Dindi - ‘Ashadi Ekadashi’ was celebrated in Jaragnagar Vidhyamandir School, Kolhapur.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #ashadhiekadashi2023 #marathishala #schoolprogramme #jaragnagarschool
    मनपा. श्रीम. लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर ◆━━━━━━━★▣✦▣★━━━━━━━◆
    🙏 निघाले आमचे बाल वारकरी...
    दुमदुमली अवघी नगरी...
    जरग विद्यामंदिर शाळेत इयत्ता पहिली व दुसरीचे बाल वारकरी झाले विठूमय...
    💫 ज्ञानोबा-तुकाराम च्या गजराने शालेय वातावरण झाले भक्तीमय..
    🥳 विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही अनुभवली आनंदवारी..
    ◆━━━━━━━★▣✦▣★━━━━━━━◆
    आषाढी एकादशी दिवशी शाळेला सुट्टी असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर शाळेतील बालवारकऱ्यांनी आदल्या दिवशीच विठूनामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. दिंडीमध्ये टोपी - पांढरा शर्ट घातलेले वारकरी व खांद्यावर भगवे ध्वज, हातात टाळ, कपाळी गंध लाऊन बाल वारकरी सामील झाले होते. मुखातून सुरू असलेल्या विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले.बाल वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त विठ्ठल भक्तीला पालकांची ही दाद मिळाली.
    टाळ आणि टाळ्यांच्या साथीत हरिनाम व विठ्ठलाचा सुरू असलेला गजर तसेच बालकांच्या रंगलेल्या झिम्मा-फुगडीने वातावरण दुमदुमून गेले. बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या मुलांची ही दिंडी लक्ष वेधून घेत होती.दिंडीतील मुलांनी संत तुकाराम, पांडुरंग, रुक्मिणी, गाडगेबाबा, संत मीराबाई, संत नामदेव, संत मुक्ताबाई अशा विविध वेशभूषा केल्या होत्या.आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या शहरातून जातात टाळ मृदंगाच्या साथीने त्यांचा सुरू असलेला विठ्ठल नामाचा गजर शालेय विद्यार्थ्यांनाही आकर्षित करतो. त्यामुळे आषाढीच्या दिवशी शाळातून वारकरी पोशाखातील बालकांच्या दिंडी काढल्या जातात.

КОМЕНТАРІ • 10

  • @YogeshYadav-zl8ig
    @YogeshYadav-zl8ig Рік тому

    राम कृष्ण हरि

  • @nilimakadam8855
    @nilimakadam8855 Рік тому

    Wow, khup chhan 👍👌👌👌

  • @nandinikale9102
    @nandinikale9102 Рік тому

    सुंदर..सावळे सुंदर रूप मनोहर
    विठू रखुमाई..

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 Рік тому

    किती गोड वारकरी.. बालगोपाल एकदम मस्त. वासुदेव मस्त.. दिंडी मस्त.. विठ्ठल रुक्मिणी गोड.. फुगड्या रिंगण.. जबरजस्त. अरेंज करणाऱ्यांचे खूप कौतुक.

  • @aniketmashidkar
    @aniketmashidkar Рік тому

    Hari vitthal jai hai vitthal 🙏 radhe radhe ❤️

  • @SwatiLohokare
    @SwatiLohokare Рік тому

    खूपच सुंदर

  • @asawarijadhav7627
    @asawarijadhav7627 Рік тому

    खूपच छान👌👌👌

  • @shreyashbhoyate2719
    @shreyashbhoyate2719 Рік тому

    👌👌👌❤️🌹

  • @aniketmashidkar
    @aniketmashidkar Рік тому

    Khup Sundar oju my little sister ❤️

  • @pushpadalal9639
    @pushpadalal9639 Рік тому

    खूप सुंदर