कविता : नको घाबरू ! | Spruha Joshi | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2024
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    तुझ्या आत काही नवे उमलताना, नको घाबरू
    तुझ्या आतला सूर्य तेजाळताना, नको घाबरू!
    नवी वाट शोधायची वेळ झाली, प्रवासात या
    सकाळीसकाळीच अंधारताना नको घाबरू!
    अशा उंच लाटांत मस्तीत रमणे तुला आवडे,
    पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू..
    कुणी वार केले, किती घाव झाले मनावर तरी
    जिवापाड जखमा अशा विसरताना नको घाबरू.
    नव्याने उद्या तू फुलव वेगळ्या जाणिवांच्या कळ्या
    फुले आजची मात्र कोमेजताना नको घाबरू..
    बहर श्वास रोखून सारे उभे नेहमीसारखे
    तुझ्या आतुनी आज मी बहरताना नको घाबरू!
    - स्पृहा.
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    __________________________________
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
    ________________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________
  • Розваги

КОМЕНТАРІ • 391

  • @manishakulkarni9448
    @manishakulkarni9448 3 місяці тому +1

    हि गजल स्त्रियांना होणाऱ्या प्रसव वेदने सारखीच आहै.. प्रत्येक शब्दांतून हेच जाणवतं.सहज शब्द रचना‌ व तितकीच सुरेल सादरीकरण.. नवनविन गजल काव्य कविता आपल्याकडून ऐकायला आवडेल..आपल्या मैफिलिची रंगत दिवसेंदिवस बहरणार हे निश्चित.
    सतीश कुळकर्णी

  • @suchetaambekar7416
    @suchetaambekar7416 5 місяців тому +1

    खूपच ह्रदयस्पर्शी आणि खूप छान वाचन

  • @kirtisonawane4524
    @kirtisonawane4524 3 місяці тому

    सुंदर, मी स्वतःलाच पाहते या कवितेत ' नको ghabru' ...reallly heart touching, nice 👏👏👏

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 3 місяці тому

    कविता छानच आहे, तुम्हास असं समोर पहाणं आनंद दायी आहे. भेटल्यासारखं वाटते

  • @akashdalal3871
    @akashdalal3871 5 місяців тому

    मला वाटतं की मनातले बोलून गेलीस ......थोडा फार खूप छान स्पृहा.
    हसत राहा.

  • @bhuvaneshthakur2366
    @bhuvaneshthakur2366 5 місяців тому

    तुमच्या कविता खूप सुंदर असतात तुम्ही करत रहा बोलत रहा आम्ही ऐकत राहू

  • @deoyanirajput374
    @deoyanirajput374 5 місяців тому +1

    Dear spruha, khup sundar kavita, mala, tumhala tai mhanavese vatte, tumchya kavita aikun manavarchi sarva mangal zatakli jate, prassanna vatte tumcha awaj aikun, thx. Mi tumcha vaifal cha interview pahila hota that was also very inspiring

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 5 місяців тому +2

    तुझ्या आत काही नवे उगवताना
    नको घाबरू...
    👌

  • @devendrachavan7799
    @devendrachavan7799 5 місяців тому

    स्पृहाजी
    गझल आवडली, लिहित राहा
    खुप शुभेच्छा

  • @dr.ujwalakamble1070
    @dr.ujwalakamble1070 4 місяці тому +1

    नवीन वाट dakhavnari women empowerment 21st century poem ❤ you dear spruha तुझ्या tondun eikayla आणखी sonepe suhaga

  • @Nehadeshpande
    @Nehadeshpande 5 місяців тому +6

    आश्वासक आणि उभारी देणारे शब्द..गझल आणि सादरीकरण दोन्ही अप्रतिम!❤

  • @user-et8yc8pw2j
    @user-et8yc8pw2j 5 місяців тому

    Tai mi 18years chi aahe ani mala tuja ya gazals ani kavita khup khup aavdtat bg i love u so much

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 4 місяці тому +1

    तुझ्या आत काही नवे उगवताना नको घाबरु स्पृहा आणि तु नवनिर्मिती च्या वेळी घाबरणार नाहीस याची मला खात्री आहे जानदार सादरीकरण ❤❤😊

