दिपू मोठा झाला | A day out with Deepu | Kokan | Calf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 436

  • @subhashbele4051
    @subhashbele4051 4 місяці тому +107

    दिपू बद्दल अभिमान वाटणे, कौतुक असणे,अगदी भावनावश होउन बोलण, दिपूच्या जन्माचे क्षण सांगताना तुमच्या भावना. ..किती तरल,निरागस, अगदी समरस होऊन गेलात,ते ही गोठ्यातल्या एका जीव लावलेल्या वासरा बाबत,. कौतुक करावे तितके कमीच ही निरागसता अशीच जपून ठेवा.

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 4 місяці тому +8

    ऐक ना... खर सांगतो कोकणातील माझ्या आवडीचे vlogar मध्ये तु आहेस.. पहिला रानमाणूस दुसरी तु आणि मुक्ता नार्वेकर.... तुझ आणि दिपूच नात असच राहो....

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 4 місяці тому +72

    ख-या अर्थाने स्वानंदी श्रीमंत आहे....
    मस्त हिरवागार निसर्ग...
    दुध दुभती जनावरं...
    किती आवडीने करते सगळं....
    मातीशी जोडलेली आहे...
    अशीच नेहमी आनंदी रहा....
    तुझे हे ब्लॉग बघुन आम्हाला पण आनंद मिळतो...
    तुझ्या बरोबर आम्ही पण गावात पोहचतो...

  • @alokpandey9532
    @alokpandey9532 4 місяці тому +98

    भारतातले सगळे लोक तुझ्यासारखेच असते तर किती छान झालं असतं.

    • @kokanakswargh
      @kokanakswargh 4 місяці тому +5

      Kharh ahe

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 4 місяці тому

      @@alokpandey9532 कीती सगळ छान झालं असत. शांत, निरागस.

    • @MahendraMVaze
      @MahendraMVaze 3 місяці тому +1

      खूप छान प्रतिक्रिया

  • @sureshsawant5502
    @sureshsawant5502 4 місяці тому +3

    हे सर्व पाहून फार आनंद होतो. पण आपले जनवरा सोबतचे बोलणे अप्रतिम. हे खरोखरच जवळपास बरेच गुराखी करतात. दिपूच्या jalmacha व्हिडिओ पहिला. अप्रतिम ,सुंदर प्रेम.❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 місяці тому +6

    स्वानंदी, तु बोलतेस ते अगदी बरोबर आहे. प्राण्यांवर प्रेम करा. हा आपला व्हिडिओ फार भावनिक झाला. खरंच दिपु हा गोंडस बाळ वाटतो. ❤

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 4 місяці тому +26

    तुझी गुरांची joint family खुप अलौकिक आहे. तुझा आवडता दिपून आहे अस वाटतय. म्हस चिखलात का बसतात ते सांग. दिपूचा happy birthday करणार , मजा येईल.
    आनंदी स्वानंदीचा आनंदी दिपू.❤

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 4 місяці тому +6

    किती प्रेम करतेस दिपू वर..त्याच्या जन्माच्या वेळच्या आठवणी सांगत होतीस तेव्हा डोळ्यातून पाणी आले 😊

  • @shankarpadave2432
    @shankarpadave2432 4 місяці тому +3

    स्वानंदी, तुझी निवेदन करण्याची मधुर शैली आणि दिपूच्या निरागसपणाचे क्षण बघताना मनाला हळवे करुन जातात...एकंदरीत सर्वच छान...!

