घरबसल्या असा करा लाखोंचा Business |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • ⭐👇 हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link :open.spotify.com/episode/7gBN... ​ ⭐👇
    Introduction 0:00
    बालपण 0:49
    नातेवाईकांचा विरोध 6:58
    पुण्यात admission 8:12
    जॉब चा प्रवास 9:03
    Food Orders-15:52
    UA-cam कडे वाटचाल 16:22
    UA-camr's ना टिप्स 20:39
    गृहिणींना संदेश 21:04
    एक मुलगी,जिच्या लहानपणीच तिचे वडिल कॅन्सर ने दगावतात. काबाडकष्ट करून आई मुलांना शिकवते. आईला तिच्या कामात मदत करत तिने आपले शिक्षण पूर्ण केले.नंतर जॉब मध्ये ही तिने आपली धमक दाखवली.तिला स्कॉटलंड ला जायची संधी मिळाली.पण लग्नानंतर तिच्या बाळाच्या रूपाने तिच्यासमोर एक चॅलेंज आले आणि तिने जॉब सोडला. अशावेळी ही तिने शांत न बसता एक यु ट्युब चॅनेल सुरु केलेआणि यशाचे शिखर गाठले. तिच्या या यशाचे रहस्य ऐका तिच्याच शब्दांमध्ये...ती मुलगी म्हणजेच 'Sarita's Kitchen' या सुप्रसिद्ध UA-cam Channel च्या निर्मात्या सौ.सरिता पदमन होत !!
    A girl whose father died due to cancer in her childhood... The mother teaches the children through hard work. She completed her education by helping her mother with her work. Later in the job she showed her threat. She got a chance to go to Scotland. But after marriage she faced a challenge in the form of her baby and she quit her job. This is when she started a UA-cam channel without sitting still and reached the pinnacle of success. Listen to the secret of her success in her own words .That girl is Mrs. Sarita Padman, the creator of the well known UA-cam channel 'Sarita's Kitchen' !!
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Work Hard story story from across India through Rags To Riches story, Business Success Story, Work Hard story videos, and, Rags To Riches story, Inspirational Story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your Work Hard story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and Must Watch Talk stories with speakers from every conceivable background, including Business Success, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmar. .
    ► Tweet with us: / joshtalkslive. .
    ► Instagrammers: / joshtalksma. .
    #marathiyoutuber #struggle #success
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda
    youtube video ideas business ideas top 5 marathi youtuber saritas kitchen best marathi youtuber marathi business ideas marathi motivation motivational speech focus on yourself small business

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @g9w958
    @g9w958 2 роки тому +587

    अभिमान आहे तुमच्यासारखा मराठी महिला यूट्यूबर आणि उद्योजिकेचा. सर्वांनी हिंदीपेक्षा आपल्या मराठी यूट्यूब कंटेंट निर्मात्याला प्रोत्साहन द्या 🙏

    • @notspecial9240
      @notspecial9240 2 роки тому +16

      होय अगदी बरोबर 👍
      परंतु , हिंदी सुध्दा आपलीच आहे ना...!
      हिंदी सोबत आपली काय शत्रुत्व ?
      सॉरी , माझ्या शब्दाचे तुम्हाला वाईट वाटले असेल तर माफ करा. परंतु , हिंदी सुध्दा आपलीच भाषा आहे ना...! 😎✌️😘👍😊🙏☺️

    • @g9w958
      @g9w958 2 роки тому +22

      @@notspecial9240 मी हिंदीबद्दल कुठेही वाईट बोललो नाही. हिंदी भारतीय भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्राचं झपाट्याने हिंदीकरण होत आहे. हिंदीच्या प्रभावाने मराठी झाकोळली जात आहे. सर्व क्षेत्रांत मराठीला प्राथमिकता मिळावी एवढंच माझं म्हणणं आहे

    • @notspecial9240
      @notspecial9240 2 роки тому +7

      @@g9w958 ओक्के सर 👍😘. होय , बरोबर मराठी जणु काही हळु हळु लुप्त होत आहे असे वाटते. 👍
      पुन्हा एकदा माफी मागतो सर तुम्हाला माझ्या कॉमेंट मुळे वाईट वाटले असेल तर ☺️🙏☺️

