LAHUJI BOLA JOTILA | लहुजी बोलं जोतीला | SHITAL SATHE | MADHUR SHINDE | SACHIN MALI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2019
  • Production - Navayan Mahajalsa
    Song - Lahuji Boln Jotila....
    Lyrics- Sachin Mali
    Composer- Shital Sathe /Aniket Mohite
    Music Arrenger - Aniket Mohite
    Singer- Madhur Milind Shinde | Shahir Shital Sathe
    Indian Percussion- Rohan Pawar | Aniket Mohite
    Melody / Kyebord - Akash Salokhe
    Shehanai / Sundry- Kedar Jadhav
    Chorus - Kumar Jadhav | Tushar Sutar | Aishvarya Jadhav | Shivani Kadam | Babasaheb Atakhile | Vishal Parde | Aniket Mohite
    Recordist -Mr.Abhijit Saraf
    Recording /Mix-Master | Mr.Abhijit Saraf
    Lyrics :
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला
    हाय मी तुझ्या साथीला रं जागव ह्या मातीला...धृ
    मी जातीचा रं मांग
    फेडतो मातीचा ह्या पांग
    काय करू जोती सांग
    लाही लाही झालं आंग
    मी त्याल रं~
    त्याल हाय तुझ्या वातीला...
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला...१
    वरातीतला अपमान
    न्हाई इसरलो रं जोती
    तू शिक्षणाचं दिलं दान
    शब्दांच झालं मोती
    तू विद्येचं दिलं दान शब्दांचं रं मोती
    शब्दांचं झालं मोती
    आलं डोळ रं~
    डोळं आंधळ्या रातीला....
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला....२
    जवा शिकलं माझी लेक
    करील सवाल अनेक
    जाती धर्माची रं मेख
    म्हणलं उपटूनिया फेक
    भान येईल~
    येईल माझ्या जातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...३
    साऊच्या आडव्या कुंकवाला
    कोण घालतो आडकाठी
    हाय गाठ लहू मांगाशी
    दिमतीला फौज मोठी, हाय दिमतीला फौज मोठी
    कोण आलाया~
    आलाया बघतो कातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...४
    अंधाराचा काळ जोती, अंधाराचा काळ रं
    मुक्तीचं आभाळ जोती, मुक्तीचं आभाळ
    पिरमाची फुलमाळ जोती, पिरमाची फुलमाळ रं
    मायेची वाकाळ जोती, मायेची वाकाळ...
    तू रं समतेचा कैवारी
    दिशा मुक्त केल्या चारी
    ज्ञान सूर्य आला दारी
    मनूला पडला भारी
    केलं नमन~
    नमन साऊ जोतीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...५
    गीतकार : सचिन माळी
    ----------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत UA-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    ---------------------------------------------------
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official UA-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa.
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 роки тому +410

    आमच्या पुढच्या पिढीला आता तरी नक्की कळतील आमचे खरे उध्दारकरते 33 कोटी नसून फक्त लहू फूले शाहू आंबेडकर आहेत... Thanku all team members....

  • @gajananpatil2281
    @gajananpatil2281 2 роки тому +345

    मी मराठा समाजाचा आहे आणि कित्येक वर्षे गावागावात जाऊन बहुजन प्रभोदन करतोय.
    मला आशीर्वाद द्यावा.
    Gajanan patil....
    BE.Mechanical.
    Aurangabad.

  • @Arjun_adhav
    @Arjun_adhav 7 місяців тому +40

    गीत ऐकल्या नंतर कळलं लहुजी साळवे यांना आद्य क्रांती गुरू का म्हणतात
    जय लहुजी.....जय सावता..... जय भीम.....!
    💙💛🧡

    • @Abhishekwayda
      @Abhishekwayda 4 місяці тому

      जय लहुजी ❤

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 4 місяці тому +2

      ​@@Abhishekwaydaबाबासाहेबांचे नाव घ्यायला जिभ झडते.त्यांनी दिलेले‌ हक्क अधिकार घ्यायला पुढेच असता.ते नसते तर तु ईथे कमेंट करायला आला नसता.कारण शाळा शिकुच दिली नसती

  • @marotimb4684
    @marotimb4684 3 роки тому +248

    ज्याला लहुजींचे इतिहास माहित आहे, त्याला लहुजींची विचार कळतात .जय लहुजी. मरेल तर देशासाठी जगेल तर देशासाठी अशी गर्जना करणारे आमचे दैवत लहुजी वस्ताद साळवे.

