कोकणातलं माझं घर | Kokan | Home town | Nature

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 3 місяці тому +345

    माझ्या मनातलं स्वप्नातलं आयुष्य तुम्ही प्रत्यक्ष जगत आहात. तुमचे प्रत्येक vlog मी अगदी मनापासुन पाहते, वाट बघत असते आतुरतेने नव्या vlogची. भाग्यवान व नशीबवान म्हणजे काय ते तुम्हाला पाहुन, ऐकुनच कळेल. स्वच्छ, स्पष्ट उच्चार, घराशी, निसर्गाची, झाडाझुडांशी व प्रत्येक प्राणीमात्रांशी भावनीक नाते, सगळ्यांबद्दल कृतज्ञता भाव मनाला खूपच भावते.

  • @gunvantshah3646
    @gunvantshah3646 3 місяці тому +92

    भाग्यवान आहेस स्वानंदी तू ! निसर्गाच्या सान्निध्यात राहून एक स्वच्छंद जीवन जगते आहे.इतक्या लहान वयात तू गायन, चित्रकला, पाककृती, घरकाम,शेतीची कामे,गुरांबद्दल असलेली ओढ ,लागणी व प्रेम वै.क्षेत्रात पारंगत आहे.तुझे प्रत्येक विडिओ आवर्जून बघतो व बघतांना असा भास होतो की मी आपल्या घरातील एखाद्या सदस्याचा च विडिओ बघतो आहे.
    तू खूप प्रगती कर.तुझ्या विडिओ द्वारे आम्हा सर्वांना निसर्गाच्या विविध छटांची व गावातील वातावरण ची नवनवीन ओळख घडवीत रहा हीच इच्छा!!

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 3 місяці тому +174

    याला म्हणतात श्रीमंती. जिथे गाई म्हशी बेडूक घोरपड कुत्रा पक्षी असती तिथे देवाची वसती. खूप सुंदर ब्लॉग ❤❤❤

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 2 місяці тому +1

      Tuze.gav.konte.te.sag.tula.bhetaiyache.aahe

  • @sagarkadam7591
    @sagarkadam7591 3 місяці тому +45

    प्रचंड भाषेवर प्रभुत्व , शुद्ध , क्या बात है , असच कोकणावर प्रेम करत रहा . कोकण सुंदर आहेच पण तू तुझ्या सुंदर शब्दांनी अजून सुंदर बनवत आहेस. छान जगताय तुम्ही 😊keep it up !!!!!!

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 3 місяці тому +3

      भाषेवर प्रचंड प्रभुत्व!

  • @ameyagore9958
    @ameyagore9958 3 місяці тому +118

    स्वानंदी, मी गोरे , गोरेगावला (मुंबईत) राहतो. तुझे blogs नियमितपणे पाहतो. मला गाव (नेटिव्ह प्लेस) नसल्यामुळे गावाकडील वातावरण उपभोगू शकत नाही. तुझे व्हिडीओ पाहिले की खूप समाधान वाटते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवतो. तुझ्या कडे लांझ्याला यायची खूप इच्छा आहे. बघू कधी जमतंय ते. तुझ्या भविष्यातील उपक्रमाला मनापासुन आशीर्वाद. तू शहरात राहणारी असून तुला गावची खूप ओढ दिसते ते पाहून तुझा अभिमान पण वाटतो करण हल्ली गावच्या मुलींना पण श हराची ओढ असते म्हणून तुझे अधिक कौतुक करतोय.👍

    • @abhaydatar4053
      @abhaydatar4053 3 місяці тому +5

      अमेय, तू आमच्यासारख्या कित्येकांच्या भावना बोलून दाखवल्यास.

    • @kalindisamudre9515
      @kalindisamudre9515 Місяць тому +1

      खूप सुंदर घर आहे.

    • @dipalisushant9202
      @dipalisushant9202 Місяць тому

      किती सुंदर ग..स्वानंदी...मला खूप खूप हेवा वाटतो ग तुझा..

  • @Priya17188
    @Priya17188 3 місяці тому +44

    लग्नाआधी मी गावी अगदी अशाच वातावरणात लहानाची मोठी झालेय. तेव्हा वेगळं असं काही वाटायचं नाही. आणि आता लग्नानंतर नाईलाजास्तव शहरात राहावं लागतंय पण तुझे व्हिडिओज पाहून माझं माहेर आठवत.🥹🤗❤️

    • @VarshaJagdale-i8q
      @VarshaJagdale-i8q 2 місяці тому +2

      Majh pn asch jhaly khup miss kartey mi majya gavala🥺

    • @Priya17188
      @Priya17188 2 місяці тому +1

      @@VarshaJagdale-i8q कोणतं गाव?

    • @Priya17188
      @Priya17188 Місяць тому

      गुळवणे (ता. चिपळूण)
      तुमचं गाव कोणतं?

