कौलारू घरांच्या सावलीत | Kokan Documentary | Konkan Places | Explore Unseen Kokan|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 446

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 Рік тому +113

    ही नैसर्गिक संपत्ती आशीच जपून ठेवली पाहिजे तरूणांनी.जमीन विकु नका कही दिवसांनी कोकण.तुम्हाला खुप काही देईल बाहेरच्या लोकांना विकु नका नाहीतर आपल आस्थितव गमावून बसू जस आमचे पुणे

    • @PS-1234
      @PS-1234 Рік тому

      Kokancha kautuk ahe chan ahe! Nakkich te kautukaspad nisarg sampati ahe! Pan mhanun apalya Pune la naav thevu naka, ithe apalyala rojgar ahet Kokanacji tarunai ithe nokari sathi shikshanasathi yete karan apan apalya naisargic sampaticha tyag kela ahe ani development keli ahe! Donhi apalya thikani chan ahet! Kokan madhye javun tumhi lakho salary che job nahi karu shakat! Ha farak pan janun ghya hi vinanti!

    • @स्वर्गप्रेमीशिवभक्तकौस्तुभ
      @स्वर्गप्रेमीशिवभक्तकौस्तुभ Рік тому +2

      Bhau ekdam barobar bolat tumhe ❤

    • @ajaykarale6856
      @ajaykarale6856 6 місяців тому +1

      Om sai ram 😊❤

    • @chettankamat7849
      @chettankamat7849 3 місяці тому

      Bhau, aapla whatsapp no shsre kara

  • @sachinsurve5544
    @sachinsurve5544 5 місяців тому +14

    नोकरीच्या निमित्ताने 9 वर्षे रत्नागिरीत काढली... खरंच निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय.. ज्यांचा जन्म कोकणात झाला ते खरंच खुप नशीबवान लोक आहेत... माझी रत्नागिरीतून सांगलीला बदली झाली.. पण कोकणातल्या अनेक आठवणींचा ठेवा माझ्या मनात आयुष्यभर राहील... Miss u रत्नागिरी. Love u रत्नागिरी ❤️❤️

  • @prakashshelatkar4276
    @prakashshelatkar4276 Рік тому +103

    आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा हीच सर्व कोकणी बांधवांना हाथ जोडून नम्र विनंती

    • @savitasawant1382
      @savitasawant1382 Рік тому +9

      बाहेरच्या राज्यातील लोकांना शिरकाव करू देऊ नका.🙏ते आले की कोकण पण गिळंकृत करतील.ही विनंती

    • @jitendrakadam191
      @jitendrakadam191 Рік тому +1

      आपले ही सहकार्य मोलाचे असावे.

    • @amazing.427
      @amazing.427 Рік тому

      Dusaryana sangnyapeksha aapn swatanepn prayatn kele pahijet kahitri

    • @Sushantmohite50
      @Sushantmohite50 Рік тому

      Ani tumhi Mumbai la basa😂

  • @sharadpatil2449
    @sharadpatil2449 Рік тому +22

    सुंदर कोकण असाच असुदे. त्याला कोणाची नजर न लागो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नकोय तो मन भकास करणारा विकास. 🙏

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 Рік тому +16

    घर जिवंतच आहेत पण ती माणसं ही जिवंत आहेत.जी बाय मगाशी रडली तिने आमच्या ही डोळ्यात पाणी काढले.

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 Рік тому +64

    कौलारू घरांच्या सावलीत, व्यक्त केलेल्या भावना काळजाला भिडल्या.आठवणींच्या हिंदोळ्यावर मन थोडावेळ तरी रमल.
    धन्यवाद. 🙏