    • @pratibhaingle888
      @pratibhaingle888 Рік тому +5

      Barobar bhava

    • @tejasgophane3119
      @tejasgophane3119 Рік тому +2

      बरोबर आहे लहुजी वस्ताद हे इतिहासातल खूप मोठं नाव आहे मोठे मोठे क्रांतिकारक वस्तादंचे शिष्य आहेत जय लहुजी जय शिवराय

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 4 місяці тому +2

      Lahujincha ithihas koni pusla?
      Annabhu na shalet kati fekun marnara kon hota ?
      Savitri bai fule yana shen kuni marle ?
      Babasahebana kuni trass dila ?
      Yache uttr jyala mahiti asel to Nkki ch petun uthel
      Jai lahuji jai bhim jai jyoti❤

    • @murlidharnavgire7618
      @murlidharnavgire7618 2 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @laxmankamble8149
    @laxmankamble8149 4 роки тому +177

    तुमच्या सुंदर गाण्यामुळे नक्कीच समाज प्रबोधन होणार जय लहुजी जय अण्णा जय भीम

  • @Vkrajboy
    @Vkrajboy 4 роки тому +370

    काळाची गरज महार,(बौद्ध),चांभार,ढोर,मातंग,होलार आणि एकूण 257 अनुसुचित जातींनी जातीवादाची भिंत तोडावी सुरुवात करावी, रोटी,बेटी व्यवहार करावा व नवा जातीमुक्त भारत बनवावा.मग मनुवाद गाडला जाईल जय शिवराय जय ज्योती,जय लहुजी,जय भीम, जय प्रबुद्ध भारत

    • @sachinb723
      @sachinb723 4 роки тому +8

      vijay k Barobar Vijayji ... tumcha email address dya nahitar contact number

    • @nanaji6592
      @nanaji6592 4 роки тому +10

      Jai bhim

    • @ravithorat7047
      @ravithorat7047 3 роки тому +5

      अगदी बरोबर भाऊ

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 роки тому +22

      बरोबर आहे , जातीमुक्त भारत हेच खरं, मी मराठा आहे ... आम्ही पण तुमच्यासोबत आहोत

    • @chanadad1234
      @chanadad1234 3 роки тому +1

      Yes

  • @gauravwaghmare464
    @gauravwaghmare464 3 роки тому +108

    ज्ञान सूर्य आला दारीं मनूला पडला भारी तो मनूला पडला भारी 🙏🙏🙏👌👌👌

  • @shahadevpingle8233
    @shahadevpingle8233 Рік тому +29

    मला देखील" मांग " असल्याचा अभिमान आहे...जय भीम..जय लहूजी..जय शिवराय...जय मल्हार...जय सेवालाल...जय मल्हार...सर्व बहुजनांचा विजय असो...

  • @nikhilmore3756
    @nikhilmore3756 Рік тому +73

    गाणं ऐकताना एक वेगळीच ताकद मिळते ❤️❤️❤️❤️ खरंच महाराष्ट्रातल्या सर्व समाजसुधारकांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे आपल्यासाठी...

  • @sunilpalekar2544
    @sunilpalekar2544 4 роки тому +193

    खरंच तुम्ही समाजाची व्यथा ह्या गाण्यातुन समाज प्रबोधन केलात.
    सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
    💐💐💐💐💐💐💐

    • @brcr3484
      @brcr3484 Рік тому

      जय लहुजी

  • @dineshkamble8002
    @dineshkamble8002 2 роки тому +64

    🔥💛अप्रतिम अशीच गाणी बनवत रहा आणि समाजासमोर आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास आणा 💛👑 जय लहुजी 🔝👑💛