  • @geetajoshi7255
    @geetajoshi7255 5 місяців тому +1

    खूप सुंदर कविता आणि सादरीकरण नेहेमीप्रमाणे झकास

  • @summaiyabagwan6072
    @summaiyabagwan6072 5 місяців тому

    खुपच सुंदर कवीता आहे प्रेरणादायी तर आहेच परंतु साधी आणि सादरीकरण अप्रतिम

  • @user-eg1oe3tr1x
    @user-eg1oe3tr1x 5 місяців тому

    मस्त... फुले आजची मात्र कोमेजताना नको घाबरू... खूप छान 🙏

  • @pranavkapse
    @pranavkapse 5 місяців тому

    मी सुद्धा कवी आहे सध्या 1st year la aahe मला तूझ्याकडून नेहमी प्रेरणा मिळते खूप वाट बघतं होतो मी video ची आणि परभणीमध्ये संकर्षण VIA स्पृहाचा प्रयोग मस्त झाला ✍👌

  • @neeshawakhare5187
    @neeshawakhare5187 4 місяці тому

    खूप छान 👌🏻 एखादी अशी कविता बोल कि स्त्री ची भावना मनातील गोष्टी त्या कवितेत असतील

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 5 місяців тому

    खुप सुंदर तुझी कविता स्फृहा. आणि सादरणीकरणही सुंदरच

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 5 місяців тому

    Khup chan spruha..agdi kaljala hat ghaltat tuzya Kavita... apratim...

  • @shrutipatki3952
    @shrutipatki3952 5 місяців тому +2

    खूप सुंदर कविता आहे स्पृहा ताई ,तुमच्या कविता म्हणजे मला मेजवानीच वाटते . अश्याच छान छान कविता सादर कर जा .

  • @madhurijoshi2569
    @madhurijoshi2569 5 місяців тому +1

    ही कविता स्त्री च्या सगळ्या टप्यांना आधार देणारी आहे. खूप छान स्पृहा 👌👌

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 3 місяці тому

    आश्वासक शब्द आणि नेहमीप्रमाणेच उत्तम सादरीकरण 🎉🎉🎉❤❤

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 5 місяців тому

    खूप छान मन मरगळले असताना, निराश झाले असताना जरा आशेचा किरण दिसला

  • @smitanagarkar9602
    @smitanagarkar9602 5 місяців тому

    Jivapad jkhma asha visartana nko ghabaru... Wahh!! Tai far takat ahe ya shabadanmadhe kharach ek prakhar Ubhari ahe... Very nice!!

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 5 місяців тому

    Teenagers sathi apratim
    Divas tuze he fulayache chi aathavan zali ,,,,,❤

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 5 місяців тому

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम लेखन
    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @sanjeevanibargal4946
    @sanjeevanibargal4946 5 місяців тому

    नवी वर्षात खूप प्रेरणादायी कविता

  • @supriyasathe5165
    @supriyasathe5165 5 місяців тому +1

    Apratim lihilays Spruha...प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा त्याच्या वाटा बदलतात,नवीन स्वप्नं बघविशी वाटतात..एक प्रकारची भीती असते त्या वळणावर...त्यांना inspiration ठरेल असा लिहिलयस👌👏👏👍लिहीत रहा..😊

  • @ranjana624
    @ranjana624 5 місяців тому +1

    स्पृहा विषय, शब्द आणि सादरीकरण सर्वच फार छान

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 5 місяців тому

    Koni vaar kele kitti ghaav zhale manavar tari.. jeevapad zakhma asha visartana nako ghabaru! I loved it! Although extremely senior i Feel relieved God bless!

  • @pardipcheddu2443
    @pardipcheddu2443 5 місяців тому

    हिवाळ्याच्या गार गार वातावरणावर एखादी ह्रदयाला स्पर्शून जाईल अशी कविता सादर करा

  • @omkarfoods8054
    @omkarfoods8054 5 місяців тому +1

    Dear स्पृहा, तुझ्या कवितेमध्ये तुझ्यासारखा साधा सरळ मनस्वी pure भाव असतो. तो आवडतो. माझी मुलगी अशीच आहे. तिची आठवण येते. ... एक आई.

  • @ameyaalawani231
    @ameyaalawani231 5 місяців тому +1

    Spruha kitti sunder ani sakartamak keliyas kavita ...khup mast

  • @manasibaindur3880
    @manasibaindur3880 5 місяців тому

    Wah wah wah! Khupach chhan. Manaat rujli hi gazal. Mala khup divasana pasna kaahi tari bheeti vaatat aahe. Aata hi gazal aiklya var mala vatate ki aatma nirikshan karun paahaychi vel zhaali aahe.