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale1437 4 місяці тому +31

    स्वानंदी ताई तू अप्रतिम आहेस. अप्रतिम म्हणण्या पेक्षा युनिकच आहेस. आजच्या आधुनिक काळात तू हे सगळं करतेस, सांगतेस, तुझं जनावाराविषयी प्रेम, निसर्गाविषयी माहिती, शेती विषयी माहिती हे सगळं बघायला खूपच आनंद होतो. माऊले तू ग्रेट च आहेस ❤❤❤❤ अशीच रहा ईश्वर तुला असच हसत खेळत ठेवो हिच त्याच्या चरणी प्रार्थना 🙏

    • @manishasapre638
      @manishasapre638 4 місяці тому

      स्वानंदी अशीच आनंदी रहा खुश रहा. खूप शुभेच्छा ❤. दिपू मस्तच😅

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 4 місяці тому +23

    स्वानंदी तु खुप लकी आहेस तुला दिपूसोबत तुझ्या बालपणीचा आनंद घेते आहेस आणि नैसर्गिक जिवन जगत आहेस ❤

  • @SiddodhanMokale
    @SiddodhanMokale 4 місяці тому +4

    स्वानंदी,अंग तुझे निसर्ग प्रेम लाजवाब आहे,आज
    मुली खेड्यात जायालाच तयार नाही, प्रत्येकीला मोठ्या शहरात जायला विदेशात जायला आवडते,तु मात्र जगावेगळी आहेस.

  • @DasharathDighe-cm5kf
    @DasharathDighe-cm5kf 3 місяці тому +3

    निसर्ग आणि प्राण्यांच्या आपुलकी आणि प्रेमातबदल.खुपखुप लाईक.

  • @JayvantDevane-op6qt
    @JayvantDevane-op6qt 4 місяці тому +5

    स्वानंदी दिपुचा वाढदिवस चागल्याप्रकारे साजरा कर जस की आपण एकाद्या लहान बाळाचा करतो तसा कर कारण की आपण ज्या मुक्या जनावरांनाच्या सहवासात राहून जो आनंद आणि सुख मिळत ना तो क्षन पैसे देऊन आपल्याला कुठेच मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा वेळ तुम्ही जनावरांच्या शोभत घालवला की कायम आपण प्रसन्न निरोगी आणि कधीच आजारी पडणार नाही ❤❤

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 4 місяці тому +7

    दिपु chya आई बद्दल एकताना अगदी भरून आल. आणि खुप छान वाटलं त्याच्या आई ची काळजी घ्यायला देवाने तुला ते भाग्य दिलं. ती जनावर नसुन तुझी भावंडं आहेत.

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 4 місяці тому +16

    दिपुला हुंड्यात देयाचा तुला किंवा रुखवतात ठेऊया गमतीने म्हणते हा vlog खुप छानच नेहमी प्रमाणे वाट बघतच होते

  • @shankarappa1994
    @shankarappa1994 4 місяці тому +8

    गुरांना चरताना पाहुण जो आनंद मिळतो. तो सांगने शब्दात येनार नाही😊

  • @manalighumare5315
    @manalighumare5315 4 місяці тому +4

    किती गोड आहेस ग तू स्वानंदी ❤ पुढे काही नाही लिहिणार मी....कारण नाही सांगू शकणार शब्दात....असेच खूप छान छान साधे सोपे पण मनाला भिडणारे contents बनवत रहा....तुला खुप खुप शुभेच्छा 😊 खूप मोठी हो

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar 4 місяці тому +14

    . खरच तुझे जीवन किती स्वछंदी आहे. मला तुझा हेवा वाटतो.

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 4 місяці тому +18

    एकदम छान झालाय हा vlog
    आजूबाजूला ही पावसाने हिरवे गार झालेले आहे .
    हीच खरी समृद्धी व तुम्ही सारे समृद्ध जीवन अनुभवत आहात तुमच्या बागेच्या जवळून रेल्वे ही जाते का त्याचा भोंग्याचा आवाज ही आलाय खरच असे जीवन हवे .

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 4 місяці тому +3

    जनावरांवर पण किती प्रेमाने वागतेस फारच छान

  • @NarendraNaik-g8w
    @NarendraNaik-g8w 4 місяці тому +20

    स्वानंदी तू तुझ्या गुरांबद्दल किती प्रेमानी बोलतेस. ऐकायला खूप गोड वाटते आहे.