  • @varshahajare5769
    @varshahajare5769 3 роки тому +611

    मी मातंग असल्याचा मला अभिमान आहे 🙏🌸 जय लहुजी 💛💛💛

  • @subhashkamble2413
    @subhashkamble2413 4 роки тому +202

    खर्या बाप्पाचा इतिहास जगा पुढे आला
    आभिनंदन पुर्ण टीम चे जय लहुजी

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 3 роки тому +7

      जय लहुजी

    • @rahulsadakale3847
      @rahulsadakale3847 3 роки тому +6

      जय लहुजी जय भीम जय शिवराय जय आण्णा जय महाराष्ट्र

    • @keshavgaikawad5644
      @keshavgaikawad5644 3 роки тому +1

      @@rahulsadakale3847 ok

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 2 роки тому +2

      आम्ही फक्त लहुजीचे भक्त

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 2 роки тому +2

      मी बाबासाहेबांनापण मानतो छत्रपती शिवरायांना पण मानतो नुसता मानत नाही पुजतो सुद्धा त्यांना पण आमचं दैवत आमचा बाप आमचं सर्व काही फक्त साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @sunilpatil6591
    @sunilpatil6591 4 роки тому +392

    सचिनचे शब्द आणि शितलताईचा आवाज म्हणजे धगधगता निखाराच...

  • @arjunuphade1746
    @arjunuphade1746 Рік тому +46

    मला गर्व आहे मातंग असल्याचा 👑🔥💛 जय लहूजी जय अण्णाभाऊ आणी जय भीम 💙

  • @user-is6xb3pi9u
    @user-is6xb3pi9u 3 роки тому +29

    #जगेल_तर_देशासाठी..🚩
    #मरेल_तर_देशासाठी..🚩🚩
    आद्यक्रांती गुरू
    #लहुजी_वस्ताद_साळवे
    यांच्या #पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 4 роки тому +325

    नाद खुळा गाणं , अंगावर काटे आले ,
    जय लहुजी , जय भीम , जय जोतिबा, जय शिवराया,💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @vickyck2656
      @vickyck2656 3 роки тому +1

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @lahuwadmare2711
      @lahuwadmare2711 3 роки тому +1

      @@vickyck2656 hjxfu

    • @ashokgaikwad3536
      @ashokgaikwad3536 2 роки тому +1

      😀❤️❤️❤️

    • @hanumantasable1631
      @hanumantasable1631 2 роки тому +1

      खरच भाऊ काटा आला अंगावर जयभीम जय लहुजी जय जोतीबा jayshivary

    • @user-ub1dm2ct3g
      @user-ub1dm2ct3g 2 роки тому +1

      Mstte bawa

  • @sachingaikwad5646
    @sachingaikwad5646 4 роки тому +174

    शब्दांमधील क्रांती तुमच्या एका एका शब्दातून बाहेर येते ते आमच्यासारख्या seasonable विद्रोह करणाऱ्या तरुणांना विद्रोहाची आग सतत पेटवत ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे
    त्यात बाळासाहेबांनी आपल्यासर्वांची एकाजागी मूठ आवळण्याचा जो प्रयोग केला त्या वंचित बहुजन आघाडी साठी सचिन माळी सर आणि शीतल ताईसाहेब तुम्हीही खूप मेहनत घेताय ते आमच्या तरुणाना एक आदर्श आहात

    • @pravinchandanshive9847
      @pravinchandanshive9847 4 роки тому

      पण मांग समाज सॊबत नाही आपल्या

    • @sjw1405
      @sjw1405 4 роки тому +1

      @@pravinchandanshive9847 KOCHIRAM KEMBLE CHE NAAV MAHIT AAHE KA KON HOTA TE

    • @COMRADECOMPANY
      @COMRADECOMPANY 2 роки тому

      @@pravinchandanshive9847
      मातंग समाजा सोबत कुणी येत नाही ,
      जेव्हा इलेक्शन येते तेव्हाचं मातंग समाज आठवतो 😠
      गद्दार साले 😠😠

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 2 роки тому

      बाळासाहेबांना विचारा त्यांच्या पक्षांमध्ये मातंग समाजाचे किती लोक आहेत ते सांगतील तुम्हाला उगाच कोणीही उठून तोंडाची गांड करू नये

