Vasant Hankare Motivational Speaker at Doodhganga Vidyalay, Kagal
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- युवक युवतींनी आपल्या आई - बापाला जाणून घेतले पाहिजे - प्रा.वसंत हंकारे कागल : आधुनिक काळातील युवक युवतींनी आपल्या आई वडीलांना जाणून घेतले पाहिजे. त्यांच्या कष्टाची त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.वसंत हंकारे यांनी केले. ते दूधगंगा विद्यालय कागल मध्ये आयोजित नाते मुलांचे आणि माता-पित्यांचे - एक सामाजिक गरज या विषयावर व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . पुढे ते म्हणाले, आजच्या आधुनिक युगात पालकांकडून आपल्या पाल्यांवर संस्कार करण्यास दुर्लक्ष होत असून पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलां-मुलींवर योग्य वेळी योग्य संस्कार घडविले पाहिजेत.आपले पाल्य फक्त भविष्यातील सुजाण नागरिक घडतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळेच्या भिंतीतून संस्कारशील माणूस घडवला जातो,आणि संस्कारशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य दूधगंगा विद्यालयात घडते. यामध्ये पालकांनी ही शिक्षकांना सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसमोर संस्काराचा पदर पसरला पाहिजे तसेच आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. वसंत हंकारे यांच्या भावस्पर्शी व्याख्यानाने उपस्थित नागरिक बंधु भगिनी, विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षकवृंद यांच्या डोळ्यामध्ये आसवांनी गर्दी केली. अध्यक्षीय मनोगतामध्ये अमेय जोशी म्हणाले की, जीवनात यश मिळवायचे असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सर्वांगीण विकास होणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांनी घेतलेला सहभाग हा लक्षणीय असून यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे . या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालू शैक्षणिक वर्षात क्रीडा,कला, वक्तृत्त्व क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा बक्षिस व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. तसेच दूधगंगा शिक्षण संकुलामध्ये महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये यशस्वी महिला व महिला बचत गट यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्री.अमेय जोशी होते. प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री. अतुल जोशी साहेब(पत्रकार) तसेच दिनकरराव प्रभावळकर, आनंदराव पाटील, प्रकाश कदम, चिन्मय जोशी, योगेश गाताडे, सागर कोंडेकर, अमित पिष्टे, गंगाधर शेवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी . पाहुण्यांची ओळख नाथा चव्हाण यांनी करून दिली. आभार संगिता पाटील यांनी मानले तर सुत्रसंचलन संग्रामसिंह यादव यांनी केले.
A great Inspiration speakar!
Very nice