रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला --- आशा भोसले, सुधीर फडके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2008
  • Raja Gosavi & Jayashree Gadkar
    Awaghachi Sansar
    रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
    मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला !
    एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला,
    ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला !
    चंद्रा, ढगांतुनी तू हसलास का उगा, रे ?
    वाकून खालती अन्‌ का ऐकलेस सारे ?
    जे ऐकले तुवा ते, सांगू नको कुणाला !
    वाऱ्या, तुझी कशाने चाहूल मंद झाली ?
    फुलत्या फुला, कशाला तू हसलास गाली ?
    जे पाहिले तुवा, ते सांगू नको कुणाला !
    हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
    पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
    धरलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला !
    हा लाजरा शहारा पाहील काय कोणी ?
    करतील का चहाडी हे गाल लाल दोन्ही ?
    गालात रंगले जे, सांगू नको कुणाला !



    गीत - डॉ. वसंत अवसरे (शांता शेळके )
    संगीत - वसंत पवार
    स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
    चित्रपट - अवघाचि संसार (१९६०)
    राग - तिलककामोद, देस (नादवेध)

КОМЕНТАРІ • 487

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Рік тому +19

    लाईक कुणासाठी? अप्रतिम आवाज, संगीत, सोज्वळ अभिनय , शब्द सारे, सारे अप्रतिम😍
    पुन्हा पुन्हा ऐकावे. ❤

  • @charudattapatil2652
    @charudattapatil2652 2 роки тому +53

    " हे गोड रूप ऐसे पाहीन मी दुरुनी " खरंच ती माणसेच वेगळी, ती दुनियाच निराळी ..... स्पर्शाशिवाय उत्कट प्रेम कसं व्यक्त केलं जातं याच उत्तम उदाहरण आहे हे गीत... 🙏

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 7 років тому +310

    दाद कुणाला द्यावी? उपमा आणि अलंकारानी नटलेल्या शांताताईंच्या शब्दांना, मधात भिजून कंठातून बाहेर पडलेल्या बाबूजींच्या आणि आशाताईंच्या स्वराना की वसंत पवारांच्या स्वरसाजाला? सारेच अप्रतिम।

    • @user-ju4zo4wc5x
      @user-ju4zo4wc5x 6 років тому +15

      लाख मोलाची बात ! अशी गाणी ऐकली तरच माणूस त्याचे माणूसपण जपेल !!

    • @deepakbrid5441
      @deepakbrid5441 5 років тому +20

      दाद पण दिली तिही सुदंर शब्दात.

    • @chandrakantmokashi9269
      @chandrakantmokashi9269 5 років тому

      Kamalakar Dhamba घू

    • @amitapatil7320
      @amitapatil7320 4 роки тому +5

      चौघांनाही दाद द्यायला हवी

    • @mrkdfortlover3202
      @mrkdfortlover3202 4 роки тому +2

      @@amitapatil7320 👍

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 3 роки тому +39

    काय सुंदर काळ होता तो... ते लाजणे, ते हावभाव... कुठे अश्लीलता नाही किंवा भडकपणा नाही... पुन्हा जन्मास जावे असा तो काळ...

    • @devendralele7349
      @devendralele7349 11 місяців тому +1

      Agdi khara bolalat👍

    • @chandrakantlimaye8110
      @chandrakantlimaye8110 11 місяців тому

      खर आहे मनातली गोष्ट डोळ्यांच्या हावभावावरून समजत होती, ती प्रेमळ नजर हवीहवीशी वाटणारी होती
      आता अर्ध कपड्यात मुलीच रस्त्यावर गावभर फिरतात आणि आयांना त्याची लाज वाटत नाही
      कंबरेचे सोडले आणि डोक्याला गुंडाळले अशी अवस्था आहे समाजाची
      ह्याला कारण हिंदी चित्रपट

  • @anandraopatil9902
    @anandraopatil9902 7 місяців тому +12

    हे देवा पुनश्च जन्म दे रे यांना सर्वाँना ज्यांनी असे गाणे निर्मिले

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 роки тому +43

    वा वा काय सुंदर .आम्ही योग्य वेळी जन्म घेतला म्हणून आम्हा ला ही गाणी ऐकायला मिळतात .आमच्या आईवडिलाना हयात मोठा वाटा आहे .लहानपणापासून ही गाणी ऐकत वयाने वाढलो.

