मित्र गमावला! RIP Dwarakanath Sanzagiri | द्वारकानाथ संझगिरी | Sunandan Lele

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • द्वारकानाथ संझगिरी देवाघरी गेल्याची बातमी कानावर पडली आणि खूप गोड़ आठवणींचा जागर मनात झाला. १९८५ पासून षटकार पाक्षिकात त्यांचे लेख मी वाचू लागलो. त्यांची शैली वेगळी होती. क्रिकेट च्या अचूक निरीक्षणाबरोबर संझगिरी रिपोर्ट लिहिताना इतिहास विनोद ह्याचा अनोखा वापर करायचे. वयाने माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा असून आमची मैत्री होती. क्रिकेट जगात त्यांना पप्पू नावाने प्रेमाने ओळखायचे. एकाच सांगतो आम्ही पत्रकार आहोत पप्पू लेखक होता. त्याची व्याप्ती खूप मोठी होती.
    #SunandanLele #cricket

КОМЕНТАРІ • 280

  • @sunnykadam14
    @sunnykadam14 2 дні тому +100

    संझगिरी सरांमुळे मी लहानपणापासून वर्तमानपत्र शेवटच्या पानवरून वाचण्यास सुरवात केली ती आजतागायत कायम आहे. सामना लाईव्ह जरी पहिला असला तरी दुसऱ्या दिवशी सर आपल्या खुमासदार शैलीत सामान्याचं विश्लेषण कसं करणार ह्याची नेहमीच आतुरता असायची आणि कदाचित त्यांच्यामुळेच क्रिकेट फक्त न पाहता वाचायचे कसे हे कळलं. त्यांची व इतर क्रिकेट दिग्ग्जाची मुलखात म्हणजे पर्वणीच आणि त्यातही वासू परांजपे सरांसोबतची प्रत्येक मुलाखत म्हणजे निव्वळ अप्रतिम . We'll always miss Sanzgiri Sir.

    • @nitinwakchaure2445
      @nitinwakchaure2445 День тому +1

      अगदी हीच भावना माझीही

    • @pushkarsangale9722
      @pushkarsangale9722 22 години тому

      Mi pn tech karaycho sir

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 17 годин тому

      मी सुद्धा शेवटून वाचायला सुरवात करायचो.

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 2 дні тому +39

    क्रिकेट आणि हिंदी चित्रपट सृष्टी यांचा सुंदर मिलाफ करून लिहिणारे दोनच होऊन गेले. शिरीष कणेकर आणि द्वारकानाथ संजगिरी. दोघेही बेस्ट

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 День тому +3

      संझगिरी सुरवातीला कणेकरांची शैली copy करायचे पण नंतर स्वताःच स्थान निर्माण केल जस सुरवातीला सगळेच गायक सैगल ची copy करायचे व नंतर प्रतेकानी स्वताःच स्थान निर्माण केल.

    • @arvind.earthy
      @arvind.earthy День тому +1

      छान नेहमी प्रमाणेच.

    • @ameyrane1078
      @ameyrane1078 17 годин тому

      मी सुद्धा. सामना पेपर चे सदर

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 дні тому +29

    षटकार फक्त सांझगिरी यांच्यासाठी वाचत होतो.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏😢

  • @ramkrishnagawade2889
    @ramkrishnagawade2889 10 годин тому +1

    माझे आवडते मासिक षटकार भावपूर्ण श्रद्धांजली sir

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 2 дні тому +26

    शिरीष कणेकर व. द्वारकानाथ संझगिरी अतिशय खुमासदार लेखन करणारे क्रिकेट व सिनेमा दोन्ही वर अत्यंत विनोदी लिहिणारे भावपूर्ण श्रद्धांजली

