Solapur मध्ये लग्नाला मुलगी मिळावी म्हणून मोर्चा निघाला, अशी आहे सिंगल मित्र मंडळाची व्यथा BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2022
  • #BolBhidu #MaharashtraMarriage #SolapurMorcha
    आपल्या प्रत्येकाच्या गावात किमान २० टक्के बाप्या आहेत, ज्यांचं वय उलटलं पण लग्न झालेलं नाही. हे बाप्या कुठल्यातर पानपट्टीवर मावा खात, कुणाच्यातर शेतात पत्ते खेळत, कुणाचा तरी बांध बघत, रोज घरात येवून बायोडेटा बघत बसतात. आज होईल उद्या होईल करत, दहा वर्ष होत आलेत पण लग्न होत नाही. इकडं शिंदे आले काय आणि ठाकरे गेले काय? आपल्या आयुष्यात कायच नाय. आत्ता हे सांगायचं कारण काय तर सोलापूरात काढलेला मोर्चा.
    परवादिवशी सोलापूरात अशाच बाप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान मुंडावळ्या, शेरवानी घालायची, घोड्यावर बसायची हौस पोरांनी भागवून घेतली पण मोर्चा झाल्यावर बिना बायकोचं घरी जाताना या पोरांच्या अंगावर आलं असणाराय हे नक्की. असो पण असं का झालंय? बिना लग्नाच्या पोरांची संख्या का वाढली? लग्न होईनात तर का होईनात ? हे मुख्य मुद्दे आहेत. याच मुद्द्याला थेट हात घालून तपासून बघितलं पाहीजे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 931

  • @surajmali73
    @surajmali73 Рік тому +735

    एक गोष्ट मला समजत नाही, जेव्हा स्त्रियांचे प्रश्न येतात तेव्हा एकदम सीरियस होऊन ते प्रश्न मांडले जातात आणि त्यावर चर्चा होते , पण जेव्हा पुरुषांचे प्रश्न येतात तेव्हा ते कॉमेडी म्हणून मांडले जातात आणि त्यावर कॉमेडी म्हणून चर्चा होते.... हे एक साष्वत सत्य आहे

    • @nikhilwalsane3880
      @nikhilwalsane3880 Рік тому +18

      Exactlyy

    • @girishsatpute2904
      @girishsatpute2904 Рік тому +29

      Feminism आहे शेवटी काय करणार

    • @VaibhaviW
      @VaibhaviW Рік тому +21

      Purushpradhan sanskriti madhe yachi paalemule rujli ahet

    • @karanpatil2132
      @karanpatil2132 Рік тому +8

      बरोबर आहे. तुमचं सांगणं.

    • @anand1311
      @anand1311 Рік тому +41

      जे आजवर पोरींनी भोगलं, कधीतरी पोरांवर येणारच होतं की! सृष्टीका नियम!!

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 Рік тому +487

    हा मुद्दा हसण्यावारी घेण्यासारखा मुळीच नाही ज्या घरातील मुलांचे लग्न जमत नाही त्या घरातील आई-वडिलांना नीट अन्न जात नाही

    • @JayShriKrishna.864
      @JayShriKrishna.864 Рік тому +15

      दोष कोणाचा?

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction Рік тому +1

      Ri8

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому +34

      Lagn tynchich hot nahiyet...je kattyavar basun supari khatat...he akhya gavala mahit ahe

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Рік тому +24

      बेरोजगारी की, कमी पगाराची नोकरी की, व्यसनाधीनता की, शेतजमीन नसणे की,पुण्यात फ्लॅट की, आय.टीतलीच नोकरी पाहिजे अशी अट एक ना अनेक अडथळे.😂

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +3

      बरोबर आहे 👍

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Рік тому +521

    चिन्मय दादा ने सध्याच्या ज्वलंत विषयाचे वर्णन खूप छान केले आहे एक लाईक चिन्मय दादासाठी👍

  • @akashd6075
    @akashd6075 Рік тому +185

    1980-1990 मध्ये ज्या स्त्रिभुण हत्या झाल्या त्याच कारणाने लागलेली अवदासा आहे या महाराष्ट्र राज्याला लग्नाच्या बाबतीत 🙏🏻

  • @user-dj3to1we7d
    @user-dj3to1we7d Рік тому +181

    मुलींची अपेक्षा जास्त आहेत .जिच्या घरचा पत्रा गळतोय तिला बंगले वाला पाहिजे. जो watchmen आहे त्याला आपली पोरगी permanent वाल्याला देईची आहे. घरात संडास नाही आणि जावई कडे 10एकर पाहिजे😌उच्च घरातील मुली परप्रांतीय नवरा करतात मग त्यांच्या कडे काही नसेना. मी तर आता लग्नाची अपेक्षा सोडून दिली😒 शेवटी रुईच्या झाडाबरोबर लग्न करायचं आणि स्मश्यनात जायचं😔

    • @anand1311
      @anand1311 Рік тому +38

      त्यात वाईट काय आहे?
      आपल्याला पण हिरोईनच पाहिजे असते की. पण पर्याय कमी आहेत म्हणून भागवतो दुसऱ्यावर!

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +8

      ​@@anand1311 😀😀😀khare aahe.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +3

      भावा ज्याला जी अपेक्षा आहे तसं काही मिळतंय का.जावू दे ना.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Рік тому +3

      @@anand1311 खर आहे. जरा जास्तच खर आहे!