  • @vinayakadurkar6833
    @vinayakadurkar6833 6 років тому +137

    हि गाणी म्हणजे मराठी गीतांचा सुवर्णकाळ . आपण भाग्यवान म्हणून या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकलो.

  • @user-oy4ov2rr5d
    @user-oy4ov2rr5d 5 місяців тому +8

    जय श्रीराम, सिनेमा होता हा.... सध्या चे पिक्चर आहेत. अभिनय, आवाज, संगीत किती हा सोज्वळ पणे प्रेमाची साद.... अप्रतिम च, जयहिंद

  • @jeevanb3991
    @jeevanb3991 6 років тому +40

    शेवटच्या कडव्यात लाजरा शहारा या शब्दांवर जयश्री बाईंचा लाजण्याचा अभिनय लाजबाब.

    • @arunahirrao4005
      @arunahirrao4005 3 роки тому +2

      मी परत फिरून येईल.असे तो काळ मला सांगतो आहे.नक्कीच,वाट पाहू

  • @raghvendraitolikar3087
    @raghvendraitolikar3087 2 роки тому +33

    गाण्यातील प्रत्येक शब्द आणि कलाकारांनी केलेला अभिनय दोन्हीही अप्रतिम आहेत असे गाणे तयार होणे आता शक्य नाही 👌👌😊😊🙏🙏

  • @kaiwalyakulkarni269
    @kaiwalyakulkarni269 Рік тому +18

    किती सुंदर भाव आहेत गाण्यातले .शब्दांना पूर्ण न्याय देणारे हाव भाव दोघांच्या चेहऱ्यावरचे .अप्रतिम आवाज आशाजींचा आणि बाबुजींचा! कानाला तृप्त करणार गाणं आणि पुन्हा त्या काळात घेऊन जाणार गाणं सगळंच अप्रतिम ही जुनी जुनी गाणी हृदयात घर करून गेलेली आहेत

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +8

    असे ऐकण्यात व वाचण्यात आले आहे की , राजा गोसावी ह्यांचा पहिला चित्रपट होता -- लाखांची गोष्ट . ह्यात काम करतेवेळी ते थिएटरमध्ये बुकींग क्लर्क होते .रोजच्या सिनेमाच्या दोन खेळांची तिकीटे विकायची व दुपारी चार वाजेपर्यंत सिनेमात शूटींग करायचे. बऱ्याच वेळी ज्या सिनेमात काम केले हिरोचे ,त्याच सिनेमाच्या खेळाची तिकीटे त्यांना सिनेमा हाॅलच्या बुकिंग विंडोवर विकावी लागली.

    • @manishaskarr9483
      @manishaskarr9483 2 місяці тому

      मी कै. राजा गोसावी यांची मुलाखत सह्याद्री वर पाहिली होती. त्यांना सिनेमात काम करायचे होते ते कै.मास्टर विनायक यांच्या घरात पण काम करत.ते बेबी नंदा लहान असताना फिरायला नेत असे

  • @pradeepsuryawanshi3634
    @pradeepsuryawanshi3634 3 роки тому +10

    इतकी साधी ,सरळ ,सोपी पण तेवढीच अवीट ,सुमधूर गाणी ..तितकाच संयंत अभिनय ..प्रेम..मनाला खूप शांती देतात..