    • @shripadmote5741
      @shripadmote5741 День тому +1

      आमी आता जवळपास सत्तरीला पोहोचलेलो आहोत तरुण पणी मी षटकार चंदेरी चौकार किंडागण हि पाक्षिक न चूकता खरेदी करत होतो आमच्या घरी सर्वांना क्रिडा व सीनेमा संबंधी आवड होती वाचून झाल्यावर त्यातील कात्रणे फोटो संग्रहासाठी वही करून जपून ठेवली होती पुढे बदली मुळे औरंगाबाद हून (संभाजी नगर ) पुणे येथे येण्या आधी माझ्या एका क्रिकेट प्रेमी मित्रा कडे ती वही सुपूर्द केली क्रिकेट वरचे श्री संझगिरी सह सर्वांचे लेख खुप छान वसंग्रहीय होते
      आपण आपल्या क्रीडा प्रेमी मित्रा सोबत त्याच नांवाने किंवा दुसर्या नावांने असे पाक्षिक सुरु करावे कारण आता इतके नव नवीन खेळाडू भारता मधे उदयाला येताहेत त्यांच्या बद्दल माहिती व छायाचित्रे आम्हाला वाचायला व बघायला मिळेल
      बघा विचार करा
      हीच संझगिरी सरांना श्रद्धांजली ठरेल🙏💐

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 дні тому +30

    लेले सर, बाळ पंडित , करमरकर यांचे समालोचन आणि संझगीरी आणि आपले लेखन हे मी खूप वर्षांपासून ऐकत आणि वाचत आलो. मी षटकारचा अंक कधीच चुकवला नाही. संझगीरींचा शब्द साठा अफलातून होता. या महान समीक्षकास भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 День тому

      संझगिरी यांच्या व्यक्तिमत्वाला एक मोठी काळी बाजू सुद्धा आहे.हा व्हिडिओ पहा.ua-cam.com/video/H4poYLTze0k/v-deo.htmlsi=g_1JsgtNd9xhbsky

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 2 дні тому +17

    सर, मी कॉलेज ला असताना साधारण 1984 ते 1990 पर्यंत मी शारदा टॉकीज च्या बाजूला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया मध्ये मी फक्त षटकार वाचण्यासाठी बसायचो आणि द्वारकानाथ संजगिरी सरांचा लेख खुप आवडीने वाचायचो.
    द्वारकानाथ संजीगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @virendraghanekar4
    @virendraghanekar4 2 дні тому +9

    खरेच एकदम दिलदार माणूस होता,अतिशय खुमासदार लिखाण,आपल्या आवडत्या लता दीदींच्या पुण्यतिथी ला हे जग सोडलेस आता तिथे देखील मैफल जमवा नव्हे ती जमेलच .
    ओम शांती

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 16 годин тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली. सदा तुम्ही आठवणीत राहाल. असे लोक ज्यावेळी देवाघरी जातात खूप वाईट वाटून जातो.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 дні тому +9

    एकच षटकार , एकच हा शब्द फार छोटा असायचा, हे मासीक तेव्हा आमची क्रिकेट ची भुक भागवायचे.
    संझगिरी यांचे लेख खूप छान असायचे. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 День тому +9

    कधीही न भेटलेला पण आपलासा वाटणारा,अगदी दिनांक,चंदेरी,षटकार अन अलीकडेच सकाळमधील लेख डोळ्यासमोर येताहेत।😢😢😢
    👏👏👏👏👏

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 День тому

      संझगिरी यांच्या व्यक्तिमत्वाला एक मोठी काळी बाजू सुद्धा आहे.हा व्हिडिओ पहा.ua-cam.com/video/H4poYLTze0k/v-deo.htmlsi=g_1JsgtNd9xhbsky

  • @akashK1601
    @akashK1601 15 годин тому +1

    आज 33 वय चालूये. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा त्यांचे लेख वाचत असायचो. खूपच छान आणि माहितीपुर्ण लेख असायचे.
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @DattaramRanjane-ck8wr
    @DattaramRanjane-ck8wr 2 дні тому +13

    सरांची शब्दरचना रसाला होती शब्दांना वेगाला सुगंध होता भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @SHRIPADKKULKARNI5488
    @SHRIPADKKULKARNI5488 2 дні тому +12

    संझगिरी सरांइतके अष्टपैलुत्व आता कोणाकडेही दिसत नाही. संझगिरी सरांची काही पुस्तके मी घेतली. अतिशय मोठी हानी झाली आहे सर. सामना पेपरचा त्यांचा स्तंभ जबरदस्त. आपण बरोबर बोललात सर,
    .
    .
    हा माणूस कधी निराश , हताश दिसायचा नाही. जिंदादिल व्यक्ती गेली.