    • @g9w958
      @g9w958 2 роки тому +4

      @@notspecial9240 महोदय/महोदया तुमच्या प्रतिक्रियेमुळे मला कसलेही वाईट वाटले नाही. मत मांडायचा तुम्हाला हक्क आहे. हिंदी लादल्याने उत्तरेकडील अवधी, ब्रज, मैथिली आणि इतर अनेक भाषा लुप्त झाल्या आहेत. आजही महाराष्ट्रात मोठ्या शहरांत मराठीतून सेवा नाकारून हिंदी लादली जात आहे. शेवटी कोणाला काय बघायचे हे ते ठरवणार. यात हिंदीबद्दल कुठेही द्वेष नाही. मी फक्त विनंती केली

    • @notspecial9240
      @notspecial9240 2 роки тому +1

      @@g9w958 👍😊😘

  • @kamblemanisha1931
    @kamblemanisha1931 2 роки тому +125

    ताई तुमचा संघर्षं एकूण डोळ्यात पाणी आलं.
    परिस्थिची जाण ठेवून आपण स्वतःला डेव्हलप केलं.तुमची अजून खूप प्रगती होवो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vandanamaine6109
    @vandanamaine6109 2 роки тому +11

    तुमचा आतापर्यंत चा संघर्ष ऐकून डोळे भरून आले तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना मेहनतीला यश लाभो ही सदिच्छा सरीता ताई 👍

  • @poojabharakar6500
    @poojabharakar6500 2 роки тому +4

    वाह खूप छान सरिता ताई...तुमचं बोलणं खूप साधं आणि गोड👌तुमचे अनुभव ऐकताना अस वाटत होतं की ते सर्व डोळ्यासमोर घडत आहे. अपॉइंटमेंट लेटर आईला दिल्याचं प्रसंग सांगितलं तेव्हा डोळ्यात पाणीच आलं. करण खर आहे की आपल्या मुलांनी कोणतं ही यश मिळवलं तर या जगात आईपेक्षा जास्त आनंदी कोणीच होऊ शकत नाही....हा प्रसंग ऐकून मला माझी आई डोळ्यासमोर आली🙏
    आणि धन्यवाद खूप छान संदेश दिला तुम्ही.....आपल्या कामात consistancy ठेवा आणि लोक नाव ठेवत राहतील त्याला दुर्लक्ष करून आपलं काम करत राहा🙏🙏
    तुमच्या अतूट प्रयत्नांना, अनुभवांना आणि यशाला सलाम.....तुम्हाला असच यश मिळत राहो हीच प्रार्थना🙏

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 2 роки тому +47

    सरिता तुझी कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले खरंच तुझ्या संघर्षाला सलाम 👍 ऑल द बेस्ट आणि तुझ्या रेसिपीज खुप च छान असतात मी त्या रेसिपीज फाॅलो करते

  • @suvarnadeshmukhe1791
    @suvarnadeshmukhe1791 2 роки тому +43

    तुम्ही सर्व महिलांसाठी एक आदर्श आहात 👍👍

  • @pvnrecipesentertainment634
    @pvnrecipesentertainment634 2 роки тому +8

    ताई तुझ्या संघर्षाला सलाम तुझीच प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक नवीन सुरुवात करायचे ठरवले आहे कृपया कृपया सर्वांनी सहकार्य करा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद

  • @rajshrimore3477
    @rajshrimore3477 2 роки тому +10

    खूपच प्रेरणादायी अनुभव कथन..
    हिंमत असेल तर ईश्वर कोणत्याही रूपात मदत करतो. हीच positivity आहे.
    👍👍👍

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 2 роки тому +46

    तुमचा आवाज खरोखरच खूप छान आणि गोड आहे. तुमच्या संघर्षाला मनापासून सलाम. तुम्हाला असेच दैदीप्यमान यश मिळो हिच मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍👍

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking 2 роки тому +46

    इतक्या अडचणींवर मात करून तुम्ही इथपर्यंत पोचला.... खरंच तुम्ही ग्रेट आहात 👍👍

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 2 роки тому +7

    सरीता तुम्ही फार मेहनती आहात.
    खरचं सगळं ऐकून कीती तुमचं कौतुक करण्यासारखे आहे.
    आणि तुम्ही धाडसी आहात.