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 3 роки тому +6

    मराठीतले सर्वोत्कृष्ट अजरामर प्रेम गीत

  • @swativayachal3268
    @swativayachal3268 6 років тому +62

    कोणा कोणाचे कौतुक करायचे
    असं वाटत की आपणच आपलं कौतुक करुन घ्यावे कि अशी गाणी गायक संगित कार नट नटी यांची सुमधुर गाणि आपल्याला ऐकायला मिळाली

  • @sandhyachaware7690
    @sandhyachaware7690 4 роки тому +14

    मराठीतील सर्वश्रेष्ठ द्वंद्वगीतांमधील सर्वोत्तम. कितीदा म्हणून ऐकावे

  • @sanjaytambe3907
    @sanjaytambe3907 4 роки тому +20

    रुपयास भाळलो मी च्या काळात इतके गोड गाणे ऐकायला कुणाला वेळ आहे का ?

  • @madhavvaishampayan8250
    @madhavvaishampayan8250 7 років тому +295

    एवढी सुमधुर गाणी पुन्हा कोण निर्माण करेल असं वाटत नाही . कोणाकोणाचे आभार मानायचे ? ती दुनियाच वेगळी आणि ते कलाकार खरे खुरे गंधर्वच !!

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 5 років тому +2

      Khara aahe Madhavji.

    • @lakshmitara5088
      @lakshmitara5088 5 років тому +1

      👌🌷👌

    • @umasathye28
      @umasathye28 4 роки тому +1

      khara aahe.. ata aamchya pidhichi gani jast vela aikavishich vatat nhit..juni gani khuuuup ch chhan astat..

    • @ramadasvrao
      @ramadasvrao 4 роки тому

      R

    • @krishna7240
      @krishna7240 4 роки тому +1

      Jatan karavi juni gaani evdhach karu shakto aapan .....

  • @sumitasolat6448
    @sumitasolat6448 2 роки тому +10

    इतकी वर्षे गेली पण ही अवीट गाणी अजून स्मरणीय आहेत.वेड लावताहेत.

  • @dattatrayakale8770
    @dattatrayakale8770 7 років тому +67

    कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही.. शब्द, चाल, संगीत आणि आवाज ह्यांचा सुंदर मिलाफ.।

    • @jagdishdeshpande5374
      @jagdishdeshpande5374 4 роки тому +1

      अगदी बरोबर बोललात

    • @prasadwaghmare6308
      @prasadwaghmare6308 4 роки тому +1

      खरंच

    • @rajubhandare6625
      @rajubhandare6625 Рік тому

      खरंच मी माझ्या आयुष्यात भाग्यवान आहे अशी खुप छान गाणी ऐकायला मिळतात खुप खुप छान

    • @sangeetapadalkar9587
      @sangeetapadalkar9587 Рік тому

      आता स्पर्शातून जादू नाही स्वर्गीय संगीत नाही. अविस्मरणीय आवाज आणि शब्द नाही. आपण भाग्यवान आणि श्रीमंत

    • @swatipadake1968
      @swatipadake1968 Рік тому

      Kharach

  • @anjalisuroshe8073
    @anjalisuroshe8073 3 роки тому +19

    गाणे सुरू होते रंगहीन पण भावना सप्तरंग लेवून निर्माण होतात 🙏सगळ्या कलाकार गीतकार संगीतकार गायकांना 🙏🙏

  • @aditymadiwale1296
    @aditymadiwale1296 Рік тому +6

    खरंच हे गाणे इतके अप्रतिम आहे की हे गाणं कितीही वेळा करोड वेडा जरी ऐकले तरी माझे कान थोडासुद्धा तृप्त होत नाहीत ज्या कोणी एवढी मराठी भाषेच्या सुवर्णकाळातील गाणे युट्युब वर टाकली तर त्यांना धन्यवाद द्यायला माझे शब्दच अपुरे पडतात पुन्हा पुन्हा शतशः धन्यवाद इतके अप्रतिम गाण्याबद्दल खरच शतशः धन्यवाद

