Vaibhav Joshi | मी.... वगैरे | Part 2 | Vivekanand Vyakhyanmala 2023
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- पुढील व्याख्यानांविषयी व मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी आमचे व्हाट्सअँप चॅनेल जॉइन करा.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ - Whatsapp Channel
whatsapp.com/c...
विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ |
पुष्प २ ले २९ नोव्हेंबर २०२३
वक्ते: मा. श्री. वैभव जोशी (कवी आणि गीतकार)
संवादक : मा. समीरा गुजर जोशी (सिने नाट्य अभिनेत्री)
विषय: मी.... वगैरे
सागर बोने (मंडळप्रमुख),
निलेश घोडेकर (विवेकानंद व्याख्यानमाला प्रमुख),
मयुरेश शिंदे (सहाय्यक वि. व्या. प्रमुख)
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली झाली.
सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे, हे संस्थेचे ध्येयधोरण आहे.
मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
संस्थेच्या प्रमुख उपक्रमांमध्ये समर्थ ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक अकादमी, छंद वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन अशा विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे.
सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेली संस्थेची 'विवेकानंद व्याख्यानमाला' गेली कित्येक वर्षे अखंडपणे लोकशिक्षणाचे कार्य करीत आहे. 'अखंड वारी समाजप्रबोधनाची' हे या व्याख्यानमालेचे बोधवाक्य! विचारवंत, राजकारणी, शास्त्रज्ञ, कलावंत, साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ अशा विविध मान्यवर मंडळींनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक आणि ज्ञानवृद्धी करणारी व्याख्यान पुष्पे गुंफली आहेत.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअँप चॅनल वर संस्थेला फॉलो करा.
इंस्टाग्राम: ...
फेसबुक: www.facebook.c... यूट्यूब : youtube.com/@v... व्हॉट्सअँप चॅनल : whatsapp.com/c...
वेबसाईट : www.vummumbai.org
email id : vidyarthiutkarsh1954@gmail.com
#vidyarthiutkarshmandal