेवा

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +6

      👍🙏

    • @amoljagtap3152
      @amoljagtap3152 26 днів тому +1

      Gavaca sharasarka vikas nako ahe...fakt prathmik suvidha purvlya pahijen...nahitar gavac gaopan rahnar nahi

    • @pratibhamalik2865
      @pratibhamalik2865 26 днів тому +10

      खडसरे तुमचं आणि तांबोळींच मनापासून कौतुक, आणि खूप खूप अभिनंदन. हे चित्र बघून मनात कालवाकालव झाली. मन सुन्न झालं. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची सेवा केली. आत्ता इथे वास्तव्यास असलेल्यानां चांगल्या सुविधा लवकर मिळू देत ही परमेश्वरा चरणी प्रार्थना.❤❤

    • @vivekm7971
      @vivekm7971 18 днів тому

      ​@@amoljagtap3152Khar ahe
      Cement cha vikas krun khup dukh hote

    • @truptikulkarni289
      @truptikulkarni289 17 днів тому +2

      Great

  • @ravindrapharande4716
    @ravindrapharande4716 Місяць тому +965

    खानू पुणे जिल्ह्य़ातील पश्चिमेकडील शेवटचे गाव. या गावात मी एकदा निवडणूक कर्मचारी म्हणून काम केलंय. तेव्हा तेथे 125 मतदार होते. 95 मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. माणसं खूप मोकळ्या मनाची. मी रवींद्र शंकर फरांदे, ओझर्डे ता. वाई जिल्हा सातारा. धन्यवाद. ❤❤❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +26

      धन्यवाद 🙏

    • @swapnilgaikwad6803
      @swapnilgaikwad6803 Місяць тому +47

      खरोखरच डोंगर कपारीतील लोकं मोकळ्या मनाची असतात 👍

    • @amolpacharne3279
      @amolpacharne3279 Місяць тому +17

      महेश सर खूप खूप धन्यवाद

    • @ruparedkar6351
      @ruparedkar6351 Місяць тому +17

      काय बोलायचे शब्द ch नाहीत man sunna jhale आहे तुम्हाला Pranam 🙏🙏की आपन त्यांची व्यtha Sarvan समजावे म्हणून प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद देते आपणास धन्यवाद

    • @prakashbhoir5171
      @prakashbhoir5171 Місяць тому +5

      Khup sundar gavache darshan ghadavale Abhari ahe tumcha🙏🙏

  • @tanujapatil7769
    @tanujapatil7769 Місяць тому +65

    निवडणुका संपल्यावर सगळ्या नेत्यांना सुट्टी म्हणून या गावात नेवून सोडायला हव, वास्तविकता कळेल त्यांना पण...

    • @user-vg4si2ll2z
      @user-vg4si2ll2z 8 днів тому

      Ho kharach

    • @user-pd4tw3lr4v
      @user-pd4tw3lr4v 8 днів тому

      या मध्ये नेत्याची चूक नाही जर पैसे घेऊन मतदान करत असतील तर नेत्याचे काम सोपे जो पर्यंत वंचित समाज जागृत नाही होणार हेच चित्र पहावे लागेल श्रीमंत लोक गरीबI कडे लक्ष देणार नाही

  • @PriyankaMore-cc7bl
    @PriyankaMore-cc7bl Місяць тому +209

    मी सहसा कोणत्या व्हिडिओ ला कॉमेंट नाही लिहित पण आज तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप भावूक झाले खरंच ही पिढी संपुष्टात चालली आहे लहानपणी उन्हाळी सुट्टीत गावि जायचो आम्ही पूर्ण गाव भरलेलं असायचं आता शिक्षण नोकरी साठी बहुतेक लोकांनी मुंबईची वाट पकडली आहे त्यामुळे अशी निसर्गरम्य आपली गाव ओसाड पडत आहेत हे पाहून खूप दुःख होत आहे आणि ही जाणीव पण होतेय की डोक्यावर पदर ९ वारी साडी धोतर पेठा आणि हातात काठी आणि तोंडी पान आणि नातवंडांना बघून तोंडातून आपुलकीने पडणारे शब्द बाय लेका हे सारं काही अनुभव घेणारी आपण शेवटची पिढी आहोत या पुढील आयुष्यात ही आजी आजोबा असतील पण त्यांचं हे रूप मिळणं कठीण आहे.... आणि त्याची जाणीव होते तेव्हा हृदय पिळवटून निघत.....तो निरागस पणा चित्रपटातील गोष्टी खरी मानणारी विलन जेव्हा हिरो ला मारतो तेव्हा त्याला शिव्या देणारी अशी निरागस पिढी आता संपुष्टात येत चालली आहे........ तुझा हा व्हिडिओ पाहून खूप भावूक झाले....

    • @siraj313_
      @siraj313_ Місяць тому +4

      barobar bollat tumi dada

    • @vijyalaxmimuliya870
      @vijyalaxmimuliya870 Місяць тому +7

      अगदी खर आहे. तुमचे करावे tewade तुमचे कौतुक व अभिनंदन कमी आहे. तुम्ही अजून भावना जपले

    • @dipakkhandagale8802
      @dipakkhandagale8802 29 днів тому +1

      👍

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt 23 дні тому +2

      😢😢😢😢

    • @sachinmore3374
      @sachinmore3374 13 днів тому +2

      दादा हि कमेंट वाचून माझ्या आजी आणि आजोबा ची आठवण झाली.