  • @interestingworld03
    @interestingworld03 Рік тому +9

    कोकणातल्या जमिनी कशाप्रकारे विकल्या जात आहेत.
    साधारण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी डोंबिवली पूर्व वरून डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी ola cab बुक केली,
    माझी नेहमीची सवय आहे, मी नेहमी cab मध्ये ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर बसतो, म्हणजे ड्रायव्हर सोबत संवाद साधता येतो, असेच नेहमीप्रमाणे ड्राइव्हरच्या बाजूला बसल्यावर
    त्याचाशी सवांद सुरु केला.
    तो हिंदी बोलत असल्यामुळे हा परप्रांतीय आहे हे पहिलेच कळले, तरीपण त्याला मुद्दाम त्याचे नाव आणि तो मूळचा कुठला हे विचारले, तर त्याने त्याचे नाव अखिलेश सिंग आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेश चा आहे असे हिंदीत सांगितले, नंतर त्याने मला विचारले की " आप किधर से हो ", तर मी त्याला सांगितले मी कुडाळचा आहे, असे सांगताना मी मनात विचार केला की ह्या भय्या ला काय माहित असणार की कुडाळ नक्की कुठे आहे, तेवढ्यात तो पटकनं बोलला की " हा कुडाळ मुझे मालूम है, मे कणकवलीमेभी काम करता हू ", हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कणकवली हे नाव मराठी नं येणाऱ्या लोकांना इतक्या स्पष्टपणे उच्चारता येत नाही पण हा आपल्या कोकणातल्या गावांची नाव इतकी स्पष्टपणे कसा उच्चारत आहे, मग त्याला विचारले तिकडे काम करतोस म्हणजे तिकडची भाडी मारतोस का, त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी अवाकं झालो, तो म्हणाला " हम उधर जमीन बेचणे का धंदा करता है ", मी त्याला विचाराल तू इथे कॅब चालवतोस आणि तिकडे जमिनी कश्या विकतोस, त्यावर तो म्हणाला
    " हमारा उधर सेटिंग है, हम इधर जमीन केलीये ग्राहक धुंडता है, फिर उसको कणकवली लॉज पे लेके जाता है, फिर उधर का हमारा आदमी जमीनके मालिक को लॉज पे लेके आता है और फिर उसको जमीन दिखाते है और उधर ही लॉज पे डील हो जाता है ", हे ऐकून असे वाटले की तिकडे ही यांचे एजन्ट आहेत की काय म्हणून त्याला मुद्दाम म्हणालो की मला पण कणकवलीत जमीन घ्यायची आहे असेल तर सांग, तसे लगेच त्याने कणकवलीत एका व्यक्ती ला फोन लावून मला दिला, समोरून बोलणारी व्यक्ती चक्क एक मराठी कोकणी व्यक्ती होती आणि त्याने मला वेगवेगळ्या जमिनी सांगितल्या.
    सांगायचे तात्पर्य हे की हे एक मोठं रॅकेट आहे आपलीच कोकणी लोक ह्या भय्या लोकांसोबत मिळून आपल्याच जमिनी परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत.
    त्यामुळे कोकणातील लोकांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्यातच 2 पैशासाठी जे एजन्ट झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करा.

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 Рік тому +15

    माझ्या आजोळ चे कोकणातले कौलारू घर असेच आहे...मोठया मामाने आणि मामेभावाने अजून ठेवलंय नीट घर...माझे आई बाबा पण खूप वर्ष तिकडे जाऊन राहतात...आमचं लहानपण मे महिन्याची सुट्टी या घराने समृद्ध केलीये!!अजूनही आमच्या मुलांना घेऊन 8...10 दिवस मऊ भात खायला,नमन बघायला,नदीवर डुंबायला,फणस ,आंबे ,करवंद ,जांभूळ खायला जातो आणि जात राहू!!😊👌खूप छान डॉक्युमेंटरी!!

    • @aniketdigole22gmail
      @aniketdigole22gmail Рік тому

      मला सरकरी job लागला की mi pn कोकणात शिफ्ट होणार 💯 🙂

  • @amolpatil13
    @amolpatil13 Рік тому +25

    प्रसाद आणि त्याच्या टीम चे मनापासून आभार.... तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपल्या पुढच्या पिढीला आपला वारसा , संस्कृती समजणार आहे..कदाचित तुम्हा लोकांच्या प्रयत्नामुळे त्यांना museum कडे जायची वेळ येणार नाही. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad5302 Рік тому +36

    Great work! Hats off to all those involved in this work! आपली संस्कृती व हा अमूल्य ठेवा जीवभावाने जपा! तुम्हा सर्वास शुभेच्छा

    • @amazing.427
      @amazing.427 Рік тому +1

      Japa mhnje ....prtyekane japal pahije kokani manus dusryana ka sangtoy kahi samajatch nahi prtyek comments madhye samorchyala sangatyet japa are kay hya

  • @samatawade8904
    @samatawade8904 Рік тому +12

    आपल्या कोकणातील खर सोन ... खूपच छान... आपल्या कोकणात अजून कोकणचं खर अस्तित्व शिल्लक आहे हे पाहून खुप प्रसन्न वाटलं... Keep it up team. चित्रीकरण उत्कृष्ट... All the best