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r 8 місяців тому +1

    समाज कल्याण सामाजिक मूल्य महिांसाठीही भरपूर कार्य केले जावे हि शुभेच्छा अभिनंदन आपण आपल्या भूमिके पेक्षा अधिक चांगले माध्यम निवडून काम केले आहे

  • @kalyanikulkarni5101
    @kalyanikulkarni5101 2 роки тому +7

    हा त्यांचा जीवनाबद्दल सांगितलेला सर्व अनुभव अतिशय प्रेरणा देणारा आहे

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d 2 роки тому +20

    ताई तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा, किती गोड बोलतेस ग तू, किती खडतर प्रवास होता तुझ्या ही आयुष्यात,लोक फक्त यश बघता पण् त्या मागच्या कष्टाची कोणाला ही भणक सुध्दा नसते,तु खुप प्रगती कर ताई,आईला तर किती आनंद होत असेल .

    • @abhinyascorner23
      @abhinyascorner23 2 роки тому

      👌👌👍👍

    • @medhawagle2791
      @medhawagle2791 2 роки тому

      सरीताताई मुख्य म्हणजे अगदी पहिल्यापासून तुम्ही स्वतःला कामात रहायची सवय लावून ठेवली. यामुळे उत्तरोत्तर तुमची प्रगती होत गेली, तुम्हाला यश मिळत गेले. अशीच प्रगती चालू ठेवा. मला तुमचा अभिमान आहे.

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 2 роки тому +11

    🙏परिस्थिती माणसाला कसे जगावे हे तर शिकविते पण फक्त पाऊल उचलणारा हवा ताई,तुझ्या प्रयत्नाना सलाम !खरं आहे की जे जीवनात काही करत नाहीत तेच टिका करतात तुझ्या दुखःआत सहभागी आहोत आईचे संस्कार खूप खूप महत्वाचे आहेत 👏 मुलीस ओझे समजू नये सञीशक्तीचा विजय असो!
    आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👌👌👍👍🌹🌹✌

  • @shakuntalanaik9111
    @shakuntalanaik9111 2 роки тому +1

    सरिता मला तुझ खूप अभिमान वाटते. मिपण खूप लोकांचे ऐकून घेतला वाकले नाही. खूप जिधीनेराहिले.माझी नातपण डी.वाय.पाटीलमधे शिकले.अमेरिकन कंपनितकाम करतेएकमहिना झाले. आधी केले पाहिजे.....।।।।.....

  • @jayramsalunkhe66
    @jayramsalunkhe66 2 роки тому +12

    कठीण समय येता, काेण कामास येतो
    ही जीवनाची वास्तविकता तुम्ही सांगितली. पण,
    Hope for the best & prepared for the worst हीच शिकवण मिळते, god bless you.
    ।। श्रीराम समर्थ।।

  • @amrutapatil7546
    @amrutapatil7546 2 роки тому +27

    Tai डोळ्यात पाणी आलं g तुमचा संघर्ष बघून.... क्रेट 👍 आणि माझ माहेर बार्शी कटचच(सोलापूर) तालुका बार्शी,आणि सांगोला सासरकडून खूपच जवळ....तू आमच्या जवलचीच आहेस...तुझा खूप खूप आभिमान ❤️वाटतो...💐💐

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +1

      हो ताई जर जीवनामध्ये दुःख असेल तर खूप सामना करना करावा लागतो जीवनामध्ये जगण्यासाठी 😔😔 आम्ही हेच दुःख घेऊण जगतोय 😔😔

    • @SushmasRecipes
      @SushmasRecipes 2 роки тому +1

      Amaruta ताई मी पण बार्शीची

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 2 роки тому +2

    खुपचं संघर्षमय आणि खूप खूप खूप प्रेरणादायी story आहे ताई तुमची..तुमचा हा संघर्षमय प्रवास ऐकताना वेळोवेळी अक्षरशः डोळ्यात पाणी अन् अंगावर काटा येत होता...सलाम तुमच्या कार्याला..तुमच्या जिद्दीला..🙏🙏
    खरचं अगदी अष्टपैलू आहात ताई...Great..Great..Great tai..👍👍😊❤️💯