    • @obc7523
      @obc7523 Рік тому

      @@anand1311 म्हणून काय मुलींना सगळे फुकट मिळत नसते,
      हिरॉईन असली तरी तिला काही आयत मिळत नाही

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 Рік тому +216

    आणि दुसरी गोष्ट मुलींच्या पण अपेक्षा भरपूर वाढलेले आहेत मुलींना आपला जीवनसाथी निवडताना अजिबात चॉईस राहिलेले नाही एकदम चांगला सुशिक्षित होतकरू मुलांना डावलून एकदम थर्ड क्लास लेवलच्या व्यसनी तसेच फालतू मुलासोबत त्या प्रेम विवाह करत आहेत शेवटी एकच म्हण आहे खासाबाला गाय धार्जिन

    • @rajupanchal3288
      @rajupanchal3288 Рік тому +56

      पळून जायचं असेल तर मुलींना भंगारवाला पण चालतो 😂😂

    • @VaibhaviW
      @VaibhaviW Рік тому +1

      Kasayala

    • @_PKMKB_PKMKC_FOREVER
      @_PKMKB_PKMKC_FOREVER Рік тому +1

      Correct

    • @Explorer_Amazr
      @Explorer_Amazr Рік тому

      आताच्या मुली एक नंबर च्या पैश्याच्या हावरट झाल्या आहेत.

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Рік тому +2

      Ha mg prema che ti kasiyat ahe.. Prema madhe tya kontyach gosti yet nahi.. Gadi bangla Paisa status position.... Mhanun muli tasa mansa sobat 2 divas upasi pan rahu saktya...

  • @AKBARKHAN14388
    @AKBARKHAN14388 Рік тому +178

    30 ते 35 वर्षापूर्वी ज्या बाप्याने मुली मारली मुलांसाठी त्याच मुलांना मुली भेटत नाही किती लवकर पापाचा घडा फोडला देवाने पहा स्वतःच्या डोळ्याने आणि भोगा आता 😓😓😓😓😓

  • @kavitasabale2972
    @kavitasabale2972 Рік тому +30

    मुलींना तरी कुठे मिळतायत,मिळाले तरी 60% मुलींना मनासारखे मिळतात बाकी 30% घरचे शोधून देतात त्यांच्याशी आवडो अथवा न आवडो लग्न करतात बाकी 10% मात्र वय उलटून जाईपर्यंत शोधत राहतात

    • @ajaybichkar5592
      @ajaybichkar5592 Рік тому +1

      हे बरोबर आहे

    • @avinashnalawade6073
      @avinashnalawade6073 5 місяців тому +1

      Apeksha swapne eka bajula aani vyavaharat bajaratil spardha yamule lagne ashich honar.

    • @kavitasabale2972
      @kavitasabale2972 4 місяці тому

      @@avinashnalawade6073 sad but reality

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 Рік тому +84

    होतय रे लग्न , भरपूर कष्ट करा, घर बांधा, निर्व्यसनी रहा, शेती चालू असू द्या आणि नोकरी , धंदा करा.

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Рік тому +13

      मी हे सर्व करतोय भावा 🙏

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 Рік тому +2

      @@pravin_deshmukh_205 होईल लग्न तुझ भावा ✌️

    • @bappuds3500
      @bappuds3500 Рік тому

      👌👌

    • @dailyitmforecast
      @dailyitmforecast Рік тому

      Right 👍✅

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 8 місяців тому +1

      *अबे दोन कोटी रोजगारच्या जागेवर युपीएससी सारख्याच सरळसेवेच्या म्हणजे बैंक रेल्वेच्या एस एस सी च्या पण दोन-दोन परीक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून राहिले कोण म्हणते पोर सिरीयस नाही दोन लाख जरी जागाहभरल्या दरवर्षी तरीही सिरीअस होतील पोर, हे सगळ्यात मोठ्ठजात कारण कसकाय विसरता विसरभोळ्या भोकाचेहो??*😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @patilnilesh9158
    @patilnilesh9158 Рік тому +25

    100% right👍 (आणि ज्या मुली पुणे पुणे म्हणत होत्या त्यांना स्वतः आता जॉब करावा लागतोय😂🤣🤣)

  • @sir4196
    @sir4196 Рік тому +57

    सध्या खुपच परिस्थिती गंभीर झाली आहे मुलगा आहे पसंत पण व्यसनी आहे जर व्यसनी नसेल तर गरीब घराचा आहे हीच परिस्थिती आहे

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому +3

      Lagn tynchich hot nahiyet...je kattyavar basun supari khatat...he akhya gavala mahit ahe

    • @akshaymane4482
      @akshaymane4482 Рік тому +1

      M garibanni lagan karu naye ka

    • @dhb702
      @dhb702 Рік тому +1

      @@akshaymane4482 गरीबांची पोरगी करायची मग

  • @doctork5417
    @doctork5417 Рік тому +49

    या भावाने बोल भिडू ला विशिष्ट शैली प्राप्त करून दिली. एखादी संवेदनशील एवंम सत्य बातमी प्रस्तुत करण्याचे अप्रतिम कौशल्य!! सर्व मुद्दे योग्य व तंतोतंत मांडले गेलेत. 👍🔥 जर आज लिंग गुणोत्तर 100 पेक्षा जास्त असते तर कदाचित एवढी गम्भीर परिस्थिती झाली नसती. कांदा उत्पादन कमी झाल्यास कांद्याचा भाव वाढतो अगदी त्याप्रमाणेच आहे arrange marriage मार्केट!! फक्त समजण्यासाठी कांदा उदाहरण दिले आहे.. यात महिला अवमान वगैरे नाही.एक मुद्दा मुलगा आणि मुलगी दोघाला ही लागू होतो तो म्हणजे Social मीडिया influence मुळे ज्या अपेक्षा वाढल्या गेल्यात त्या दोघांनीही कमी करून जमिनीवर यायला हवे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      100%barobar mudde.