  • @guniwakode879
    @guniwakode879 2 роки тому +10

    असे वाटते जनु तो काळ किती सुवर्ण होता कारण गीत रचना,गायिकी,संगीत कानात घुमत राहते पुन्हा पुन्हा असे गाणे ऐकावे वाटते

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 11 місяців тому +2

    अगदीच खर आहे तो चेहेरा देखील तेवढाच गोड आहे निर्मात्यांनी कलाकार विचार पुर्वक चित्रपटाला शोभेल अशीच निवडली आहे

  • @swatibhanagejoshi4730
    @swatibhanagejoshi4730 2 роки тому +6

    किती गोड दिसतेय 😍 गाणे ही गोड

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 3 роки тому +4

    सारेच अप्रतिम, अलौकिक , अपार आनंद देणारं. धन्यवाद या साऱ्यांना !

  • @neelprabhakulkarni7347
    @neelprabhakulkarni7347 2 роки тому +3

    खरं आहे माधवजी तुम्ही म्हणता ते.अशी सुमधूर, भावपूर्ण, गाणी आता ऐकायला मिळण.कठीणच आहे.शब्द साधेच पण अर्थ किती छान.कुणीही ऐकावीत.आम्ही नशिबवान त्या काळात ऐकली अशी सुंदर गाणी.आणि आजही ऐकतोय.गाण्यातील शब्दातून किती सहज,हळूवार प्रेम व्यक्त झालयं. 🌹🌹

  • @shrikantpeshave8528
    @shrikantpeshave8528 27 днів тому

    अगदी सहज पण अप्रतिम अभिनय केला आहे या दोघांनीही. जयश्रीबाईंचे हावभाव आणी लाजणे अप्रतिमच.

  • @vilasnatu9740
    @vilasnatu9740 5 років тому +6

    राजा गोसावि हे सूद्धा एक सूपरस्टारच होते आहेत

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 2 роки тому +4

    खुप अर्थपुर्ण गाणे ऐकावे वाटणारे जयश्री जी आणि राजा गोसावी यांचा छान अभिनय आणि सुधीर बाबुजी आशा भोसले यांचा मस्त आवाज मनाला भाळवणारा पुन्हा पुन्हा ऐकावा वाटणारा.

  • @chinmaysant
    @chinmaysant 7 років тому +36

    कितीदा ऐकावे तितके कमीच आहे ह्या सगळ्या रचना । जितक्यांदा ऐकावं तितक्यांदा नवीन काहीतरी सापडतच ।। 🙏👌👌👌

  • @vrishali.g3353
    @vrishali.g3353 6 років тому +28

    सात्विक प्रेमाचे दर्शना आणि सुमधुर गाण्याची ओळख आशाताई सुधीर जी जयश्री आणि राजा गोसावी सारेच कॉम्बो अप्रतिम

    • @jeevanb3991
      @jeevanb3991 6 років тому +2

      Vrishali Gotkhindikar नायक नायिका हातभर अंतर ठेवून प्रेम व्यक्त करतात. किती सोज्वळता आहे.

    • @udaykorde4468
      @udaykorde4468 5 років тому +2

      Jeevan B नशीबवान आम्ही. नाही तर आताच्या चाँदन्यानी आणि हिरोनि किती अंतर ठेवले आसते कोणास ठाऊक कदचित मान खाली घालावी लागली असती. त्या वेळी कलाकार सिनेमा आणि बाहेरच्या जगात सुद्धा सोज्वळ हॉट होते.

    • @udaykorde4468
      @udaykorde4468 5 років тому +1

      जगात सुद्धा सोज्वळ होते.

  • @shantwaghmare8551
    @shantwaghmare8551 5 років тому +13

    गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या सुरांच्या गीतांच्या आठवणी

  • @MOVIEQUEST1
    @MOVIEQUEST1 7 років тому +24

    काय म्हणावं त्या सात्विक भावभावनांना ! किति सुमधुर शब्दकळा!

