मश्रूम खीमा असा बनवला तर नॉनव्हेजलाही विसरून जाल | Leena's Sugrankatta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #mashroomkheema #मश्रूमखीमा #मश्रूमचेपदार्थ #स्पायसीभाजी #खीमा #व्हेजखीमा #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
    मश्रूम खीमा
    मश्रूम ४०० ग्रॅम
    बटर ४-५ टेबलस्पून
    दालचिनी १ इंच
    लवंग ४
    काळी मिरी १०-१२
    तमालपत्र २
    हिरवी वेलची २
    मोठे कांदे २
    मोठे टोमॅटो २
    आलं लसूण पेस्ट १ टेबलस्पून
    थोडी कोथिंबीर
    हळद १ चमचा
    तिखट १ चमचा
    काश्मिरी मिरची तिखट १ टेबलस्पून
    धनेपूड १ चमचा
    चिकन मसाला १ चमचा
    मीठ चवीनुसार
    कसुरी मेथी १ टेबलस्पून
    मश्रूम स्वच्छ धुवून जितके बारीक चिरता येतील तितके बारीक चिरणे. व्हेजिटेबल चॉपर असेल तर त्यात बारीक चिरून घ्यावे. कांदा व टोमॅटो देखील बारीक चिरून घ्यावेत.
    भांड्यात बटर टाकून त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी, हिरवी वेलची टाकून मिनिटभर परतावे. मग कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, टोमॅटो घालून परतावे. आता हळद, तिखट, चिकन मसाला ( इथे तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरु शकता.), थोडेसे मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मग मश्रूम व अर्धी वाटी गरम पाणी घालावे. आधी घातलेल्या मीठाचा अंदाज घेऊन आता मीठ ॲडजस्ट करावे. सगळे नीट मिक्स करून झाकून ठेवावे. मश्रूम शिजायला जास्त वेळ लागत नाही. पाच ते सात मिनीटात भाजी शिजते. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी हातावर चोळून घालावी. थोडी कोथिंबीर घालून सगळे मिक्स करावे.
    आपला मश्रूम खीमा तयार आहे.
    Video shooting & editing:
    Varun Damle
    +91 95459 08040

КОМЕНТАРІ • 5