  • @vijayaghevade6342
    @vijayaghevade6342 16 днів тому +27

    यांना काही मदत करता आली तर किती आनंद होईल. समाजात अजून खूप चांगली तरुण मुले, मुली आहेत त्यांनी मनावर घेतले तर, आणि अशा प्रकारच्या मदतीसाठी आव्हान केले तर, खूप सारी मदत, विविध प्रकारे करता येईल. आवडेल असे, गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचायला!🙏

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn Місяць тому +694

    फक्त वीस वर्षांच्या आत शहरातील दगदगीला कंटाळून सगळे निसर्गाच्या कुशीत पळतील 101%

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +25

      अगदी 👍

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 Місяць тому +23

      144 कोटी लोकसंख्या आहे भाऊ भारताची सध्या,
      20 वर्ष गाव राहूदे सरळ झाड तरी बघायला मिळतील का.....

    • @mm45454
      @mm45454 Місяць тому +19

      💯, मि स्वतः त्या मार्गावर आहे 🙏

    • @subodhsonawane2691
      @subodhsonawane2691 Місяць тому +5

      ती बरोबर बोलला

    • @shilpa3544
      @shilpa3544 Місяць тому +1

      Barobar mi pan parat vichar kartey punha swata kasht karun jagayche
      City madhe khup swarthipana ahe
      Pan zade ani forest jya gantine nashta kartayt bagun bhiti vattyey

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 Місяць тому +263

    गावची माणस किती मायाळू असतात... बाबांनी ते फणस दिलं.... मन अगदीच भरून आलं यार.... खेड्यातील माणसं खरोखर देव माणसं असतात ❤

  • @SanjhayPawar
    @SanjhayPawar 17 днів тому +35

    मी संजय तानाजी पवार मु. आरफळ तालुका सातारा मी या गावात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिला मतदान अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यावेळेस आम्ही सर्व निवडणूक कर्मचारी डोंगरकडेने दोन तास पायी चालून नंतर गाव दिसले गावातील माणसे खुप प्रेमळ फक्त 95 मतदान झाले होते. मतदान काम झाले नंतर गाव सोडताना खूपच वाईट वाटत होते आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अविस्मरणीय आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत मी आपला खुप खुप आभारी आहे.❤❤

    • @paayvata
      @paayvata  17 днів тому

      धन्यवाद सर 🙏

  • @ajayshitkar8271
    @ajayshitkar8271 Місяць тому +163

    शेवटी किती अपलुकिनी तो माणूस येवढं लांब गेला आणि फणस डोक्यावर घेऊन आला , ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे , जुनी लोक ती एक नंबर च आजकाल अशी माणुसकी कमी कमी होत चाललेली दिसते 🙏🏼

  • @educationandcreativity1989
    @educationandcreativity1989 Місяць тому +111

    Mi 2010 ते 2016 ...6 years as a teacher mhanun kam kel....Digewasti - khanu yethe. 6 years व्हिडिओ मधील व्यक्तींसोबत राहिलो . Rathod Sachin.

  • @user-bx6ck5vk3w
    @user-bx6ck5vk3w 3 дні тому +2

    आजोबांचे प्रेम पाहून मन गहिवरून आले.
    शहरात एवढं प्रेम नक्कीच शोधून सापडणार नाही.

  • @dattatrayabarkale7635
    @dattatrayabarkale7635 Місяць тому +62

    निशब्द केलस मित्रा.....
    परीस्थितीने गांजलेली पण मनाने श्रीमंत असलेली शेवटची पिढी...

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @dattadhindale8001
    @dattadhindale8001 Місяць тому +96

    इथला प्रत्येक माणूस पैशाने नाही मनाने खुप श्रीमंत आहे‌.. हे तुम्ही पण अनुभवल असेल दादा... आमची पण ह्या गावाला कोरोनाच्या काळातील भेट झाली आहे...
    इथल्या एका बाबांना मी एक प्रश्न विचारला होता कि बाबा तुम्हाला ह्या घरांच्या बदल्यात खाली शहरात जवळपास घर(थोडक्यात पुनर्वसन) दिले पाहिजे. तर ते मला म्हणाले नको रे बाबा आम्हाला किड्यामुंग्यासारख जीवन नाय जगायचं...

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +9

      हो, वयक्तिक माझी देखील तीच धारणा आहे. हे जीवन सर्वात भारी असते त्यांच्या जगाकडून काहीही अपेक्षा नाहीयेत फक्त किमान पायाभूत सुविधा असतील तर त्यांना इतर ठिकाणची कधीच ओढ लागणार नाही आणि नसेलही... खरे शाश्वत जीवन तर तेच आहे

    • @mm45454
      @mm45454 Місяць тому

      ​@@paayvata 💯👍

    • @jagdishdevlekar1358
      @jagdishdevlekar1358 Місяць тому +3

      फक्त परमेश्वराच्या कृपेने या माय बापांचे पाण्याचे हाल दूर होऊदेत हीच सदगुरु चरणी प्रार्थना..🙏🙏

  • @pavanrajyadav7563
    @pavanrajyadav7563 Місяць тому +105

    राजकीय कारकीर्दीत एकच माणूस भारी वाटला अमोल नलवडे

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 Місяць тому +15

      जि प सदस्य मा श्री अमोल नलावडे यांनी दुर्गम भागात लोकांसाठी खुप कामे केलेली आहेत

  • @spore8617
    @spore8617 Місяць тому +210

    आमची फॅमीली अशा गावात कायमस्वरूपी जायचा विचार करत आहे, ह्या शहरी जीवणाचा आता कंटाळा आला आहे, शांत जीवण जगायचं असेल तर अशाच ठिकाणी जायला हवं

    • @PrashantMarathe-dd9kd
      @PrashantMarathe-dd9kd Місяць тому +8

      मीही अशीच जागा शोधत होतो. आता जाईन. तिथे.