    • @piyu...1976
      @piyu...1976 Рік тому

      True.... Adhichya pidhine mulga pahije mhnun Muli marlya... Mul vadhli ani ata muli milt nahi

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 Рік тому +23

    चिन्मय भिडू तु ज्या पद्धतीने माहिती देतो ना ती डायरेक्ट काळजाला हात घालते.
    तुला एक सलाम ❤️

  • @swapnilkadam8410
    @swapnilkadam8410 Рік тому +39

    आज पासून 30 वर्षानंतर एक video बनणार.... मुलींना मुलगा मिळेना... मुलींचा परदेशी मुलांकडे ओढा.... 🤣😆

  • @aadeshsomavanshi8715
    @aadeshsomavanshi8715 Рік тому +35

    बॉयफ्रेंड च्या जीवावर पाणीपुरी खाणाऱ्या पोरी पण नवरा सरकारी नोकरी वाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवता 👋😁😁👇👇👇

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 Рік тому +26

    पण काही ठिकाणी बापुच लग्न जरी झालं तरी नंतर कोनत्या ना कोणत्या कारणावरून पोरी डिवोर्स घेत आहेत . त्यात बापू तर गेलाच पण बापू ची आर्धी प्रॉपर्टी सुद्धा गेली बसा आता बोंबलत 😂

    • @Gadi_wadi
      @Gadi_wadi Рік тому +1

      😂😂😂😂😭😭😭😭😅

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Рік тому

      @Rushikesh Gawande हो.हे पण आहेच.😂

    • @amolyadav3207
      @amolyadav3207 Рік тому +2

      किती तरी ठिकाणी हा धंदा सुरू केला आहे....

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Рік тому

      @@amolyadav3207 Ha dhanda Parprantiya karatat.. Me baghitlay jawalun

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 Рік тому

      😂😂😂😂

  • @eknathshinde153
    @eknathshinde153 Рік тому +56

    चिन्मय बापू स्टोरी मस्त होती 😃,
    उरकून घ्या यंदा, नाही तर तुमची पण तीच बाप्या सारखी अवस्ता व्हायची. 😂😂

  • @akashkshirsagar6479
    @akashkshirsagar6479 Рік тому +16

    मोरच्यातले सगळे बापे आमच्या तालुक्यातले म्हणजेच मोहोळचे होते.

  • @Beuniqueeee
    @Beuniqueeee Рік тому +115

    My four month baby smiles when Chinmay talks 😀

  • @swapyfy
    @swapyfy Рік тому +20

    काय चिन्मय शेठ स्वतःची स्टोरी मित्राची म्हणून चीटकवतोय 😂😂😂

  • @agam000
    @agam000 Рік тому +15

    मी लय टेंशनमधे होतो पण भावाचं बोलणं ऐकून आणि इथल्या कमेंट्स वाचून जरा हलकं हलकं वाटतय😇☺️

  • @RajRaj-pt9sq
    @RajRaj-pt9sq Рік тому +10

    प्रेम करून लग्न करायचं बोलल तर मुलगा चोर,भिकारी,चरसी पण चालतो..,फक्त arrange maarage मधे सरकारी नोकरी पाहिजे...भलेही मुलीने पाहिले किती पण केळे खाल्ले असू...😡😡😡

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Рік тому +7

    मुलींच्या घरचे वाढलेल्या अपेक्षा आणि मुलींचे कमी झालेले प्रमाण ह्याच फॅक्टर्स जास्त प्रभाव शील आहेत

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 Рік тому +41

    सर्वात भारी लाईन "बापाला घर घ्यायला प्ननास वर्ष लागले पण पोराचा आधी पुण्यात फ्लॅट पाहिजे". पोरीला स्वतः नोकरी नसते पण मुलाला पॅकेज कमी आहे म्हणून नको म्हणतात, स्वतः च घर पडक असते पण मुलाचं गावाकडे पण घर चांगल बांधलेलं पाहिजे, यावर कळस म्हणजे मुलगा अन् मुळीत दोन वर्षापेक्षा जास्त अंतर नको. म्हणजे त्या पोरीपेक्षा फक्त दोन वर्ष मोठं असणाऱ्या मुलाने पॅकेज पण चांगल घ्यायचं, गावात घर पण बांधायचं, पुण्यात फ्लॅट पण घ्यायचा आणि कार पण. इतकं होऊन पण ती मुलगी म्हणणार मझ तर नशीब च फुटल ग.

    • @KSRLO
      @KSRLO Рік тому +7

      बरोबर आहे
      मुलीच्या अपेक्षा अवाजवी व चुकीच्या आहेत
      पण मुलं ही सुंदर गोरी नाजूक सडपातळ च मुलगी शोधत असतात, शिकलेली नोकरी वाली पण सावळी, काली, लठ्ठ मुलगी नाकारतात

    • @kalyandeshpande2173
      @kalyandeshpande2173 Рік тому

      @@KSRLO गोऱ्या, सडपातळ मुलींचे तर अजून जास्त नखरे. मुली स्वतः आपण काय आहोत ते बघतच नाहीत. मुलांच्या अपेक्षा त्या प्रमाणात कमी आहेत

    • @KSRLO
      @KSRLO Рік тому +4

      @@kalyandeshpande2173 मुलांच्या ही अपेक्षा खूप जास्त आहेत, घटस्फोट झालेल्या मुलांना घटस्फोट किंवा विधवा मुलगी चालत नाही

    • @truthtold3597
      @truthtold3597 6 місяців тому +2

      ​@@KSRLOमुली फक्त काळा आणि जाड मुलगा शोधत फिरतात

    • @user-dh5fy3yu2m
      @user-dh5fy3yu2m 3 місяці тому

      ​@@truthtold3597😂😂😂😂😂जयाचा ❤डा मोठा असेल तो

  • @riteshukey22
    @riteshukey22 Рік тому +18

    खरं आहे राव... मी पण त्यातला एक आहे.. 32 झाले आता आणखी BF.7 आलाच,, मर्तोच आता बिना पाण्यात डूबुन..😅

