समस्या मार्गदर्शन, श्रीक्षेत्र नाणीजधाम दि. २१ मे २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे समस्या मार्गदर्शन
    महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन संपल्याचे घोषित करताच १ एप्रिल २०२२, स्व स्वरूप संप्रदायाच्या सर्व पीठांवर भाविकांनासाठी दर्शन खुले झाले. अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे विविध राज्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात समस्या मार्गदर्शनाचे कार्यक्रमही संपन्न झाले.
    ज्याप्रमाणे मुंग्यांना सांगावे लागत नाही की गूळ कुठे आहे त्याप्रमाणे गुरुमाऊली श्री क्षेत्र नाणीज येथे असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलेल्या असो लोकांची हा हा म्हणता गर्दी वाढू लागली.
    म्हणून अगदी देशभरातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही मंडळी, रणरणत्या उन्हात अतिशय शिस्तबद्ध रीतीने, अत्यंत संयमाने रांग लावून गुरुमाऊलीच्या भेटीसाठी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. इतकेच काय पण पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र नाणीजचा डोंगरात अवतारलेला स्वर्ग पाहण्यासाठी धाव घेत आहेत.
    २ वर्षांनी जे जे भाविक पाहिल्यानंदा श्रीक्षेत्र नाणीज येथे आले आहेत ते जगद्गुरुश्रींना पाहून, त्यांना भेटून, त्यांचे दर्शन घेऊन भाऊक तर होतातच, परंतु या दोन वर्षात श्रीक्षेत्रामध्ये झालेला बदल, सजलेला परिसर देखील आपल्या डोळ्यात साठवून घेत आहेत. कारण नाणीजच्या प्रत्येक आकृती सजताना, त्याची निर्मिती होत असताना परमपूज्य स्वामीजींचे नियोजन आणि दूरदृष्टी आणि वेगवेगळ्या संकल्पना यांची प्रचिती येते.
    चला मग आपणही पुन्हा सैर करूया आपल्या सुंदरगडाची. नाणीजधाम अतिशय शांत आणि सुन्दर निसर्गरम्य परिसर आहे यात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते वरदचिंतामणी गणेशाचे, तेही त्याच्या संपुर्ण कुटुंबासहित म्हणजेच दोन्ही पत्नी रिद्धी सिद्धी आणि दोन्ही पुत्र शुभ व लाभ यांसमावेत. त्यानंतर मंदिर येते ते प्रभू श्रीरामाचे आणि तेही प्रभू श्रीराम, सितामाई लक्ष्मण व राम भक्त हनुमान यांसोबत.
    उजव्या बाजूला पुष्करणी एका देखाव्यासह, तेही हिन्दवी स्वराज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज व हे आराध्य घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री पूज्य जिजाबाई साहेब
    पुढे नानिजपीठा चे मुख्य मंदिर .. ज्यात प.पु. गुरुमाऊली चे उपास्य दैवत आणि या पिठाची पिठदेवता संत शिरोमणी श्रीगजानन महाराज स्थानापन्न झाले आहेत. तसेच या मंदिरात गुरुमाऊलीचे सद्गुरू ब्रम्हलीन प.पू. काडसिधेश्वर महाराज व आद्य जगदगुरू श्री रामानंदचार्य महाराज याचेही दर्शन होते.
    या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे सदर मंदिर हे जगन्नाथाच्या रथाचे प्रतीक आहे. ज्याची आठ चाके अष्ठधा प्रकृतीचे प्रतिनिधित्व करतात, तर रथाला बांधलेले ६ हत्ती हे आपल्या आयुष्यातील ६ षडविकरांचे प्रतीक आहेत, आणि अश्या रथावर खुद्द गरुडारुढ भगवान श्रीविष्णू या रथाचे नियंत्रण स्वतःच्या हाती घेऊन, सारथ्य करीत आहेत.
    पुढे असणारया भव्य संतपिठावरून प.पू. जगद्गुरु श्री नरेन्द्राचार्यजी महाराज म्हणजेच आपल्या गुरुमाऊली सर्वाशी प्रत्यक्ष संवाद साधून सर्वाना मार्गदर्शन करत आहेत.
    आपल्या जुन्या भक्तगणांना प्रेमाने भेट असतानाच प. पू. स्वामीजी नवीन भाविकांना देखील उद्बोधन करीत आहेत.
    जीवनात सुख दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ हा चालूच राहणार आहे, परंतु त्यातही आपण एखाद्या चांगल्या खेळाडूप्रमाणे यशस्वीपणे कसे खेळतो आणि यश-अपयश कसे पचवतो हे महत्वाचे आहे. नेहमी जिंकणेच अपेक्षित नसून कधीकधी त्या खेळात टिकून राहणे सुद्धा जिंकल्याचेच लक्षण आहे. असा चांगला खिलाडू वृत्तीचा माणूस बनवण्याची क्षमता फक्त भक्तीतच आहे. त्यासाठी दिवसातून १० मिनिटे एकाग्र होऊन भक्ती करणे आवश्यक आहे. स्वप्नातही कोणाचे वाईट चिंतु नये असे मार्गदर्शन प. पू. स्वामीजींनी उपस्थित भाविकांना केले.
    सरतेशेवटी येथील भव्य असे प्रसादालय. जेथे आलेल्या प्रत्येक भाविकांसाठी दोन्ही वेळचा महाप्रसाद अगदी विनामूल्य आणि पोटभर दिला जातो. एकावेळी किमान ८०० भाविक प्रसादालयात बसून महाप्रसाद घेतात. अश्या प्रकारची येथे सोय केलेली आहे. तसेच भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास, धर्मशाळा आणि गरजेच्या इतर सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

КОМЕНТАРІ •