  • @ujwalapawar2117
    @ujwalapawar2117 2 роки тому +1

    नमस्कार सरीता ताई , मी तुमचे बरेच विडीओ पाहिले आहेत .तुम्ही खुप छान पध्दतीने रेसिपी समजाऊन सांगता. तुमच्या रेसिपी छान असतात. मी काही करूनही बघीतल्या आहेत. तुमचे जोश टाॅक वरचे बोलणे आणि अनुभव ऐकून छान वाटलं. तुमचे अनुभव प्रेरणादायी आहेत . खरचं मलाही काही तरी करावंस वाटत .मलाही नुसते बसून रहाणे आवडतं नाही. मीही स्वतः दिवाळीच्या फराळाच्या आणि मेथी लाडू डिंक लाडू अशा ऑर्डर घेत होते.तसेच माझा टेलरिंगचा व्यवसाय ही चांगला चालत होता आता 5 - 6 महिन्यापासून तब्येतीच्या कारणाने मला सगळं बंद कराव लागले. पण आजचं तुमच जोश टाॅक वरील बोलणं ऐकून पुन्हा नव्याने काही करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. मी नक्कीच पुन्हा माझे काम सुरु करेन. Thank you so much तुमच्यातील जिद्द पाहून मलाही प्रेरणा मिळाली. तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा. तुमची उत्तरोतर प्रगती होवो हिच मनोकामना.

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 2 роки тому +4

    शब्दच नाहीत कौतुक करायला,माझी आवडती यु ट्युबर, खरंच तू एक ideal aahes saglyansati.

  • @sonaartcraftcookingallin114
    @sonaartcraftcookingallin114 2 роки тому +18

    सरिता ताई तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले. तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात. 🙏🙏🙏

  • @KathaPravah
    @KathaPravah 2 роки тому +1

    अभिनंदन सरिता. तुझ्या जिद्दीला सलाम . अजुन खुप प्रगती होणार तुझी. तुझा प्रचंड अभिमान वाटतो. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरूणांसाठी एवढेच नाही तर माझ्यासारख्या मध्यमवयीन लोकांसाठी तू एक प्रेरणा बनून आली आहेस.अभिनंदन ❤❤❣

  • @vidyaayare9358
    @vidyaayare9358 Рік тому +1

    प्रत्येक महिलेला जे मनात वाटत असते जे तिच्या ही बरोबर घडले ले असते ते तसेच एखाद्या सखीच्या तोंडून एकले की खूप बरे वाटेल आणि पुन्हा जिद्द निर्माण होते तुला आणखी पुधी वाटचालीच्या शुभेच्छा..

  • @seemabairagi5093
    @seemabairagi5093 2 роки тому +15

    ताई तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे,आणि तुमचा इथपर्यंत च प्रवास खूपच खडतर झाला, हे सगळ प्रेरणादायी आहे.खरच ग्रेट आहात तुम्ही,तुमच्या रेसिपी मी पण बघत असते,🙏🏻

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 роки тому +9

    मराठी माणसाचा झेंडा अटकेपार लागतो तेव्हा खुप आनंद होतो.

  • @sujatarahane
    @sujatarahane 2 роки тому +2

    सरिता खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा.
    तुझ्या कष्टाला, मेहनतीला असेच यश मिळत राहो ही सदिच्छा.

  • @kavitakoli8779
    @kavitakoli8779 2 роки тому +1

    खूप छान सरिता..खरच तुझा प्रवास खडतर होता पण त्यावर मात करत चालत राहिलीस..Simply great..अशी कमी लोक आहेत ज्याना आपली किस्मत बदलायची संधी भेटते. तुज्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 2 роки тому +18

    Success हे फक्त आणी फक्त कष्टाने आणी अडचणी वर मत करूनच मिळत याच आणखीन एक उदाहरणं दिलात ताई तुम्ही खूप मनापासून धन्यवाद तुमचे तुमचा लाख मोलाचा अनुभव आमचा सोबत केल्या केल्या बद्दल...धन्यवाद..🙏🙏

    • @nilimatawlare2388
      @nilimatawlare2388 2 роки тому

      खूप छान माहिती दिली आहे काही करण्यात ऊसाह येते आहे

    • @nehadeshmukh2499
      @nehadeshmukh2499 2 роки тому

      खूप छान आणि मोलाचा मेसेज दिला आपण गृहीणी ना.थेक्स् ताई

  • @PoojasCorner
    @PoojasCorner 2 роки тому +5

    ताई तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो...
    खरच एवढा खडतर प्रवास करून तुम्ही जे साध्य केले आहे ते तुमच्या कष्टाचा फळ आहे.... 💐