  • @monikabhaware933
    @monikabhaware933 3 місяці тому +21

    जस तू म्हणालीस की एखाद्या चित्रा त किंवा कवितेतील वर्णन असता तसच तुझा पूर्ण घर परिसर आणि कोकणातील जीवन आहे.. एखाद्या लेखकाने,कवियत्रिने किंवा चित्रकाराने कल्पना करावे तसे.... अतिशय सुंदर ❤

  • @TejalNarvekr
    @TejalNarvekr Місяць тому

    This is the real richness …. Khup khup lucky ahes tu… enjoy this nature.. god bless❤

  • @Vasaitalukanews
    @Vasaitalukanews 3 місяці тому +18

    तुझं हे अतिसुंदर निसर्गरम्य नयनरम्य परिसरात वसलेल घर पाहून मन प्रसन्न झालं. किती नशीबवान आहेत तुझे आई-वडील आणि किती नशीबवान असेल तो जो या घराचा जावई बनेल 😀❤

  • @manjiriadvant2701
    @manjiriadvant2701 3 місяці тому +4

    खुप सुंदर. 👌🏽. तुझी बोलण्याची पद्धत आणि एकूणच कोकणी वातावरण मनाला ताजेपणा देऊन जाते. आणि तुझं 'ऐका ना ' फारच गोड.

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 місяці тому +72

    Eye soothing!! ⭐😍 ग.दि.मा नी लीहीलेल आणि सुधीर फडके यांनी.. स्वरबद्ध केलेल गाण आठवल तुझ घर 🏡 पाहून.."गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे......कल्पनेत जो स्वर्ग असे..तो मनास सापडे...माझीया (आजोबांचे) प्रियेचे झोपडे..❤!! अत्यंत गोड आठवण स्वानु!!!.....हे "स्वानुभव".. खूप छान निसर्गाच्या सान्निध्यातल्या 🏡.Keep vlogging girl and stay blessed always ❤

    • @anantparab3200
      @anantparab3200 3 місяці тому +1

      किती सुंदर शब्दात व्यक्त केले आहे आपण. देव बरे करो

  • @letslearn9675
    @letslearn9675 3 місяці тому +8

    स्वानंदी... तुझ्या नावात आणि तसाच वागण्यात बोलण्यात राहण्यात आनंद ओथंबून वाहताना दिसतो.... उगाचच कुठेही दिखाऊपणा नाही, जे जसं आहे तसंच तु दाखवते आणि सांगते ही
    आईने केलेल्या नर्मदा परिक्रमेविषयी बनवलेल्या व्लॉगपासून मी नियमितपणे तुझे व्हिडिओ बघतं असते. आणि खरंच तुझे व्हिडिओ नकळतपणे एक आंतरिक समाधान, आनंद देतात...खुप दिवसांपासून तुझं घर आतून ही बघायला मिळावं अशी प्रचंड इच्छा होती आणि आजचा हा व्हिडिओ बघून खुप प्रसन्न वाटलं... तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि बाप्पा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ह्या सदिच्छा 😇😊💐

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 3 місяці тому +178

    सध्याची कोकणातली नंबर वन वलॉगर आहेस तु

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 3 місяці тому +7

      कोकणी रानमाणूस सर्च करा

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 3 місяці тому +1

      @@Amit-n1v
      नक्कीच तो तर आहेच

    • @nazimmulla2781
      @nazimmulla2781 3 місяці тому

      Ranmanus no 1

    • @aratikarkhanis8456
      @aratikarkhanis8456 3 місяці тому +1

      Krushnai Gazane is also good.Shubhangi Keer is most worst
      But Swanandi is the best.❤

    • @mahendragovekar1163
      @mahendragovekar1163 2 місяці тому +1

      I have stopped watching shubhangi keer...Swanandi is best

  • @vijaypatil4559
    @vijaypatil4559 2 місяці тому

    स्वानंदी तू खूपच गोड व साधी सरळ आणि कष्टाळू मुलगी आहेस. छान कोकणी घर,चित्रमय निसर्ग,सुंदर नेटकी परसबाग सगळं छान जस तू म्हणालीस की एखाद्या चित्रा त किंवा कवितेतील वर्णन असता तसच तुझा पूर्ण घर परिसर आणि कोकणातील जीवन आहे. तुमचे प्रत्येक vlog मी अगदी मनापासुन पाहते, वाट बघत असते आतुरतेने नव्या vlogची.

