भारताचा राष्ट्रध्वज सर्वात पहिल्यांदा फडकवण्याचा मान मिळालेला मराठी माणूस, 75 years of Independence

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025
  • आज भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट१९४७ ला भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचा युनियन जॅक खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज तिथ डौलानं फडकायला लागला.
    त्याआधी मध्यरात्री तो स्वतंत्र भारताच्या विधिमंडळात फडकवला गेला होता आणि याच वेळी नेहरूंनी long years ago we made a tryst with destiny म्हणजेच 'अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता' हे प्रसिद्ध भाषण केलं होतं. मलाही अनेक वर्षे असं वाटत होतं की पंतप्रधान नेहरूंनी पहिला झेंडा फडकवला तो लाल किल्ल्यावर पण तो फडकवला गेला होता इंडिया गेटजवळच्या प्रिन्सेस पार्कमध्ये. जिथं नेहरूंनी राष्ट्रध्वज फडकवला, पहिल्यांदा राष्ट्रगीत गायलं गेलं आणि राष्ट्रध्वजाला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.
    १५ ऑगस्ट १९४७ रोजी मराठा बटालीयन हमाडा जपान येथे तैनात होती. १५ ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय ध्वज फडकवला गेला यावेळी हमाडा येथे सजावट केली गेलेली होती आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आतषबाजीही करण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज याप्रकारे भारतीय वेळेच्या आधी सुमारे साडेपाच तास जपानमध्ये फडकवला गेला आणि तो फडकवण्याचा मान भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल D A Surve यांना मिळाला.
    ‪@DrishyamStories‬
    @drishyamcommunications
    ‪@NarwaneRahul‬
    Research & Writing- Kaustubh Mudgal & Yashodhan Joshi
    Director- Rahul Narwane
    Speakers- Yashodhan Joshi
    Camera- Rahul Narwane & Satyam Avdhutwar
    Editor- Satyam Avdhutwar
    Studio - Drishyam Communications
    -------------------------------------------------------------------------------------------
    Website - www.drishyamcommunications.com
    Linkdin - www.linkedin.com/in/drishyam-communications
    Facebook - drishyamcommunications
    -------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ •