1 Lakh Subscribers पूर्ण झाल्याबद्दल प्रेक्षकांचे Aarpaar आभार | Vinod Satav | Mugdha Godbole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #MugdhaGodbole #VinodSatav #WomankiBaat
    प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक 'स्त्री' असते असं आपल्याकडे म्हटलं जातं, यशस्वी पुरुषांपेक्षा 'प्रत्येक यशस्वी गोष्टीमागे स्त्री असतेच' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरपारचे एक लाख सबस्क्रायबर्स होण्यामागे 'वुमन की बात'चा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक स्त्री एकावेळी अनेक भूमिका बजावत असते, दहा गोष्टींचा विचार डोक्यात सुरु असतांनाही ती हसतमुख राहून सगळ्यांना सकारात्मकता देत असते, करियरमध्येही यशाचे टप्पे गाठत असते, पण हे साध्य कसं होतं? उपजतच असतं की कष्टाने साध्य केलेलं?
    यामागे वैचारिक भूमिका काय असते? हे सगळं जाणून घेण्यासाठी सुरुवात झाली, 'वुमन की बात'ची! 'वुमन की बात'मध्ये उत्तम लेखिका, अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि लिड मीडियाचे संस्थापक विनोद सातव यांनी अनेक महिलांना बोलतं केलं, म्हणूनच एक लाखाच्या टप्प्यावर या दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या आहेत. विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांच्या मुलाखती घेण्याचे त्यांचे अनुभव, मुलाखतीनंतरच्या प्रतिक्रिया, काही पडद्याआडच्या गमतीजमती सांगणारा असा हा एपिसोड! शिवाय उत्तम लेखिका, मुलाखतकार आणि एक यशस्वी महिला म्हणून मुग्धाचेही विचार या एपिसोडमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील, त्यामुळे हा एपिसोड शेवट्पर्यंत नक्की बघा.

КОМЕНТАРІ • 52

  • @thanekar256
    @thanekar256 8 днів тому +4

    मुग्धा मॅडम ने फक्त बोलत रहावं आणि आम्ही ऐकत रहावं ❤❤❤❤

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 8 днів тому +5

    फार उत्तम इंटरव्ह्यु झाला. मुग्धा गोडबोले यांचे विचार crystal clear आहेत. त्यांना ऐकत राहावेसे वाटत होते. एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन !

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 8 днів тому +2

    आरपार च्या सर्व टीमची नावे घेऊन विनोद जी तुम्ही कौतुक केलेत, हे मला आवडले. तुमचा संयत पणा मला आवडतो. मुग्धा यांचे विचार सुस्पष्ट आणि प्रामाणिक वाटले.. आपण करीत असलेल्या कामाचा अभ्यास, मार्केट ची मागणी आणि स्वतःच्या कामावर खूप प्रेम करण्याची वृत्ती दिसून आली. आरपार च्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 8 днів тому +3

    एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. वुमन की बात अतिशय सुरेख कार्यक्रम सादरीकरण करण्यात येते त्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. पुढील टप्पा लवकरात लवकर गाठावा ह्याकरता अनेक शुभाशीर्वाद.

  • @kanchanlovalekar9822
    @kanchanlovalekar9822 5 днів тому +1

    कमाल...!!! मालिकांविषयी चं मत तर जबरदस्त! मुग्धा ताई ❤

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 9 днів тому +2

    गोडबोले आडनावाचे सार्थक झाले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व🎉 ग्रेट पर्सनॅलिटी ❤❤ u

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 4 дні тому +1

    खूप छान आहे विदियो..मुग्धा चे सांगणे पटले मला.आवडलं.धन्यवाद 👌👌👍

  • @aditee2570
    @aditee2570 3 дні тому +1

    अप्रतिम मुलाखत. मुग्धा मॅडम आणि विनोद सर, दोघेही फार छान व्यक्त झाले आहेत.