  • @ambhoredaya
    @ambhoredaya 2 роки тому +37

    जयभिम 🙏 ताई खूपच प्रेरणादायी गीत
    सचिन भाऊ यांचे शब्द आणि तुमच्या आवाज,,,, अप्रतिम

  • @KaranKhadselahujibhakt
    @KaranKhadselahujibhakt 3 роки тому +4

    टीम नव्याने जलसा अण्णाभाऊ साठे लहूजी यांच्या गाण्याची तुमच्याकडून अजून सुद्धा अपेक्षा आहेत असे चांगले गाणे बनवा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @atheistindian1275
    @atheistindian1275 4 роки тому +160

    ...इतिहास त्यांचीच प्रशंसा करतो,ज्यांनी मानवजातीसाठी कार्य केले आहे.

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 4 роки тому +156

    अंगावर शहारे आणणारे शब्द रचना आणि अप्रतिम संगीत गायन ,,तुम्हा सर्वांना मनाचा जय लहुजी जय जोती जय भिम 👏

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 роки тому +2

    क्रांतीकारी जय लहुजी 🙏🏻🙏🏻

  • @satishdhanedhar8701
    @satishdhanedhar8701 3 роки тому +136

    आपन फक्त गाण्या पुरतेच एक असतो
    काळाची गरज आहे
    बहुजनांनी एक व्हा अन् बाळासाहेबांना साथ द्या

    • @rajnikantkamble3936
      @rajnikantkamble3936 2 роки тому +1

      B team of bhajapa

    • @sainathgaikwad6258
      @sainathgaikwad6258 3 місяці тому

      देनार् नहित अप्ली कहि किमत करित नाहित अपन अप्लल लड़ल पहिजे अकिने

  • @ashishshinde1453
    @ashishshinde1453 4 роки тому +402

    या गाण्याचा मोह काय आवरत नाही.
    रोज एकदा तरी ऐकावं लागतय बगा!

  • @sanjaytabhane177
    @sanjaytabhane177 4 роки тому +57

    एकाच शब्दात...... अप्रतिम..... जयभीम... जय शिवराय.... जय लहूजी....जयजोती...जयमुलनिवासी.. आता फक्त वंचित बहुजन आघाडी ....

  • @gayatrisonone1387
    @gayatrisonone1387 Рік тому +10

    गर्व आहे मला मांग असल्याचा 💛🙏👑🤩✍️जय लहुजी 🙏💛जय अण्णाभाऊ 💥🙏🤩✍️ जय भीम 💙🙏 जय शिवराय 🧡🙏

  • @kunalkhandagale2441
    @kunalkhandagale2441 Рік тому +11

    गर्व नाही तर माज आहे मांग म्हणून जन्मला आलो💛👑📿🚩

  • @vinayakkandalkar4341
    @vinayakkandalkar4341 4 роки тому +185

    जय लहुजी
    जयजोती
    जयभीम !
    उत्तम गीत संगीत !

  • @sandipgawari8789
    @sandipgawari8789 4 роки тому +39

    जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा
    जय लहुजी
    जय भीम
    जय शिवराय
    👌👌👌

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade8956 2 роки тому +16

    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💙💐

  • @rakeshjagtap7187
    @rakeshjagtap7187 2 роки тому +2

    Jay bhim ......Jay lahu....."bhau samaj"

  • @n.g.9671
    @n.g.9671 4 роки тому +157

    खूप सुंदर आणि काल्पनिक भाकड कथांना गाडून सत्य इतिहास मांडणारे गीत

  • @kunalkhandagale2441
    @kunalkhandagale2441 2 роки тому +2

    गर्वच नाही तर माज आहे मातंग असल्याचा 💛✌️💯🙏✨👑👑👑

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 роки тому +8

    भाग्य लागतं मांगाच्या घरात जन्मायला

  • @bhushanshinde3551
    @bhushanshinde3551 4 роки тому +65

    Five hundred pages of history were explained in five minutes.....
    Great Sachin sir and Sheetal mam.
    हाय मी तुझ्या साथीला र...
    जागव या मातीला ...

