कोल्हार /Sujay Vikhe Patil | तीस वर्षाच्या राजकारणात आम्ही कधी दहशत केली का ?-;मा.खा.डाँ.सुजय विखे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • तीस वर्षाच्या राजकारणात आम्ही कधी दहशत केली का?विखे पाटील परिवार कुणालाही दहशतीखाली जाऊ देणार नाही;माजी.खा.डाँ.सुजय विखे
    महिला बचत गटांना पिठाच्या गिरण्याचे वाटप
    #srb_news_live #Sujay_Vikhe_Patil
    आमच्यावर दहशतीच्या राजकारणाचे आरोप केले जातात. माझा त्यांना सवाल आहे,३० वर्षाच्या राजकारणात आम्ही कधी दहशत केली का? कुणाला अरेरावी केली का? कुणाची लुबाडणूक केली का? असे एक तरी उदाहरण घडले आहे का ? विखे पाटील परिवार कुणालाही दहशतीखाली जाऊ देणार नाही.विरोधांकडे विकासाचे व्हिजन नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये विखे दहशतीचे राजकारण करतात हे विष पेरण्याचे काम करतात. असा परखड सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
    कोल्हार भगवतीपूर येथे प्रत्येक महिला बचत गटाला एक याप्रमाणे ८८ पिठाच्या गिरण्या तसेच भजनी मंडळांना भजनाचे साहित्य डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
    या कार्यक्रमप्रसंगी डॉ.विखे बोलताना होते.म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गट निव्वळ कागदावर नाही. किंबहुना कार्यक्रमांना गर्दी करण्यासाठी नाहीत.प्रत्येक महिला बचत गटांना आलेल्या योजना पोहच करण्याचे काम केले आहे.
    कोल्हार भगवतीपूरमध्ये केलेला विकास आपल्या सर्वा समोर आहे.विकास करताना लोणी आणि कोल्हार या दोन्ही गावांत आपण भेदभाव केला नाही. साठवण तलावासाठी ट्रस्टची जागा घेतली. पुढील तीन महिन्यांत स्वच्छ पिण्याचे पाणी देणार असा मी शब्द देतो.अन्यथा मत मागायला येणार नाही. जातीपातीचे राजकारण केले नाही. जो माणूस विकास करील त्याच्याच पाठीशी उभे राहा.विरोधक विष पेरणीचे काम करीतच आहे.आपला विकास करायचा का अन्य काही करुन घ्यायचे हे तुमच्या हातात आहे.असे हि विखे यांनी सांगितले.
    प्रास्ताविक देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराव देवकर यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्र खर्डे, यमन पुलाटे यांनी केले.याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, कोल्हार बुद्रुकच्या उपसरपंच सविता खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, धनंजय दळे, प्रवरा फळे भाजीपाला संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे, पंढरीनाथ खर्डे, अमोल थेटे, श्रीकांत खर्डे,श्रीकांत बेद्रे, साईनाथ खर्डे,अक्षय मोरे आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

КОМЕНТАРІ • 58