  • @drprashantshinde
    @drprashantshinde Рік тому +31

    कोकण देवभूमी, देवमाणसांची भुमी🙏🙏. भकास करणारा कोणताच विकास नको ,संवर्धन हवे. 💖 कोकणी असल्याचा स्वाभिमान आहे

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Рік тому +2

      Suvidha nirman karata karata
      Sagalach nast honar Aahe

  • @chetankumar8392
    @chetankumar8392 Рік тому +11

    अप्रतिम सादरीकरण आणि हृदयस्पर्शी कथाकथन👍👍♥️♥️♥️♥️
    सर्वच टीमला शुभेच्छा🌿🌿

  • @sagarnavale9055
    @sagarnavale9055 Рік тому +7

    अवघे कोंकण आपूलेच असावा....ही संस्कृति ही भूमि कोंकण वासियांचा प्राण आहे दादा आपन भावनीक केले आपल्या या चित्रफीतीने अत्यधिक भावनिक केले आभारी आहोत 🙏

  • @precioussana2358
    @precioussana2358 Рік тому +15

    I Respect Everyone Who Were Involved In This, Seriously The Best Piece That I Ever Seen On UA-cam, Hats OFF To YOU I LOVE YOUR VIDEO
    not only this vidio, shashank but all ur vidio are best

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 Рік тому +3

    आधी विदर्भात पण गोंदिया भंडारा जिल्यात काही तालुक्या मधे होते असे खूप घर पण आता राहिले नाही …

  • @vidhighogle4240
    @vidhighogle4240 Рік тому +5

    Great work shashank☺
    हा व्हिडिओ पाहून कधी एकदा गावी जातेय असं झालंय🥰

  • @shubhambodhe3476
    @shubhambodhe3476 Рік тому +12

    खूप सुंदर.
    अगदी खर आहे. कोकणची माणसं साधी भोळी..माणुसकीचा ओलावा आणि संस्कृतीची जोड आज जपणारे कोण असतील तर हेच कोकणी.
    येवा कोकण आपलच असा...🥹😊🙏🏻

  • @panditchaudhari4611
    @panditchaudhari4611 Рік тому +5

    खूप छान माहिती मिळाली कौलारू मातीच्या घराबद्दल!👌👌👍

  • @paragahire112
    @paragahire112 9 місяців тому +3

    खूप छान वाटलं हे पाहून. "कोकण म्हणजे फक्त निसर्ग सौंदर्य नाही तर एक जीवनशैली आहे" एवढंच पटवून द्यायचंय जगाला. पण त्या अगोदर आम्हा कोकणी लोकांना जाणून घ्यावलागेल, नक्की कुठे चुकतोय.

  • @neetasawant4844
    @neetasawant4844 Рік тому +1

    खूपच सुंदर!! ठाकर आदिवासी कला अंगण कुठे आहे. त्याला भेट देऊं शकतो का ? म्हणजेच तिथे स्टे होम करू शकतो का ? Pls reply

  • @rupashigwan8974
    @rupashigwan8974 Рік тому +3

    अवर्णनीय. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा विडीओ बघून.मन हेलावून टाकणारे क्षण .... खूपच सुंदर.

  • @kanchanchatterjee1203
    @kanchanchatterjee1203 Рік тому +4

    मणात आणी हृदयी मधे सुंदर छवी म्हणजे महाराष्ट्र 💖💖💖💖💖💖🔱🔱🔱🔱

  • @nareshkambale6028
    @nareshkambale6028 Рік тому +10

    ताई तुमचे अश्रू 😢सांगतात तुम्ही किती प्रेम करता गावातील जीवनावर

  • @jagdishmalvankar9160
    @jagdishmalvankar9160 Рік тому +3

    अप्रतिम, चित्रफित. अतिशय सुरेख आणि
    चित्रफितीतील सुंदर असे दृष्यानुरुप निवेदन.
    मंत्रमुग्ध होऊन चित्रफित पहात होतो आणि हे कोकणातील दैवी सौंदर्य पाहून आपणही या कोकणातील मातीचा भाग आहोत याने उर अभिमानाने भरून आला.