  • @savitapadole4931
    @savitapadole4931 2 роки тому +1

    खूप छान प्रेरणादायी व्हिडीओ आहे आणि सर्व ऐकून अक्षरशः पाणी आलं डोळ्यातून.. मी सुद्धा एक सिंगर आहे.. पण कोरोना काळात काही तरी करायचं म्हणून फूड ऑर्डर घेतल्या आणि लोणची बनवून विकली खूप छान रिस्पॉन्स मिळाला.. सरिता च्या स्टोरी वरून youtube चा विचार करतेय 👍

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Рік тому +1

    मला तुझ्या बद्दल खुप जाणुन घ्यायचे होते बरं झालं तु हा व्हिडिओ टाकला त्यामुळे आम्हाला कळले तु किती संघर्ष केला आहे

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 2 роки тому +22

    Congrats Sarita. Khup dhadpad karun tumhi yash kamavala aahe. Proud of you. All the best for future endeavors. 👍👍👍

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 роки тому +5

    खूप खूप अभिमानास्पद. तुमच्या आई खूप नशीबवान आहेत तुमच्यासारखी मुलगी त्यांना लाभली. All the best 👍🏼

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi1613 2 роки тому +1

    खुप छान!! तुमच्या रेसेपी मी बघते खरच खुप छान असतात मला आवडतात... तुमचा आता पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏

  • @shwetaketkale3943
    @shwetaketkale3943 2 роки тому +1

    सरिता ताई खूपच छान आहे तुझं गाईडन्स तुझा जीवन संघर्ष खूप प्रेरणादायी आहे तुझा रेसिपीज पण खूप छान असतात मी ट्राय करत असते. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 2 роки тому +5

    खरच प्रेरणादायी ...मी पण ह्या प्रसंगातून गेली.भावी वाटचालीसाठी खुप छान शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 2 роки тому +18

    Great ताई खुप प्रेरणादायी अनुभव आहे तुमचा आमच्या साठी 🙏🙏😊🙏🙏

  • @rashmipawar4637
    @rashmipawar4637 2 роки тому

    तुमचा जीवन प्रवास ऐकून खुप अभिमान वाटला व प्रेरणाही मिळाली. तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 2 роки тому +1

    सरिता ताई तुमचा हा संघर्ष ऐकून खरचं डोळ्यातून पाणी आले तुमची खूप खूप प्रगती होवोत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @yojanapatwardhan5900
    @yojanapatwardhan5900 2 роки тому +3

    प्रेरणदायी प्रवास , खूपच छान सरिता .
    पुढील वाटचाली साठी , खूप खूप शुभेच्छा.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 роки тому +28

    मनापासुन सलाम आपल्या जिद्द आणि कर्तृत्वाला 🙏🌹👏👏

  • @snehalbagwe4177
    @snehalbagwe4177 2 роки тому

    शाब्बास !!! तु भरपूर हुशार आहेस. लहानवयात आलेल्या समस्यांना सामोरे जाऊनही आपला हा जम बसवणे सोपे नाही. तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे . एक प्रेरणादायी झगडून यशस्वी जीवन घडविण्याची तुझी जी वृत्ती आणि क्षमता आहे त्याला सलाम!!!

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 2 роки тому +1

    खरंच तु खुप सुंदर बोलतेस
    मला खूप वाईट वाटते मी तुला आता पाहते
    तुझा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे
    माझी पण खूप इच्छा होती स्वतः चे होटेल नाही तर घरगुती टिफीन असे काही करायचे पण मला घरातून सपोर्ट नाही मिळत आणि मला खूप मोबाईल वापरता ना भीती वाटते काही चुकणार तर नाही ना मला दोन मुलगे आहेत ते काही करु देत नाही आज मी फर्स्ट टाईम तुझ्या बरोबर बोलले 😍🙏

  • @sadhanasushil6840
    @sadhanasushil6840 2 роки тому +3

    ताई तुमचा फार अभिमान वाटतो 🥳🥳💐💐🙏🙏पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @kanchangatkal7279
    @kanchangatkal7279 2 роки тому +5

    Khup chan tai abhiman vatto tumcha🤗🤗bharun aal tumchi journey ekun!! Good luck tai...👍👏

  • @manishamahajan7430
    @manishamahajan7430 2 роки тому

    खूपच छान....खूप खूप अभिमान वाटतो तुझा....आणि तुझ्या recipes pan एकदम परफेक्ट असतात.....