  • @vandanapatil144
    @vandanapatil144 4 місяці тому +13

    खूप छान आहे दिपू आणि तू पण

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 4 місяці тому +11

    कोकणातील हिरवा निसर्ग आणि गुरांच्या गळ्यातील घंटांचा किणकिणाट फारच छान

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 4 місяці тому +6

    Atishay goud aahe g dipu. ❤😘😍🤩🥰

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 4 місяці тому +19

    म्हशी गं म्हशी , अशी गं कशी, कुठे तू जाशी 🤔 म्हशीने चिखलधुनी केली 😄 😄😄 दिपूवर धाकट्या भावाप्रमाणे प्रेम, पाठराखण मस्तचं. दिपूच्या पहिला वाढदिवस पाशात्त पद्धतीने केक कापून नाही तर न्हाऊ माखू घालून, औक्षण करून आणि पूर्णा वरणाचं जेवण करून साजरा करावा असं मला वाटतं. 👌 ♥️ 👍

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 4 місяці тому +5

    स्वानंदी तू किती एकरूप झालीस या मुक्या जिवांशी.ज्या सहजतेने आणि नैसर्गिकपणे शूटिंग केली,त्यामुळे आपण गोकुळात आल्यासारखे वाटते.
    दिपुला वाढदिवसासाठी लापशी आणि शतावरी कल्प याची मेजवानी देणे.

  • @sohamdamle2160
    @sohamdamle2160 4 місяці тому +8

    वा मस्त दिपू खरंच मोठा झाला आणि आत्ता छान गुटगुटीत दिसतोय पण खरंच जनवरावर आपण जेवढे प्रेम करतो तेवढे ते देखील आपल्या वर प्रेम करतात दिपूला वाढदिवसाच्या च्या दिवशी त्याचं आंबोण खायच्या अगोदर सत्यनारायण पूजेला जसा शिरा करतो तो करून त्याच तोंड गोड कर पण छान वाटलं दिपूला बरेच दिवसांनी बघितल्यावर ❤❤

  • @swapneelk1267
    @swapneelk1267 4 місяці тому +5

    दिपू डॉन अस नाही म्हणालीस आज त्याला ना..म्हणून काना डोळ्याने बघत होता तो तुला...
    दिपुसाठी comment नाही तर फक्त प्रेम..निखळ अगदी...❤❤

  • @SanjayPatil-ck9hr
    @SanjayPatil-ck9hr 4 місяці тому +21

    तूझ्या सारखी तूच एकमेव आहेस, छान निसर्गाचा आनंद घेतेस तू 👌🏻👌🏻👌🏻

  • @uttaramodak4386
    @uttaramodak4386 4 місяці тому +6

    तुझ्या सारखाच तुझा दिपू गोड आहे अगदी😀👌

  • @vikas_1008
    @vikas_1008 4 місяці тому +3

    स्वानंदी तुझे हे निसर्ग सुखाने ओतप्रोत असलेले ब्लॉग पाहून मुंबई पुण्या सारख्या शहरात आयटित राहणाऱ्या युवा वर्गाला देखील गावाकडची ओढ निर्माण होत असणार....❤❤

  • @prabhakargavit6922
    @prabhakargavit6922 4 місяці тому +4

    स्वानंदी ताई अशा गुरांसोबतचा व्लोग आवर्जून वाट पाहत होतो..खुप छान व्लोग👌💯💯

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 4 місяці тому +11

    किती सुंदर व्हिडीओ. किती आवड तुला तुमच्या गुरांची आणि त्यांची घेता उत्तम काळजी. दिपू बद्दल सांगताना किती आनंद होत होता तुला. 👌👌🌹🌹

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 4 місяці тому +4

    दीपू डाॅन झाला..😎
    हवा करतोय ❤😂

  • @gauridhopavkar2627
    @gauridhopavkar2627 4 місяці тому +12

    गोड गोड दिपू आणि माघीही..

  • @ipl4943
    @ipl4943 3 місяці тому +2

    तुमची जो हा ब्लॉग असतो ना तो larger than life आहे.
    गावाकडच्या आठवणींना उजाळा देणारे तुमचे ब्लॉग पाहून मन भरून येतं.