    • @rp-tp5vf
      @rp-tp5vf Місяць тому +18

      बोलणे सोप आहे करून दाखवा

    • @tanajidaundkar150
      @tanajidaundkar150 Місяць тому +4

      👌🏻विचार आहे

    • @timepass-mj6bs
      @timepass-mj6bs Місяць тому +16

      तिकडे जावून शहरीकरण करु नका.. म्हणजे झालं

    • @krushnalirudrake661
      @krushnalirudrake661 Місяць тому +7

      Bhau bolne sope aahe ajun 10 warshani 25% khedi oas padnar aahet

  • @sagarphadnis3852
    @sagarphadnis3852 Місяць тому +81

    😥😥गावाची अवस्था बघून खूप वाईट वाटलं
    आणि आजोबांनी किती प्रेमाने उन्हात चालत जाउन फणस आणले अशी प्रेमळ माणसे जपली पाहीजेत

  • @user-pe8ed3ty5d
    @user-pe8ed3ty5d Місяць тому +76

    मराठी संस्कृति जोपासण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे जय महाराष्ट्र

  • @jayawantkumbhar9781
    @jayawantkumbhar9781 Місяць тому +105

    महेश खूप छान माहिती दिलीस...आज तुझ्यामुळं खर वास्तव समोर आल आहे...संघर्षमय जीवनात देखील समाधानान् सुख शोधणाऱ्या शेवटच्या पिढी सोबत भेट आज तुझ्यामुळे घडली आहे...धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      धन्यवाद मित्रा🙏

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 Місяць тому +163

    मी अनेक दिवस अशाच दुर्गम गावाच्या शोधत होतो.खुप खुप आभार

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +2

      धन्यवाद 🙏

    • @user-sj2rg9yu5p
      @user-sj2rg9yu5p Місяць тому +5

      Suresh uncle apkli kahi sanklpana asel tar kalva maza pan sahbagh hoel

    • @DilDeshDuniyadari
      @DilDeshDuniyadari Місяць тому +6

      काय संक्लपणा आहे कळेल का अम्ही पण जॉईन करू.

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt 23 дні тому

      Me khrach khup bhauk zhalo mazya dolyatun aashru aale 😢😢😢

    • @ShrutiKore-xo7pn
      @ShrutiKore-xo7pn 13 днів тому

      Majhya dolyatun bisleri yevu laagle😢​@@TonyStark-yv7jt

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Місяць тому +44

    पाहताना सर्व निसर्ग रम्य वाटतं ,पण ना रोजगाराच्या संधी, आणि आज खेड्यातील तरुणांना लग्ना वेळी कोणी विचारत सुद्धा नाही .....त्याचाच परिणाम म्हणून सर्व खेड्यातील कमी जास्त प्रमाणात अशीच अवस्था आहे. आणि होत आहे.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Місяць тому +55

    खुपच अपरिचित गावाची माहिती मिळाली,ते ही पुण्यापासून फक्त 75 कि.मी. अंतरावर ही परिस्थिती आहे.

  • @pradeeprewale6089
    @pradeeprewale6089 12 днів тому +4

    रविंद्र आपल्या कोकणात आडबाजूला अशी खुप गावे राहणा-या माणसांवीना कुलूपबंद आहेत. कितीही आपत्ती आली तरी हे खरे कुणबी घाटावरच्या क्वाॅलीस, सफारी मधे फिरणा-या मराठी शेतक-यांसारखे आत्महत्या करत नाहीत.
    धन्य 🙏 हे कुणबी.

  • @shivajibaravkar6138
    @shivajibaravkar6138 День тому +1

    अमोल नलावडे जी फार प्रेरणादायी व गरीबांचे हित साधणारे राजकीय नेतृत्व आहेत.

  • @sudamkurhade5983
    @sudamkurhade5983 Місяць тому +55

    पायवाटा खरं आहे.
    अशी दिलदार माणसं भेटन दुर्मिळ.
    यालाच माणुष्कि म्हणायचे.
    भाऊ हा व्हिडिओ हिंदीत बनवा
    माणस कस जीवन जगतात.
    सरकार ला माहिती होऊ द्यावे.
    अच्छे दिन कि बुरे दिन..
    हे पुर्ण देशाला कळु द्या.