  • @ramudanshive2267
    @ramudanshive2267 4 роки тому +76

    Super song , समाज जागृतिच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा ,जय लहुजी -जय भीम

  • @mayurkadam1456
    @mayurkadam1456 Рік тому +9

    जय भीम जय लहुजी 💙💛✨♥️🤝🏻
    आपण एक आहोत भावांनो 💪🏻💯

  • @gayatrikamble4399
    @gayatrikamble4399 3 роки тому +99

    Jay Bhim🙏 jay Jyoti🙏 jay Sau 🙏
    Sir you are best lyricist 💗
    हे गाणं ऐकण्याचा मोह आवरतं नाही ।
    Best song 😊

  • @sagarkamble360
    @sagarkamble360 4 роки тому +22

    अप्रतिम सचिन....
    शितलताई आणि मधुर आवाज म्हणजे अंगात ज्वालामुखी पेरलात...अनिकेत मोहिते सुपर संगीत

  • @user-em1vf7hg2h
    @user-em1vf7hg2h 4 роки тому +15

    अप्रतिम सत्य शब्द रचनाकार सचिनदा....

    माझ्या बहुजनांची खरी ज्ञानकोकीळा शितलताई
    मानाचा जयभिम

  • @gabbar96k
    @gabbar96k Рік тому +8

    अप्रतिम शब्द रचना आणि आवाज ही..! #दोघांचा पण❤️..! असेच क्रांतिकारी आणि समाज प्रबोधन गीत एईकायला आवडतील..!
    Jaibhim 💙

  • @rekhachaudhari6016
    @rekhachaudhari6016 3 роки тому +30

    🚩🚩Jai bhavni Jai shivaji 🚩🚩
    🚩🚩 Jai Jyoti Jai Kranti 🚩🚩
    🇪🇺🇪🇺 Jai bhim nomo buddhay 🇪🇺🇪🇺
    🇧🇳🇧🇳 jai lahuji Jai anna 🇧🇳🇧🇳

  • @poojakash_
    @poojakash_ 4 роки тому +91

    खूप छान अप्रतिम गीतातून समाजजागृती इतिहासाची मांडणी.. 👌👌👌💐💐💐

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 4 роки тому +13

    Kdk song jay lahuji!!!

  • @shreedada9562
    @shreedada9562 3 роки тому +6

    मायमाऊली सावित्रीआईस पैलवान लहुजी मांग यांस विनम्र अभिवादन... मी माळी...
    जय ज्योती जय क्रांती.!!
    जय लहुजी..!!
    जय भीम...!!
    जय शिवराय..!!

  • @akshaytupe3954
    @akshaytupe3954 6 місяців тому +2

    सत्यशोधक... तिमिरातून...तेजाकडे...

  • @hrushikeshsalave8657
    @hrushikeshsalave8657 4 роки тому +143

    जय लहुजी जय भीम
    एकच इच्छा आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांचं एक अप्रतिम गाणं बनवा
    जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ🙏🙏

  • @SidSun2805
    @SidSun2805 4 роки тому +58

    अहा.... वाहहहहह वाहहहहह................ अंगाला काटे आलेत... अतिशय सुंदर lyrics व अतिशय सुंदर गायन...
    जय लहुजी
    जय जोती
    जय शाहू
    जयभीम

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 роки тому +10

    बंधुनो ग्यान सूर्याच्या प्रकाश आलाय आपल्या दारी एक वंचित बहुजन बाधव आहे चला एकीन जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय

  • @balajikhandebharad3881
    @balajikhandebharad3881 2 роки тому +2

    खरोखर महात्मा फुले आणि लहुजी वस्ताद यानी मिळुन महान कार्य मार्गी लावेल है
    शिक्षणाचे , आपुनच जाती जातीत वाटुन घेतेल है त्याना, जय ज्योति जय लहु

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa  4 роки тому +182

    टीम नवयान महाजलसा च्या वतीने सर्वांचे मनापासून आभार....!

    • @ajayadgale5522
      @ajayadgale5522 4 роки тому +7

      Ata banavan navin ekda lahujich gan fakt election purat ka?

    • @user-lv8pu9kb5r
      @user-lv8pu9kb5r 3 роки тому +1

      *Jay Shivray Jay Lahuji Jay Bhim*

    • @krishnagholap3009
      @krishnagholap3009 3 роки тому +2

      मला तुमला भेटये चे आहे

    • @lahuwadmare2711
      @lahuwadmare2711 3 роки тому

      @@user-lv8pu9kb5r 👌😆😋😁😊

    • @bhaikamble1910
      @bhaikamble1910 3 роки тому

      @@user-lv8pu9kb5r ङमङ
      ञटथ

  • @santoshpachwane3682
    @santoshpachwane3682 4 роки тому +22

    गीत आस आहे जस का येचात सगले दुनिया च हित आहे... कड़कककककक जय लहूजी...

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 місяців тому +2

    जय ज्योतिबा...जय लहूजी...त्रिवार वंदन..👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sachingotmukle1239
    @sachingotmukle1239 2 роки тому +5

    खरंच मी माझं भाग्य समजतो मी मातंग आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे जय लहुजी जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v 4 роки тому +113

    त्यागीले सर्वकाही
    झटले दिन-राती
    दलित वंचितांच्या
    मनात पेटवली जोती॥
    धन्य तो क्रांतिबा धन्य मा सावित्री
    अनिकेत डोळस

  • @rahulshinde5358
    @rahulshinde5358 4 роки тому +48

    हे नुसतं एक गीत नाही आहे तर एक वारसा आहे ज्योती साहू चा आणि त्यांच्या शिक्षणाच्या तालमीत तयार झालेली माझी मुक्ता चा त्यांना स्वरक्षणाची ढाल बनून उभे राहणाऱ्या माझ्या लहुजीचा , अंगात काटा आणि एक ऊर्जा भरली ह्या गीताने खरचं मनापासून जय भीम जय ज्योती जय साहू

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 роки тому +9

    Kdk मानाचा क्रांतीकारी जय लहुजी जय अण्णा जय भीम 🔥🔥💛💛🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏 🔥🔥🔥💛💛💛

  • @kairtkvairal4465
    @kairtkvairal4465 2 роки тому +8

    जय लहूजी जय अंबूज

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 4 роки тому +70

    *अप्रतिम गीत आहे ताई*
    *एकदम प्रेरणादायक गीत आहे*
    *🙏जय लहुजी*

  • @rakhichoure1251
    @rakhichoure1251 4 роки тому +55

    हे आहे खरं इतिहास मांडणार गीत अप्रतिम... सर्व टीमचे खरोखरच मनापासून धन्यवाद त्यांनी इतकं सुंदर गीत बनवलं आहे.

  • @omkarjadhav4048
    @omkarjadhav4048 2 роки тому +16

    गर्व आहे मला मातंग असल्याचा💛⚡🙏🌍

  • @itzrishieditz6685
    @itzrishieditz6685 2 роки тому +54

    मी जय भिम आहे माग महर एकच आहे 💙💙💛💛

  • @pawanbankar8231
    @pawanbankar8231 4 роки тому +28

    मधुर शिंदे, शीतल साठे ताई
    जय शिवराय जय भिम जय लहुजी

  • @avinashgaikwad1018
    @avinashgaikwad1018 4 роки тому +23

    प्रत्येक शब्दा गणीक अंगावर काटा सर्रर्रर्रर्रर्रर्र करत होता
    अप्रतिम सर

  • @sahebraogaikwad4670
    @sahebraogaikwad4670 3 роки тому +6

    जय लहुजी..... गुरु 🥰🥰

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 2 роки тому +9

    🚩अतिशय सुंदर गीत मानाचा जय लहुजी जय भीम 🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ajayadgale5522
    @ajayadgale5522 4 роки тому +52

    लहुजी आणि जोतिबाच्या मध्ये "गुरूशिष्य" वजा मानस "पितापूत्र" असे नाते होते.

    • @adittyaff5833
      @adittyaff5833 3 роки тому +1

      बंधुनो इतिहास वाचत चला एकीन चला चुकत असेल तर सांगा

    • @ajayadgale5522
      @ajayadgale5522 3 роки тому +3

      @@adittyaff5833
      मी जे बोलतोय ते इतिहास वाचून बोलतोय

    • @sachinnatkar479
      @sachinnatkar479 3 роки тому +1

      💯💯💯बरोबर💯💯💯

    • @sachinnatkar479
      @sachinnatkar479 3 роки тому

      @@ajayadgale5522 बरोबर बोललात सर

    • @sachinnatkar479
      @sachinnatkar479 3 роки тому

      @@ajayadgale5522 💯💯💯💯💯

  • @santoshjadhao7970
    @santoshjadhao7970 4 роки тому +17

    ह्रदयस्पर्शी गीतांची बोल...👌
    शितलताई यांना सप्रेम जय लहूजी..