  • @popatjadhav9697
    @popatjadhav9697 День тому

    निखळ सौंदर्य आणि नितळ प्रेम .....

  • @mahavir3011
    @mahavir3011 9 років тому +110

    दैवी लोक .दैवी संगीत .दैवी रचना. दैवी स्वर. .पुन्हा होणे नाही आम्ही भाग्यवान.आभारी आहे

    • @user-ju4zo4wc5x
      @user-ju4zo4wc5x 6 років тому +2

      लाख मोलाची बात ! अशी गाणी ऐकली तरच माणूस त्याचे माणूसपण जपेल !!

    • @maheshvaze8533
      @maheshvaze8533 5 років тому +1

      khup Chan

    • @vidhitinarvekar4749
      @vidhitinarvekar4749 5 років тому

      @@user-ju4zo4wc5x ymsrathl

    • @lakshmitara5088
      @lakshmitara5088 5 років тому +1

      👌🌷👌

    • @kiranmahale6633
      @kiranmahale6633 4 роки тому

      kharay

  • @श्रावणपवार
    @श्रावणपवार 19 днів тому

    अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम...
    यापेक्षा सरस एखादा शब्द असेल तर तोही फिका पडावा असा आवाज, असे शब्द, गाण्याची चाल, राजा गोसावी आणि सौंदर्याची खाण जयश्री ताई यांचा अभिनय...स्वर्गीय अनुभव.

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 4 роки тому +8

    1979-1980-1981 golden days in my life या गाण्यामुळे सर्व आठवणी जाग्या झाल्या...

  • @user-lu5pd4jq4w
    @user-lu5pd4jq4w Місяць тому

    जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटं नाही आहे अतिशय सुंदर🎉❤😢👍👍👌👌💐💐

  • @sudhakarmodak1244
    @sudhakarmodak1244 7 років тому +30

    अविस्मिरणीय रचना व संगीत ह्दयालर कोरलेले व मनात व कानात साठवलेले

  • @user-tg9xv8zz9w
    @user-tg9xv8zz9w 2 місяці тому

    खर प्रेम काय असते हे सांगणारा काळ म्हणजे गदिमा, बाबूजी,आशा ताई,लता दिदी

  • @bharatighewari7820
    @bharatighewari7820 5 років тому +9

    अप्रतिम शस्दरचना...अप्रतिम आवाज...सगळच छान...अविस्मरणीय अवीट गाण....

  • @vinoddere5079
    @vinoddere5079 5 років тому +8

    या सुंदर भावना मनात घर करुन बसल्यात
    खरच खुप सुंदर आहे हे गीत कानावर
    पडले कि मन कसे ठवठवीत होते

  • @shakuntalaraje3581
    @shakuntalaraje3581 9 місяців тому +1

    Triveni sangum madhur swar ,sangeet ani sunder abhinaya!

  • @PraveenKumar-mn2on
    @PraveenKumar-mn2on 6 років тому +20

    लाख मोलाचे असे गीत , संगीत , कलाकार, गायक हे पुन्हा कधी जन्म घेतील का ....?
    शक्यच नाही .

    • @ushanehulkar5639
      @ushanehulkar5639 5 років тому

      Sandersong

    • @ushajoshi7373
      @ushajoshi7373 5 років тому

      ए मालिक तेरे बंदे हम
      स्वर्गीय खरंच स्वर्गीय ध्वनी..जोशी सांगली

  • @vishwaskanitkar1791
    @vishwaskanitkar1791 4 роки тому +5

    अशी गोड, मधुर व अप्रतिम गाणी पुन्हा मराठीत होतील का?अशी गाणी नवीन पिढीपर्यंत पोहचवणे जरूर आहे.हा ठेवा कायमस्वरूपी जपायला हवा.