  • @Labra136
    @Labra136 24 дні тому +16

    गावच्या लोकांना खूप माया असते . शहरातली लोक बिझी वेळ नसतो त्यांना पण गावाकड गेलो तर कुठे बसवू आणि काय करु असे होते त्यांना गरिबाला माया असते हो .❤❤❤❤😊😊

  • @vilf9
    @vilf9 Місяць тому +51

    खुप कष्टाचे पण साधे तितकेच नैसर्गिक जीवन व देण्यासाठी कायम हात वर असणाऱ्या पिढी ला मुकणार, नमस्कार या मन श्रीमंत देवांना 🙏🙏🙏

  • @sagargorhe
    @sagargorhe Місяць тому +50

    2007 साली मी ह्या गावामध्ये गेलो होतो. Inter-Vida संस्थेच्या माध्यमातून...खूप लांब गाव आहे. आम्ही टेकपवळे गावातून चालत ह्या गावात गेलो होतो. ह्या गावाच्या शेजारील चांदर गाव पण खुप छान आहे.

  • @greencityinternetcafe4775
    @greencityinternetcafe4775 Місяць тому +97

    अतिशय दुर्गम भागातील कठीण वास्तव्य दाखवणारा व्हिडीओ किती समस्या येत असेल त्यांना जीवन जगताना या गावामध्ये .

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +3

      धन्यवाद 🙏

  • @ambarshinde1036
    @ambarshinde1036 19 днів тому +5

    2019 ला मी गेलो होतो खानु ला, तेव्हा बरेच लोकं होते,
    दिघी वस्ती च्या सरपंचांनी स्वतः जेवण बनवून खायला घातले होते....जबरदस्त माणस ❤

  • @ashokjadhav3847
    @ashokjadhav3847 29 днів тому +6

    आपण वेल्हे तालुक्यातील गावे दाखवता खूप छान वाटत अगदी अशा दुर्मिळ खेडोपाडी शिवकालीन पर्यटन स्थळ आहेत .

  • @BhagwatJadhav-rl4ky
    @BhagwatJadhav-rl4ky 29 днів тому +9

    नलावडे यांचं खरच खूप आभार
    आणि ह्या लोकांन साठी येवढं करतात म्हणजे खरच खूप भारी माणूस आहे
    नाही तर आजकाल चे नेते कुठं येवढं कोणासाठी करतात

  • @tusharkdesai6658
    @tusharkdesai6658 Місяць тому +27

    एक अनोळखी व्यक्ती आपल्या व्यथा ऐकून घेतल्या आपला पिण्याच्या पाण्याबद्दलचा संघर्ष जाणून घेतला...आपण काय तरी द्याव म्हणून त्यांनी आपुलकीने फणस तुम्हाला दिला ❤

  • @user-br7oz2df4k
    @user-br7oz2df4k Місяць тому +56

    खूप भयान आहे.
    परंतु तरी पण एवढ्या जिद्धी नी राहणाऱ्या या लोकांना सलाम 🚩

  • @pratikadhawade8300
    @pratikadhawade8300 11 днів тому +9

    अमोलशेठ नलावडे जिल्हापरिषद सदस्य ,कामाचा नेता ,1 नंबर माणूस

  • @jenitasport4344
    @jenitasport4344 5 днів тому +3

    हि स्मार्ट इंडिया नोदीजींची धन्य धन्य ते सहकार

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 Місяць тому +26

    असं वाटलं नाही पुणे जिल्ह्यात पण एवढं दुर्गम गाव असेल म्हणून,किती माणुसकी आहे इथल्या लोकांच्यात.खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ तुम्ही.

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 Місяць тому +7

    खूप मेहनत घेवुन बनवली फिल्म.धन्यवाद.लोकांसमोर परिस्थिती आणली.आणि नलावडे यांच्या सारखे लोकसेवक आहेत हे बघून अप्रुप वाटते.

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @user-dy6tt2wm4f
    @user-dy6tt2wm4f 29 днів тому +9

    किती गावातील माणसे प्रेमळ. आजोबानी लावलेले फणस मिळाले नातवाला

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 Місяць тому +35

    महेश जी तुमचा प्रत्येक vlog जीवाला रुख रुख लावणारा, पूर्ण मन आणि शरीर आतून ढवळूण काढणारा असतो. प्रत्येक शहरात राहणाऱ्या ग्रामीण माणसाला तुमचे vlogs बघून आपलं इथे काहीतरी राहिलंय, काहीतरी हरवलंय.आपण शहरात कृत्रिम जीवन जगतोय याची जाणीव होत राहते.... खरंच गांव आणि गावपण सर्व हरवत चाललंय. तुम्ही आमच्या सारख्यांसाठी जिवंत ठेवताय, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      धन्यवाद 🙏

  • @pralhadmhaskar2621
    @pralhadmhaskar2621 Місяць тому +24

    एवढ्या खडतर परिस्थिती मध्ये जीवन जगणाऱ्या माणसांना कोटी कोटी प्रणाम, इथे जाण्याचा मार्ग सांगा दादा.

  • @anilgamre9201
    @anilgamre9201 Місяць тому +37

    खुप ह्रदयद्रावक सत्य! आपण एकविसाव्या शतकात आहोत हे त्रिकालाबाधित सत्य स्विकारण क्लेशदायक आहे! खुप छान व्हिडिओ! पाहून माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! आभार

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      धन्यवाद 🙏

  • @sweetsanvi2824
    @sweetsanvi2824 Місяць тому +35

    मला खूप वाईट वाटले सगळे बघून... त्यांना साधं पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही.. राहतात ते घर पडकी आहे पण मंदिर मात्र पक्क आहे... देवाला सुद्धा दया येऊ नये😡

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Місяць тому +33

    शासनान/ स्वयंसेवी संस्थानीे अशी गांवे निधी देऊन प्राधान्याने गांवांना सुविधा देणे गरजेचे आहेSpecially लोकप्रतिनीधी / अधिकारी .