  • @roopavakadkar3659
    @roopavakadkar3659 5 місяців тому +1

    खूप सुंदर कविता 👌👌....मनोमन भावली आणि पटली❤

  • @himaniyelkar6482
    @himaniyelkar6482 5 місяців тому

    परत परत ऐकाविशी वाटणारी कविता ....कुठेतरी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करावीशी वाटणारी कविता ...धाडशी...❤

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 4 місяці тому

    खूप छान कविता केली आहे.❤❤
    खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 5 місяців тому

    Spruha ma’am वरील गजलेला संगीत पण देनें छान वाटेल कानाला

  • @vindasahakari3189
    @vindasahakari3189 3 місяці тому

    Wah Spruha Tayee. Khup chan aahe Kavita. Agdi yogya veli hi kavita aakali, mi mhazi sthiti ashich hoti.

  • @hemantpatki6062
    @hemantpatki6062 5 місяців тому

    काही शेेर चांगले काही ठीक, पण नको घाबरू❤

  • @shobhashriyan58
    @shobhashriyan58 5 місяців тому

    आवडली कविता, सादरीकरण छान, नेहमीप्रमाणेच अर्थात ❤

  • @karishmakoli1813
    @karishmakoli1813 5 місяців тому

    खुप सुंदर...मनाला उभारी देणारी कविता ❤😊

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 5 місяців тому

    कविता छान आणि तुला महणताना पाहून ही छान वाटले

  • @saritadhere7716
    @saritadhere7716 5 місяців тому

    Khup chhan .....ashich roz yet ja aamcha samor .....

  • @suneetakale1489
    @suneetakale1489 5 місяців тому

    तूअशीच कविता करताना नको घाबरू .छानकविता .

  • @cancer4684
    @cancer4684 5 місяців тому

    As usual, Spruhaniya, shravaniya. Khup sunder distes.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 5 місяців тому

    मागील एक वर्षापासून मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्या साठी मला ह्या शब्दांची खूप गरज आहे. ऐकताना असं वाटलं की तुम्ही मला समोर बसवून समजावून सांगत आहात. खुप खुप धन्यवाद या शब्दां साठी आणि तुमच्या आश्वासक आवाजा साठी 🙏🤗

  • @pritambhandarkar3100
    @pritambhandarkar3100 5 місяців тому

    Spruha tumhi nehmi vegveglya sub. Var lihita. Khup chhan ani utsahane lihita. Tumchya likhanatla bahar mala khup aavdato. Asacha navin lihit ja ani aamhi vachat jau.

  • @user-io9nq2ku3p
    @user-io9nq2ku3p 5 місяців тому +2

    खूप सुंदर सादरीकरण कविता खूप सुंदर आहे त्यात तुझ्या आवाजात खूप सुंदर वाटले पुढच्या कवितेची वाट पाहतोय तुझे विचार खूप आवडतात आज कवितेप्रमाणे साडी मध्ये खूप सुंदर दिसत होतीस तुला खूप शुभेच्छा.

  • @priyankakoshti6929
    @priyankakoshti6929 5 місяців тому +4

    अप्रतिम कविता...नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी उमेद देणारी कविता ऐकायला मिळाली😊😊😊😊 .... खूप सुंदर❤

  • @KN-ho4jf
    @KN-ho4jf 5 місяців тому

    खुप साधे सोपे शब्दात पण खूप गहन अशी कविता केली तुम्हीं मला लई आवडली.मी लगेच माझ्या मैत्रिणला शेअर केली,ती नेहमीच निराश असते कारण ती खूप भोळी आणि प्रेमळ आहे. हल्ली नात्यांना व्यवहार्यतेची कड लागली आहे. तिला यातुन मार्ग करता येत नाही.. तिचा प्रश्न आहे व्यवहार आणि नाते हे दोन्हीची सांगड कशी घालावी??
    नक्कीच ही कविता तिला प्रेरणा देईल...

  • @radhikalende811
    @radhikalende811 5 місяців тому

    Khup chan nava surya tejaltana nako ghabaru❤ spruha tai ❤

  • @alpanamoghe7332
    @alpanamoghe7332 5 місяців тому

    खूपच छान कविता लिहिली आणि म्हंटली आहेस ❤

  • @anilpowale8291
    @anilpowale8291 5 місяців тому

    खूपच सुंदर, भावस्पर्शी .....