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 4 місяці тому +6

    दीपू चरायला गेला, म्हशीला बघितला चिखलात लोळताना, खरच खूप सुंदर आहे बाघ आहे ,दिपू च्या जन्माचा व्हिडिओ नक्की बघा, तुझे खरबो सबक्राइबर्स होतील, दिपू चा जन्म स्वानंदी च्या घरी झाला त्याचं नशीब किती छान आहे, उपीठ छान होते, तू जेवण हसून करते फार छान आहे, प्राणी प्रेम फार अमूल्य आहे, कुणी अनुभवल का नाही पण स्वानंदीचा गळा दाटून आला होता, पाऊस आला होता, दिपू छान चरत होता! नंदी हे देवाचे महादेवाचे भक्त होते आणि जसे गणपती नाते नंदी होते तसे नाते स्वानंदी आणि दीपू चे आहे ब्लॉग अति सुंदर होता!

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 місяці тому +14

    बैलांच्या बद्दलचे तुझे विचार ऐकून खूप बरं वाटलं ❤

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 4 місяці тому +6

    तिथं असल्याचा भास होतो. इतकं मनापासून तुम्ही सर्व सांगता ना. व्हिडिओ संपूच नये असं वाटतं. खूपच छान 👌🙏

  • @GauravAuti93
    @GauravAuti93 Місяць тому

    काना डोळा करतो Dipu Khup खोडकर आणि qute Ahe Dipu त्यामुळे दिपू साठी एक लाईक तर बनतोच

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 4 місяці тому +2

    Happy birthday दिपु 🎉खुप छान गोड बातमी चा ही विडीवो बघितला खुप छान

  • @alexgates5202
    @alexgates5202 4 місяці тому +11

    किती ते गोडकौतुक करावे तेवढे कमीच आहे . वाह ....स्वानंदी ❤

  • @neelamkudtarkar2092
    @neelamkudtarkar2092 4 місяці тому +1

    स्वानंदी तू नावाप्रमाणेच खूप गोड गोड आनंद देणारी आहेस. तुझं दिपू विषयी प्रेम मला खूप आनंद देत. धन्यवाद स्वानंदी अशीच आनंदी रहा. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @marathifolkarts9880
    @marathifolkarts9880 3 місяці тому

    माझ्या आयुष्यात इतका सहज सुंदर आणि भावनिक vlog पाहिला नव्हता.किती छान बोलतेस.कुठेही खोटा आव नाही,सगळं कसं सहज सुंदर. वा तू खरी कोकण कन्या आहेस.गातेस पण किती सुंदर.ही खरी कोकणची संस्कृती.तुला खूप खूप आशीर्वाद

  • @smile105
    @smile105 4 місяці тому +1

    तु गुरांबद्दल किती बारकाईने अभ्यास केला आहेस.खूप छान वाटते गुरां सोबतचे तुझे bonding❤Dipu Don😘😘

  • @BankarPatil11
    @BankarPatil11 4 місяці тому +92

    आपल्या महाराष्ट्र मधील 10 मुली पण या ताई चा video बघत नसेल कारण मुलींना असे जीवन नको वाटते मस्त मोठ्या city मध्ये नवऱ्याच्या जीवावर जगायला त्यांना मजा वाटते.थोड्याच मुली शिकून जॉब करतात 90%तर फुकटात जिंदगी जगत आहे 😊

    • @Advait-12
      @Advait-12 4 місяці тому +6

      खरय

    • @vilaskenjale2136
      @vilaskenjale2136 4 місяці тому

      मिजास केवडी करतात नवरा प्लॅट पाहिजे सरकारी नोकरीं पाहिजे सासू सासरा नको दीर नको कामं नको शेतात जायला नको लग्न ठरवताना आई वडील ठरवतात शेती करणारा गावी राहणारा नको किती काय रुबाब करतात शिकलेली असली म्हुणुन काय झाले संसार करताना नवऱ्याला साथ देणे किती महत्वाचं असते ते कुठे समजत ह्या शहरात गावात राहणाऱ्या मुलींना

    • @absolute4001
      @absolute4001 4 місяці тому +1

      Tumhi pn city madhe rahta na ?