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Рік тому +1

      😂

    • @rohitnagwanshi
      @rohitnagwanshi Рік тому +6

      Nako karu bhava chance ahe tula, lagna zhalavar taan Kami nahi, sagle lagna tuttay Ani sarv kayda one side mulincha bajune

    • @riteshukey22
      @riteshukey22 Рік тому

      @@rohitnagwanshi right

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Рік тому +63

    त्याच्यामुळेच तर तयारी जोरात चालू आहे, 30 एप्रिल 2023 ला AsO होऊनच दाखवणार 💪💪💪

  • @manish123450
    @manish123450 Рік тому +126

    His unique style is so attractive regardless of subject want to listen him again and again

    • @Shaah7866
      @Shaah7866 Рік тому +1

      Exactly!!! 😁

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +7

      म्हणजे तुम्हाला मराठी समजतं पण लिहिता येत नाही असं समजायचं का.

    • @manish123450
      @manish123450 Рік тому +1

      @@narayanp4256 भावा काय समजायचं हा तुमचा प्रश्न..मुद्दा काय आहे आणि आपण बोलतो काय आहे? तुम्हाला इंग्लिश समजायला जड जात असेल तर थोडा इंग्रजी शब्दकोश वाचत जावा यूट्यूब वरून वेळ काढून..

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      Brother, jokes apart, though I have completed my schooling through vernacular medium, I have impeccable command over English. Even better than a Chartered Accountant as said by one CA himself.But whenever I have to write on Marathi forum, I prefer to write in Marathi.

    • @manish123450
      @manish123450 Рік тому

      @@narayanp4256 it's individuals choice which language to use..i like Marathi and likes to write in Marathi whenever I write a long story.. but if there is quick something to be written i prefer English as it's easy to type..

  • @amardhame3851
    @amardhame3851 Рік тому +6

    जाच्या आई बापने मुलगी आहे म्हणून एकादही गर्भपात केला नाही त्यांचे लग्न नक्की होनार

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      Kay bolalay pan, 100% khare.

  • @zenzokurita
    @zenzokurita Рік тому +34

    अनेक बाप्यांना डॉ. मुंडे ची लई आठवण येते, शिव्या देण्यासाठी.

    • @toughgal
      @toughgal Рік тому +1

      Kay zal

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому +4

      Lagn tynchich hot nahiyet...je kattyavar basun supari khatat...he akhya gavala mahit ahe

    • @vishaldhanawade3379
      @vishaldhanawade3379 Рік тому +2

      @@manisherande4568 अस नाही आहे माझा एक मित्र आहे त्याला लाखात पगार आहे, व्यसन नाही, पुण्यात आणि मुंबईत फ्लॅट आहे, फक्त त्याला जन्मजात हाताला एक बोट नाही बाकी काहीच दोष नाही, तरी त्याच लग्न होत नाही, बोला आता.

    • @sapnamelanta2381
      @sapnamelanta2381 21 день тому +1

      ..aata shivya deyun Kay phayda😢

  • @rushikeshalhat1652
    @rushikeshalhat1652 Рік тому +27

    आजकालच्या मुलींच्या अपेक्षा पुण्यात फ्लॅट पाहिजे गावाकड शेती पाहिजे नवरा पुण्यात किंवा मुंबई मध्ये राहणारा पाहिजे दिसायला हृतिक रोशन पाहिजे म्हणजे bodybuilder Ani handsome bar त्यात ह्या स्वतः पण heroine सारख्या नाही .आता मला ह्यावर मुलींचा म्हणणं ekachay.

    • @shivajiraodeasi5705
      @shivajiraodeasi5705 Рік тому +11

      मुलाचे नखरे पण खूप वाढलेत. त्याना इंजिनीअर नोकरी करणारी वर घर सांभाळून शहरात राहणारी मुलगी पाहिजे .दुभती गाय चारा कमी खाणारी असावी.

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому +5

      Lagn tynchich hot nahiyet...je kattyavar basun supari khatat...he akhya gavala mahit ahe

    • @shivanipathak9065
      @shivanipathak9065 Рік тому

      Barobar bolat... Changli nokari karnari pahije, ghar sambhalnari pahije sundar pahije Ani war magel tevdha hunda denar pahije... Lagnacha mazya baghat astana Solapur kadchi mansa spashta vicharat hote hunda denar ahe ka tumhi, denar asal tar pudhchi bolni karu...

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Рік тому +6

    सध्याच्या बिना लग्नाच्या पोरांच्या मनातील गंभीर विषय मांडलाय चिन्मय भावा...आणि खुपच छान पद्धतीने मांडलाय....

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Рік тому +7

    भावा तू भाषा भारी वापरतोस... शहरी पण आणि ग्रामीण पण .... तुझी सांगण्याची पद्धत भारी आहे...

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 Рік тому +5

    ह्याच मुलांची उद्या लग्न झाली तर मुलींना जन्माला घालायला मुलांच्या आयांची संमती आहेका. त्या वेळेस मात्र आपल्या पोराला मुलगाच व्हावा म्हणून काहिही करायला ह्या आया तयारच आहेत. तसेच हुंड्याचा प्रश्न कुठे सुटला आहे. अजूनही लग्न खर्च , मानपान मुलीच्या आई बापांनी करायचा अशीच मागणी असते.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Agadi khare.