    • @vishwaslanjekar6971
      @vishwaslanjekar6971 День тому +1

      अत्यंत अभ्यास कोणत्या प्रकारचा बिलकुल गर्वाचा अंश पण नसायचा. कोणत्याही विषयावर चौफेर जानकारी घेऊन लिहिणे सर्वांनाच फार आवडायचे. भावपूर्ण श्रद्धांजलीऔ😢😢😢😢

  • @digvijayj9
    @digvijayj9 День тому +5

    RIP वासू परांजपे आणि संझगिरी दोघांची जोडी छान विश्लेषण करत

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 День тому +3

    षटकार मी सुध्दा घ्यायचो. विनोद कांबळीचे युग होते त्यावेळी. ❤❤

  • @sandeshtawade923
    @sandeshtawade923 День тому +4

    मी 2003 वर्ल्ड कप पासून यांचे लेख वाचत होतो अप्रतिम लेखन
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chandandevkar4172
    @chandandevkar4172 2 дні тому +2

    सांझगिरी सरानी अतिशय चांगले क्रिकेटचे विवेचन केले . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि.

  • @prashantgurav4019
    @prashantgurav4019 День тому +3

    मी सांगलीत द्वारकानाथ सरांचा कार्यक्रम ऐकला आहे. खुपच मजा आली होती.

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 17 годин тому

    एकच षटकारच्या अगदी पहिल्या अंकापासूनच मी स्वर्गीय श्री.द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनशैलीच्या प्रेमातच पडलो. अंक हातात घेतल्यावर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्य़त वाचून झाल्याशिवाय खाली ठेवत नव्हतो. त्यांचा महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले सर्व लेख अतिशय सखोल आणि वाचनीय असायचे. तसेच त्यांचे भ्रमंती, भटकंती आणि मुलुखगिरी वरील लेख म्हणजे अक्षरशः मेजवानीच असायची. अश्या या चतुरस्त्र आणि सिद्धहस्त व्यक्तीमत्वाला अतिशय मन:पूर्वक आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 2 дні тому +9

    सिनेसृष्टी आणि क्रिकेट या दोन विषयांवर दोन लेखक कायम वाचावे असे वाटायचे ते म्हणजे शिरीष कणेकर आणि द्वारकानाथ संझगिरी आता दोघेही नाहीत, आता क्रिकेट मधील त्यांचा वारसा तुमच्या खांद्यावर आहे

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 День тому

    संझगिरी सरांचे लेख अतिशय वाचनिय असायचे व बोलणं ऐकत रहावे असे असायचे. फ़ार दुःखद बातमी 😢

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 19 годин тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐एक चांगला समालोचक, मुलाखतकार, लेखक आपण गमावला.

  • @gauravparab02
    @gauravparab02 14 годин тому

    सामना वाचताना संझगिरी सरांचा लेख नसेल याची कल्पना करूनच मन हळहळले.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr День тому

    मस्त.. थोड अजून वेळ आणि पप्पू बद्दल अजून ऐकायला अवडल असत!
    ॐ शांति द्वारकानाथ

  • @revatinar7875
    @revatinar7875 День тому

    एकदम सर्वज्ञानी व्यक्ती.दिलखुलास हसन जगणं.क्रिकेट चे जबदस्त चाहते आणि त्याबद्दलची माहिती.kammmal

  • @milinddeshpande5926
    @milinddeshpande5926 2 дні тому +1

    अतिशय दुःखदायक घटना ! मी लहानपणी षटकार चा निस्सीम वाचक होता. संझगिरी सरां चे अनेक लेख वाचले होते , त्यांचे cricket चे विश्लेषण छान असे ! भावपूर्ण श्रद्धांजली !

  • @alvaropereira5689
    @alvaropereira5689 21 годину тому

    No words ....it's really a shock to know that a versatile writer whom i always admired....is no more ...he was just a great writer.....

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy День тому +1

    लेले काका, खरच विनंती एक पुस्तक लिहा काका वरती, तुमचे अनुभव सर्व 🙏🏻

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 День тому

    अतिशय सुंदर लेखक,समीक्षक.