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 Рік тому +2

    अप्रतिम चित्रकरण, voice over आणि pure heart गावची माणसं आणि तिथला निसर्ग ✌✌❤❤👌👌🤘🤘

  • @vishalpalav2970
    @vishalpalav2970 Рік тому +7

    Sindhudurg and Malvani culture ❤️

  • @rakeshahire4580
    @rakeshahire4580 9 місяців тому +5

    🌏 जगात भारी आपल कोकण 🌏

  • @gaurikale1790
    @gaurikale1790 Рік тому +2

    अतिशय सुंदर माहिती संकलन, मांडणी आणि सादरीकरण. कोकण जपलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींना धरून राहील पाहिजे कारण ही संस्कृती, परंपरा कोकणाचा पाया आहे. संपूर्ण टीम ला अनेक शुभेच्छा 🥰🥰

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Рік тому +9

    अतिशय सुंदर सादरीकरण 👌👍

  • @dhanajipatekar4638
    @dhanajipatekar4638 8 місяців тому +2

    भावा तुझे प्रत्येकक्षात कोकणचाचे प्रेम ,माया ,आपुलकी ,जिव्हाळा नव्हे नव्हे जनु काही कोकणासाठी तुला घडविले आहे हे पाहुन खुप आनंद होतो.

  • @vinitdeshpande85
    @vinitdeshpande85 Рік тому +2

    अतिशय सुंदर सादरीकरण आहे. माहितीपटाचा प्रवाह देखील सहज आहे. कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.

  • @roshankhairnar629
    @roshankhairnar629 5 місяців тому +2

    कोकण हा निसर्गाने, परमेश्वराने दिलेला अनमोल ठेवा आहे, महाराष्ट्राला आणि मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. कोकणची संस्कृती अप्रतिम असून तिचा मराठी बांधवाने आदर राखला पाहिजे. आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा, हीच सर्व कोकणी बांधवांना हाथ जोडून नम्र विनंती

  • @SuperMahesh1982
    @SuperMahesh1982 Рік тому +5

    वा अप्रतिम छान लिहिलंय आणि शूट मस्त केलंय, खरंच गरज होती याची लोकं विसरत चलली आहेत जुनी घरं आणि परंपरा.
    शशांक ठाकूर आणि राजेश वराडकर यांचे विशेष कौतुक.

  • @vijaychavan6659
    @vijaychavan6659 Рік тому +2

    आपल्या मातीची ओढ आणि तिचा ओलावा काय असतो, ते या व्हिडिओतून प्रकर्षाने जाणवले. या कोकणातील मातीचं वैशिष्ठ्य असे आहे कि, आहे त्या नैसर्गिक संसाधनात येथील भूमीपुत्र सुखेनैव सूशेगात
    स्वर्गसुख जगत असतो. शहरी भौतिक आणि यांत्रिक सुखाची इथे वखवख नसते.

  • @omkarok100
    @omkarok100 Рік тому +4

    खूप सुंदर सादरीकरण i ❤ kokan..Jay Maharashtra 🚩

  • @mtrickstechnical6987
    @mtrickstechnical6987 Рік тому +5

    Awesome 👏👏👏❤️
    Best of luck to your team 🔥

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Рік тому +1

    फोटोग्राफी अजून चांगली होईल याची काळजी घ्यावी 🤗🤗🤗🤗🤗

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 Рік тому +2

    खुपच सुंदर. आमचे गांव सुध्दा खुप सुंदर आहे. रेडी कनयाळ. रेडीचा गणपती खुप प्रसिद्ध झाला आहे. तसेच तेरेखोलचा किल्ला सुध्दा. जुने दिवस आठवले की खरचं खुप छान वाटत. धन्यवाद.

    • @hemantwaingankar7014
      @hemantwaingankar7014 Рік тому

      हो, आणी सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा

  • @vaibhavthakur8535
    @vaibhavthakur8535 Рік тому +3

    खुप छान, सर्व Team चे मनःपूर्वक अभिनंदन🎉

  • @mushtaqkarol-tr9rr
    @mushtaqkarol-tr9rr Рік тому +3

    Nostalgic. Nice presentation. May natural beauty of kokan (sindhudurg) b preserved. Onus is on all of us - the natural n original generations of these areas that includes this commentator.

  • @smitakelwalkar7381
    @smitakelwalkar7381 Рік тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ. माझे लहानपण ते लग्न होईपर्यंत चे जीवन मी मातीच्या घरात जगले. आता पुन्हा तसेच जगावेसे वाटते आहे. त्यासाठी प्रयत्न पण चालू आहेत.

