कराड ते कास पठार ,महाबळेश्वर | Karad To Kaas Pathar, Mahableshwar | 4k | 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #kaaspathar #karad #marathi #marathivlog #satara #kaspathar #mahableshwar #sangali
    कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.
    कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

КОМЕНТАРІ • 24