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      हो, पण शाश्वत विकास होणे गरजेचे आहे निसर्ग राखून

  • @brs5767
    @brs5767 Місяць тому +14

    आता ते सर्व गावकरी मुख्य प्रवाहात आले.सर्वच दुर्गम भागातील लोकं आता मुख्य प्रवाहात आले आहेत. शाळांसाठी मुलं मिळत नाहीत.प्रगती झाली !!!!

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 10 днів тому +4

    जिल्हा अधिकाऱ्यांनी ह्यांना गॅस पाणी लागणाऱ्या अनेक गोष्टी आणि पेन्सिल लागून करावी.

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Місяць тому +66

    किती भयाण शांतता आहे अवघी चार माणसं 😢

  • @pradeeptake4841
    @pradeeptake4841 Місяць тому +24

    प्रतेक ठिकाणी फिरताना माला मझ्या आज्जी चे बलपन दिसत् होते.❤

  • @janardhanbadge1654
    @janardhanbadge1654 Місяць тому +16

    काय बोलावे शब्द सुचत नाहीत शक्य असेल त्यांनी मदत करावी हे नम्र विनंती.

  • @rahulpagare2176
    @rahulpagare2176 Місяць тому +19

    खूप खूप खूपच सुंदर गाव आहे.तिथले घर,ते अंगण , अंगणात बसलेली आजी खूप छान आहे मलाही खूप आवडते असे गाव .मीही गावातच राहते पण आमचं गाव खूप सुधारत चालले आहे.माझ्या मुलीला ही खूप आवडतात अशी गावं ती फक्त १० वर्षांची आहे

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Місяць тому +6

    हे गाव पुन्हा आस्टित्वात यावे आणि
    बहरून जावे . शहरातील थोडी गर्दी इकडे आली तर ...हीच प्रार्थना. किती
    सुंदर निसर्ग आहेपण वस्ती नाही वाईट वाटते फणस पाहून आनंद
    झाला. किती दिलदार . ते आणून देणे
    किती मोठं मन त्या दादांचं... धन्यवाद हे वास्तव पाहायला मिळाले तुमच्यामुळे
    आली तर

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 Місяць тому +13

    वीस वर्षे कशाला पाहिजेत शहरात आत्ताच माणसं पोळतायत, आताच लोकांना गावाची आठवण व्हायला लागली आहे,

  • @narendrakumarpatil5147
    @narendrakumarpatil5147 Місяць тому +6

    आजोबाच्या हाती लावलेल्या झाड़े,त्यांचे फळं खायलं मिळाले ।देव पावले तुम्हाला।

  • @pravinainapure6388
    @pravinainapure6388 7 днів тому +2

    खर आयुष्य तेच जगत आहेत आपन फक्त भरपुर शिक्षण घेऊन लोकांची चाकरी करत आहे चार पैशासाठी

  • @shivshankarbachewad3512
    @shivshankarbachewad3512 Місяць тому +9

    आम्ही व आमचे मित्र . . . या परिसरात नोकरी केली . . खरचं याच परिसरात सहयाद्री सारख्या मोठया मनाची माणसे येथे राहतात . . खरे जीवन जगण्याची कला आम्ही येथेच शिकलो . खानूप्रमाणे घोल . दापसरे ही गावे देखील आम्ही २००७ साली निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा याची देही याची डोळा पाहिले . .

  • @pravinzagade5740
    @pravinzagade5740 Місяць тому +8

    घोल मध्ये मी सोलर चे काम केले होते...इथले लोक खूप स्ट्रगल करत जगतात...ज्यांना थोड कमी पडलं की ओरडतात त्यांना तिथं २-३ आठवडे सोडलं पाहिजे, म्हणजे समजेल आपण किती सुखात राहतो.

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Місяць тому +9

    खानु मधील गव्हाणे आणि गोरड कुटुंब अजून 4 घरे कोकणात रायगडच्या पायथ्याला असणाऱ्या आमच्या वारंगी गावात स्थायिक झाली आहेत.

  • @vijayatapkir8260
    @vijayatapkir8260 Місяць тому +4

    खरंच खूप चांगली माहिती मिळाली, ग्रामीण भागातील वास्तव भयानक आहे, गावात काही सुविधा उपलब्ध नसल्याने लोक गाव सोडून गेले, जर शासनाने तेथे सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोक राहतील. सध्या या चार माणसांसाठी तरी काही तरी करा. माणूस मयत झाल्यावर होणारे हाल तर वाईटच, धन्य ती माणसं आणि त्यांचे प्रेम

  • @user-io5hs1rf1h
    @user-io5hs1rf1h 18 днів тому +3

    खरच तुमच्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळे तुम्हाला खायला मिळणार हे एकूणच किती भारी वाटलं असेल तुम्हाला..😢😢

  • @Ganu.k.87028
    @Ganu.k.87028 10 днів тому +2

    मी वेल्हे मध्ये 2 वर्ष राहिलेलो आहे शिक्षणासाठी मी बीड चा आहे हा व्हिडिओ बघून अगदी मन भरून अल खूप आठवणी आल्या मला तिकडच्या माझ्या आयुष्यातील ते दोन वर्ष मी कधीचं नाही विसरणार.. खूप काय शिकायला भेटल मला.. तिकडची लोक खूप मायाळू.. बाळा शिवय बोलत नसाची.. विषय म्हणजे निसर्ग किल्ले दर्या धबधबे अँड त्या तालुक्या मध्ये खूप काय गाव आहेत छोटे छोटे.. मी कधीही पुण्याला आलो की मला तिकडची ओढ लागते कधी जाईल आस होत मला नक्की नोकरीला लागावं मी अँड मला तेच गाव भेटाव खूप इच्छा तिकडच्या लोकांची सेवा कराची.. अजून पण खूप आठवण येथे मला वेल्याची..