    • @obc7523
      @obc7523 Рік тому

      जर मुलगा यशस्वी असेल तर अपेक्षा असणार च की

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w Рік тому +18

    अजून लग्नाचं wai tr नाही झालं 23 cha आहे पण हा प्रश्न खूप गंभीर होईल पुढे..... कारण दोघांच्या अपेक्षा...... मुली ना सुद्धा शिक्षण देऊन फक्त गृहिणी chya भूमिकेतून बाहेर काढायला हव.... मुलांना सुद्धा attitude बदलायला हवा... पालकांना सुद्धा समजायला हवे की आयुष्यात त्यांनी संगर्ष केला तसा आपल्या मुलांना पण करावा लागेल.... त्यांना आरामदायी aayusha भेटू शकत नाही..... अन् शेतकरी वैगेरे काय वाईट नाही..... नोकरी म्हणजे काय सुख नाही..... हा पण मुलगा निर्व्यसनी हवा अन् मुलीबद्दल एक आदर हवा ही अपेक्षा रास्त आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Phar maulik vichar mandlet tumhi.

  • @avirajpatil1140
    @avirajpatil1140 Рік тому +5

    मित्रा एकदम ज्वलंत विषय मांडतोय तू.... खरच तुझा अभ्यास आणि वक्तृत्व वाखाणण्याजोगे आहे....

  • @rohitm772
    @rohitm772 Рік тому +5

    खरंच हा खूप सीरियस विषय आहे मुलाना तिशी उलटली तरी पोरी मिळत नाही,त्या मुलाची,आई वडिलांची काय मानसिक अवस्था होत असेल त्याचा विचार न केलेलाच बरा

  • @kunaljadhav1955
    @kunaljadhav1955 Рік тому +4

    जातीतलाच जावई पाहिजे.... जातीतलीच सून पाहिजे.... हे सुध्दा एक दळीद्री कारण आहे या गोष्टीमागं....

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Рік тому +11

    बापू ची स्टोरी एक नंबर होती .

  • @smitjoshi6435
    @smitjoshi6435 Рік тому +7

    ही एक सत्य घटना आहे.ह्या विडिओ मुळे आजच्या दिवसाची सुरुवात छान होणार👌👌आणि बाप्याची entry झक्कास होती🤩😂😂

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Рік тому +14

    आता ज्याचात हिम्मत असेल त्यानेच लग्न कराव.ज्‍याला जमत नाही त्‍याने जगाव आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा,अनेक चांगल्या गोष्टी आहेत.आपले जीवन महत्त्वाचे आहे कारण ते पुन्हा कधीही मिळणार नाही.
    Single life, sexy life👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Ha phar changla attitude aahe to lokana patvun dyava.

    • @atulkijubani...7635
      @atulkijubani...7635 Рік тому

      सेक्सी कसं काय.....

    • @beautyandthebeast1465
      @beautyandthebeast1465 Рік тому

      True

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 Рік тому

      @@atulkijubani...7635
      तुम्ही तुमचे आयुष्य कसे सेक्सी बनवता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे

  • @darkrushgaming9872
    @darkrushgaming9872 Рік тому +29

    आमच्या गावात 2 पोर आहेत चांगले संस्कारी पोर आहेत गावात कधीही भांडण नाही काही नाही त्यांची आई लहानपणीच वारली त्यांना फक्त वडील आहेत पण त्यांना अजून पर्यंत पोरगी भेटली नाही.

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому +4

      ajun laga polticians cha naaadi,,,,

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +6

      संस्कार म्हणजे श्रीमंती नाही.भांडणं करत नाहीत म्हणजे श्रीमंती नाही. कुणाची आई वारली म्हणून कोण मुलगी देणार नाही. पुढं बोला.

    • @manisherande4568
      @manisherande4568 Рік тому

      @@narayanp4256 ithe paan anudan an reservation chi bhik Magnar ka...ja kar kaam dhanda,,, mangat til takad dhahva. kaam dhanda kara...politicians chya nadi laguna...jagatun pori yetil...

    • @darkrushgaming9872
      @darkrushgaming9872 Рік тому +1

      @@manisherande4568 aho tai te polititions cya Nadi nahi lagat 1 porga shikshak aahe tar dusra shetkari pn porgi milena aaj vay त्यांचं 30 आहे

    • @darkrushgaming9872
      @darkrushgaming9872 Місяць тому

      @@AmbrosiaBu nahi, tyanchya gharat aai nahi aahe mhanun mulgi shodhnarahi kuni nahi.

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Рік тому +4

    मन खिन्न करणारा विडिओ .. बोल भिडू टीम चे खूप कौतुक .. खूप सुंदर निरीक्षण आणि माहिती संकलन

  • @pdc19
    @pdc19 Рік тому +4

    कठीण काळ आलाय,ईतके सर्व पाहून लग्न झालेले तरी किती लग्न टिकून राहतात ते पण बघा घटस्फोट किती होता आहेत रोज त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा साहेब, मला मुलींचे पण वय 30/40 येतंय त्यांना पण प्रोब्लेम येतंय शिक्षण जॉब पैसा करिअर स्वावलंबी इंडिपेंडंट वगैरे वगैरे मुळे कठीण झालंय सर्व असाच पाहिजे,
    या सगळ्यांमुळे दोघांसाठी हा कठीण प्रश्न होऊन जाणार आहे भविष्यात.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @sketchingemotions1130
    @sketchingemotions1130 Рік тому +14

    तू खतरनाक आहेस भावा!!!!!!! किलर सादरीकरण!!!!!!

  • @a_mhite2
    @a_mhite2 Рік тому +7

    खूप गोष्टी असतात लग्न करताना पण त्यातल्या काही प्रमुख गोष्टींवर पण विचार केला पहिजे जसे की,
    १) मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षण जास्त आहे त्यामुळं अर्थात मुलींच्या अपेक्षा असणार आणि त्या योग्यही आहेत.
    २) आपल्याच मराठी मुली दुसऱ्या राज्यातल्या मुलांसोबत लग्न करत आहेत.
    ३) काही चांगल्या शिकलेले मुल/मुली ह्या आपल्या पेक्षा कमी कमावणाऱ्या जोडीदार निवडत आहेत. त्यामुळे दर्जा राहिला नाही.
    खरच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि कुठेतरी सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

    • @durgeshmhaskar9582
      @durgeshmhaskar9582 Рік тому

      बरोबर बोलला भाई.....