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 місяці тому +21

    स्वानंदी ताई खरच किती छान जीवन जगत आहेस तु....असं घर आणि हे जीवन आम्ही फक्त गोष्टीच्या पुस्तकात आणि पहीली ते चौथीच्या मराठी च्या पुस्तकात अनुभवलंय...आधुनिक जिवनातील सगळी सुखं एकीकडे आणि तु जे life जगतेस ते एकीकडे....👏खुप सुंदर....कुणालाही हेवा वाटेल असं जगतेस ....😊❤👏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 днів тому +1

    आवड असली की सर्व मनोकामना पूर्ण होतात तु छान छान सर्व कामे करत आहेस

  • @hetalpatel1858
    @hetalpatel1858 3 місяці тому +58

    कोकण को हमेशा जीवित रखना कोकण को देखने से जो एक सुकून मिलता है वह कहीं नहीं मिलता है और हर एक कोकण वासी को मेरी बिनती है कि कौन-कौन को बचाएं रखना उसे कभी भी शहरी विकास की तरफ मत लेकर जाना कोकण की जिम्मेदारी अब तुम्हारी है आने वाली हर पीढ़ी की है । हमारा तो पहले गांव था अब सिटी हो गया बचपन में जब हम पूरे जंगल में घूमते थे तो किसी का डर नहीं था रहता था लेकिन जब से यह गांव शहर बन गया तब अब गांव से बाहर निकालने का भी एक डर लगता है । हमारे पास थोड़ी जमीन बची है उसमें मैं हर तरह के पेड़ ,फूल, फल , और थोड़ा सा अनाज हल्दी मैंने एक ही पैड मे तीन तरह के आम लगाया है । अभी भी यह जारी है । मुझे कुदरत से बोहोत लगाव है ।
    थैंक यू कोंकण 🌹🙏

  • @anuradhaaudi8023
    @anuradhaaudi8023 Місяць тому

    खूप छान.मन प्रसन्न झाले.खरच तू नशीबवान आहेस.

  • @dhananjayralegankar3220
    @dhananjayralegankar3220 3 місяці тому +24

    तुझे प्राक्तन थोर, म्हणुन तुला ह्या सुन्दर घरात व सुन्दर परिसरात राहिला मिळतय.
    खूप खूप शुभेच्छा!
    श्री. स्वामी समर्थ!
    श्री. स्वामी महाराज तुझे कल्याण करो,
    ही त्यांच्या चरणी प्रार्थना.

  • @swami1111
    @swami1111 3 місяці тому +4

    समाधान समाधान आणि निव्वळ समाधान वाटते तुझे व्हिडिओ पाहून स्वानंदी. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे ही कविता अठवते. खूप छान व्हिडिओ 🤗🤗☘️🪴🌴🌳🌲🌼🌻🌸💮🌿🌱🌾🏞️

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 3 місяці тому +33

    अतिशय सुरेख चित्रीकरण.छान कोकणी घर,चित्रमय निसर्ग,सुंदर नेटकी परसबाग सगळं छान.एखाद्या सुरेख ललित लेखाचे वाचन केल्याचा अनुभव..अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.

    • @vardaparanjpe5622
      @vardaparanjpe5622 3 місяці тому

      मस्तच तुझे vlogs खूपच सुंदर असतात माझं सासर माहेर दोन्ही कोकणातली त्या मुळे तुझे विडीओ खूप जवळचे वाटतात अशीच विडीओ करत रहा गाणं चालू ठेव कारण गाता गळा आणि शिंपता मळा ठेवला तर तो फुलत रहातो

    • @vilaskhaire3617
      @vilaskhaire3617 3 місяці тому +1

      अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल सजलेल स्वप्नातील घर आणि आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर खूपच सुंदर धन्यवाद

  • @kalpanapadwal9354
    @kalpanapadwal9354 3 місяці тому +7

    अप्रतिम
    शब्दात नाही व्यक्त करू शकत
    असेच निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद घ्या. शुभंम भवतु.

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 3 місяці тому +19

    हिरवाकंच, सुस्नात झालेला परीसर
    निवांत, आश्वासक, देखणं वातावरण.....
    माणूस, प्राणी सर्वांच्या आयुष्यात शांतता घेऊन येतं..
    याचं लोभसवाणं दर्शन या vlog मधून होतंय.
    🤗🤗
    पर्जन्य संगीत आता शांत होत जाणार,याची हुरहुर वाटतेय.
    पण त्याची जागा पक्ष्यांचं कूजन घेईल, याची ग्वाहीही मिळतेय.
    😊😊

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 місяці тому +4

    आतापर्यंत पाहिलेले तुझे सगळे व्हिडीओज आवडले होते पण आजचा व्हिडीओ मला खूप जास्त आवडला ❤❤
    खूप नशीबवान आहेस तु स्वानंदी तुला रोज इतके सुंदर आणि शांत निसर्गरम्य आयुष्य जगायला मिळते ❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 місяці тому +9

    स्वानंदी स्वर्गाहुन सुंदर आपलं कोंकण..... किती किती रमणीय, मनमोहक, आल्हाददायी वातावरण......... जगण्याची मजा उर्जा कोकणातच ❤

  • @sayalikulkarni4618
    @sayalikulkarni4618 3 місяці тому +1

    Tu khup nashibvan ahes karan tu kokanat etkya sunder thikani rahates pratek gosht jagtes tithli tuze vlog pahnarya pratekachya swapnatal ayushya tu jagti ahes Ani amhala pn Anand det ahes khup chan Kam krtes tu ganpati bappa tuz khup chan Karo Ashi me tyala vinanti krte ashich amhala khup chan chan videos dakhv thanku so much swanandi

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 3 місяці тому +15

    सुंदर, सुरेख, शांत, प्रसन्न, आल्हाददायक...