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Місяць тому +9

    सरकारने अशा लोंकाना सुविधा पुरवल्या पाहिजेत कारण हया माणसांमुळे गावाचं गावपण राहतं

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 Місяць тому +33

    या जुन्या पिडीचा ठेवा आपल्यालाच सांभाळायचा आहे आणी त्यासाठी सरकारने यात लक्ष घातलेच पाहिजे गावाखेड्यात जाऊन तिथली परिस्तिथी पाहून मदत केली पाहिजे मुलांसाठी शाळा तरुण वर्गाला रोजगार म्हाताऱ्या लोकांसाठी डॉक्टर हॉस्पिटल यावर काम झाले पाहिजे त्यात light पाणी सिलेंडर हे आहेच पण खर्च आपली गाव संस्कृती आणी जुनी मानस आपणच जपली पाहिजे❤

    • @kalyanikamble5981
      @kalyanikamble5981 Місяць тому

      Ho agdi barobar aahe dada tumch juni mans tyana japla pahije te aahet mhanun apan aahot khara tar tumhi khupach changla kama karat aahat ya madhe ankhi loka aek houn aale pahije apli sunskruti japli pahije khup Khup dhanywad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @madhavdarekar8735
    @madhavdarekar8735 18 днів тому +2

    उत्तम माहिती हृदय पिळवटून टाकणारी.मुलांनी गावाकडची ही अमूल्य आशि नैसर्गिक संपतती जपली पाहिजे.आणि आपल्या आई वडील.यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे

  • @rajendra505
    @rajendra505 2 дні тому +2

    ही तीन चार डोकी गेल्यावर काय होणार ह्या गावचे, मित्रा हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ😢
    पावसाळी ही लोक कशी राहत असतील.वास्तव दाखवल

  • @dayanandkhandagale4987
    @dayanandkhandagale4987 Місяць тому +9

    खरंच! हृदयस्पर्शी व्यथा मांडली आहे आपण😮😮❤❤

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Місяць тому +24

    छान चित्रण.. वेल्हे चां छान निसर्ग दर्शन झाले.. तसा हा तालुका जास्त पावसाचा म्हणुन ओळखला जातो.. पण आता भकास वाटला.. यंदा उन्हाने काहीली झालीय सगळीकडे.. चार घरांचं गाव पाहून आश्चर्य वाटलं.. मन व्याकुळ झाले.. कसे रहात असतील तेथील लोक...

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +3

      धन्यवाद

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv Місяць тому +13

    मुंबई-गोवा महामार्गावर पाली गावाच्या पुढेही खानू गाव आहे.हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात येते.

  • @nileshkhambe2452
    @nileshkhambe2452 8 днів тому +3

    खानु मधले गव्हाणे आमच्या वारंगी गावात स्थाईक झाले आहेत. अजूनही लग्न कार्यात त्यांच्या मूळ गावाचं नाव टाकतातच..... गाव खूप लांब राहिला असला तरी मन गावातच आहे..!!

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 Місяць тому +2

    प्रेरणादायी जीवनकार्याचे दर्शन घेतले व मन विचारमग्न झाले.... धन्यवाद 🌹👌👍

  • @anantwakure-ek5gr
    @anantwakure-ek5gr Місяць тому +6

    महेश चांगली माहिती दिली. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कॉलेजच्या सहली इत्यादी माध्यमातून आपण अशा दुर्गम भागातील गावांना सर्वांनी भेट देऊन काहीतरी करायला पाहिजे

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद, नक्कीच 👍

  • @rahulbhosale1900
    @rahulbhosale1900 Місяць тому +2

    खरंच., किती साधी,सरळ,समाधानी माणसे आहेत. नलावडे सर यांचे विशेष आभार.

  • @kevalkamble890
    @kevalkamble890 7 днів тому +2

    Wow... Picnic la firayla jaav yanchyakde.. so beautiful and interesting place ❤

  • @sheetaldarwatkar6888
    @sheetaldarwatkar6888 Місяць тому +9

    एप्रिल 2024 मध्ये मी ह्या गावांमध्ये गेले होते....श्री सत्य साई संस्थेतर्फे दरमहा ह्या गावात भाजी वाटप कार्यक्रम राबविला जातो. त्या निमित्त मी ही सर्व गावे बघितली आहेत...

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      चांगला उपक्रम राबवत आहात 🙏

  • @user-px9jm4ov3j
    @user-px9jm4ov3j 29 днів тому +3

    खुप बरं आणि मनमोकळ झाल बघून मला माझ्या अजी ची आठवण आली❤❤❤

  • @DeepakChavan-gt1ro
    @DeepakChavan-gt1ro 3 дні тому +1

    काय व्हिडीओ पहिला no one
    खूप मन हेलावून गेले.
    अतिशय सुंदर असे हे गाव, किती शांत झाले. काहीतर करा अन् गावात पाण्याची व्यवस्था करा.
    मी पुण्या जिल्हा तील सर्व पदाधिकारी अधिकारी एनजीओ नेते अश्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो की खानु गावाचा कायापालट करा.