  • @sudhirwadkar7319
    @sudhirwadkar7319 2 дні тому +1

    सरांची भाषा शैली अद्वितीय होती. शेवटचे पान कोणी वाचल्या शिवाय राहत नसेल. सरांना
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 День тому

    SANZGIRI gelyawar tumhi amhala tyanna bhetavalat...dhanyawad 🙏
    Sanzgiri was a flawless orator..with amazing talent..

  • @ramchandradivekar5221
    @ramchandradivekar5221 День тому +1

    सप्तरंग, सकाळ चे सरांचे लेख खूप छान असायचे.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 дні тому +1

    सुनंदन, षटकार वाचत व द्वारकानाथ संझगिरी चे वर्तमान पत्रातील लेख वाचत वाचतच आम्ही मोठे झालो. वाचताना खुमासदार शैलीतील लेख वाचताना गंमत वाटायची ऐक वेगळीच शैली होती लिखानाची.आता उरल्या फक्त आठवणी
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @avinashshigvan1727
    @avinashshigvan1727 День тому

    There was the biggest contribution of Dwarkanath Sanzgiri Sir's Shatrkar magazine in my life to love cricket.

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 2 дні тому +5

    Vasu Paranjape Shirish Kanekar and now Sanzgiri An era of such knowledgable experts from Dadar Matunga and Shivaji Park area comes to an end

  • @sandeepaphale6860
    @sandeepaphale6860 День тому

    संगीत षटकार असा एक कार्यक्रम ते खूप छान सादर करायचे.

  • @AnveeVerekar1107
    @AnveeVerekar1107 День тому +1

    सचिन वर लिहिलेल्या 'सार्वभौम सम्राट ' आणि ' चेहरा वाजपयेचा , bat विश्व हिंदू परिषदेची ' , हे माझे द्वारकानाथ संझगिरी यांचे आवडते लेख. सामना दैनिक मध्ये त्यांचे येणारे लेख आणि विश्लेषण मी आवर्जून वाचायचो.. दादर येथे श्री स्वामी समर्थ मेडिकल जवळ ते अचानक मला 2005 मध्ये भेटले, शॉर्ट पँट T- शर्ट वर त्यांनी मला स्वाक्षरी दिली.. मी त्यांचे लेख आवर्जून रोज वाचतो हे सांगितल्यावर ते हसले, मी त्यांच्या पाया पडलो, "अरे नको नको" असे ते म्हणाले .. एक तीच या माझ्या आणि त्यांच्या मधील शेवटचीच भेट आणि आठवण..
    द्वारकानाथ संझगिरी यांचे ती कात्रणे अजूनही मी जपुन ठेवलीत..

  • @Astromomer2008
    @Astromomer2008 20 годин тому +1

    एकचं सांगतो, संझगिरींचा लेख आला की तो कधी वाचतो आहे याच्यासाठी अधीर व्हायचो.

  • @janardangawas8564
    @janardangawas8564 2 дні тому +3

    द्वारकानाथ संझगिरी म्हणजे लेखणीच्या दुनियेतील गॅरी सोबर्स. महान अष्टपैलू लेखणीकार. क्रिकेट ,बॉलीवूड ,प्रवास वर्णन कोणताही विषय असून दे . प्रवास वर्णन किंवा जगात जिकडे कुठे फिरले त्या देशाचं वर्णन मी ऐकलेले दोघच एक प्रवीण दवणे सर आणि दुसरे द्वारकानाथ संझगिरी. सचिन ऐकावा तर त्यांच्याकडूनच. त्यांची पुस्तकं अश्रू आणि षटकार , खेलंदाज ,शतकात एकच सचिन , देव आनंद - के दिलं अभी भरा नही ,फाळणीच्या देशात ,वल्ली आणि वल्ली ,शॅम्पेन क्रिकेट , दादर एक पिनाकोलाडा, फिरता फिरता ,माझी बाहेरख्याली ,थेम्सच्या किनाऱ्यावरून ,आशा एक सुरेल झंझावात ,प्यार का रंग सूनो ,चिरंजीव सचिन ,आम्हाला वगळा काय पुस्तक लिहिलीत. षटकार पहिल्या अंकापासून वाचलाय. वर्तमानपत्र वाचायची सुरुवात शेवटच्या पानापासून करायचो. द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख वाचला नाही तो दिवस उपाशी असल्यासारखं वाटायचं. असा अष्टपैलू आपल्यातून निघून गेला खर वाटतच नाही. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @sanjaysawant897
      @sanjaysawant897 День тому