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 2 місяці тому

    ❤ बहारदार आणि उत्तम 👍

  • @rekhamathkar2858
    @rekhamathkar2858 4 місяці тому

    खुप छान कविता आणि तुम्ही सांगितली ही छान

  • @user-td1lw7gw1o
    @user-td1lw7gw1o 5 місяців тому

    Tumchya kavita khoop khoop avadtat

  • @manishawasule198
    @manishawasule198 5 місяців тому

    Khupacha chhan khupacha arthapurna jagwnyachi hi mat aali

  • @saylishah5543
    @saylishah5543 5 місяців тому

    Apratim...khup sundar arthay ya kavitecha...really touched my heart...

  • @PalS_In_The_Beautiful_World
    @PalS_In_The_Beautiful_World 5 місяців тому +2

    Thanks Spruha, किती वाट पहायची तुझ्या कवितेची?
    नेहमीप्रमाणेच आजही तुझ्या तोंडून ऐकलेला प्रत्येक शब्द मनात खोलवर रुजला.
    Keep writing, खुप छान लिहितेस!
    उंच भरारी घे. खुप खुप मोठी हो. God bless you always. 🎉🎉❤

  • @kavitakale1310
    @kavitakale1310 4 місяці тому

    खूप छान कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण

  • @user-xy6fl7mc1n
    @user-xy6fl7mc1n 5 місяців тому

    Khup chan vivaran जगण्यातल्या भावनांना सांभाळण्याच

  • @jyotikalyani6388
    @jyotikalyani6388 4 місяці тому

    Khup chhan Spruha god bless you

  • @mahadevKolse-oo7qu
    @mahadevKolse-oo7qu 5 місяців тому

    खूप छान कविता 👌👌 खूप शुभेच्छा 💐💐

  • @imsvjoshi
    @imsvjoshi 5 місяців тому

    खुप सुंदर व अप्रतिम 👌👌🙏🙏🌹🌹

  • @vrushalimadhavi4742
    @vrushalimadhavi4742 3 місяці тому

    अप्रतिम, आणि खूपच अर्थपूर्ण

  • @user-sf4dd1jx5s
    @user-sf4dd1jx5s 5 місяців тому

    Thanks! Madam, Aaj ekda punha tumchya kavitene ek navin umed jagrut keli, tehi aaj ashya prasangi jevha khari garaj hoti,aaj rastyachya kadela basun swatachya astitwacha vichar karat nairashyechya daraat paul taktanach nakalat youtube open kela gela ani tumcha video samor aala.. Thanks! Jast kahi lihinyachya manasthitit nahi...pan aadhar milala evdhe nakki...

  • @lahudhakne8409
    @lahudhakne8409 5 місяців тому +1

    अतिसुंदर खूप छान कविता

  • @nandinipatil9302
    @nandinipatil9302 5 місяців тому

    खूप प्रेरणादायी आणि उत्स्फूर्त, उत्साहवर्धक...keep it up..❤

  • @kiranpande
    @kiranpande 5 місяців тому

    गझल 😂 सातवीतल्या मुलाची कविता. खोलीच नाही.

  • @facttecz8081
    @facttecz8081 5 місяців тому

    खूप सुंदर आहे कविता तुमची ❤

  • @user-td1lw7gw1o
    @user-td1lw7gw1o 5 місяців тому

    Khoop must motivational gazal aahe.

  • @harshad24
    @harshad24 5 місяців тому

    क्या बात
    रोज भेटतील अनेक मुखवटे
    चेहरा तुझा आरशात बघून जा
    किती सांगशील मनातील गुपिते
    श्वास तिचे एकदा पारखून जा
    कशाला पाहिजे दुसऱ्याचा हात?
    तुझाच सूर्य ओंजळीत घेऊन जा
    नेहमी मार्ग का विचारायचा?
    तुझीच तू पायवाट बनून जा
    कितीवेळा बोलणार तेच गाणे
    जीवनाचे गीत गुणगुणून जा
    - हर्षरंग

  • @sunitapawar4334
    @sunitapawar4334 5 місяців тому

    खूप सुंदर प्रेरणादायी,धन्यवाद

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 5 місяців тому

    अप्रतीम.छान लिहिलं आहे.