    • @paayvata
      @paayvata  3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @santoshmore473
    @santoshmore473 Місяць тому +49

    मी ह्या गावी लहान पणी खूपदा गेलोय हे माझ्या आईचे गाव आहे

    • @dhaneshjarande1120
      @dhaneshjarande1120 21 день тому

      कोणता तालुका दादा आणि गाव कोणते आहे हे

    • @user-bn5dm4lp9f
      @user-bn5dm4lp9f 9 днів тому +1

      BHAI, AAI CHE GAAV AHE TAR MAG HYA GAVASATHI KAHITARI KARA,TAR TUJHYA AAILA VADILANA KHUP BHARUN PAVLYA SARKHE HOIL. ANI GAVATIL MANSANA SUDDHA. FAKT 1CH SANGANE, GAAV JAPAA, MANASE JAPAA, ANI NAATI PAN JAPAA. JEEVAN SUKHAMAY HOIL.!! JAY RAM KRISHNA HARI !!

    • @STPF_Commando
      @STPF_Commando 3 дні тому

      ​@@dhaneshjarande1120 खानू ता. वेल्हे

  • @dineshmahajan5871
    @dineshmahajan5871 Місяць тому +6

    भाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं ज्याप्रमाणे तुमच्या आजोबा या गावातले होते त्याप्रमाणे या गावातील इतर लोकांनी देखील या गावात वर्षातून एकदा का होईना भेट द्यावी आणि त्या भागातील सरकारी यंत्रणांना माझी विनंती आहे कृपया अशा गावाकडे लक्ष द्यावे त्यांना पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील याची जान ठेवावी

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj Місяць тому +21

    महेश भाऊ धन्यवाद अशी परिस्थिती दाखवून आपल्या लोकांना जाग गेले

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @DineshKumbhar-mm6ch
    @DineshKumbhar-mm6ch 10 годин тому +1

    खरं आहे दादा आज पण गरीबांना कोणी पात नाही जे जून ते सोन म्हणतात 👌👌🙏नाहीशिर होतील दादा हे खरं आहे खूप छान दादा धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  9 годин тому

      धन्यवाद 🙏

  • @vijayjoshi49
    @vijayjoshi49 Місяць тому +17

    माझ्या गावाचे नावही खानूच आहे. पण ते रत्नागिरी पासून २५ किमीवर मुंबई- गोवा महामार्गावर वसलेले आहे. सुमारे 2000 वस्तीचे लहान से गाव आहे. हे सर्व पाहिल्यावर आम्ही किती सुखात आहोत हे समजले.

  • @success4you243
    @success4you243 Місяць тому +8

    किती ते प्रेम गावाकडचं स्नेह❤

  • @Kirtanwala_john
    @Kirtanwala_john Місяць тому +12

    पौर्णिमेच्या रात्री माळरानावर बसायला किंवा अंगनात झोपायला खूप मस्त वाटते. डांबावरच्या लाईटमुळे चंद्रचांदन्यांच्या प्रकाशात असणारी मन प्रसन्न करणारी शीतलता अनुभवता येत नाही.🙏🙏

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Місяць тому +28

    आमच्या गावात सुद्धा हीच अवस्था होत चालली आहे कधी गेलं तर माणसं दिसतच नाहीत

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Місяць тому +3

    आपण स्थानिक लोकप्रतिनिधी श्री नलावडे यांचेशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेणे आवश्यक वाटले ,त्यामुळे तेथील लोकांच्या समस्या चव्हाट्यावर येऊन त्याला वाचा फुटली असती। व शासनाचे लक्ष्य वेढण्या स मदत झाली असती असे वाटते।।

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 Місяць тому +7

    मी पण राजगड ( वेल्हा ) तालुक्यातला पण पहिल्यांदा नाव ऐकले या गावचे आणि तुमच्या मुळे पाहिले पण तालुक्यात अशी बरीच गावं आहेत कारण राजगड तालुका दुर्गम म्हणून ओळखला जातो तालुक्यातील अशी बरीच गावं असतील त्या सर्व गावांची भेट घेऊन त्यांना जगा समोर आण म्हणजे समजेल प्रत्येकला

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Місяць тому +14

    आमच्या साताऱ्यात महाबळेश्वर मध्ये ही अशीच गावे आहेत.
    जिथं देशाच्या स्वातंत्र्या नंतर आजुन ही रस्ते झाले नाहीत.

    • @abhijeetpawar3079
      @abhijeetpawar3079 Місяць тому +2

      दादा मी माझं एक निरीक्षण सांगतो. तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या. पण रस्ते नाही झाले म्हणून त्या गावाचं गावपण टिकून असेल एकदा का राक्षस रुपी विकास गावात घुसला की माणुसकी मेलीच म्हणून समजा. आणि परकीय लोक कुरघोड्या जीवघेणी स्पर्धा येतेच

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 26 днів тому +2

    ही लोक कशी राहातात आपल्या एक किलोमीटर चालायच म्हटल तर तन तन होते हा व्हीडिओ पाहील्यावर आपण किती सुखी आहोत हे जानवत

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 12 днів тому +1

    खूप छान. एक वेगळीच दृष्टी मिळाली.

