घाट माथ्यावरुन कोथळीगड..आणि जंगली वन्य प्राण्याचे अनपेक्षीत दर्शन....!पेठचा किल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कर्जत
    जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
    कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. या किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळीगड (कोथळा) असाही आढळतो. लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते. पहाण्याची ठिकाणे :
    पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावातून तसेच घाट माथ्यावरील अनेक गावतून पेठच्या किल्ल्याच्या माचीवर असलेल्या पेठ गावात वाटा येतात. त्यापैकी आंबिवली गावातून येणारी वाट जास्त प्रमाणात वापरली जाते. या वाटेने आंबिवलीहून साधारणपणे दिड ते दोन तासात पेठ गावात पोहोचता येते. पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पेठ गावात वस्ती आहे. या वस्तीतूनच किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्य़ांनी २० मिनिटे चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार ओलांडून ५ मिनिटे चढून गेल्यावर एक ठळक पायवाट वळसा मारुन पेठच्या सुळक्याकडे जाते. या पायवाटेवर डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसतात. पावसाळा सोडून इतरवेळी या पायर्‍यांनी किल्ल्यावर जाता येते. पायर्‍या संपतात तेथे किल्ल्याच्या दुसर्‍या प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. ता प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर समोर कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. गुहेकडे जातांना उजव्या बाजूला दोन गाड्यावर ठेवलेल्या तोफ़ा दिसतात.
    पेठ किल्ल्यावरील कातळाच्या कातळाच्या पोटात गुहा, टाकी, लेणं आणि गडमाथ्यावर जाणारा जीना खोदलेला आहे. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब आहेत.
    गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहेत. गडमाथ्यावर तलाव आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकर डोंगररांगेतील, तुंगी, पदरगड(कलावंतिणीचा महाल), नागफणी, त्यामागे सिद्धगड, लोणावळा बाजूकडील नेढ नाखिंड डोंगररांगेवरील पवनचक्क्या, कौल्याची धार, ढाकची डोंगररांग हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.
    गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे समुह व टेहळणीसाठी कोरलेली गुहा पाहायला मिळते.

КОМЕНТАРІ • 29

  • @rahulpokar3204
    @rahulpokar3204 4 місяці тому +1

    ❤❤

  • @user-zc6kw3kp7d
    @user-zc6kw3kp7d 5 місяців тому +1

    Khupach bhari

  • @pushkarjoshi3570
    @pushkarjoshi3570 5 місяців тому +1

    Sir . buetiful video ❤❤❤

  • @sadashivpatil8317
    @sadashivpatil8317 5 місяців тому +2

    अति सुंदर ! बहोत खूब! असेच दर्शन घडवत जा.

    • @santoshhule6922
      @santoshhule6922  5 місяців тому

      नक्किच प्रयत्न करु...!

  • @pravinpingale4987
    @pravinpingale4987 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर वर्णन

  • @bhagvanjamghare-yd7ox
    @bhagvanjamghare-yd7ox 5 місяців тому +1

    खूप छान. आमच्या जवळ आहे परंतु कधी गडावर जाण झाले नाही. पुन्हा एकदा धन्यवाद असेच नेहमी आपल्या व्हिडीओ येऊद्या

    • @santoshhule6922
      @santoshhule6922  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद दादा..
      असेच सपोर्ट करीत रहा...!!

    • @santoshhule6922
      @santoshhule6922  5 місяців тому

      नक्कीच येत जाईल...
      आपल्या युट्युब चाईनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरु नका, धन्यवाद.

  • @ChandrakantNalawade-qt5ji
    @ChandrakantNalawade-qt5ji 5 місяців тому +1

    Khupch sundar ...

  • @aartiashokkhamkar4526
    @aartiashokkhamkar4526 5 місяців тому +2

    Khup chan

  • @user-rv1jv1vd6x
    @user-rv1jv1vd6x 5 місяців тому +2

    Khupch chan

  • @prathmeshhule2864
    @prathmeshhule2864 5 місяців тому +1

    खुपच सुंदर....!

  • @RakeshMeghval-ef9ht
    @RakeshMeghval-ef9ht 5 місяців тому +2

    Nice work...

  • @user-zt3tj6vq4j
    @user-zt3tj6vq4j 5 місяців тому +3

    घरी बसुन तुम्ही छान सफर घडवली.

  • @santoshhule6922
    @santoshhule6922  3 місяці тому

    Like,comment,share and subscribe to my youtube channel thank you so much for your likes and comments I really appreciate it ❤️

  • @sakshiwandre19
    @sakshiwandre19 5 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @ashpakkureshi8023
    @ashpakkureshi8023 5 місяців тому +2

    Hule mama mast 😍😍

  • @ashpakkureshi8023
    @ashpakkureshi8023 5 місяців тому +1

    Khup chaan...❤

  • @kunalkhalde7753
    @kunalkhalde7753 5 місяців тому +2

    1 Number

  • @mahadevnelwade8311
    @mahadevnelwade8311 5 місяців тому +2

    Kharch sundar aahe gad.

  • @ashpakkureshi8023
    @ashpakkureshi8023 5 місяців тому +1

    Mast

  • @santoshhule6922
    @santoshhule6922  5 місяців тому

    तुम्ही जे पाठबळ देताय त्याबद्दल धन्यवाद...!

  • @user-md8ye4ug4f
    @user-md8ye4ug4f 5 місяців тому +1

    😮😮

  • @santoshhule6922
    @santoshhule6922  5 місяців тому

    Thanks ....like our video.

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs 5 місяців тому +1

    ❤❤

  • @user-md8ye4ug4f
    @user-md8ye4ug4f 5 місяців тому +2

    खूप छान