  • @prashantkadam1719
    @prashantkadam1719 Рік тому +1

    तुमच्या मराठी भाषेत बोलण्याचा खूप अभिमान आहे

  • @lifeofnetworker
    @lifeofnetworker 2 роки тому +31

    खुप अभिमान वाटतो ताई तुझा
    सर्व नात्याना संपूर्ण न्याय देऊन तू स्वतःला पण सिद्ध केलं you make me cry👍🥰🥰
    Real motivator 👍👍👍👍

    • @anoshgaikwad1113
      @anoshgaikwad1113 2 роки тому +1

      Mast didi ....khup chan vatal tumcha video bghun

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 2 роки тому +10

    खूप छान आहे व्हिडिओ ताई nice 👌👌❤️ मी पण असंच काही ना काही करते पण मी एक हाउस वाईफ आहे घरात ब्लाउज शिवते

  • @suhaspatil4059
    @suhaspatil4059 2 роки тому

    खूपच प्रेरणादायी प्रवास ताई.. खूपच मोटिवेशनल विडिओ.. Mindblowing... 👌👌👌👌👍👍👍👍

  • @nilamtaware4536
    @nilamtaware4536 2 роки тому

    खरच खूप छान ताई, मला अभिमान आहे आणि मी रोज तुमच्या रेसिपीस पाहते मला खूप खूप आवडतात आणि मी त्या फोलो ही करते, छान छान रेसिपीज बघायला मिळते आणि आणि तुमची अशीच खूप खूप खूप भरभराट होऊ, तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं थँक्यू ताई 🙏

  • @gaheshjadha
    @gaheshjadha 2 роки тому +14

    Tai 22 minutes चा video आहे पण एक minutes हि कंटाळा आला नाही. Your my big inspection woman.

  • @sakshishingre5929
    @sakshishingre5929 2 роки тому +5

    Excellent sarita....motivative speech तू तूझ्या नावासारखंच आहेस....सतत न थांबता वाहत राहणे...

  • @rupalidhaygude7055
    @rupalidhaygude7055 2 роки тому

    Heart Tach video....khup kahi shikayla milala ..me tumche sgle video bgyte khup chan astat... tumchya kde bgun khup kahi krnya cha aatmvishwas yeto

  • @poojarokde4023
    @poojarokde4023 2 роки тому

    खरंच खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे तुझा प्रवास ताई.👌🏼💐

  • @Vidhi.09
    @Vidhi.09 2 роки тому +31

    Sarita great! You r good daughter, wife, mother,n excellent cooking skill ....complete package .

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 роки тому +16

    सरिता ताई खूप touching आपोआप डोळे पाणावले god bless you

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 2 роки тому +1

    सरीता खरंच तुझा खूपच अभिमान वाटला हा विडिओ पाहून. कित्ती त्रासातून गेली आहेस. एकदा आईला भेटव ना.

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 2 роки тому

    खूप छान vlog होता सरिता तुझा प्रवास yekthna रडू आले. तू खूप ग्रेट आहेस 👌👌🙏👍तुझ्या कर्तुत्व vala सलाम 🙏khrch No Words. Gbu. Khup मोठी हो. 😊❤❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 роки тому +21

    सरीता तुला असेच यश मिळत राहो...तूझ्या कार्याला तुझ्या धाडसाला व तूझ्या जिद्दीला सलाम ‌..proud of u सरीता ..May God bless u Always ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ShitalGhotekar
    @ShitalGhotekar 2 роки тому +22

    My Favourite UA-camr,chef sarita..
    Bless you dear❤️🍁

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 2 роки тому

    खूप छान... details मध्ये सांगितलं सगळं...खूप शिकण्यासारखं आहे या व्हिडीओतून...

  • @user-rx6zm2pi1v
    @user-rx6zm2pi1v 10 місяців тому

    Khup chan vatla tainchi story aikun..... Khup abhiman vattoy mala tumchya baddal.... Thank you so much tumhi amchyaparyant tumchi story pohchavli.... Ek jidda nirman zali ahe..... Navi umed milali ahe

  • @archanapereira1943
    @archanapereira1943 2 роки тому +3

    Very much inspiring video .thank. You . God bless you always keep it up 🙏

  • @vandanathete2156
    @vandanathete2156 2 роки тому +5

    Thank you so much for sharing your experience, it is so inspiring, god bless you🙂