  • @sharmishthapathak7481
    @sharmishthapathak7481 Місяць тому +25

    विहीरीच्या आजूबाजूला किंवा तिथे जिथे शक्य असेल तिथे जर मोठे खड्डे खाणले तर पावसाचे पाणी जीरून विहीरीला पाणी राहील
    पाणी फाऊँडेशन किंवा अशा अनेक संस्था अशी कामे करतात त्याना ईथे काम करण्याची संधी द्यावी म्हणजे त्याच्याही कामाचे सोने होईल आणी गावातील लोकांनाही पाणी मिळेल

  • @gopalkillekar7307
    @gopalkillekar7307 Місяць тому +3

    दुर्गम भागातील चित्रीकरण फारच उत्तम दुर्गम भागातील सत्य परिस्थिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांनीही त्या मनाने फार मोठं काम केले ते म्हणजे पाण्यासाठी धन्यवाद साहेब नलवडे साहेब

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद

  • @surajbhalerao3637
    @surajbhalerao3637 21 день тому +1

    परत हे असे दिवस येणार नाहीत खरंच किती सुंदर दिवस होते ते ती निरागस गोड माणस त्यांची प्रेमळ भाषा त्यांचा प्रेमळ स्वभाव.इथून पुढे हे अस फक्त पुस्तकात किंवा अश्या व्हिडिओ मधूनच पाहायला मिळणार आहे .

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 Місяць тому +2

    जीवन संघर्ष. सलाम या खडतर जीवनला.

  • @prakashmahajan949
    @prakashmahajan949 28 днів тому +3

    मी, सुद्धा खानु येथे सन् 1978/79 मध्ये election duty साठी गेलो होतो. तेव्हा 198/200 वोटिंग होते... Panshet dam, मधुन लॉन्च ने गेलो होतो... एक सुंदर अनुभव.

    • @paayvata
      @paayvata  28 днів тому

      🙏

    • @paayvata
      @paayvata  28 днів тому +1

      एवढ्या वर्षानंतर ही आकडा आपल्या लक्षात आहे आणि गावही... सलाम आहे सर

    • @Anand64_nashik
      @Anand64_nashik 25 днів тому

      हया वर्षी कोणी गेले का इलेक्शन ड्यूटी साठी .

  • @ushabobade4580
    @ushabobade4580 Місяць тому +3

    अशी महाराष्ट्रमध्ये बरीच गावं आहेत की तिथपर्यंत कोणी जात नाहीत फलटण जिल्ह्यात वारूगड असे गाव आहे की तिथे चिट पाखरू फिरकत नाही फक्त्त एक नाथचे मंदिर आहे आणि शिवाजीच्या काळातील एक वाडा आणि खोल अशी विहीर आहे तिथे फक्त्त जत्रेला लोक येतात. पण... माझी मोठी नणंद अश्या ठिकाणी कित्येक वर्षे एकटी राहत होती. आता त्या या जगात नाहीत पण धन्य ती माऊली आणि तो गड.. वारूगड..

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      खूप छान ताई. आणि माफ करा पण छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख असावा 🙏

  • @dilipbhadale6241
    @dilipbhadale6241 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ,कुठे प्रगती दिसते,,विदारक सत्य, समाज किती बेफिकीर असतो,,

  • @kailasbhere
    @kailasbhere 8 днів тому +1

    फणस आणून देणाऱ्या बाबा चे कीती मोठे मन आहे ❤ असे माणसे गावातच भेटतात.. खरच खूप छान व्हिडिओ बनवला

    • @paayvata
      @paayvata  8 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @pravinshenavi4365
    @pravinshenavi4365 Місяць тому +3

    माझ्या आईच्या मामांनी व्हेले तालुक्यातील पासली या गावी स्वतःचे हायस्कूल सुरू केले आहे. त्यामुळे मी पासली गाव व व्हेले तालुका आणि तिकडचा काही भाग बघितला आहे. आणि मी तिकडे राहिलेलो सुद्धा आहे. त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. असेच व्हिडिओ बनवत रहा सर ❤❤

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому +1

      धन्यवाद 🙏

  • @namdeodhindale8474
    @namdeodhindale8474 Місяць тому +27

    अप्रतिम सादरीकरण आपल्या भागातील व्यथा दाखवल्यात

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @sachindongre88
    @sachindongre88 Місяць тому

    14:35 बाबांनी खूप भावनीक केलं
    एवढं निरागस प्रेम फक्तं ग्रामीण भागात च मिळू शकते.....
    "फणस घेऊन जा थोडी गाडी थांबवा, मी घेऊन येतो अं्"
    बाबा ❤ तुमच्या शब्दांनी मन भरुन आले

  • @ranjanavasave1084
    @ranjanavasave1084 Місяць тому +2

    आमच्याकडे सातपुडा पर्वताच्या शिखरावर या बरं हीच गोष्ट दिसून येईल.मागास मागास सांगत मागेच ठेवले पण तेवढंच आनंद देणारी माणसं आहेत ही.कमी गरजा कमी साहित्य अगदी समाधानी जीवन आम्ही तर अगदी जवळून पाहिले आहे.शिक्षक असल्याने जवळून पाहता आले