    • @Bailgada884
      @Bailgada884 4 місяці тому

      ❤❤❤❤

    • @BankarPatil11
      @BankarPatil11 4 місяці тому

      @@absolute4001 दादा मी लहानपणापासुन 26वर्षापर्यंत गावाकडेच खूप काम केल आहे शेतात आणि जेव्हा वेळ मिळाला की अभ्यास करत होतो आणि सकाळी ground.माझे आईवडील शेतीच करतात.अन मी पण सुट्टीवर गेलो की दिवसभर शेतात काम करतो .लहान पासुन शेतात कष्ट करायची सवय आहे त्यामूळे लाज नसली पाहिजे आपल्याच शेतात काम करायची.

  • @psmayuresh
    @psmayuresh 4 місяці тому

    मला तुझे vlog बघताना प्रचंड आत्मिक समाधान मिळतं.. एखादं देवाचं स्तोत्र म्हणताना मिळतं तसं..

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 4 місяці тому +6

    वाहहहह खुप छान गाई.. गोकुळातील गोधन वाटतं.

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 17 днів тому

    खूप सुंदर vlog असतात ताई तुझे,गुरांवर अत्यंत प्रेम,पाहून खूप बरं vatey,Ani बरीच माहिती,तुझे बोलण , मस्तच,phudhchya वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @17.atharvawadekar69
    @17.atharvawadekar69 4 місяці тому +4

    स्वानंदी ताई सर्व गाई गुरांचे नंतर वेगळा video बनव. दिपू भरपूर शांत आहे and ase गाई सोबत राहणे किती मस्त अनुभव आहे .

  • @marathifolkarts9880
    @marathifolkarts9880 3 місяці тому

    किती सुंदर माझ्या डोळ्यात पाणी आलं.

  • @nileshchavan4896
    @nileshchavan4896 4 місяці тому +3

    कृपया ताई दिपू चा वाढदिवस नक्कीच करा आम्हाला तो ब्लॉग पाहायचा आहे आणि त्याची आम्ही नक्कीच वाट बघू.

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 4 місяці тому +9

    खूपच छान. मुक्या जनावरांवर निस्वार्थी प्रेम करणं हि एक कला आहे. आणि ती तुला खूपच छान जमते. ❤❤❤

  • @sanjaynanajkar8643
    @sanjaynanajkar8643 4 місяці тому +3

    ❤❤❤🎉 दीपक ज्योती नमोस्तुते दिवाळी ला जन्माला आलेला दिपू❤ बद्दल❤🎉 आपल्या प्रतिक्रिया ❤आपल्या भावना 🎉अगदी साहजिक🎉 आहे ❤कारण त्याचा जन्म तुम्ही प्रत्यक्ष बघितला आहे🎉 तसंच त्याचा बालपण तुम्ही एन्जॉय करत आहात😂😂 हा अनुभव सगळ्यांनाच मिळतो असं नाही🎉 त्यामुळे तुम्ही जे सांगता किंवा जे चित्रीकरण करत आहात त्याच्यातून आम्हाला तो बघता येत🎉 तुमच्या भावना समजून घेता येतात🎉 यालाही नशीब लागतं🎉 दिपूला प्रथमच कुठे बाहेर काढून आपण चारायला घेऊन गेला त्याचे चित्रीकरण एकदम लाजवाब🎉 लहानपणी आपण जेव्हा शाळेत जायचो आईचा पदर धरूनच जायचं ना 😂आईला चिकटूनच😂 किंवा आईच्या कडेवरच 😂❤असायचो ना🎉 अगदी त्याचप्रमाणे दिपू त्याच्या आईसोबत प्रथम चारायला जात असताना आईच्या मागे मागे केव्हा आईला घुसळत😂 चालत होता😂 अगदी स्वाभाविक नैसर्गिक आहे ते😂🎉 त्याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त😂 त्याला एक तर गुळ तूप पोळी😂 आणि पुरणाची पोळी🎉 त्याला आवडणारी गुळचट ढेप 🎉म्हणजे चारा🎉 इकडे विदर्भात वड्या सारख्या ज्या बाजारात मिळतात त्याला ढेप म्हणतात🎉🎉 बाकी चित्रीकरण सुंदर संवाद एकदम भावनात्मक होते🎉🎉 मोरया