  • @hemanthakumarkamath7779
    @hemanthakumarkamath7779 4 роки тому +25

    Waah... Anybody notice that they ( the actors ) have never touched each other even once during the song... just classic song and picturisation..
    A CLASSIC IN RAAG DESH by Sudhir Phadke and Ashs Bhosle... I really feel the pain listening today's marathi music... Once it was HEAVENLY....

    • @SukhdevJadhav
      @SukhdevJadhav 4 роки тому +1

      हे गोड रूप ऐसे निरखिन मी दुरून

    • @geeta8237
      @geeta8237 4 роки тому +1

      It has Soul connection.

    • @devendralele7349
      @devendralele7349 11 місяців тому

      It's raag Tilak Kamod

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 5 років тому +9

    अप्रतिम ..खरच ..😍असं गाणी संगीत पुन्हा होणे नाही

  • @kshiprac
    @kshiprac 12 років тому +16

    Sundar lyrics....outstanding tune aani sakhshat Sudhir Phadke and Asha Bhosle ...Heavenly

  • @indrakarankashinathraokhad7398
    @indrakarankashinathraokhad7398 4 роки тому +5

    खूप सुंदर मधुर रागदारी वर आधारित गाणे

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 4 роки тому +4

    काय हावभाव आहेत, अगदी निर्मल.... आज काल कुठं असे पहायला मिळते

  • @anandraopawar7317
    @anandraopawar7317 5 років тому +9

    असे सुमधुर गीत ऐकणे
    किती भाग्याचे असे गीत होणे नाही.

  • @milindlimaye1973
    @milindlimaye1973 3 роки тому +1

    खरच कुणाकुणाला नमस्कार करू. या गीतामधे सहजसुंदर अभिनय करणाऱ्या राजा गोसावी , जयश्री गडकर यांना.
    सदर गीत सादर करताना आमच्या कानांना स्वर्गीय आनंद देणारे बाबूजी ,आशा भोसले यांच्या स्वरांना कि अजरामर गीत लिहिणाऱ्या शांता बाईंना का सुमधुर संगीतकार बाबूजींना.खरच आम्ही फारच भाग्यवान आहोत .

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 Рік тому +1

    अविस्मरणीय गीत... गीत, संगीत आणि स्वर सर्वच अप्रतिम...

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 8 років тому +17

    श्रीस्वामीसमर्थ नमस्कार वा फारच सुंदर अगदी स्वर्गसुख अनुभवले.

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 роки тому +2

    शिरसवाडी पुस्तक वाचून कोणी कोणी आलंय इथ

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 Рік тому

    खरेच सारेच अप्रतिम। रोमँटिक गीत याला म्हणावे। यैकताना। पहाताना आल्हाद दायक वाटते

  • @omsaicaretakerservices3997
    @omsaicaretakerservices3997 4 роки тому +2

    शतदा ऐकूनही तहान मिटत नाही असे सुंदर गीत....गीत संगीत आवाज सारेच काही अतीसुंदर

  • @sadashivjoshi3319
    @sadashivjoshi3319 8 місяців тому

    आज सहा एक वर्षानी हे अजरामर गीत ऐकताना तोच टवटवीत अनुभव संयत शब्दानी फुललेली प्रीत सुचकपणे मनाला भिडते,प्रसन्न करते..केवढी ही जादू?

  • @swativaidya1817
    @swativaidya1817 4 роки тому +3

    पवित्र प्रेमाची भावना या सुमधूर गीतातून जाणवते

  • @subhashkulkarni4857
    @subhashkulkarni4857 5 років тому +3

    सर्व भावगीतांमध्ये अतिशय गोड .