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 Рік тому

      Bhau shahratlya anek marathi mula pan dusrya rajyatlya mulinshi lagna kartaat

    • @dapakarswapnil3264
      @dapakarswapnil3264 Рік тому

      अरे तुमचा कड हुंडा नाही महून हे सगळ होत आहे

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath Рік тому +5

    पुण्यात सांगून फुरसुंगीत राहतोय 😂😂👌

  • @Khumkar
    @Khumkar 2 місяці тому +1

    किती रंजक सांगितले राव चिन्मय भाऊ....पण लग्न अजून तरी जमतील का हा विषय चिंतेचा राहीलच.... पोरींच्या बापानी बघा हा व्हिडिओ ❤❤❤

  • @amrutyadav1460
    @amrutyadav1460 Рік тому +7

    एक नंबर भावा 😘 मी नुकताच यातून बाहेर पडलोय.. तुला चांगलंच माहीत आहे

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 Рік тому +5

    मी पण जंगली रम्मी तर कुठे गौतमी अजिबात सिरियस नाहीं 😅😅
    जो होगा देखा जायेंगा भगवान मेरे साथ है!

  • @swapnilmane982
    @swapnilmane982 Рік тому +18

    आज भावाचा swag च वेगळा आहे 🔥🔥🔥

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil Рік тому +3

    पळून जाऊन लग्न करायचं मनलं कि मुलींना
    गवंडी, ड्राइवर, कोंबडी पाळणार, मिस्त्री, टपोरि, जायच्या कडे काहीच नाही असा मुलगा चालतो....
    पण ठरवून लग्न करायचं मनलं कि मग घर, गाडी, मुलाला नौकरी, 10 एकर शेत, मुलगा एकटा पाहिजे,
    असं आहे सगळं.....
    दिल दिया है इट भी देगे ...😌

    • @sandipchaple8254
      @sandipchaple8254 Рік тому

      Nalayak pori asatat ashaa & ashach porinchi sankhya aahet Maharashtra t.

  • @sudarshanjadhav2403
    @sudarshanjadhav2403 Рік тому +2

    मुला कडे प्लॅट, शेती , *सरकारी नोकरी*, साईड बिझनेस, किती इन्व्हेस्टमेंट, आहे याची चौकशी करणे देखील , हुंड्याचा प्रकार आहे , बाकी ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल ,
    अमाप अपेक्षा ठेवतात मुलीच्या घरचे त्यामुळेच राहिल्या काहि जनी आता...

  • @abhaykhadke9705
    @abhaykhadke9705 Рік тому +13

    मुलगी वाचवा मुलगी शिकवा

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 Рік тому +6

    सिंगल आयुष्य भारी असतं लग्न झाल्यावर लय डोक्याला ताप असतो

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Рік тому +1

    याला मुलेही जबाबदार असतात . नोकरी नंतर लगेच लग्न करायचं सोडून सेटल होण्याच्या हट्टापायी आणखी ४-५ वर्षे घालवतात . आधी लग्न करावं योग्य वयात .. घर , गाडी नंतर होतेच

  • @nikhilkolekar2578
    @nikhilkolekar2578 Рік тому +8

    काळ बदललाय भावा, मुलीचा बाप सुद्धा बेधडक म्हणतो माझ घर खापरीच आहे स्लॅब टाकून दे मुलगी तुलाच.
    मुलगीच लग्न लावून देतोय का तिला विकतोय तेच कळत नाही, आणि पळून गेली की तोच बाप संत्रा घेतो.

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому

      माझ्या एका मित्राला 3 वर्षे स्थळ मिळालं नाही म्हणून शेवटी त्याने आंतरजातीय विवाह केला

    • @bhaubau6247
      @bhaubau6247 Рік тому +1

      Tumhi pan mula vikatach hota ki....Hundyachya Nawawarti...tithe tar mulgi pan pahije Ani paisa pan...

    • @nikhilkolekar2578
      @nikhilkolekar2578 Рік тому

      @@bhaubau6247मी हुंडा प्रथेचे समर्थन करत नाही पण, हुंडा घेतला हे सांगताना मुलाकडचे लपवत नव्हते पण मुलीचा बाप पैसे घेऊन म्हणतो कुठे बोलायचं नाही.

    • @bhaubau6247
      @bhaubau6247 Рік тому

      @@nikhilkolekar2578 ka nahi bolaycha...je ahe te ahe...fukat Daan dharma kon karta kaa

    • @nikhilkolekar2578
      @nikhilkolekar2578 Рік тому

      @@bhaubau6247 मला तेच म्हणायचंय मुलाने हंडा घेतला हे जगजाहीर होते पण मुलीचा बाप काहीपण मागणी करतो ते मात्र झाकून ठेवतात दुट्टपी आहेत लोकं

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 Рік тому +6

    मुलगा कर्तबगार असेल आधी प्रचंड कष्ट घेतले असतील आणि स्वबळावर उभा असेल तर मुलींची लाईन लागते , नुसतं हाती पक्षाचे झेंडे घेऊन आणि साहेब , दादा,भाऊ, ह्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावल्यावर असच होणार