    • @sanjaynanajkar8643
      @sanjaynanajkar8643 3 місяці тому

      तुझा सदैव उपक्रम असे चालू देत हीच शुभेच्छा शारदीय नवरात्रीच्या तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 4 місяці тому +1

    खूपच छान व्हिडिओ, हिरवागार निसर्ग आणि तुझं प्राण्यांबद्दल असलेले प्रेम,आपुलकी 🙏

  • @sureshangre9011
    @sureshangre9011 2 місяці тому

    ऐका ना तुम्ही खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ बनवता.

  • @Ahilyanagar-Ka-Vloger
    @Ahilyanagar-Ka-Vloger 4 місяці тому +7

    दिपू लय भारी😎, निरागस 🥺आहे.आयुष्यात काही पण होऊ दे त्याला दूर करू नकोस.🤞🏻

  • @ganeshgopal3801
    @ganeshgopal3801 3 місяці тому

    आजच्या काळात तुम्ही सगळी कामं प्रेमाने आनंदाने करत आहात ते पाहून तुमचे कौतुक वाटते 🚩

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 4 місяці тому +11

    वाह ...... स्वानंदी , केवळ अप्रतीम झालाय आजचा हा भाग . एकदम दिपू मय ..... अनमोल आहे अगदी .... खूप आवडला . आज तुझे गाणे नाही ग , दिपू चा वाढदिवस असेल तेव्हा मात्र जरूर ऐकवं . गोडाचा पदार्थ म्हणजे सगळ्यांची आवडती पुरण पोळी कर की ..... एकदम मस्त . असेच सुंदर ,सुंदर ,सगळे भाग होऊ देत . ❤❤❤❤

    • @kulkarnikp9
      @kulkarnikp9 4 місяці тому

      एकदम बरोबर "पुरण पोळी" च हवी वाढ दिवसांकरिता. आपल्या महाराष्ट्रात सनासुदीला, कुलधर्म कुलाचाराला देवाचा नैवेद्य म्हणून आवर्जून केला जाणारा सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे "पुरण पोळी"

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 4 місяці тому

    Atishay sunder blog .
    Nisarg sobat aaplee mat..
    Ghar,, Bhaji , sarv .., kahi khupach Chan..
    June Ghar..
    Khupach Chan Blog..

  • @TusharThakur
    @TusharThakur 4 місяці тому +2

    दिपू बद्दल बोलताना तू खूप भावूक होत होतीस. दिपू कायम तुझ्या जवळ राहो हीच प्रार्थना. नेहमीप्रमाणे मस्त रीलॅक्सिंग विडियो. 👌

  • @Bharatiya_15847
    @Bharatiya_15847 4 місяці тому +1

    छान झालाय दिपूसुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा,
    मागील जवळपास 1 वर्षापूर्वी पासून मी आपले व्हिडिओ आणि shorts पाहत आहे, कधीच video पाहताना कंटाळा आला नाही किंवा video skip करावा असे नाही वाटले.💯
    पुढे जाऊन आपले लवकरात लवकर 3 million subscribers होणार आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.🎉💐