  • @pradnyashirke8584
    @pradnyashirke8584 Рік тому

    Very inspiring story sarita... तू खूप धडपडी आहेस....सतत काहीतरी करण्याचा ध्यास आणि आत्मविश्वास असला की आपल्या इच्छा आपण नक्की पूर्ण करू शकतो... सर्वात महत्वाचे म्हणजे जे लोक काही करू शकत नाहीत तेच इतरांना नावे ठेवतात हे 100 टक्के खरे आहे.....
    तुझ्या सर्व पाककृती खूप छान असतात
    ..पदार्थ बिघडत नाही...तुझा आवाज खूप गोड आणि लाघवी आहे...तुझे यश आणि कीर्ती अशीच वृंद्धिगत होत राहो...alll the best

  • @reshmakumbhar6218
    @reshmakumbhar6218 2 роки тому

    ho.खूप छान ताई .कॉन्फिडेन्स vadhala.प्रेरणा मिळाली.

  • @happywithshubhangi7987
    @happywithshubhangi7987 2 роки тому +6

    Great motivation👍 🙏Thank you so much

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 роки тому +8

    Hats off ur struggling journey, n very impressive personality. 🙏🙏👍👍

  • @kalasneharts
    @kalasneharts 2 роки тому +1

    Thank you ताई, तुमच्यामुळे मला खूपच प्रेरणा मिळाली आणि मी माझं स्वतःचं youtube चॅनेल सुरू केलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏

  • @shitalthakur8085
    @shitalthakur8085 Рік тому +1

    खरं ताई तुमचे विचार तुमचे अनुभव ऐकून अभिमान वाटतो तुमचा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @KomaLakhan12
    @KomaLakhan12 2 роки тому +4

    Love u taai.. mazya dolyat pani aal , very inspiring 👍

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 роки тому +4

    Khup chan Tai. Congratulations 👏👏
    Khup mehnati aahat tumhi 💞

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 роки тому

    ताई तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप खरतड प्रवास होता तुमचा तरीपण तुम्ही सगळ्यावर मात करून तुमचे देह गाठले त्यबद्दल तुमचे अभिनंद तुम्हाला असेच यश मिळो तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏👋👍😍♥️

  • @yashvantiyadav6601
    @yashvantiyadav6601 2 роки тому

    खूपच मस्त..किती जिद्दीने राहणं..सतत काहीतरी नविन करणं..स्वत:ला अक्टिव ठेवण..हे खरच शिकण्यासारखे आहे मँम तुमच्याकडून..🙏😊

  • @minalsagvekar1926
    @minalsagvekar1926 2 роки тому +6

    खूपच प्रेरणादायी आहे.keep it up Sarita, life experience is greate.समक्ष भेट शक्य होईल का ?

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 роки тому +5

    Well done Tai......👌👌तुमचा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी आले .खूप प्रेरणा देणारा अनुभव आहे तुमचा.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @manishasapate3732
    @manishasapate3732 2 роки тому

    खूप छान माहिती दिली. Very inspiring. Thank you very much.

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 Рік тому

    खूप छान.... प्रेरणादायी....एक करेक्शन... "आईच्या आनंदाला उधाण नव्हतं" असं नाही...."आईच्या आनंदाला उधाण आलं." असं हवं...... अनुराधाज किचनच्या सौ.अनुराधा तांबोळकर यांच्या चॅनल ला टेक्निकल प्रोब्लेम आला तेव्हा तु मदत केलीस....हे फार आवडलं....नाहीतर समव्यवसायिक लोकांचं पाय खेचण्यात लोकांना असुरी आनंद मिळतो...... सरिता तुला खुप यश मिळो... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎁💐

  • @sushma8612
    @sushma8612 2 роки тому +27

    After hearing this motivational speech, I m proud to be a woman!!!

  • @glacier1418
    @glacier1418 2 роки тому +6

    नमस्कार ताई मला तुमचा अभिमान वाटतो कुठल्याही गोष्टी सहजपणे मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात पण तुमच्या जिद्दी ला माझा तुम्हाला मानाचा मुजरा अशाच नेहमी यशस्वी होत रहा

  • @sushmakadam280
    @sushmakadam280 2 роки тому

    खूप सुंदर छान विचार आहेत हे मनोगत हे विचार ऐकून काही तरी करायची इच्छा निर्माण झाली आहे 👍 आभारी आहे

  • @shwetabane4285
    @shwetabane4285 2 роки тому

    Khup chhan mam, प्रयत्न ला सतत्याची जोड asavi kharach khup chhan

  • @geetagulwady2500
    @geetagulwady2500 2 роки тому +8

    Felt so nice hearing you. You are very encouraging.