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 роки тому +4

    जय लहुजी 🙏🏻 जय लहुजी💛जय लहुजी 🧡जय लहूजी❤️जय लहुजी💚जय लहुजी💙जय लहुजी💜जय लहुजी🤎 जय लहुजी🖤जय लहुजी💖जय लहुजी🤍जय लहुजी💓जय लहुजी🌟 क्रांतीकारी जय लहुजी
    एक स्वाभिमानी लहूसैनिक 💥🙏🏻🙏🏻❤️

  • @hanumangayakwad6210
    @hanumangayakwad6210 3 роки тому +9

    जय लहुजी

  • @sachinnikhade1391
    @sachinnikhade1391 4 роки тому +23

    खूप छान आवाज शीतल ताईचा. जय शिवराय जय भीम जय जोती जय लहुजी...

  • @sunilkamble8954
    @sunilkamble8954 4 роки тому +28

    जय जोती 🙏 जय लहुजी 🙏जय भीम 🙏
    Nice

  • @maheshladkat4687
    @maheshladkat4687 2 роки тому +3

    Jai... Jyoti.. Jai... Lahuji. Jai Kranti. 💐💐💐🙏😊👏

  • @sudhir_godase
    @sudhir_godase Рік тому +4

    पाच मिनिटात पुर्ण इतिहास डोळ्यापुढं उभा केला... खूप खूप मस्त चित्रीकरण 👌👌👌🙏🙏जय शिवराय, जय लहुजी, जय ज्योती जय सावित्री, जय भीम....जय महाराष्ट्र...... 🙏🙏🙏🙏

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 4 роки тому +44

    *खरोखर या गाण्यातून आपण गुरुवर्य लहुजींचा खरा इतिहास समजून घ्यावा ?*
    *ताईंनी खूप सुंदर या गाण्याच्या माध्यमातून इतिहास आपल्या समोर मांडला !*
    *क्रांतिकारी जय लहुजी*

  • @navnathpg7410
    @navnathpg7410 4 роки тому +52

    अप्रतिम गीत.
    जय लहुजी
    जय जोती
    जय भीम

  • @balasahebgharwadhave6222
    @balasahebgharwadhave6222 2 роки тому +1

    आपल्या पूर्वजांनीही शिक्षणावर किती भर दिला होता तो यामधून दिसून येतो,
    त्यांना माहिती होत शिक्षणामुळे आपण या नीच मनुवादी व्यवस्थेतून मुक्त होऊ शकतो
    अंगावर शहारे आले ऐकून
    जय ज्योतिबा ,जय लहूजी, जय भीम

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 роки тому +3

    मी धनगर आहे पण मला हे गाणं खुप आवडलं. जय मल्हार जय लहुजी

  • @G.E.Official8261
    @G.E.Official8261 4 роки тому +24

    जय लहुजी जय शिवराय जय भीम जय ज्योतीबा

  • @rideandtrek7617
    @rideandtrek7617 4 роки тому +27

    गाणं ऐकून अंगाला काटा आला राव खूपच छान गाणं आहे जय भारत जय संविधान

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 2 роки тому +1

    अंगावर शहारे आले गाणं ऐकून खरंच काय गाण्याची रचना, गायन, आणि संगीत अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @om_pawar
    @om_pawar Рік тому +2

    गर्व आहे मला मी मांग असण्याचा...जय अण्णाभाऊ 💛 जय लहुजी 💛 🙏🏻🙏🏻

  • @ruturajkhanderao3705
    @ruturajkhanderao3705 4 роки тому +268

    जय ज्योतीबा जय भीम जय शिवराय जय शाहु जय लहुजी

  • @harshadkulkarni9370
    @harshadkulkarni9370 4 роки тому +13

    Kadar masta !! 👏👏😊👍👌👌

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 роки тому +14

    बाधवानो निल्या पिवल्या झेड्या खाली या महान देशभक्त लहुजी सालवे समर्थक व्हा आणि संघर्ष करा लाचारीला धिक्कार करा शेवटी इच्छा तेथेच मार्ग जय लहुजी सालवे जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय

  • @Political15235
    @Political15235 Рік тому +6

    जय ज्योति जय लहुजी ✨

  • @alrcreation645
    @alrcreation645 4 роки тому +30

    Jay Bhim Jay Lahuji Jay Shivaray 🙏

  • @nileshrobinson6778
    @nileshrobinson6778 4 роки тому +9

    खूप खूप छान.. मांगाच मत फक्त आणि फक्त वंचितला च मग गळ्यावरून सुरी फिरली तरी चालेल. पण मत बाळासाहेबांना च..जय लहुजी .जय भिम. जय शिवराय

  • @aniketkadam1314
    @aniketkadam1314 2 роки тому +4

    साहेबा शिवाय पर्याय नाही 💙🔥💪.. जय भीम 🔥🤩

  • @MSDhonifan-pv6ug
    @MSDhonifan-pv6ug Рік тому +2

    Wa काय साँग आहे राव, जबरदस्त 💪 जय भीम, जय लहूजी🙏💙

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 4 роки тому +63

    3:15 - *साऊच्या आडव्या कुंकाला* -
    Heart Touching 🙏

    • @sair_gavachi
      @sair_gavachi 3 роки тому +1

      बरोबर

    • @bharatthombe6288
      @bharatthombe6288 2 роки тому +4

      Saau. My new born beby girl name jay lahuji. Jay bhim. Jay saau jyoti

    • @pratikdethe5425
      @pratikdethe5425 2 роки тому +1

      @@bharatthombe6288 Great 🌹

    • @nileshgaikwad666
      @nileshgaikwad666 Рік тому

      👑खरचं दादा ऐकदम मनाला छंद लावणार गाणं आहे🤩🥰🙌
      👑💪जय बसव, जय शिवराय, जय अहिल्या, जय लहुजी, जय क्रांती, जय ज्योती, जय भीम, जय बिरसा...🙏🏻🙏🏻🙏🏻
      सर्व धर्म, जाती समभाव ♥️🙇‍♂️🙌...

  • @rameshbankar3030
    @rameshbankar3030 4 роки тому +12

    आपल्या समाजकार्याला,विचाराला,प्रबोधनाला सलाम.

  • @omkarkamble1834
    @omkarkamble1834 2 роки тому +5

    Lay lahuji bava

  • @ipc3024
    @ipc3024 9 місяців тому +1

    म्हणून बाबासाहेब म्हणायचे माझी 10 भाषण अन वामन च एक गाणं ❤❤❤ समाज परिवर्तनासाठी गाण्यांमधून प्रबोधन खुप गरजेचं असत शितल ताई great ❤

  • @manishtambe8287
    @manishtambe8287 4 роки тому +7

    सचिनदादा खरोखरंच तुमचं लिखानं खूप ग्रेट आहे.👌👌👌👌👏👏👏

  • @sanvidhanshaan6987
    @sanvidhanshaan6987 4 роки тому +5

    खरा इतिहास... जो आपल्या पासून लपवला होता. आपण आपल्या लेखणीतून खूप उत्तम रीतीनं मांडला. काळजाला भिडणारी शब्दरचना... तितक्याच ताकदीचं संगीत अन गायन... जबरदस्त. जय भीम... जय लहू... जय ज्योती.

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 3 роки тому +1

    हे गीत खूप सुंदर आहे तमाम बहुजन समाज ने शिक्षण द्वारे लहुजी साळवे मुक्ता साळवे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्याचा वारसा चालवा हीच गीता मधून अपेक्षा प्रकट होते ली पहायला मिळते....

  • @jailahujistatus7003
    @jailahujistatus7003 2 роки тому +6

    जय लहुजी जय आण्णा🙏✨

  • @kshitijnahare1261
    @kshitijnahare1261 4 роки тому +22

    Jaibhim Jai Bharat Ek no.song🇪🇺🇮🇳