      परफेक्ट विश्लेषण केलय तुम्ही सर पप्पुंच्या लेखनशैलीचं👌

  • @6531gaurav
    @6531gaurav 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
    संझगिरी सर लिखाणात जे ऐतिहासिक दाखले देत असत त्यामुळे त्यांचे सगळं लेखन हे वेगळ्या दर्जाचं आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होत 🙏🏻

  • @ShwetaNikumbha
    @ShwetaNikumbha 2 дні тому +1

    He was my favourite since childhood
    I never left chance to read Shatkar and His editorial writing in News paper..
    I have watched his stand up on cricket and interviews!!
    RIP🙏🏽

  • @ashutoshjoshi6618
    @ashutoshjoshi6618 День тому

    I wasn't privileged enough to read his work but I used to closely follow his UA-cam channel Dwarakanath Sanzgiri- All rounder. I used be mesmerized listening to his analysis of every day of test match especially the 2018 Ind tour of Eng & Aus in 2019. He would avidly reply to my comments. Once I had mentioned I aspire to be able to speak like him one day and he was kind enough to reply. Truly a gem of a cricket analyst. Om Shanti.

  • @mayurshingade5086
    @mayurshingade5086 2 дні тому +3

    Passing away off Dwarkanath Sanzgiri is indeed very sad news !! May you meet Madhubala up in the heavens!!!

  • @deepakvispute4350
    @deepakvispute4350 День тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली,अत्यंत दुःखद बातमी, द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे क्रिकेट चे वर्तमान पत्रातील लेख वाचून क्रिकेट chya प्रेमात पडलो,खूप छान लेख वाचून मन तृप्त होऊन जायचं❤

  • @VirajRao
    @VirajRao 2 дні тому +2

    Very sad news. Back in my school days, have grown up reading Sanzagiri's sir articles in Loksatta and his coverage of 1992 WC in Australia and NZ. I believe when I was in 9th/10th grade I had sent him mail on a postcard at the Loksatta address and had received a reply for him. It's a very sad day for all cricket fans.

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb День тому

    क्रिकेट वर जीवनावर सुद्धा मनापासून आणि भरभरून प्रेम करणारा माणूस. संझगिरी व्यक्तीचीत्रण सुद्धा छान करायचे.

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 День тому +1

    कै. सन्माननीय द्वारकानाथ संझगिरी साहेब हे सुप्रसिध्द क्रिकेट समीक्षक होते, बाॅलीवुडवर ते लिहायचे,लेखक होते, संगीत प्रेमी होते आणि ते अभियंता ही होते. बृहन्मुंबई महानगर पालिकेतील प्रमुख अभियंता ( पाणी पुरवठा प्रकल्प) ह्या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आमचे ते साहेब होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, विनोदी होता .साहेब म्हणून आम्हांला त्यांची कधी भिती वाटली नाही.सर्वांमधे मिळून मिसळून रहाणे. ते कार्यरत असताना त्यांनी दिवाळीत त्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवला होता.
    अशी आपल्या सर्वांची आवडती व्यक्ती शरीररूपाने आज आपल्यातून देवाघरी गेली असली तरी त्यांच्या स्मृतींचा असंख्य ठेवा आपल्याला त्यांची आठवण करुन देईल.
    🙏🙏 भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @pundalikhadap4548
    @pundalikhadap4548 День тому

    संझगिरी सरांची लेखणी अद्भुत होती. लोकसत्ता किंवा सामना मधील लेख वाचण्यासाठी हजारो वाचक रविवार ची आतुरतेने वाट बघायचे !
    असे अद्वितीय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही !!!
    विनम्र आदरांजली 🙏🙏🙏

  • @ranjanakaveri10
    @ranjanakaveri10 2 дні тому +3

    सोलापुर मध्ये षटकार कोणाकडे दिसला की आधाशीपणे वाचायचे खुप सुंदर फोटो हो असायचे. शेवटच्या पानावर कोणा एका क्रिकेटरच्या आयुष्यासाठी योगदान करा असे आवाहन असायचे .
    षटकारच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @sanjaysawant897
    @sanjaysawant897 День тому