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 28 днів тому

    Khupch sunder ghar,parisar,bagh,kharech tu khup hushar v bhagyawan ahes swanandi,god bless you

  • @User1976valid
    @User1976valid 3 місяці тому +4

    Nice .. sagale boltat kokan khup Chan .. pan festival zhale ki most young generation back to Mumbai … people like you real saver for kokan .. very nice initiative 👍

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 24 дні тому

    माणूस तंत्रज्ञानाने कितीही प्रगत झाला तरी त्याला अशा निसर्गाशिवाय पर्याय नाही...त्याला शेवटी निसर्गाच्या पायाशीच यावं लागेल... उत्तम ब्लॉग आहे तुझा पाहून खूप प्रसन्न वाटलं...

  • @vaijayantikelkar3969
    @vaijayantikelkar3969 3 місяці тому +4

    स्वानंदी, खरचं तू खूप भाग्यवान आहेस. अशा वातावरणात तुला रहायला मिळतय. खूप छान आहे परीसर. बघून प्रसन्न वाटते.

  • @vlogs643
    @vlogs643 Місяць тому +1

    Khup Chhan vatla tu pan khup mast lai bhari.keep it up wel done.

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 3 місяці тому +4

    खरंच तुझा हेवा वाटतो अशा वातावरण आणि संस्कारात वाढलीस आणि राहतेस फारच सुंदर निसर्गरम्य परिसर आहे स्वानंदी तुझा जबरदस्त 👌🏼👌🏼

  • @smitawalvekar9842
    @smitawalvekar9842 3 місяці тому +2

    खरच किती सुंदर समृद्ध जीवन तू जगतेय swanandi. माझ्या करता तर हे सर्व स्वप्नवत आहे.❤😊

  • @vishalpawar6818
    @vishalpawar6818 3 місяці тому +78

    वर्षाराणीचा आशीर्वाद लाभलेल्या हिरव्यागार कोकणात तू राजकन्येसारखी बागडतेस. ❤

    • @SAM-bu5su
      @SAM-bu5su 3 місяці тому +4

      Wahh surekh lihilay tumhi

    • @vishalpawar6818
      @vishalpawar6818 3 місяці тому

      @@SAM-bu5su धन्यवाद

  • @pune1654
    @pune1654 2 місяці тому

    किती भारी आहे तुझे आयुष्य.मस्त निसर्गाच्या सानिध्यात जगतेस .तू खूप भाग्यवान आहेस

  • @shilpakalghatgi743
    @shilpakalghatgi743 3 місяці тому +4

    अप्रतिम च शब्द नाही नेहमी प्रमाणे स्वानंदी गोड आणि निसर्गसाठी अस जीवन जगणे खूपच सुंदर

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 3 місяці тому +1

    स्वानंदी, मी तुझे सुरुवातीपासूनचे सगळेच विडीयो बघीतले आहेत. तू लाजा तालुक्यातील तर मी राजापूर येथील असून आपल्या कोकणातील सृष्टीसौंदर्य तू या माध्यमातून ईतर लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली आहेस. तुझी विविध प्रकारातील गाणी(लोकगीत, भावगीत,शास्त्रीय गायन आणि चित्रकला) या सर्वात तू पारंगत असून शुध्द मराठी भाषेवर असामान्य प्रभुत्व आहे. मी कोकणातील माझ गत आयुष्य तुझ्या विडीयोच्या माध्यमातून पुनः अनुभवतोय. तुला खूप खूप शुभेच्छा!

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 3 місяці тому +4

    अशा निसर्गरम्य वातावरणात राहतेस आणि आम्हालाही सुदंर दर्शन घडवतेस तुझ्या मंजुळ सुमधुर आवाजाला तो निसर्गही सुंदर दाद देतोय असं वाटतं, तुझं प्राणीमात्रावरच प्रेम त्यामुळे तुमच्यात एक भावनिक जवळीक निर्माण झालीय. सारंच अप्रतिम शब्दांच्या पलीकडच👌🏻👌🏻❤️❤️

  • @harshatamhankar16
    @harshatamhankar16 3 місяці тому +1

    खूप छान वाटल तुझा vlog पाहून. किती नैसर्गिक आणि सगळे प्राणी, पक्षी, फुले, फळे. मस्तच ग स्वानंदी😊

  • @ManishaNene
    @ManishaNene 3 місяці тому +4

    तुझ्याकडे कलागुण खूप छान आहेत आणि तू त्या निसर्गात रमतेच ते बघून खूप आनंद होतो

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 3 місяці тому +1

    खूपच सुंदर volg आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम स्वानंदी तू भाग्यवान आहेस हे स्वर्गसुख असच जप

  • @vandanalimaye4679
    @vandanalimaye4679 3 місяці тому +3

    स्वानंदी, तुझ्यासोबत हा कोकणातला नितांतसुंदर निसर्ग असा अनुभवणं अतिशय आनंददायी आहे.सोबत तुझं गाणं असतं तर मजाच आली असती.घर-परिसर सुंदरच!!!......