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 5 місяців тому

    कविता व सादरीकरण दोन्हीही मस्त ❤

  • @deathnote6361
    @deathnote6361 5 місяців тому +5

    "Your poems are pure magic! 🌟 Mesmerized every time. ✨📜"

  • @manishapatil4807
    @manishapatil4807 5 місяців тому

    अप्रतिम!
    १३ तारखेचा ठाण्यातील तुझ निवेदन नेहमी प्रमाणेच भारी झालं शेवटी तु केलेली कविता तर खुपचं सुंदर होती . तु शब्दाची जी विण रचतेस तीला तोड नाही गायका पेक्षा तुझ सादरीकरण उजव झालं.. तुला अशीच प्रतिभा लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना .. अनेक आशीर्वाद

  • @anuradhagadlawar1589
    @anuradhagadlawar1589 5 місяців тому

    Very interesting mam. Personally हि कविता माझ्या situation la खूप जास्त corelate करते . आणि तुमच्या मुळे ही आम्हाला अनुभवायला मिळते. खूप thanku . Asch lihit Raha lots of love from Maharashtra

  • @mPOWword
    @mPOWword 5 місяців тому +1

    Zhakaas, aatma aanee hrudayala choonaaree Kavita aahay hee❤️🤩💪🏾👏🏾🥳, very inspiring, thank you🙏🏽

  • @suvarnapatukale3037
    @suvarnapatukale3037 5 місяців тому

    अप्रतिम गझल 👌👌👌🌹✍️👌👍

  • @Rashu12336
    @Rashu12336 5 місяців тому

    Tx spriha आजच मला ह्या इंस्पैर केलास दुसऱ्या la samjavnarayala स्वतः la samjjava6la Kami Padto g apn it's need me urgently tx very much

  • @vjadhav844
    @vjadhav844 5 місяців тому

    किती सुंदर.. अप्रतिम. सुंदर सादरीकरण

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 5 місяців тому

    🌷🌸खूप छान स्पृहाताई

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 5 місяців тому

    Apreteem, phar maste 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shamar4408
    @shamar4408 5 місяців тому

    Waah..khup chan gazal..manapasun aavdli

  • @pvk1964
    @pvk1964 5 місяців тому

    स्पृहा खूप छान लिहिलंय.खूप जणांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. नकारात्मकता सोडून सकारात्मकते कडे नेणारे शब्दांकन

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 4 місяці тому

    स्पृहा नवीन कविता सादर करताना नको घाबरु! तुझ्यातील उर्मी बहरतांना नको आवरु !
    एकदम नवी ताजी कविता
    अंगात उत्साह संचारला !
    मस्तच अनेक शुभेच्छा

  • @sujatabhand7138
    @sujatabhand7138 4 місяці тому

    खूपच छान स्पृहा👌👌

  • @nidheemoharil1328
    @nidheemoharil1328 5 місяців тому

    फारच सुंदर.... या १ तारखेस ५० पूर्ण झाले...
    आता स्वतःसाठी जगायचं ठरवत होते ...पण ...
    या कवितेने बळ मिळाले.....
    खूपच छान.....❤❤❤❤

  • @user-ll2nx7sc4v
    @user-ll2nx7sc4v 5 місяців тому

    स्पृ हा मी प्रथमच तुझी कविता तु स्वतःच गाताना ऐकली खूपच छान वाटले. अशी च छान छान कविता ऐकायला खूपच आनंद होतो.

  • @vasudhadeshmukh8374
    @vasudhadeshmukh8374 5 місяців тому

    केवळ अप्रतिम🎉❤

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 3 місяці тому

    खूप छान स्पृहा 🎉

  • @pradeeptalekar6533
    @pradeeptalekar6533 5 місяців тому

    वाह..खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @swatigokhale1302
    @swatigokhale1302 5 місяців тому

    स्पृहाताई,अतिशय सुंदर कविता आणि तितकंच गोड तुमचं सादरीकरण. अशीच नवनवीन कवितांची भेट या वर्षी आम्हाला मिळत राहो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
    सौ.स्वाती गोखले.
    कोथरूड, पुणे.

    • @asawarishetye7399
      @asawarishetye7399 5 місяців тому

      Tuz saglach khup Chan ast aavadt tuch aavadtes

  • @vrundaagashe6335
    @vrundaagashe6335 5 місяців тому

    Khup chan... Mast vatle... Navi umed milali....

  • @AnjaliDeo-hy9fx
    @AnjaliDeo-hy9fx 5 місяців тому

    फार छान क्वचित.

  • @truptijalukar7144
    @truptijalukar7144 5 місяців тому

    अप्रतिम सुंदर. Love u.

  • @anshubansod5340
    @anshubansod5340 4 місяці тому

    Khup sundar kavita