    क्रिकेट, सिनेमा, प्रवास,संगित आणि जेवन यांचा अप्रतिम मिलाप पप्पुंच्या लिखाणात असायचा.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 дні тому

    संझगिरी सर गेल्याची बातमी आत्ताच मला कळली, गेली अनेक वर्षे आम्ही सरांसोबत अनेक कार्यक्रम केले, अनेक आठवणी ते क्रिकेट आणि सिनेमा संदर्भात मजेशीर पणे सांगत असे, देव आनंद हे त्यांचे आवडते अभिनेता , खुप वाईट वाटले, सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @coolcheetah123
    @coolcheetah123 2 дні тому +1

    RIP🙏Dwarakanath Sanzagir ek abhudpurva vyaktimatwa tyanche cricket warche lekh wachlet me faar uttam lihayche!!! ani vishleshan pan far bhari...

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 17 годин тому

    लेले सर तुम्ही त्यांचे वारसदार आता तुम्हीच ❤

  • @rajendrakasare-ci9kp
    @rajendrakasare-ci9kp День тому

    षटकार व चंदेरी मधील संझगिरीचे लेख व गौतम राजध्यक्षांचे फोटो यावर आमची पिढी तुटून पडायची अविस्मरणीय क्षण दिलेत संझगिरी सर तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @niteshandhale5380
    @niteshandhale5380 2 дні тому

    व्दारकानाथ सरांचे सामना मधील लिखाण क्रिकेटवरच त्यांचे लिखाण .......अप्रतिम असायचे.....भावपुर्ण श्रध्दांजली संझगिरी सर

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 День тому +1

    द्वारकानाथ संजगिरी सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
    एक क्रिकेट खेळाडू म्हणून मला सरांना 5 वेळा भेटायला भेटले हाच माझा मोठा ठेवा आहे 🙏
    मी लहानपणापासून षटकार वाचत आलो आहे 🙏

  • @pj8291
    @pj8291 День тому

    महान लेखक, पत्रकार!! RIP 🙏 🪦

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 дні тому

    खूप ग्रेट होते. फार दुःखदायक बातमी.
    आज शिरीष कणेकरांची पण आठवण झाली.

  • @vivekkamalapurkar933
    @vivekkamalapurkar933 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली , एकमेव हा , यासम पुन्हा कोणी होणे नाही.

  • @aneeshlonkar8493
    @aneeshlonkar8493 2 дні тому +1

    Sanzagiri sir pan maze tumchya evdhech favourite journalist hote 😔🥺 om shanti 🙏

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar3677 День тому

    द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.असा क्रिकेट आणि बॉलिवूडचे मिश्रण करून समिक्षण करणारा आता होणे नाही.

  • @shashankjoshi8294
    @shashankjoshi8294 10 годин тому

    संझगिरी सरांमुळे आम्ही क्रिकेट वाचायला शिकलो. ज्या वयात आम्ही क्रिकेट हा खेळ बघून, ऐकून शिकत होतो, समजून घेत होतो तेव्हा द्वारकानाथ सरांच्या मटा मधील संशिप्त लिखाणातून ते आम्ही वाचत होतो. अश्या या आमच्या युगातल्या 'संजय' ला भावपूर्ण निरोप...🙏💐🌸 स्वर्गातील देव सुध्दा त्यांच्या कडून क्रिकेट, चित्रपट, संगीत यांचे त्यांच्या खुमासदार शैलीत किस्से ऐकतील.🙏

  • @maharashtradharma
    @maharashtradharma 18 годин тому

    त्याचे श्रीलंकन जुन्या क्रिकेट खेळाडू बरोबर खास संबंध होते.

  • @rameshwanzare1710
    @rameshwanzare1710 2 дні тому +1

    2024 T20 world cup जिंकला तेव्हा यांचा लेख जो खूप महिन्यांनी आला तितके महिने मी वाट पाहिली त्यांच्या लेखाची...will miss him and his special touch of cricket..

