शंभू राजेंना पकडण्यासाठीचा सापळा । बलिदान दौड । दिवस सातवा - क्षेत्र संगमेश्वर। ०७ - भाग ०२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • सेवेचे ठाई तत्पर
    II आयोजित II
    🚩बलिदान दौड 🚩
    अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
    ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.
    🚩दौडीचा मार्ग-
    जन्मस्थान पुरंदर
    पालीचा किल्ला सुधागड
    पद्मदुर्ग
    रत्नागिरी
    जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
    किल्ले पन्हाळा
    शृंगारपूर
    संगमेश्वर
    धर्मवीर गड ( बहादूर गड )
    क्षेत्र तुळापूर संगम
    या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.
    १७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल
    🚩सहभागी सदस्य राईडर 🚩
    सत्यजीत भोसले
    किरण शेळके
    प्रशांत काळाने
    सुयोग शिंदे
    🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩
    पार्थ चव्हाण
    साई दळवी
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 17

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 5 місяців тому +4

    खरच तुमच्या कार्याला मनापासून सलाम करते.इतिहासाविषयी खूप आवड आणि आदर आहे मला. महाराजांची रोज भक्ती करते, त्यांच्या विषयी रोज मी वाचते, विडिओ बघते.एकीकडे शंभुराजेंबद्दल एवढ्या वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत हे वाचताना, ऐकताना खूप वाईट आणि विचित्र वाटायचं. पण हे पुस्तक त्यातील संदर्भ आणि त्यावर तुमचं योग्य विश्लेषण एवढं नीट समजावून सांगणं यातून महाराजांवर केल्या गेलेल्या चुकीच्या गोष्टी पूर्णपणे खोडून कडण्यात आल्या आहेत.खूप छान वाटलं ही माहिती मिळाली.महाराजांचं चारित्र एवढं श्रेष्ठ असताना किती चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत त्यांना हा विडिओ म्हणजे एक जबरदस्त उत्तर आहे.खरच तुम्ही खूप मोठ पुण्याचं काम करत आहात.तुम्हाला मनापासून धन्यवाद. 🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @manjilimahadeshwar4177
      @manjilimahadeshwar4177 5 місяців тому +1

      महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या त्या ठिकाणी जावून त्या त्या प्रसंगाचं वाचन करून ते समजावून सांगतात ते खरच खूप भारी वाटल. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत तिथे आहोत असच वाटत होत.तो प्रसंग काय असेल असे चित्र डोळ्यासमोर उभ राहत होत.शिवपुत्र संभाजी हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका डॉ. सौ. कमल गोखले यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांनी सगळ्या बाजू विचारात घेवून योग्य ते लिहिलं आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती माहिती मिळते.
      श्री छत्रपती संभाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा.🚩🚩🚩

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 5 місяців тому +1

    खरच कामानिमित्त ऐकायला उशीर झाला पण आज हयात जी काही विविध अंगणी पुराव्यानिशी बाजू मांडली आणि काय आणि कस झाल असेल हे ठरवण्याची जबाबदारी ऐकणाऱ्यावर सोडली हे पुस्तक खरचं खूप महत्वाचं आहे...कादंबरी आणि ऐतिहासिक पुरावे असलेलं पुस्तक यातलाही बराच फरक जाणवला...काय वाचायचं कस वाचायचं आणि समजून घ्यायचं हे नव्या अंगाने कळल...दादा धन्यवाद खूप खूप आभार

  • @abhaypise3862
    @abhaypise3862 2 місяці тому +1

    Shambhu raje yanchyavar kaid honyacha prasang yeu shakto he bahutek raje yanna swataha watat asava te ladhle khup, pan tithe ek vadil mhanun pan te hote, tevha tyancha baal shauraje he kewal 6,7 varshache astil, tyanchya rakshanasathi santaji ghorpade aani khandoji yanna rajenni raigadi janyas bhag paadle, shapat deun. Ek raja mhanun ek swarajyarakshak mhanun, ek vadil mhanun tyanni kiti mothi kirti ghadavli, ganoji shirke tu baiman jhala shartula hath dila ,tya kadapasun aajwar aani yenari hazaro varshachi pidhi he tula kadhich maaf karnar nahi, aani aurangya tu tar kayam narkat sadat asshil raakshasa.

    • @nirajrakshe4239
      @nirajrakshe4239 2 місяці тому +1

      Tuz view point pn barobar ahe dada❤

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf 5 місяців тому

    वतना वरून हा घात झाला असे वाटते, माफ करा ,मी छत्रपतींनचा पायाचा दास आहे,छत्रपतींन कडून झालेली फार मोठी चूक,असे या दासाला वाटते, बाकी फार मेहनत घेतलीत,धन्यवाद

  • @tractorspot
    @tractorspot 5 місяців тому

    अत्यंत उत्कृष्ट व सविस्तर वर्णन या सिरीज मध्ये केले आहे ✅

  • @prashantkalantre4811
    @prashantkalantre4811 5 місяців тому

    Khup khup chaan shabdat sangta yet nahi evdhe changle kam kelay tumhi

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 5 місяців тому +2

    तथाकथित बलिदान मास पाळायचा म्हणून रोज रिला बनवणार्यांनी हा इतिहास प्रसिद्ध करावा❤

  • @lionhearttreks4790
    @lionhearttreks4790 5 місяців тому +2

    ❤❤ khup mst asch khra itihas lokansmor aana

  • @anuragbhoyar4019
    @anuragbhoyar4019 5 місяців тому +1

    नक्कीच आपल्या श्रमाचे सार्थकी ठरेल ❤

  • @dr.dhondiramsawant7154
    @dr.dhondiramsawant7154 5 місяців тому +1

    Khara itihas khup chan sangtay

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 5 місяців тому

    यशस्वी भव ❤

  • @akashrade7914
    @akashrade7914 5 місяців тому

    दादा तुम्ही कोणत पुस्तकं वाचताय🙏🚩

    • @STTHistory
      @STTHistory  5 місяців тому

      हा भाग नीट बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा यात आहे. 🙏🏻🚩

    • @akashrade7914
      @akashrade7914 5 місяців тому

      ​@@STTHistoryखूप मस्त आहे दादा