  • @manjulasalian6511
    @manjulasalian6511 2 роки тому +7

    Great journey of you Mam....you are a real inspiration to lots of women ....what you told at the end to all housewives that keep yourself active and learn new things everyday has given me lots of positivity....all the best for your future 👍🥰

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 2 роки тому

    Sarita tuza video purna manlaun yeikala khup chhan valala , tuze kasta ,tras aani jidda baghun khup Abhiman vatala ,mage khechnare barech astat ki je swara kahi na karata dusaryana nava thevtat , ashya lkana yogya uttar deun tu pudhe gelis aani tuza aim gathalas khup chhan, aani tuza kautuk karava thevdha kami aahe,.....,all the best in future

  • @shruti1086
    @shruti1086 2 роки тому +1

    👍👌 खरंच तुमची कहाणी कौतुकास्पद आहे कष्टाला पर्याय नाही हे तुम्ही दाखवून दिले आहे तुमचा आवाज पण छान आहे.

  • @vaibhavijadhav1619
    @vaibhavijadhav1619 2 роки тому +12

    Very good Sarita. You are hardworking , genuine and down to earth. Good inspirational talk. Thank you.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 2 роки тому +6

    Khup khup chhan,what confidence Sarita.Tumchi story khro khar khup inspirational aahe.mi tumchya pushkal receipes baghitlya aahe.👍👌👌👌👌👌

  • @atulmali4474
    @atulmali4474 2 роки тому

    मॅडम तुम्ही अगदी अतीशय कष्टाने , हिंमतीने हे सगळं करु शकतात...आॅल द बेस्ट पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shreyamore5948
    @shreyamore5948 2 роки тому

    Khup chan prerana denara pravas aani ha video publish kelyabaddal Josh talk la dhanyavad 🙏

  • @saritakamdar1586
    @saritakamdar1586 2 роки тому +13

    Awesome personality!
    You are simply great. I always follow your channel. Thanks for wonderful recipes.

  • @aashwiniranmale5495
    @aashwiniranmale5495 2 роки тому +15

    खूप छान💐💐👌👌👍👍

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 2 роки тому

    खूप छान प्रेरणादायी आहे खूप काही शिकायचं असेल तर अशी जींद पाहेजे अनुभव शेअर केले सलाम स्त्रीशक्तीला 🙏

  • @PoonamYadav-bu9bq
    @PoonamYadav-bu9bq 2 роки тому

    Great tai khup chan bolis.tujya kade bagun swatabadaalcha confident vadhla

  • @Godisgreat2020
    @Godisgreat2020 2 роки тому +5

    Well done ताई 👍🏻👌👌

  • @vijayaskitchenandart8579
    @vijayaskitchenandart8579 2 роки тому +3

    नमस्कार सरिता🙏🙏
    तुझा जीवन प्रवास खूप खडतर होता त्या सगळ्या अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध केलेस.. तुझा अभिमान वाटतो ... आम्हाला तुझ्याकडून प्रेरणा मिळाते .....तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐♥️♥️

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Рік тому

    माझ्या पतींना त्या वेळी दवाखान्यातुन घरी आणले त्या वेळी माझ्या मुली शाळेत गेल्या होत्या कोणी तरी त्यांना शाळेत आणायला गेले त्या शाळेतुन घरी आल्यावर त्यांनी घरासमोर खुप मोठा गर्दी बघीतली माझी दोन नंबरची मुलगी खूप हुशार होती आणि ती लगेच घरात गेली व तिने विचारले माझ्या वडिलांनी काय झाले आहे ज्या वेळेस मी तुझा हा व्हिडिओ पाहिला त्यांवेळी मला माझ्या मुलींची आठवण झाली माझ्या बहिणीचे पती मंगळवारी गेले व माझे सोमवारी त्यामुळे मला खूप टेन्शन आलं मी देवाला म्हटलं देवा कसलं हे आमचं नशीब हे असच कोणाच्याही जीवनात होऊ नये

  • @vaishalisutar9608
    @vaishalisutar9608 2 роки тому +1

    खूप खडतर प्रवास. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