  • @manasivaishampayan4301
    @manasivaishampayan4301 2 місяці тому

    स्वानंदी तू खूपच गोड व साधी सरळ आणि कष्टाळू मुलगी आहेस. प्रत्येक आईला तुझ्यासारखी मुलगी हवी. तुझं निसर्ग प्रेम प्रामाणिकपणा सुरेल गायन आणि कलावंताचा हात साऱ्याच गोष्टी मनाला भावणाऱ्या

  • @Thenostalgicmaharastrian
    @Thenostalgicmaharastrian 3 місяці тому +4

    खरंच अगदी चित्रसारख आयुष्य जगतेस तू ...हेवा वाटतो तुझा ...एवढा छान परिसर आणि आयुष्य आहे तुझ तुझ्यासाठी normal असणार आयुष्य आमच्यासाठी किती special आहे शब्दात नाही सांगू शकत ....कारण तुझ आयुष्य जगणं स्वप्नवत आहे आमच्या सारख्यांसाठी...खूप छान छान video काढ तुझी you tube फॅमिली खूप मोठी होऊ देत ....आणि आम्हला असेच छान छान video पाहायला मिळू देत ...खूप आभार मनावेसे वाटतात की तू तुझ you tube chanel सुरू केलस...स्वाठला lucky समजते की हा परिसर आपली जन्मभूमी नसल म्हणून काय झालं तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून जागून घेतेय तेवढं🥺खूप खूप प्रेम तुला❤

  • @AnantJagdhane
    @AnantJagdhane 2 місяці тому +2

    निस्वार्थ भावनेने जे काही निसर्गाने आपल्याला भरभरुन दिले आहे त्याचे आपण जतन संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे

  • @hemantnirgun453
    @hemantnirgun453 3 місяці тому +4

    फारच छान...तू खूप भाग्यवान आहेस. तुला अश्या निसर्गाच्या सान्निद्यात रहायला मिळतय.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 3 місяці тому +2

    अप्रतिम. तुम्ही सर्वच खुपच भाग्यवान आहात. ईश्वराच्या सान्निध्यात राहून पावन झालात.धन्यवाद. जय गजानन.

  • @NarendraNaik-g8w
    @NarendraNaik-g8w 3 місяці тому +3

    मी रोज सकाळी लवकर काम आटपून पहिला तुझा vlog बघते. मन अगदी प्रसन्न होऊन जात. ❤

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 місяці тому +2

    लाईफ एन्जॉय करायचं असेल तर असं वातावरण हवं. निसर्ग सहवास, शुद्ध हवा, आणि पशु पक्षी . किती सुंदर हवामान! स्वानंदी बेटा रियली व्हेरी नाईस व्लाॅग.

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 3 місяці тому +3

    स्वानंदी खूप सुंदर परिसर हिरवागार परिसर आहे आणि तुझ अदबशीर बोलण मनाला आनंद देत

  • @shilpabapat9123
    @shilpabapat9123 8 днів тому

    स्वानंदीच कोकणातील घर ,आमराई, आणि परिसरातील फुलबाग, गोठ्यातील गायींशी बोलण संवाद ऐकून छान वाटल.

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 3 місяці тому +3

    कोकणातील निसर्गरम्य परिसरात सर्व प्रकारच्या भाज्या, फुले याची लागवड केली आहेस. फारच छान वाटले.

  • @remediosfernandes5405
    @remediosfernandes5405 Місяць тому

    Nice, beautiful! I like your vlogs of nature.

  • @hetalpatel1858
    @hetalpatel1858 3 місяці тому +17

    स्वानंदी मतलब जो हमेशा नंदी के साथ और आनंद में रहने वाली
    भगवान की कृपा बनी रहे आप पर 🌹🙏

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 3 місяці тому

      Swanandi...cha arth nandi ke sath asa nahi hot......swatah ananadi.... khush asnari....jashi ti kharech aahe❤❤

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 2 місяці тому

    Khupach chhan....... Great ani kup sunder.....

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 3 місяці тому +6

    फार सुंदर घर आहे, ज्या घरात थोरा मोठ्यानं आदर दिला जातो, पशू पक्ष्यांना प्रेम केल जात, झाडांना निर्गचा संगोपन केला जातो, कला , सौंकर, संस्कृती,आधारभाव, प्रेमभाव, रियाज करत असलेली एक सुकन्या ज्या घरात असते ते अति सुंदर असते वन्य प्राणी लाही प्रेम करते थी स्वानंदी आणि जो पाऊस पडत होतो तो देवाचा आशीर्वाद होता नेहमी खुश रहा मुलगी शिकली आणि स्वानंदी झाली देश प्रगत होणारच, तुझ खूप आभार.

    • @UjwalaSAWANT-u4j
      @UjwalaSAWANT-u4j 16 днів тому

      आवडल तुमच घर आणि परीसर .आमचे पण कोकणात घर आहे. जास्त रहायला जमत नाही. गणपती आणि होळीला जातो.