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go Рік тому +4

    I have great sympathy for that hostel girl as her sister was laughing at her while she was crying.

  • @vanitamestri8384
    @vanitamestri8384 Рік тому +1

    हे सर्व असच कायम टिकून राहू दे .कोकणातील लोकांनी पण भाऊबंदकी वाद , देवस्की हे सोडून द्यावी .म्हणजे सर्व चागलं होईल.

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Рік тому +1

    प्रसाद गावडे., महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुमचे छायाचित्र आणि कौतुक पाहिले खुप आनंद झाला., सकाळी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांना फोटो दाखवला आणि सांगितले हा बघा माझा आवडता रान माणूस.,mr.prasad I am very happy to see your snap in mumbai times.,many congratulations and best wishesh for your future activities.

  • @jaykarekar
    @jaykarekar Рік тому +2

    Best episode. People should rethink while building the Concrete House🏠. I personally Feel the mud house is where life blooms❤

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Рік тому +1

    मस्तच आमचे पण घर कौलारू आहे.अजून तरी आमचे घर सिमेंट चे नाही.खूप मज्जा येते गावी गेल्यावर

  • @shripadpatil6982
    @shripadpatil6982 Рік тому +4

    Today i feel my old memories. Nice video 👍👍👍👍

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому +1

    माझ्या सर्व 🙏 कोकणी बंधूंना , एक ☹️ कळकळीची विनंती. कृपा करून थोड्याशा पैश्यासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी किंवा घरे, बाहेरच्या लोकांना विकू नका. तुमची घरे किंवा जमिनी एकदा हातातून गेल्या, तर कोकणी माणूस संपला . जय महाराष्ट्र, जय कोकण.

    • @dipaligurav3980
      @dipaligurav3980 Рік тому +1

      खरंच अनुभव ऐकताना गालावर कधी थेंब ओघळले कळलंच नाही मलाहि लोक विचारतात एवढी शिकून कोकणात शेतकर्याशी लग्न करून काय मिलवलेस पण मी काय मिळवले हे प्रसाद फक्त आणि फक्त तूच जाणू शकतोस तुलाभेटायला मला आवडेल मी मावलंगे गाव रत्नागिरी ची माजी सरपंच

  • @mukeshkambli492
    @mukeshkambli492 Рік тому +1

    आजी आजोबा तुम्ही शतायुषी व्हा

  • @sagarjangam1614
    @sagarjangam1614 Рік тому +2

    खुपच छान…👌🏻👌🏻
    हा वारसा कायम असाच पुढे जपला गेला पाहिजे..

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Рік тому +3

    मला माझ्या लहानपणीचा गाव आठवलं!धन्यवाद

  • @iamrahul7066
    @iamrahul7066 Рік тому +1

    अप्रतिम चित्रकरण, voice over आणि pure heart गावची माणसं आणि तिथला निसर्ग ✌️✌️❤❤👌👌🤘🤘

  • @sandipgore78
    @sandipgore78 Рік тому +1

    कोकणाचा बद्दल माहिती सांगणारा हा आज चा विडिओ खूप आवडला.प्रसाद तुझा मेहनतीला सलाम .तुझा या विडिओ तुन आज आपल्यातली संस्कृती, नाळ, निसर्ग सौंदर्य हे पाहायला मिळालं 👌

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 Рік тому +1

    डोळ्यात साठवून ठेवत, पाहत राहीलो कोकणी घरांचं वैभव..! खरंच खूप सुंदर आहे माझं कोकण, मी सोलापूरचा आहे...! मला माझ्या आयुष्यातील एक काळ या स्वर्गात व्यतीत करायची मनस्वी इच्छा आहे. प्रसादाचं कौतुक करावं तेवढं थोड आहे...take care. Love you Dear friend.

  • @madhavpanchal9152
    @madhavpanchal9152 Рік тому +1

    खूप सुंदर. मला माझे लहाणपणीचे दिवस आठवले. 👌🏻

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Рік тому +2

    kokan mhanje the blue mesmerizing sea, the green vegetations, the suka meva, the hapus, the forts, the fields, the lakes, the flowers, the rivers and not to forget the manglorian kaulan che chira stone che ghar - love it - truly - your description really brings a picture of my beautiful kokan !