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 8 місяців тому +1

      *अबे दोन कोटी रोजगारच्या जागेवर युपीएससी सारख्याच सरळसेवेच्या म्हणजे बैंक रेल्वेच्या एस एस सी च्या पण दोन-दोन परीक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून राहिले कोण म्हणते पोर सिरीयस नाही दोन लाख जरी जागाहभरल्या दरवर्षी तरीही सिरीअस होतील पोर, हे सगळ्यात मोठ्ठजात कारण कसकाय विसरता विसरभोळ्या भोकाचेहो??*😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @narayanp4256
    @narayanp4256 Рік тому +16

    मुलगी मिळत नसेल तर मग पोरी पटवा. प्रेम करा.मी अनेक मुलं बघितलेत जी कमी शिकलेली आहेत, चांगली नोकरी नाही तरीपण त्यांना सुंदर व चांगल्या बायका मिळाल्या आहेत. चांगल्या नोकरी वाल्या पेक्षा आणि जास्त शिक्षण घेतलेल्या पेक्षा. आजू बाजूला फिरताना लक्ष देवून बघा. मी दोन peon बघितलेत जे 15 ते20 हजार पगार घेतात पण त्यांना सुंदर व पदवीधर b com मुली भेटल्या आहेत.हे कसं काय बुवा.

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 Рік тому +1

      HIV झालेला असतो त्यांना... 🥹🥹🥹🤑🤑🤑

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Рік тому

      @@shridharthorat6590 Lame

    • @beautyandthebeast1465
      @beautyandthebeast1465 Рік тому +4

      Khara bolatat tumhi!!Ani he doghana pan lagu padte mulana pan mulinapan...Arrange marraige peksha love marraige walyana changle life partner milat aahet..kiti tari muli dekhil avarage looking asatat but tyana love marraige madhe handsome kartutvavan navre milalet!!

    • @arvind2562
      @arvind2562 Рік тому

      वास्तव ❤️

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому +1

      You are wrong भावा, माझं निरीक्षण आहे की, जे अट्टल बेवडे असतात त्यांनाच नेमकी चांगली समजूतदार आणि सुंदर बायको मिळते आणि दुसरा मुद्दा - सध्याच्या मुली practical बनल्या असून त्या मुलाचं career future अँड estate बघून जोडीदार निवडतात आणि आधीच्या प्रेमी मुलाला कोलतात

  • @allinoneg.b.6517
    @allinoneg.b.6517 Рік тому +1

    चिन्मय भावा तुझं सादरीकरण खूपच छान असतंय...
    हा विषय आणि त्याचे विश्लेषण खूपच छान केलस तू...

  • @pradeeppawar1194
    @pradeeppawar1194 Рік тому +227

    CHINMAY NEVER DISAPPOINTS HIS AUDIENCE
    Yours,
    बाप्या !

  • @FilmyBoy-te5qn
    @FilmyBoy-te5qn Рік тому +5

    हल्ली मुलींच्या बाबतीत त्यांना श्रीमंत मुलगा पाहिजे एकुलता एक पाहिजे जमीनदार पाहिजे पण शेतात काम करणार नाही स्वतः राहतात २ खोलीच्या रूम मध्ये आणि अपेक्षा खुप मोठ्या चूक तशी गावातल्या लोकांची पण आहे त्यांनी मुली होऊ दिल्या नाही त्यामुळे आजची तरुणपिढी भोगत आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      100%barobar.

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Рік тому +1

      Nokri wala Pahije... shetkari nko... business man nako

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 Рік тому +5

    वा क्या विश्लेषण हैं !!

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 Рік тому +1

    पोरीचा बाप पोरी साठी सरकारी नौकरी वाला पाहत बसतो अन पोरी तिकडे गाव भर चरून येते 4-5लफडे करून आणि एखाद्या बरोबर पळून लग्न करते बाप पोरीला परत आणून लग्न लावून देतात पण पोरगी काही राहत नाही मग त्या मुलाकडून पैसे उकळतात आणि घटकस्फोट असे धंदे चालू आहे सध्या गावोगावी

  • @rahuldarade8501
    @rahuldarade8501 Рік тому +2

    भाई तूने तो दिल को छू लिया 💗

  • @dailynewshub260
    @dailynewshub260 Рік тому +29

    Best lines 😂😂 are in starting 0:00 to 1:28 😂😂
    Overall total video is amazing 😂😂

  • @sanketbharekar8743
    @sanketbharekar8743 Рік тому +4

    जळजळीत सत्य मांडलय भावा.

  • @wolfofdalalstreet4933
    @wolfofdalalstreet4933 Рік тому +2

    भावा तुझी कोल्हापूर स्टाईलन बोलण्याची पद्धत आपल्याला लय आवडली बघ, भावा नाद खुळा ईषय हार्ड

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 Рік тому +1

    तुझी विषय मांडण्याची पद्धत खूप चांगली आहे

  • @funplots
    @funplots Рік тому +9

    Perfect Explained....😍😎😎💪💪💪

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Рік тому +4

    आई खुरपायला का जाईना जावंई जोरातच पाहिजे,अशी समाजाची वाईट परिस्थिती आहे
    हे वास्तव आहे

  • @santoshwaghmare3001
    @santoshwaghmare3001 Рік тому +1

    मनापासून आभार साहेब तुमचे

  • @mayurrambade
    @mayurrambade Рік тому

    सध्याच वास्तव अत्यंत चपखल पद्धतीने पण तेवढेच खर ही आहे. चिन्मय भाऊ खरच भारी.

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 Рік тому +3

    काय बोलास भावा... 🤣👌👌👌प्रत्येक पॉईंट बरोबर बोलास... ☝️... पण आज काल मुलीच्या अपेक्षा खुपच आहेत.... हेच खरं आहे....

  • @CancerVlogger
    @CancerVlogger Рік тому +8

    बाप्या फेमस झाला😀❤️

  • @MrBadshah74
    @MrBadshah74 Місяць тому +1

    लग्नाला मुली मिळत नाही पण live in relationship साठी मिळतात. म्हणजे सोबत पाहिजे पण बंधन नको. यात लग्नात कायदा मध्ये येतो आणि live in मध्ये कायदेशीर बंधन नाही. हे कारण तर नाही ना.