  • @ajitpatil3770
    @ajitpatil3770 2 місяці тому

    Your vlogs creating mind blowing happiness in life. 90% same I had enjoyed in our childhood at Tarapur native place.

  • @shriprasaddate4929
    @shriprasaddate4929 3 місяці тому +14

    कुंड्यात झाडं लावून निसर्गात राहण्याचा आभास निर्माण करणार्‍या माझ्यासारख्या शहरी लोकांना ही तर मेजवानीच होती.

  • @ChxhdDbxhdj
    @ChxhdDbxhdj 2 місяці тому

    Aik na...... Khup Sundar aani manmokla sanwad. Bisargashi suddhaa.

  • @SatyaajitAWagh-n7t
    @SatyaajitAWagh-n7t 3 місяці тому +4

    स्वानंदी, तुम्ही जे आयुष्य जगताय तश्या आयुष्याचं मी नेहमीच स्वप्न बघत असतो. माझं स्वप्न आहे, कोकणात समुद्र किनाऱ्याजवळ, भातशेतीने, नारळी-पोफळी, सुपारीच्या बागांनी वेढलेले, गर्द वनझाडीत लपलेले एक सुंदर कौलारू घर असावे. कोकणात शेती करून तिथेच आयुष्यभर रहावे. काही महिन्यापूर्वी तुमचा एक vlog बघायला मिळाल्यानंतर मी तुमचे सगळेच vlogs आवर्जून बघत असतो. You are literally living life of my dreams. तुम्ही कोकणवासीय खरंच खूप भाग्यवान आहात.

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 3 місяці тому

      सर मी सर्व ब्लॉग अवर्जून पाहत आस्थो. तुम्हा सर्वांची कॉमेंट वाचणे खूप आनंद देथो..विशेष करून तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अगदी माझा मनातील आहे.समाधान हेकी मला जे नेहमी वाटत आहे तीच प्रतिक्रिया तुम्ही दीलिथ..खूप. मनातून संतोष वाटला. आभारी आहे स्वानंदी चे आपण...खूप मस्त वाटले सर....🙏🙏🙏

    • @anmolshedge7565
      @anmolshedge7565 3 місяці тому

      स्वानंदी तुझा video बघितला की संपूर्ण दिवस कसा स्वानंदीमय होऊन जातो. मनाने मी तुझ्या सोबतच असते. मी पण कोकणातच राहते. माझं बालपण निसर्गात गेलं. माझ्या सारखी एक निसर्ग वेडी, हळवी मुलगी आहे. तुझ्यात मी मलाच बघते. तुझ्या गाण्यात, तुझ्या चित्रात मी हरवून जाते. हेच स्वर्गसुख अजून काय पाहिजे. तुझा हा निरागस पणा कधीच सोडू नकोस. अगदी अशीच रहा कायम. तुला भेटायची खूप इच्छा आहे. 🥰🙌

  • @sunilchitale2764
    @sunilchitale2764 Місяць тому

    सुंदर. मन प्रसन्न होते. तुमचं बोलणं ही फार रसाळ आणि सांगितीक आहे.

  • @meenaaware9304
    @meenaaware9304 3 місяці тому +6

    खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य मी, नेहमी, पाहते तुझे ब्लॉग, खूपच, छान आसतात

  • @asmitabhandare4353
    @asmitabhandare4353 3 місяці тому +1

    किती छान... निसर्गाच्या सानिध्यात...खूप मोकळं ,निरोगी आनंदी ....कष्ट असले तरी त्याचं फळ फार सुरेख आहे....रोज काही तरी नवे असणार. मस्त...❤

  • @madhukarsupekar3701
    @madhukarsupekar3701 3 місяці тому +3

    आनंदाचे डोही आनंद तरंग ❤ सुख म्हणजे आणखी काय असते याची अनुभूती व पुनर्प्रत्यय

  • @manjirigore4169
    @manjirigore4169 3 місяці тому +1

    खूप छान स्वानंदी. खरं छान आयुष्य जगत आहेस अशीच राहा.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 місяці тому +5

    खूप सुंदर व्हिडीओ. मला माझ्या म्हातारपणी असं शांत, निसर्गाच्या जवळ जाणारं आयुष्य, आनंदाने जगायला आवडेल.

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 3 місяці тому +1

    स्वांनंदी तुम्ही कोकणातल्या फार थोड्या लोकांपैकी एक आहात जे एव्हढ्या सुंदर रम्य ठिकाणी नशिबान राहतात आणि आमच सगळ व्यवस्थित आनंदान चालू आहे असे सांगतात .ह्या साठी तुम्हाला प्रणाम🙏 आणि तुला सदैव आशिर्वाद🙌

  • @rajeevkulkarni2167
    @rajeevkulkarni2167 3 місяці тому +4

    खूप छान! प्रसन्न वातावरण..