  • @PRASADBAPAT-n4f
    @PRASADBAPAT-n4f День тому

    लता मंगेशकर, द्वारकानाथ संझगिरी आणि शिरीष कणेकर यांच अनोख अदभुत नातं होत, हे त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी जाणवायचं.....लता मंगेशकर आणि संझगिरी एकाच दिवशी जगातून निघून जाणे (वेगवेगळ्या वर्षी) हा हि एक दुःखद योगायोग आहे.........

  • @paragparab3687
    @paragparab3687 День тому

    Dwarkanth Sanjgiri Sir was an Expert of Cricket. I used to watch his Videos on UA-cam. Feeling Sad for his demise. May his Soul rest in Peace. My condolences to his families

  • @suhasdeogaonkar
    @suhasdeogaonkar День тому

    संझगिरी व किणीकर ह्यांच्या जाण्याने क्रिकेट व चित्रपट प्रेमींचे प्रचंड नुकसान.... ्

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy День тому

    आज एक लाईक, तसे नेहमी असतो पण संझगिरी काका साठी हा लाईक आणि कंमेंट ही,भावपुर्ण श्रद्धांजली काका 🙏🏻🙏🏻 लवकर या नव्याने या त्याच भूमिकेत आमचे मुलं - नात नातू अनुभवतील तुमचा नवा जन्म 🙏🏻🙏🏻

  • @chaitanyadhore7457
    @chaitanyadhore7457 День тому

    संझगिरी सरांना मी पहिल्यांदा एबीपी माझाला खेळ माझा हा शो यायचा तेव्हापासून फॉलो करत होतो

  • @prashantmulik847
    @prashantmulik847 День тому +1

    द्वारकानाथ संझगिरी सर यांचं क्रिकेट बद्दल माहिती देताना ती माहिती आम्हाला ऐकताना खूप मस्त व भारी वाटायची आणि खास करून ते सुनील गावसकर सर व सचिन तेंडुलकर सर यांच्या क्रिकेटबद्दल बोलायचे ते खूप मस्त वाटायचे .

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 День тому

    संजगीरीचे लेख म्हणजे पर्वणी असायची, एक चांगला लेखक गमावला.
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽

  • @ShivajiRamraoDapke
    @ShivajiRamraoDapke 2 дні тому

    षटकार सारखी लोकप्रियता नंतर कुठल्याही साप्ताहिक/पाक्षीकाला नाही मिळाली. याचे श्रेय अर्थातच संझगिरी सरांना. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shaileshvaidya6672
    @shaileshvaidya6672 День тому

    आपल्या सगळ्यांचे क्रिकेट प्रेम वाढीस लावणारे आणि वेड लावणारे क्रिकेट समीक्षक आता होणे नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹🌷🌹🌷

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 2 дні тому +1

    💐🙏💐भावपुर्ण आदरांजली💐🙏💐

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 День тому

    संझगिरी अतिशय सुंदर लेखन करायचे. अनिल कुंबळे चे बाॅल वळत नव्हते तेव्हा सझंगीरी कुबंळे चा उल्लेख अनिल सरळ कुबंळे असा करत.
    ग्रेट माणूस 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 2 дні тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली..
    त्यांचे लेखन match डोळ्यसमोर आणायचे.
    त्यांच्या उपमा मिश्किल असायच्या.
    उदा. डॉलरमिया, मायावतीला विश्व् सुंदरी म्हणणेसारखे आहे वैगरे...
    ते जीवन भरभरून जगले.
    रसिक व रंगेल होते.
    जिंदादिल होते.
    खुशखुशीत बोलण्याची शैली होती.
    आम्ही त्यांचे फॅन होतो.
    सध्या तुमचे आहोत सुनंदनजी.. 🙏

  • @pavanadhao679
    @pavanadhao679 День тому

    काय बोलावं काहीच कळत नाहीये... खुमासदार शैलीत क्रिकेट च वार्तांकन खूप वेळा ऐकलंय...😢😢😢

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 День тому

    Sir, another star of Marathi sports writer went behind the screen of time. Praying Bhagwan to give peaceto his souls.