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 4 місяці тому

    कोकणातली नंबर वन वलॉगर आहेस तु. सुंदर आशयपूर्ण व्हीडिओ आणि उत्तम सादरीकरण👍

  • @rutaganu9274
    @rutaganu9274 4 місяці тому +1

    आमच्या स्वानंदीचा दिपू द ग्रेट!! ❤❤
    मस्त.. दिपूला बघून आनंद झाला. आजचा हा vlog छानच झालाय. दिपूविषयी बोलताना कधी हळवा तर आनंदाने भारलेला तुझा आवाज, तुझं नि दिपूचं नातं सांगणारा!! ❤❤ दिपूच्या जन्माचा vlog मलाही फार आवडला होता. तुझे गावाकडचे असे व्हिडिओ बघताना कितीदा आनंदाने आणि जुन्या आठवणींनी डोळे भरून येतात. आपली घरची गायीगुरं फार जीव लावतात. तुझ्यामुळे पुन्हा पुन्हा माझं बालपण भेटत रहातं, आनंदाचे क्षण पुन्हा जगण्याचा आनंद मिळतो. Thank you dear...❤❤❤
    दिपूला विशेष काय आवडतं? आंब्या फणसाचं काही असेल तर साठवलेला रस वापरून नक्की काहीतरी बनव. सांदण, पुरणपोळी वगैरे.. त्या celebration चा ही एक झकास vlog येऊ दे. वाट पाहेन.

  • @manojbhorkar1196
    @manojbhorkar1196 4 місяці тому +1

    प्रेमळ निरागस दीपू आणि स्वानंदीचे जग

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 4 місяці тому +1

    कामाचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो एकदम छूऽऽमंतर!!!👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z 4 місяці тому +1

    दिपू सोबत स्वतःचे बालपण मनसोक्त जगून घेतेस तू ज्याप्रमाणे आईवडील आपल्या लहान मुलांमधे आपल बालपण जगतात. दिपूच्या वाढदिवसाला पुरणपोळी करंजी सगळं कर आणि त्या दिवशी तीच बंदिश म्हण आणि आम्हा श्रोत्यासाठी एक मराठी गझल .. फरमाइश तुझ्या फॅन्सची

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 4 місяці тому

      मस्त कमेंट 😊👍🏻

  • @sanjayatkari4169
    @sanjayatkari4169 4 місяці тому +1

    सुंदर video ..स्वानंदी, 👍

  • @sangitaborse923
    @sangitaborse923 4 місяці тому

    दिपू ल छान पुरणपोळी करून घाल. गोंडस, गोजरा आहे ग दिपू.❤

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 4 місяці тому +6

    सुरेख दवबिंदू आणि दिपूच्या घंटेची किणकिण 🤗

  • @Shrutigurav08
    @Shrutigurav08 4 місяці тому +5

    स्वानंदी तुझ किती प्रेम आहे ग या मुक्या जनावरांवर
    खरचं तू खूप लाड करते ग दिपूचे
    आणि तू पण खूप गोड आहेस ग
    आणि तू खूप भावनिक झाली होतीस g बोलताना

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx 4 місяці тому

    तुमचे व्हिडिओ सकाळी सकाळी पाहिले ना कि दिवस एकदम मस्त जातो..अतिशय सुंदर

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 4 місяці тому

    स्वानंदी तुझं किती प्रेम गुरांच्या वरती खरंच कि तुझा आवडता दिपू आणि माघी तू जेव्हा सासरी जाशील तेव्हाचा क्षण कसा असेल तुझ्यासाठी? शब्दात सांगणे तुझ्यासाठी फार कठीण असेल.

  • @namdeodurgule6267
    @namdeodurgule6267 4 місяці тому

    खूप छान अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्वानंदी अतिशय गोड मुलगी स्वत च्या कुटुंबाप्रमाणे जनावरे तयार करण्यात आली आहेत एक सुशिक्षित युवतीने जोपासना केलेले छंद वाखाणण्याजोगी मायबोली निसर्गाचे विहंगम दृश्य ग्रामीण बाज अभिनंदन आणि शुभेच्छा😊🎉

  • @hitakshibhoir4089
    @hitakshibhoir4089 4 місяці тому +1

    खूपच सुखद अनुभव..thank yoy❤

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 4 місяці тому

    स्वानंदी ताई खरच दिपु तुझ्यासाठी पाखऱ्याच आहे ...खुप जीव लावतेस त्याला...😊😊खुप छान ...आणि त्याचा वाढदिवस जोरात करा मस्त...👏😊❤

  • @17.atharvawadekar69
    @17.atharvawadekar69 4 місяці тому +1

    Kiti सुंदर मस्त दिपू 1 वर्षाचा झाला , भरपूर गाई आहेत .