  • @sunitavelhankar1071
    @sunitavelhankar1071 3 місяці тому

    किती सुंदर आहे हे सर्व वातावरण, फुलं, कमळाच्या तळ्याकाठी रियाजाला बसणं ही कल्पनाच किती काव्यात्मक आहे
    अशीच लिहित रहा ❤

  • @anjalikhanapure7592
    @anjalikhanapure7592 3 місяці тому +5

    स्वानंदी स्वानंदी.... तुझा प्रत्येक ब्लॉग म्हणजे एक दिवा स्वप्नच आहे माझ्यासाठी... बोलो गं घरी कधीतरी

  • @octopus1860
    @octopus1860 3 місяці тому +1

    घराचा vlog खूप सुंदर झालाय. तुझे ब्लॉगमध्ये सहजपणे वावरण्याचे मला कौतुक वाटते. घरही साक्षात निसर्गाच्या कुशीत आहे. एकदम मस्त. असाच vlog सुरू ठेव.

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 3 місяці тому +3

    खऱ्या अर्थाने एक निसर्गरम्य जीवन जगतेय स्वानंदी तू अशीच नेहमी आनंदात रहा आणि आम्हालाही निसर्गाचे नवनवीन रूप पाहायला मिळोत अशी इच्छा❤❤❤😍🥰

  • @SGKulkarni
    @SGKulkarni Місяць тому

    खुप छान वर्णन करायची शैली आहे ताई.आपल्या पुर्वजांबद्दल कृतज्ञता,उगाच कुठेही पाल्हाळ नाही,सर्वांबद्दल मनस्वी प्रेम खराेखर तुला ईश्वरी वरदहस्त आहे.खुप आशीर्वाद

  • @sudeepdongre
    @sudeepdongre 3 місяці тому +4

    अप्रतीम ! पृथ्विवरील देवभुमी म्हणजे कोंकण मि ही त्या देव भुमीत रहातो, पण त्याला आता बर्या पैकी सीमेंटची लागण झाली आहे. (कर्जत/रायगड). तरीही आम्ही बरीच फुल व फळ झाडे घरा भोवती लावली आहेत. पण खरे नशीबवान तुम्हीच, कारण तुम्हाला प्रत्यक्षपणे स्वर्गात रहाण्याचे भाग्य लाभले आहे. असेच निसर्गावर प्रेम करत रहा आणी दुसर्यानाही शिकवा. धन्यवाद !

  • @sakshisurve641
    @sakshisurve641 3 місяці тому +1

    खूप छान आहे तुझे घर आणि घराभोवती चा परिसर
    मला माझे माहेर आठवते
    तुझे सगळे vlog मी पाहते
    तुला खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्य भर अशीच हसत राहा तुला खूप खूप आशीर्वाद

  • @shilpa455
    @shilpa455 3 місяці тому +13

    पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणतात तो हाच असावा आणि आमची स्वानंदी देवी स्वरूप 🙏🙏

  • @mimarathi9836
    @mimarathi9836 2 місяці тому

    Swanadi तुझे आभार मानावें तितके कमीच खरंच तु कीती छान आयुष्य जगतेस, निसर्गाच्या सानिध्यात राहणे, आपल्या कोकण ची जीवन शैली स्वीकारणं आणि त्यांचं मनमुराद आनंद घेणं....तु एखादा होम स्टे का नाही सुरू करत , आम्हांला तुमच्या सोबत कोकणातील माणसाच्या आयुष्यात असलेली दैनंदिन जीवनातील धड्पड कुतूहलानं पहायला मिळेल आणि स्वालंबन राहुन स्वतःचं आयुष्य कसं व किती छान जगावं हें खरंच तुझ्याकडून शिकाव लागेल......

  • @maulidk9595
    @maulidk9595 3 місяці тому +4

    स्वानंदी म्हणजे स्वतः आनंदी राहण्यासाठी इतरांना आनंद देणे.... आजच्या काळात तुमच्या सारखी मुलगी भेटन दुर्मिळच म्हणता येईल... तुझा व्हिडिओ पाहिला तर निखळ निःस्वार्थ प्रेम वाटत कोकण आणि तुझ्या वागण्या बोलण्याबद्दल... निसर्ग आणि कोकण पाहायचा असेल तर तुझा व्हिडिओ पाहिलं तरी खूप काही भेटून जाईल..!

  • @prathameshbhagwat6362
    @prathameshbhagwat6362 6 днів тому

    Khup Chan…. Mala Awadla Vlog 😊👌🏻👌🏻👌🏻

  • @subhashkulkarni9196
    @subhashkulkarni9196 3 місяці тому +4

    हेवा वाटतो हे सगळ पाहून ...!! खरंच नशिबवान आहेस, अशा निसर्गा सानिध्यात राहते आहेस..❤

  • @BushanJoshi
    @BushanJoshi 3 місяці тому +1

    जबरदस्त खूपच सुंदर घर परिसर गुर या सर्वांचा तू एक आत्मा त्यामुळे सर्वच व्हिडिओ कायमच बघायलाआवडतील ❤❤ तुला कायमच सदिच्छा. मंगलमूर्ती मोरया

  • @OnkarBhasar
    @OnkarBhasar 3 місяці тому +15

    ऐका ना व्हिडिओ खूप छान होता

  • @chhayakatkar9599
    @chhayakatkar9599 3 місяці тому +1

    स्वानंदी घर आणि परिसर अगदी स्वप्नात पाहतो किंवा एखाद्या कादंबरीतील असावे असेच आहे आणि तू ते व्यक्त ही खूपच छान करतेस,मला तुझी भाषा शैली आणि तू पण खूप आवडतेस.