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 7 місяців тому +1

    समजूतदार माणसं

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 Рік тому +2

    किती छान माहिती आहे . डोळे भरून येतात😢

  • @shravanofficial
    @shravanofficial Рік тому +4

    What an experience ❤ kudos to the whole team

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 Рік тому +1

    Khup masta hota ha video
    @Shashank great work ❤

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 Рік тому +1

    आमचं पण ७५वर्षांपूर्वीचे मातीचे घर आहे
    ते प्रिझरव करण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का
    गावं अंदुर्ले तालुका कुडाळ
    आमच्या जवळ ५ते १०किलोमीटर area मध्ये बरीच किनारे आहेत
    निवती रॉक वेंगुर्ला सर्व जवळ आहे विमानतळ २२ किलोमिटर

  • @sumitrajbhoikamble6728
    @sumitrajbhoikamble6728 Рік тому +1

    Save Kokan #No_to_barasu_refinery

  • @purvaghawale
    @purvaghawale Рік тому +1

    खुपच सुंदर कल्पना आहे 😍♥️#mukkampostkokan😁🤙

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 9 місяців тому

    खूपच छान व्हिडीओ एकदम जुने गावाकडचे दिवस आठवतात खुप छान 👌👌👌

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे. खरंच कवलारू घरात जी मजा येते ती सिमेंट की काँक्रिट मध्ये नाही.
    तेव्हा सर्वांनी प्रण करा मातीची घर वाचूया.

  • @anilmaurya.01
    @anilmaurya.01 Рік тому +2

    We all need to preserve our heritage..great work by our ancestors...nice message from the video.

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 Рік тому +1

    छान व्हिडिओ.यातील एक ताई म्हणतायत की आम्ही भांडलो कुंडलो तरी आनंदात असतो.सणासुदीला भेटतो.हाच तर वेगळेपणा आहे कोकणच्या लाईफस्टाईल चा.आणि जुन्या कौलारू घरात राहण्याचा.सुंदर...प्रसाद.

  • @nageshsarang_youtube
    @nageshsarang_youtube 7 місяців тому

    खरोखरच आता ही आपली कोंकणी संस्कृती टिकविण्याची वेळ आली आहे. खूपच सुंदर सादरीकरण केले आहे.

  • @aniketsatam
    @aniketsatam Рік тому +2

    भावना काळजाला भिडल्या.............हृदयस्पर्शी

  • @Lidili
    @Lidili Рік тому +1

    Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice video. I remember my childhood spent in Village. Now there's lot of difference in life style compared to those days back to fifty years. Now even in Village lot's of changes has taken place. Thank you very much for your valuable video. Appreciate your courage and wish you best regards for next video.

  • @rohitkumargundale
    @rohitkumargundale Рік тому +1

    खतरनाक 😍😍😍👍🏻👍🏻🌿♥️🌿

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 7 місяців тому

    माझ्या महाराष्ट्राचं ते नंदनवन आहे ,त्याला जपावं हीच अपेक्षा.

  • @kokaniking1999
    @kokaniking1999 Рік тому +1

    I love kokan❤❤❤

  • @ankushmayekar9913
    @ankushmayekar9913 Рік тому +2

    खुप छान छायाचित्रण आणि सादरीकरण ❤

  • @ManikSorate-ew2uf
    @ManikSorate-ew2uf Рік тому +1

    खुपच सुंदर!!! डोळे आणि मन दोन्ही एकदम भरुन आला❤ 🌸✨

  • @francoindien
    @francoindien Рік тому +1

    मस्त video, congratulations 🎉कुठला कॅमेरा वापरता?

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 Рік тому +1

    खूप छान, आणि काहीसा हृदयस्पर्शी शेवटचा भाग, प्रसाद गावडेंच कौतुक!! त्या उपक्रमाची अधिक माहिती मिळाली तर छानच..

  • @acadcasr6292
    @acadcasr6292 Рік тому +6

    Absolutely wonderful. Prasad , Keep making this kind of documentaries which will help us to keep in touch with our culture and nature of Konkan , for , our culture has an inseparable companion MOTHER NATURE . If possible , make some documentary on making of old style , eco friendly housed in Konkan !

  • @RameshZine-mp6dn
    @RameshZine-mp6dn 6 місяців тому +1

    Lay bhari.

  • @vikrantkadwadkar4545
    @vikrantkadwadkar4545 Рік тому

    भाऊ मुंबई आणि कोकण वेगळं नाही. मुंबई पण कोकणच आहे. कोकण म्हणजे फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग नाही.