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 4 дні тому +2

    ❤ वाह मु ग्धा, proud of you 👍 तू एक चांगला आदर्श तयार करत्येस

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 днів тому +1

    मुलाखती अनेक झाल्या पण आजची चर्चा सगळ्यांत उत्तम होती. 👌🏻👍🏻

  • @ketakideshmukh7229
    @ketakideshmukh7229 20 годин тому

    ही मुलाखत माझ्यासाठी सगळ्यात आणि एकमेव अशी मुलाखात आहे की मुग्धा ताई माझा गेलेला mood parat आणणारी.. म्हणजे मी ही मुलाखत कितीही वेळा पाहू शकते not just because hya mahdhe स्त्री च कौतुक केलंय but also tu ze ani vikas सरांचे विचार.. एका शब्दात sangayach tar सुख

  • @surekhanatu3642
    @surekhanatu3642 5 днів тому +1

    अप्रतिम मुलाखत

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 8 днів тому +1

    छान मुलाखत. पहील्यांदाच एकमेकांची मुलाखत(ही थीम) घेताना बघितली. आवडली. खुपसे समजले. 👍

  • @seemamhaske7913
    @seemamhaske7913 8 днів тому +2

    खूप छान मुलाखत आणि दर्जेदार उपक्रम. मुग्धा हि गरवारे highschool ची alumni आणि विनोद हा BMCC चा batchmate ह्या connection मुळे जास्त अभिमान दोघांचा 😊 पण त्यामुळे नाही तर खरोखरच दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप छान काम करत आहेत. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव हा दिसून येतो. इतकी वर्षं मनोरंजन विश्वात टिकून राहायचं आणि तरी दर्जा ढासळू द्यायचा नाही हे सोप्पं नाही. त्यासाठी दोघांचे मनापासून कौतुक. असेच काम पुढेदेखील करत राहा!

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 5 днів тому +1

    अतिशय छान एपिसोड. तुम्हाला अनेक शुभेच्छा. असेच छान छान एपिसोड घेऊन येत राहा. कारण मला स्वतः ला स्त्री म्हणून ह्यातून काही न काही तरी चांगल मिळतं.
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    आणि मुग्धा गोडबोले मला तुम्ही फार आवडता. पुण्याची असल्या मुळे कदाचित जास्ती आवडता 😊

  • @akshay5823
    @akshay5823 7 днів тому +1

    खुप सुंदर, विचार करायला लावणारी मुलाखत ❤️❤️🙏🙏

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 7 днів тому

    लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन ! पुढे असेच आरपार वूमन की बात चालू रहाण्यासाठी शुभेच्छा 💐

  • @jyotsnakamble720
    @jyotsnakamble720 8 днів тому +2

    You go ahead...be positive...Mala khup inspiration milay ...positivity milaliy...aajkal wachayla vel nahi..pan pragalbh vichar aaiknyasathi muddam vel kadhte..I m also working women from big joint family..so women ki baat really matters...getting something to face various situations...❤

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 6 днів тому +1

    मी मंगला गोडबोले ह्यांचे सकस लेखन नेहमी वाचत आले आहे . मुग्धा चा अभिनय ' आजी बाई जोरात ' ह्या नाटकात छान आहे . २०२० पासून आमच्या घरात टीव्ही चॅनल्स नाही म्हणून सध्या मला मुग्धा च्या लेखनाबद्दल काही अनुभव नाही. पण ती ह्या मुलाखती मधे छान बोलते आहे.

  • @ManishaW-ir8zk
    @ManishaW-ir8zk 8 днів тому +1

    Khup khup Abhinandan tumha sarvancha

  • @truptibhosale-o2v
    @truptibhosale-o2v 3 дні тому

    Great work Vinod sir

  • @user-fe5zt7ss8b
    @user-fe5zt7ss8b 5 днів тому

    Excellent interview!

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 9 днів тому +3

    Mughdha abhyas purna bolna, aapli mata spasta pane mandli. Atantya abhays purna episode.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 8 днів тому +1

    उत्तम मुलाखत.
    Woman की बात हा विषय मस्त पणे मांडला आहे. मुग्धाजींचे विचार अगदी स्पष्ट आहेत आणि मांडताना बोलतात देखील छान पद्धतीने.
    बायकांचे विषय निघाले की पुरुष बऱ्याचदा म्हणत असतात.... की सारखं किती आणि काय बोलत असतात , असं. पण बायकांनी बोललं पाहिजे तेही मोकळेपणाने असं मला वाटतं. मी तर म्हणेन पुरुषांनी देखील त्यात सहभाग घ्यावा कारण शेवटी स्त्री पुरुष एकत्र वावरतच असतात ना.
    तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा चर्चा होतात , त्यासाठी तुमचे आभार. खूप छान.... अजून अशा मुलाखती घेत जा आम्ही नक्की बघू.
    बरेच भाग मी पाहिले आहेत. खूप छान कार्यक्रम ! ❤

    • @mugdhagodbole5230
      @mugdhagodbole5230 2 дні тому

      आभारी आहोत. पुढेही जरूर बघत रहा. 😊

  • @surekhapatil1799
    @surekhapatil1799 8 днів тому +1

    Excellent discussion 🎉🎉

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 5 днів тому

    मी ज्या देशात वास्तव्य करून आहे, तिथे गाडी रिव्हर्स करताना मागे पाहिले नाही तर चालक परवाना देणारा अधिकारी चालक परीक्षेत नापास करतो...