  • @shivanikadam7999
    @shivanikadam7999 3 місяці тому +5

    १.ranmanus
    २.swanadani sardesai
    ३. Red soil
    ४.krushnai gazne
    Osm all channel

  • @life-is-energy482
    @life-is-energy482 3 місяці тому +2

    खरचं यार...आयुष्य असावं तर अस...सहज साधं , निसर्गाच्या कुशीत ल...लहान पणीपासून डोळ्यासमोर रंगवलेले चित्र ..आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं❤😊😊

  • @adesh651
    @adesh651 3 місяці тому +4

    खरी लाइफ तर तू जगत आहे ताई ❤. आमच आयुष्य तर शहरातील धावपळीत चाल 😂

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 Місяць тому

    सुंदर परिसर आहे सगळा पक्षी, प्राणी झाडं,फुलं खूप छान वाटलं पाहून

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 3 місяці тому +11

    तु पुण्यात कुठे राहते.गावी कधी येते तुझे व्हिडिओ खूपच छान असतात स्वानंदी

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 2 місяці тому

    Excellent work madam. New generation People leaving in urban places can never feel experience of it. Devbhumi lovely konkan your heartfelt efforts. Inspiring mission

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow 3 місяці тому +5

    कोकणात नक्की कुठे ते तर सांगितलच नाहीत.

  • @ushaparulekar375
    @ushaparulekar375 Місяць тому

    खूप आदर्श जीवन जगत आहेस.तुला खूप खूप आशीर्वाद.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 місяці тому +1

    Apratim Ghar Parisar
    Sunder Durshan Kelly
    Ati Uttam Blog

  • @pramodsurlikar5938
    @pramodsurlikar5938 2 місяці тому

    मस्त आहे. स्वानंदी अशीच निसर्गाची सेवा करत रहा. मला तुमच्याकडे येऊन निसर्गाची मजा घ्यायला आवडेल. तू आता फार्म टुरीजम सुरू कर. भरपूर लोक येतील. All the best 💯

  • @pratikshajadhav7166
    @pratikshajadhav7166 Місяць тому

    स्वानंदी तू खूप भारी आहेस मला तू खूप खूप आवडते एकदम लाघवी आहेस आणि सगळ्यांना जीव लावतेस माहिती तर एवढी मस्त देते सगळ्यांचच तूला खूप कौतूक तूझ्या आवाज खूप गोड आहे कधीही थकलेली किंवा कंटाळलेली दिसत नाही तूला खूप आशिर्वाद ❤❤❤

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 3 місяці тому +2

    घर, परिसर, आमराई, गोठा, सर्वच काही तुझ्यासारख सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @abhaykulkarni9143
    @abhaykulkarni9143 3 місяці тому +1

    खूप छान 👌आजच्या एवढ्या materialistic जगात तुझे प्रयत्न नक्कीच स्तुत्य. हेच जीवन आहे. कोकणात राहण्याचा आनंद काही सा वेगळाच पण खूप सुंदर. तुला खूप शुभेच्छा

  • @abhaydatar4053
    @abhaydatar4053 3 місяці тому +2

    तू अगदी बरोब्बर बोललीस स्वानंदी. एकजण आंब्याचं झाड लावतो आणि फळे पुढची पिढी खाते. आता तू आणि तुझ्या बाबांनीही पुढच्या पिढीसाठी आंबा लावलाय. तू यात वर्णन केलेलं जुनं घर तुझ्या एका व्हिडीओ मध्ये पाहिल्याचं आठवतंय. तो साकवही आठवतोय. सगळं किती सुंदर आणि शांत आहे. तुझे छंदही किती वेगवेगळे आणि सुंदर आहेत. आजोबांनी बांधलेलं हे नवीन घरही खूप खूप आवडलं.

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 місяці тому +1

    अतिशय सुरेख व्हिडीओ
    मी मागे पण एखादा म्हणालो होतो स्वानंदी,बाळा किती भाग्यवान आहेस की अशा सुंदर वातावरणात रहाण्याचे भाग्य तुला लाभले
    खुप छान घर,परीसर
    माझं किती जुन स्वप्न आहे की अस घर आणि तेही कोकणात असाव.पण........

  • @vilaspalande933
    @vilaspalande933 3 місяці тому +1

    कल्परुक्षा कोकण कन्या साठी,आजोबा
    लाऊन गेले.पोरी फार सुंदर छान ब्लॉक.