  • @ajayparkar6470
    @ajayparkar6470 Рік тому +1

    खूप छान,
    हृदयस्पर्शी सादरीकरण
    आठव इली😢

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 Рік тому

    धन्यवाद झिला अशीच आपल्या कोकणी संस्कृति राहूदे

  • @DeepakKMore
    @DeepakKMore Рік тому +1

    Mast video, aavadla... Thanks to you. from EUROPE.

  • @prachirasam3093
    @prachirasam3093 Рік тому +2

    Great work!! Kokan❤️

  • @rupalisawant2503
    @rupalisawant2503 Рік тому +1

    खूप छान भावना व्यक्त केल्यात.....

  • @santoshmistry4588
    @santoshmistry4588 Рік тому +1

    Till 25 years back we had same cottage..200 years old....in mahim..Mumbai...all lost due to builder & politicians...still fighting.
    Really great ....konkan....really beautiful & respectful....have to preserve it....heven...love you..
    Feel like setteling here....

  • @champalalbanswal3484
    @champalalbanswal3484 2 місяці тому

    भाऊ माझी खुप इच्छा आहे कोकणात येऊन राहायला मालवणा मध्ये फार फार
    निसर्ग सुंदर,
    भाऊ एक स्वस्त घर मिळाले तर सांगा माझी फार मनापासून इच्छा आहे मालवण मध्ये उरलेल आयुष्य जगाचे आहे
    खरंच भाऊ घर मिळाले तर सांगा

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Місяць тому

    भाऊ खरच कोकणाच्या सानिध्यात पक्ष्यांच्या किलबिलाटात राहायला मिळालं तर खूप छान होईल आम्ही सांगलीकर आहोत

  • @warana369
    @warana369 6 місяців тому +1

    👌👌👌👏👏👏❤❤❤👍👍👍🙏🙏🙏💐💐💐

  • @chetanwakkar
    @chetanwakkar Рік тому +1

    Shashank thakur

  • @sachintukaramkure5978
    @sachintukaramkure5978 Рік тому +1

    फार.फार.छान.भावा

  • @surajmarchande95
    @surajmarchande95 Рік тому +1

    Thanks....Khup sunder....From Direction to edit it was superb 😍 ...Love this

  • @Uniqueideas111
    @Uniqueideas111 Рік тому +3

    कोकण is emotion ❤️

  • @SachinPawar-kb9yv
    @SachinPawar-kb9yv Рік тому +1

    शशांक ठाकूर

  • @siddheshgawthe6939
    @siddheshgawthe6939 5 місяців тому

    यामध्ये स्लॅबची घरे आमच्या कुंभारमाठची दाखवली आहेत

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 Місяць тому

    कदाचितजर जर मला हा व्हिडिओ दोन वर्षे आगोदर पाहिला मिळाला असता तर मी आमचे जुने घर पूर्ण न मोडता वर फक्त छत बदलले असते पण आता वेळ निघून गेली आता खूप पच्छाताप होत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे आपले जुने मातीच घर टिकवून ठेवा आणि आपल्या कोकणाची शान वाढवाआ

  • @dhananjaytamhankar1890
    @dhananjaytamhankar1890 Рік тому +1

    One of the best I have seen in recent time❤
    To creators it would be great if could create similar content in English.
    I would love to share it with my friends and colleagues

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 4 місяці тому

    कोंकण (कन्नड भाषेत "मलेनाडू "असे म्हणतात)

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 6 місяців тому

    देवा तिथल्या लोकाना, आई वडिल, आजी आजोबा, भाऊ बहिनी, गाई म्हशी, देवा या सज्जन लोकाना सुखी ठेव री बाबा, आई च्या दूधा ची माया, घरात ल्या भींती ची साया, कोकनी लोका च्या नवीन पीढी ची, मूला मूली नी ची येनारे आयुष्य भविष्य येनारे दिवस सुखी यशस्वी येवू दे या मना पासुन सदभावना , सदइच्छा, या कोकन भूमि च व तिथल्या प्रत्येक पीढी च भल कर देवा, दूध साखरे चा ठेवा, मनुष्य च मनुष्या पासुन सुखी किवा दुखी होतो, आपल्या पूर्वजानी तीथे जीवन वसवीले, धन्य ती कोकन ची भूमी, अशीच पवित्र राहीली पाहीजे❤❤😂🎉🎉😅😅😅😅😊😊😊❤❤❤❤❤❤