स्वामी माझे अष्टावधानी दि. २६ मे २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • 'स्वामी माझे अष्टावधानी'
    अनंत विभूषित जगद्गुरू श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या अष्टावधानी व्यक्तिम्त्वाचे अतुलनीय पैलू आपण या ना त्या गोष्टींमधून नेहमी अनुभवतो. एक उत्तम वक्ता, कुशल व्यवस्थापक, सुंदर स्थापत्यशास्त्र जाणकार, एक उत्तम प्रशासक, उत्कृष्ट गुणग्राहक, एक सर्वगुणसंपन्न संघटक, सर्वोत्तम कुटुंब प्रमुख आणि अनाकलनीय अशी जाण असणारे आधुनिक विचारांचे प्रवर्तक.
    प. पू. स्वामीजींनी नियोजनाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व नेहमीच सर्वांना पटवून दिले आहे. आणि आहोभग्य आहे आपले की आज त्याचेच प्रात्यक्षिक देखील पहावयास मिळत आहे. निमित्त आहे पावसापूर्वीची तयारी ..... खुद्द प. पू. जगद्गुरूश्री सुंदरगडावर सर्व तयारी जातीने करून घेत आहेत. आज संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातून सुट्टी देत, त्यांच्यासोबत आश्रमाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करीत आहेत.
    नियोजनासोबतच प पू स्वामीजींचे एखाद्या आई प्रमाणेच प्रकृतीवर असलेले प्रेम आणि त्याबाबतची असलेली काळजी देखील दिसून येते.. त्यांच्यातील परब्रम्हाची झलक देखील पटकन दृष्टीस पडते जी या चराचरातील सर्व सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकांची आईप्रमाणे काळजी घेत आहे.
    या सर्व प्रपंचामधून आपल्याला नक्कीच आपल्या गुरुमाऊलींमधील एका कुशल प्रशासकाची आणि कुटुंबवत्सल प्रमुखाची प्रचिती आली असेलच..
    अशा अष्टावधानी गुरूमाऊलीना त्रिवार वंदन.. 🙏

КОМЕНТАРІ •