  • @vijaydantale3663
    @vijaydantale3663 4 роки тому +2

    गाण्यास भाळलो मी ...फारच सुंदर

  • @guniwakode879
    @guniwakode879 Рік тому +1

    पुन्हा पुन्हा ऐकावे पाहावे वाटणारे अप्रितम चित्रण झालेले अतिशय गोड व मंजुळ असे हे सूंदर गाणे

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 11 місяців тому

    उत्तम शब्द रचना उत्तम संगीत, उत्तम गायन, उत्तम चित्रावलोकन, उत्तम कलाकार हा तर पंचगंगेचा संगम आहे कोणा एकाला दाद देता येईल असे मला वाटत नाही, अवीट गोडी असलेली ही निर्मीती बघून परमेश्वर देखील सुखावला असेल
    राधेला कृष्ण आठवला असेल, त्याच्या खोड्या आठवल्या असतील, केवळ अप्रतिम ह्या पलीकडे जीभ पूढे जात नाही

  • @nenesv1956
    @nenesv1956 7 років тому +15

    Thanks Rajadhyakhsha Saheb for uploading such song

  • @ramadasvrao
    @ramadasvrao 4 роки тому +11

    Beautiful song and those were the days when Raja Ghosavi & Jayashree Gadkar we’ar at the top of Marathi screen !

  • @kishordeo1834
    @kishordeo1834 2 роки тому +1

    हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत,

  • @suchitraranadive4325
    @suchitraranadive4325 24 дні тому

    केवळ अप्रतिम!सतत ऐकत असते.

  • @rakheeparkar5194
    @rakheeparkar5194 3 роки тому +2

    गा ण्याच्या प्रेमात पढावें, असे गाणे आहे. 👌👌

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 2 місяці тому

    आशाजींचा आवाज महणजे मधाचे पोवळे.

  • @manjugadgil2105
    @manjugadgil2105 12 років тому +4

    atishaya madhur geet. apratim aavaj aani jayashree aani rajabhau lajawab. thanks for uploading

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 4 роки тому +6

    Immortal music..lyrics..acting...just amazing..no words..

  • @vinodtatiya9687
    @vinodtatiya9687 5 років тому +2

    देस रागातींल एक अप्रतिम रचना

  • @leenab1328
    @leenab1328 2 роки тому +6

    Soft tenderly sweet soulful song 🎵 💕
    My fav ..close to my heart ❤

  • @shashankpandit6882
    @shashankpandit6882 Рік тому

    कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी प्रत्येक वेळी गोडवा वाढतच जातो. ही आणि अशी अनेक कर्णमधुर गाणी ऐकत आम्ही वाढलो हे नशीबच. बाबूजी अन् आशाताई याचे स्वर म्हणजे मेजवानीच. जयश्री गडकर आणि राजा गोसावी यांचा सहज अभिनय याला तोड नाही. सभ्य शृंगार व हळुवारपण ही त्या काळची श्रीमंती होती. कवी संगीतकार गायक गायिका सर्व उत्तुंग.

  • @ajaytalgeri133
    @ajaytalgeri133 Рік тому +4

    My humble pranams to the entire team of this music team. My understanding, this is the outstanding composition lyrically/vocals. Ultimate.

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 Рік тому

    याला म्हणायचे रोमँटिक गीत. किती आलुवार काय तो स्वर्गीय स्वर थेट हृदयाला भिडणारे केवळ अप्रतिम

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Рік тому

    राजा गोसावी जयश्री गडकर यांचा अभिनय सुधीर फडके यांचा आवाज शांताबाई चे काव्यलेखन व आशा भोसले यांचा आवाज व वसंत पवार या सर्वांनाच दाद द्यायला पाहिजे. या सर्व टीम वर्क मुळे इतके सुंदर गाणे ऐकावयास मिळाले की जे सारखे च ऐकावेसे वाटते. जूने ते सोने म्हणून च म्हणतात.

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 Рік тому

    tumche he gane kitihi vela aikle tari samdhan hot nahi. gane evergreen aahech, pan tumhi te apratim sadar kele aahe. Dhanyavad.

  • @vijaymalapalse2117
    @vijaymalapalse2117 10 днів тому

    Ati sundar git Sade sope arthpurn 👌👌

  • @sudeshrajurikar8940
    @sudeshrajurikar8940 2 місяці тому

    खरच तो काळ भारीच होता, ते सांगता येणार नाही.