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 4 дні тому +1

    20:15 yes really waiting for this topic ....it affects to womens career ....metro ali pn toilets ale nhi ...he kup vait avshta ahe aplya deshyachi ...ladkyabahini la jya gostinchi kami ahe te pn dya .. assa sarkar la magna ahe

  • @MeghanaWagh
    @MeghanaWagh 9 днів тому +2

    Tumcya podcast mule mazyatala patience vadhla,purn episode pahate ani sagale episode pan.karan content khup chaan aste Best wishes

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 7 днів тому

    Chhan mulakat

  • @madhuravelankar3272
    @madhuravelankar3272 8 днів тому +1

    Congratulations🎉

  • @waikars.878
    @waikars.878 9 днів тому +2

    विचार खूप विचार करायला लावणारे आहेत

  • @preranaparkhi6671
    @preranaparkhi6671 День тому

    Khoop chan prog aahe ha khoop Abhinandan. Madhun adhun ha prog ubha karatana kay kay experience yetat, problems yetat he kalavat raha.

  • @shraddhachavan8190
    @shraddhachavan8190 9 днів тому +1

    Khup mahatvacha mudda mandala ahe

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 4 дні тому +1

    1:06 yes baykanaa diet kup kathin aste correct Bollat

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 22 години тому

    लाखाची गोष्ट....लाख मोलाची चर्चा... विशेशतः टीव्ही मध्यमाबद्दल खूप positive,eye opener चर्चा झाली.मुग्धा ताई तुमचे विचार सुस्पष्ट आहेत. धन्यवाद...
    पण एक द्विधा मनस्थिती होते...की
    फक्त समाजात जे दिसतं तेच दाखवणे संयुक्तिक.पण प्रेक्षकांना समृध्द करणेही टीव्ही माध्यमाची जबाबदारी नाही का? तुम्हाला आवडत नाही तर remote तुमच्याकडे आहे,टीव्ही बघू नका... असं जबाबदारी झटकणार उत्तर दिलं जातं, हे कितपत योग्य आहे.मुग्धताई..

    • @mugdhagodbole5230
      @mugdhagodbole5230 16 годин тому

      अगदी बरोबर. हे उत्तर योग्य नाहीच. पण गंगूबाई नॉन मॅट्रिक सारखी मालिका,ज्यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती बद्दल भाष्य केलं जायचं ती आताच्या काळात होऊ शकेल का? लोकांच्या भावना इतक्या अणकुचीदार झाल्या आहेत की इच्छा असून अनेक गोष्टी आता करता येत नाहीत.

  • @waikars.878
    @waikars.878 9 днів тому

    मी तुमची फॅन आहे ताई

  • @arpitasiddhabhatti4377
    @arpitasiddhabhatti4377 8 днів тому

    Hello sir /madam ....
    Neelam Shirke yancha interview ghya please....my favourite Neelam Shirke

  • @ketakideshmukh7229
    @ketakideshmukh7229 20 годин тому

    तुझे कौतुक करायचे झाले तर तू जे काही व्यक्त होते ते फार स्पष्ट पणे होते आणि tyamagacha अभ्यास खूप काही बोलतो
    I would say now THE mugha godbole ranade

  • @manishanaik5626
    @manishanaik5626 4 дні тому

    @1.04......आपण त्यांचा आदर केला पाहिजे.....किती तो मानभावीपणे.
    तुम्ही आदर करायचं मनावर घेतलं तर आणि तरच स्त्रियांनी आपण आदरणीय आहोत असं वाटून घ्यायचं का....?
    समजा तुम्ही हा तुमचा मनाचा प्रचंड मोठेपणा नाही दाखवला.....आणि आदर नाही केला....तर.....
    म्हणजे एखाद्या स्त्रिचा आदर तुमच्या ठरवण्यावर आहे का.....?

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 6 днів тому

    Chanel has to change there mind our Marathi brilent act no chance due to no quality