माननीय विधिमंडळ गटनेते श्री. जयंतराव पाटील | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • माननीय विधिमंडळ गटनेते श्री. जयंतराव पाटील | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई
    विधानसभेतील विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर श्री. जयंतराव पाटील यांनी आपले विचार मांडले. अर्थ बळावर सरकारं कशी आणता येतात? याचा अनुभव आपल्याला या पाच वर्षांत आला. पोलिसांवर प्रचंड तणाव असून त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे, याबद्दल पाटील यांनी चिंता व्यक्त केली. कंत्राटी आणि विकासकांचे हे सरकार झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
    शक्तीपीठ महामार्गाला लोकांचा विरोध आहे, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा अशी विनंती श्री. जयंतराव पाटील यांनी शासनाला केली. पेपरफुटीचे अनेक प्रकार या सरकारच्या काळात झाले आहेत, त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री अपघातग्रस्तांना मदत जाहीर करतात पण त्यांच्या आकड्यात समानता असावी, अशी विनंती देखील पाटील यांनी शासनाला केली. कारागृहातील दैनंदिन गोष्टींची प्रचंड महागाई वाढवलेली आहे, त्यात भ्रष्टाचार होत असेल तर यात शासनाने लक्ष घालावे अशी सूचना केली. चातूर्वर्णीय पुन्हा राज्यात आणि देशात येऊ नये. महाराष्ट्राने शाहू- फुले- आंबेडकर यांचा विचार कायम जपलेला आहे. जनतेच्या आशीर्वादाने आमचं राज्य येईल ते आम्ही मनुस्मृतीने नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालवू, असा विश्वासही पाटील यांनी सभागृहात व्यक्त केला.
    #MonsoonSession2024 #MonsoonSession #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #jayantpatil

КОМЕНТАРІ •