  • @rajendradeshmukh1342
    @rajendradeshmukh1342 День тому

    षटकार तेंव्हा (1984)अल्प्वाधित प्रसिद्धिस आलेले आणि खूपच वाचण्याजोगे पाक्षिक होते. संझगिरी सरांचे लिखान मन्हजे वाचकांना पर्वणी होती. माझ्या सारख्या मराठवाड्यात राहणाऱ्या पर्यंत षटकार फक्त वाचनालयात मिळायचे. संझगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День тому

    सामना दैनीकातील सांझगीरी याचे सर्व लेख मी वाचले आहेत.
    अप्रतीम लेखन शैली.

  • @pandurangtoshniwal6301
    @pandurangtoshniwal6301 День тому

    The great Sanzgiri sir , never expected U leave us
    unpredicted . A great loss to all cricket lovers .RIP .❤

  • @akshay5823
    @akshay5823 День тому

    खुप आठवण येते सरांची नेहमी like आणि रिप्लाय द्यायचे. खुप मिस करू सरांना.
    संझगिरी सरांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹😢

  • @ganeshparab2972
    @ganeshparab2972 2 дні тому

    द्वारकानाथ संझगिरी म्हणजे क्रिकेटची पंढरी..शतशः नमन

  • @jyotilimaye3623
    @jyotilimaye3623 День тому

    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @sandeepwabgaonkar6576
    @sandeepwabgaonkar6576 День тому

    Aamhi shatkar wachaycho aani Sanzgiri cha lekhan pan khup wachla cricket var cha far chan 🎉🎉RIP

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 День тому +3

    साधारणतः 2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले.
    असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

  • @udaysahasrabuddhe5530
    @udaysahasrabuddhe5530 2 дні тому +1

    ॐ शांती....भावपूर्ण श्रध्दांजली

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 День тому

    सन्माननीय द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏💐💐💐

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 2 дні тому +3

    🎉 Shiva ...Shastri aani Maninder ..England Madhe Unfit Rahana parvadnar naahi..1986 cha ..article aajahi smaranat aahe

  • @nileshshete1609
    @nileshshete1609 12 годин тому

    He was my favourite since childhood
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @shamsundarmane7817
    @shamsundarmane7817 День тому

    सर, द्वारकानाथजी गेले हि बातमी पाहून धक्काच बसला. विषय कोणताही असो, त्यांची विषयची मांडणी खूप छान असायची. त्यामुळे त्यांनी केलेले कोणतेही लिखाण वाचणीय होते. लतादीदी ज्या दिवशी गेल्या त्याचदिवशी द्वारकानाथजी गेले हा कसला योगायोग समजावा. कदाचित देवाला सुध्दा वरती जमलेल्या दिग्गजांच्या बद्दल विषय मांडताना कठीण जात असावे. द्वारकानाथजी आपले लिखाण वाचून असे वाटायचे की हा लेख कधी संपूच नये. पण.....
    इथून पुढे कोणतेही समीक्षण वाचताना तुमची उणीव नक्की भासणार. भावपूर्ण श्रध्दांजली💐💐🙏🙏

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 ओम् शांती 🙏🏻

  • @pradeepjoshi1290
    @pradeepjoshi1290 2 дні тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹💐🌷🌺💐

  • @bashirchichkar9873
    @bashirchichkar9873 День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली संझगिरी सरांना 🙏🙏

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 День тому

    भावपूर्ण श्रध्दांजली कॉलेज च्या काळात ' षटकार' मधील भाषाशैली वाचनीय होती

  • @charuhasmudvedkar5554
    @charuhasmudvedkar5554 День тому

    No one can write articles on cricket the way he used to write I used to buy saamna news paper just to read his articles on cricket very witty his knowledge of cricket amazing outstanding his friendship with top cricketers cricketers not only indians even with srilankan cricketers was very surprising all players used to like him they were very close to him we all are going to miss you sir and your articles. RIP sir 🙏

  • @dilipbhomkar7369
    @dilipbhomkar7369 2 дні тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @pradeepnabar
    @pradeepnabar День тому

    फार वाईट झालं

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e День тому

    द्वारकानाथ संझगीरी, शिरीष कणेकर, वि वि करमरकर माझे आमच्या पिढीतील आवडते क्रिकेटचे स्तंभलेखक . भावपूर्ण श्रद्धांजली!