अमृतनयना | नयना आपटे यांना सांस्कृतिक मानवंदना | Amrutnayana | Cultural tribute to Nayana Apte

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2024
  • ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाउल ठेवलं आणि आईच्या अकाली निधनानंतर आपल्या अभिनय शैलीने आपलं स्वतःचं अस्तित्व आणि "मी नयना आपटे" अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाची पंचहात्तरी आणि कारकिर्दीची सत्तरी या निमित्ताने नयना आपटे यांच्या कलाप्रवासाला सांस्कृतिक मानवंदना म्हणून 'संस्कृती सेवा न्यास' या संस्थेने 'सवाईगंधर्व एन्टरटेन्मेंट' च्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात सादर झालेल्या या कलाकृती.
    गायक - पं. मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित
    वादक - मकरंद कुंडले,आदित्य पानवळकर
    नृत्य - गायत्री दीक्षित व सहकारी (वरदा नृत्यालय)
    अभिनेते - प्रविणकुमार भारदे व बाल कलाकार
    तसेच
    अथर्व गोखले, स्वराली गर्गे, आकाश भडसावळे आणि नयना आपटे
    निवेदक - अमेय रानडे, तपस्या नेवे
    Veteran actress Nayana Apte was given a cultural tribute on her 75th birthday at Kalidas Natyamandir Mulund on 24 February 2024. He has received 'Padma Shri' from the Government of India and 'Lifetime Achievement Award' from the Government of Maharashtra. Nayana Apte created a great image of her art in all three domains of acting, singing and dancing. As the daughter of actress Shanta Apte, she made her foray into theater at the age of just four and after her mother's untimely death, her acting style created her own presence and identity as "I am Nayana Apte". Her acting career has now completed 70 years. On the occasion of her 75th birthday and completion of 70 years to career, these artworks were presented in the program 'Amritnayana' organized by 'Sanskriti Seva Nyas' in collaboration with 'Sawaaigandharva Entertainment' as a cultural tribute to Nayana Apte's artistic journey.
    Singers - Pt. Mukund Marathe, Dnyanesh Pendharkar, Neelakshi Pendharkar, Aparna Aparajit
    Musucian - Makarand Kundale, Aditya Panwalkar
    Dance - Gayatri Dikshit & Team (Varada Nrityalay)
    Actors - Praveenkumar Bharde & child actors
    AND
    Atharva Gokhale, Swarali Garge, Akash Bhadsavle & Nayana Apte
    Anchor - Amey Ranade, Tapasya Neve
  • Розваги

КОМЕНТАРІ • 7