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 4 місяці тому +3

    Mahsine mast saban lavun ghetla wow nice video 🎉🎉

  • @anushkanawathe
    @anushkanawathe 4 місяці тому

    तुझ्या दिपूला खुप खूप प्रेम! मजा येते त्याला बघायला!❤

  • @kshitijkedari4751
    @kshitijkedari4751 4 місяці тому +1

    Khup Sundar aahe dipu

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 4 місяці тому

    आमच्यापेक्षा तूच दिपूच्या जास्त जवळची आहेस... त्यामुळे त्याला काय आवडते हे आमच्यापेक्षा तूच सांगू शकशील ना ग..❤❤❤

  • @sachinvispute4970
    @sachinvispute4970 4 місяці тому

    Nice idea bhirthday celebration

  • @kiranbalakrishnan3826
    @kiranbalakrishnan3826 4 місяці тому +1

    Best way of living ❤

  • @PratikshaLakhat
    @PratikshaLakhat 4 місяці тому +1

    Tai khup sunder video 👌👌👌👌👌

  • @sureshangre9011
    @sureshangre9011 2 місяці тому

    आपले सगळे व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत.खूप खूप छान आवाज खूप गोड आहे.

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 4 місяці тому +1

    स्वानंदी,,,तुमचा हासरा चेहरा खूप छान वाटतो,खूप गुणी आहात

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 4 місяці тому +4

    दीपूच्या जन्मा पासून बघत असल्याने ,त्याची वाढ होताना बघितलं आहे त्यामुळे त्याच्याशी भावनिक नातं तयार झालं आहे....मला माहीत नाही तुम्हाला बहीण भाऊ आहे किंवा नाही पण दुसरं भावंडं नसल्याने त्याच्याशी धाकट्या भावासारखे वाटत असेल म्हणून तो विशेष आवडीचा झाला आहे असं मला वाटतं....
    वाढदिवस साजरा करा जरूर ,त्याला औक्षण करा मात्र नक्की....👍👍😃😃

  • @advocate_arunnair
    @advocate_arunnair 4 місяці тому

    Your vlogs are so soothing and its one of the best channel i have ever viewed ❤. Keep creating such wonderful content and God bless.

  • @rupeshsawant8526
    @rupeshsawant8526 4 місяці тому +1

    खरच खूप छान गुरे आहेत सर्व

  • @yesananda4222
    @yesananda4222 4 місяці тому +1

    This is so so natural, I am touched with your dedication and passion for the kids, lovely keep it up regards

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 4 місяці тому

    Khup chan vatal Dipu la baghu kevda motha distoy. Thank u Swanandi ❤ love u

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar 4 місяці тому

    खरंच दिपू आज्ञाधारक आहे

  • @rajashrisoman
    @rajashrisoman 4 місяці тому +1

    खूप मस्त वाटल ,गावाच्या आठवणी ताज्या झाल्या ,धन्यवाद स्वानंदी
    तुझा दिपू असाच छान छान मोठ्ठा होऊ दे❤

  • @MASS_9880
    @MASS_9880 4 місяці тому

    खूपच छान video असतात तुझे. आज pakharya chi आठवण करून दिलीस त्यामुळे शाळेतील दिवस आठवले.. खूप छान मस्त.. Dipu पण खूप छान आहे...

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 4 місяці тому

    खूपच छान ब्लॉग काय बोलावं शब्दच नाहीत ❤❤

  • @sweetfamily84
    @sweetfamily84 4 місяці тому

    खूपच सुंदर vlog 👌👌👌👌👌

  • @vishalbansod4392
    @vishalbansod4392 4 місяці тому +1

    16.26 kal lavi chi fule...Gloriosa superba

  • @vijaypatil3826
    @vijaypatil3826 4 місяці тому

    खुपमस्त दीपुशेठ🎉

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 4 місяці тому

    Khoop sunder video ,Deepu mast 👍👌