  • @aratidhavale2078
    @aratidhavale2078 Рік тому +1

    अख्ख्या गाण्यात कुठेही स्पर्श नाही.दोघही एकमेकांपासून decent अंतर ठेवून आहेत.दोघही फक्त नजरेने बोलतात. खरोखर अप्रतिम मेळ आहे सगळ्याचा

  • @sharadpande499
    @sharadpande499 Рік тому

    Kay shabdrachana.
    Kiti sundar sangeet
    Kiti sundar swarrachana.
    Mast bahut badhiya sundar.
    Man ani kaan trupta zale.

  • @sameerbhavsartandle7509
    @sameerbhavsartandle7509 8 років тому +5

    मनाला साद घालणारे गीत

  • @smitakokitkar4159
    @smitakokitkar4159 3 роки тому +1

    व्वा किती सुंदर 💞

  • @dattaprasadjoshi6191
    @dattaprasadjoshi6191 Місяць тому

    अविट गोड ❤

  • @user-fu9uw7js1p
    @user-fu9uw7js1p 2 роки тому +1

    अप्रतिम..👌

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Рік тому

    तीलककमोद रागातील अतीशय श्रवणीय गाणे.सुधीर फडकेंचे संस्मरणीय संगीत.

  • @vrushalibedekar4014
    @vrushalibedekar4014 5 років тому +7

    Brilliant composition by Shri. Vasant Pawar. A unique blend of 2 raagas. DES and TILAK KAMOD. 😊

    • @dipiaarmarathi
      @dipiaarmarathi  5 років тому +1

      This is Tilak Kamod raag , I guess

    • @jayalaxmibhat4101
      @jayalaxmibhat4101 Рік тому

      Hamne tujko pyar kiya hey ethana kon karega... Sadhana & Raj kapoor.. Same raga ( guess)

  • @bhalchandrasawant2528
    @bhalchandrasawant2528 8 років тому +5

    मनातले गीत

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 2 роки тому

    डी पी राजाध्यक्षांचे सुद्धा. खूप खूप अभिनंदन काय सुरेख पार्श्वभूमी तयार केली आहे नागपूर

  • @ravan66iyer99
    @ravan66iyer99 8 років тому +17

    What a song. Sung superbly by our Appa saheb and legendry Asha thai.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 8 місяців тому

    अप्रतिम!❤❤❤❤❤❤❤❤

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 8 місяців тому

    खूप छान आणि सुंदर लयबद्ध सुमधुर संगीत आणि सुंदर लयबद्ध सुमधुर आशा ताई आणि बाबुजी अप्रतिम सुंदर 👌👌💗

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 роки тому

    खरचं पुर्वीची जुनी गाणी अत्यंत गोड आणी कर्णमधुर अर्थपूर्ण होती किती हि ऐकतच रहावी वाटतात

  • @makarandkawale317
    @makarandkawale317 8 місяців тому

    हि अशी गाणी आता खुपच दुर्मिळ होत चालली आहेत,पण खरं सांगायचं तर,हि गाणी म्हणजे जुन्या लोकांची ऊर्जा होती.

  • @chaitanyajosh
    @chaitanyajosh 14 років тому +10

    Another beauty from Vasant Pawar ! Why do such talented ppl always die young !!

  • @cmpendse
    @cmpendse 6 років тому +4

    excellent piece of Music..........Kudos to Vasant Pawar , Asha bhosale and Of course Sudhir Phadke ............Shantabai........the greatest as usual...........

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 2 роки тому

    इतकी सुरेख गाणी ऐकतच राहावेसे वाटते रसिकांवर अनंत उपकार आहेत नागपूर

  • @shakuntalaraje3581
    @shakuntalaraje3581 11 місяців тому +1

    This song is example of melody and fabulous acting of the artists.