  • @tushardalvi1991
    @tushardalvi1991 Рік тому +2

    Ekch number video bhava....amhi solapurchech aahot... Thanks for putting up effort into this video....

  • @yashx_2000
    @yashx_2000 Рік тому +6

    काय नाय तसलं अपेक्षा पैसा असला ना खिशात हजारो पोरी माग येतात 💵

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 Рік тому +8

    भाऊ तूमी एकदम काळजात तीर मारला हो!💔

  • @rahulyedake1786
    @rahulyedake1786 Рік тому +1

    *मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????*
    कमी शिक्षण आहे - नको
    पगार कमी आहे - नको
    खेड्यात राहतो - नको
    स्वतःचे घर नाही - नको
    घरात सासू सासरे आहेत - नको
    शेत नाही - नको
    शेती करतो - नको
    धंदा करतो - नको
    फार लांब राहतो - नको
    काळा आहे - नको
    टक्कल आहे - नको
    बुटका आहे - नको
    फार उंच आहे - नको
    चष्मा आहे - नको
    वयात जास्त अंतर आहे - नको
    तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको
    एक नाडी आहे - नको
    मंगळ आहे - नको
    नक्षत्र दोष आहे - नको
    मैत्रीदोष आहे - नको
    सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?
    संसार कुणाबरोबर करणार ?
    आई/ वडील कधी होणार ?
    सासू/सासरे कधी होणार?
    आजी/आजोबा कधी होणार ?
    बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
    मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
    हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.
    माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
    जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
    लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.
    पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही,
    स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो.
    आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय.
    आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
    पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Рік тому +1

    😃 Ek number re bhava. Kaay hasat khelat tumhi khari paristhiti bolun dakhvli. Lai bhari.

  • @vaibhavdhamankar4567
    @vaibhavdhamankar4567 Рік тому +5

    Last dialogue 🔥🔥🔥😂😂🤣🤣🤣

  • @kartikwaman7212
    @kartikwaman7212 Рік тому +25

    Hi Chinmay,
    You really have good storytelling skills
    Keep it up.

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Рік тому +1

    कारण वेगळंच आहे हो साहेब मुलींची संख्या कमी झाली आहे . आता लग्न 💒 विसरा वय निघून गेल्यावर पोरगी देणार नाही

  • @yogeshbaraskar502
    @yogeshbaraskar502 Рік тому

    खूप छान विडिओ... सत्य परिस्तिथी

  • @praheshcharthal
    @praheshcharthal Рік тому +5

    Bol Bhidu is ssly getting a true fan base by creating a content on veriety of topics... And the timing of videos is just awesome 😎
    Vishay trending mdhe aala ki tya vr video aalach mhnun samja 🔥

  • @santyj1851
    @santyj1851 Рік тому +4

    नाही जमेल रे सगळ्यांचे लग्न मनापासून प्रार्थना आहे माझी 🙏🏻

  • @advcharulthoratjadhav6552
    @advcharulthoratjadhav6552 Рік тому

    Serious विषय खूप छान सांगितला.

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz Рік тому +2

    2012 ला मी panvel मध्ये असं पाहिलं होतं की लग्नासाठी पोरं दीपक fertilizer सारख्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामाला जात होते. लग्न झाल्यावर नोकरी सोडून जात. पोरींना फसवून लग्न करत होते.

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil7 Рік тому +3

    video त सांगितलेली एकना एक गोष्ट खरीच आहे...

  • @abhaykhadke9705
    @abhaykhadke9705 Рік тому +7

    खूब गंभीर मुद्दा है

  • @harisargar2154
    @harisargar2154 Рік тому

    एकदम सही सही मांडणी केली आहे... हे वास्तव आहे.

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 Рік тому +1

    हा खरच फार गंभीर विषय आहे. बाप्या हा एक प्रतिनिधी आहे. अशी असंख्य मुलं आज निराश होऊन फिरत आहेत. लिंग गुणोत्तर हे एक मोठं कारण आहेच. पण एकट्या पत्रिकेत शंभर गोष्टी असतात. त्यातील एक नाही जुळली तरी चांगलं स्थळ हातातून जातं.

  • @Khakiadda.
    @Khakiadda. Рік тому +5

    इंदोरीकर महाराज की जय हो...
    लग्न न होण्याचे कारण इंदोरीकर आहे 😂😂😂😂

  • @varshapatil1053
    @varshapatil1053 Рік тому +6

    Khupch कठीण होऊन बसलाय सगळ

  • @prashantbhosle8787
    @prashantbhosle8787 Рік тому

    खूप छान माहिती 👏👏👏

  • @mangeshjagdhane7992
    @mangeshjagdhane7992 Рік тому

    Ek no bhawa.रिअल विषयाला खुप भारी style मध्ये represent केलेस.

  • @abhijitmundhe100
    @abhijitmundhe100 Рік тому +4

    चिन्मय भावा, तुझा तालुका,जिल्हा कोणता रे?,तुझा "ट्यून "एकदम भन्नाट आहे.

  • @akashyekondi9598
    @akashyekondi9598 Рік тому +4

    आज मुलानं वर जी परिस्तिथी आहे तीच परिस्तिथी काही वर्षाने मुलीनं वर पण येणार आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      Navhe, mulinvar ji paristhiti hoti, ti aata mulanvar aahe, kiti stree garbh marle gele.

  • @b.ashish9436
    @b.ashish9436 Рік тому

    Khup chan explanation ...reality

  • @physics9786
    @physics9786 Рік тому

    आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ 👌👌👌