उपवास स्पेशल: आल्याची चटणी, बटाटे-रताळ्याचे कालवण | Fasting Recipes । Quick & Easy Upwas Vrat Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #upwas #upwaschatni #upwasthecha #Upvasachathecha #Thecharecipe #kalvan #कालवण #upwasAlooCurry #Upvasrecipe #Fastingrecipe #chaturmas #NoOnionNoGarlic #चातुर्मास #उपवासचटणी #उपवासाचाठेचा #navratrispecial #नवरात्रीस्पेशल
    तुम्हाला उपवासाचे तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे ना? म्हणून उपवासाला फराळ करताना तोंडी लावायला शेजारी काहीतरी चमचमीत - झणझणीत हवं आहे, हो ना? ही डावी बाजूच आपल्या फराळात विविधता आणत असते म्हणून सगळ्यांना ती जास्तच आवडत असते.. मग त्या साठी एक नव्हे तर दोन पदार्थ आपण पाहुयात.
    १. आल्याची चटणी / ठेचा :
    १० ते १२ लाल सुकवलेल्या मिरच्या उकडून मऊ झाल्या की त्याची देठं काढून जाडसर वाटून घ्यावे. २ इंच आलं कीसून घ्यावे. तेलात जिरे घालून ते तडतडले की त्यात आल्याचा कीस घालावा. आले चांगले परतले गेले की त्यात १ चमचा ओले / सुके खोबरे घालावे व छान परतून घ्यावे. त्यात जाडसर वाटलेल्या मिरच्या घालून त्यात चवीपुरते मीठ घालावे. आता अर्धवट कुटलेले दाणे व जिरे घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे. झाला आपला मस्त झणझणीत ठेचा / चटणी तय्यार!
    २. रताळं - बटाटा कालवण :
    तेलात जिरे घालून ते तडतडले की त्यात बारीक बटाट्याचे आणि रताळ्याचे काप केलेले घालावे व छान परतून घ्यावे. दुसरीकडे ४ चमचे दाण्याचे कूट, १ ते १.५ चमचा खोबरं, १ हिरवी मिरची, १ चमचा जिरे व १ चमचा कोथिंबीर एकत्र जाडसर वाटून घेणे. आता हे वरील वाटण आपल्या रताळ्या - बटाट्याच्या भाजी मध्ये घालावे. रताळ्याचा आणि बटाट्याचा रंग बदलला की त्यात थोडे पाणी व चवी पुरते मीठ घालून झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवून घ्यावे. झालं आपलं कालवण तय्यार!
    कशा वाटल्या तुम्हाला ह्या झणझणीत रेसिपीज?
    उपवास आणि चातुर्मास स्पेशल तर आहेच होना, पण जेवणात तोंडाला चव येण्यासाठी पण तुम्ही ह्या रेसिपिज करू शकता. हे जरा हटके पदार्थ नक्की करून बघा आणि आम्हाला ते कसे झाले नक्की सांगा? आणि हो अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!
    #upwas #fastingspecial #chaturmasspecial #maharashtrianthecha #navratrispecial
    How to Make Upvasacha Thecha
    How to make Ginger Thecha
    How to make Special Upvasacha Thecha
    How to make Upvasacha Kalvan
    How to make Sweet potato Recipes
    No onion no garlic food recipe, pure vegetarian food recipes, Anuradhas Recipes, Recipes by Anuradha

КОМЕНТАРІ • 15

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 7 годин тому +4

    दोन्ही रेसिपीज प्रथमच बघितल्या.छानच आहेत.

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 7 годин тому +1

    काकू दोन्हीही उपवासाचे पदार्थ खूप मस्त बनवले 👌👌👌👌

  • @minajshaikh693
    @minajshaikh693 5 годин тому +1

    Khup chan

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 7 годин тому

    मस्त चटणीचा प्रकार , नाविन्यपूर्ण !

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 7 годин тому

    नमस्कार ताई, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ketuue5333
    @ketuue5333 8 годин тому

    Chhan recipes. Nakki try karen. Thanks❤

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 3 години тому

    नमस्कार काकू दोन्ही उपवासाचे पदार्थ खूप छान चवदार आहेत मिरची जर byadgi घेतली तर जास्त तिखट होणार नाही माझी आजी रताळ्याची अशी भाजी करायची 😊

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 3 години тому

    सुंदरच ❤

  • @sharadayadav8950
    @sharadayadav8950 8 годин тому +1

    उपवासाचा डोसा रेशिपी सांगा

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 8 годин тому

    🎉mast 😊

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 Годину тому

    मस्त ❤

  • @swatijoshi519
    @swatijoshi519 8 годин тому

    Màst

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 3 години тому

    Donihi recipes khup chan. Hyderabad la Allam chutney khalli hoti, tyanchya kadun recipe ghetali hoti. Tikade chincha ani gul ghaltat. Ti pan chan lagate. Kalwan mastach.

  • @dhanashrijoshi8726
    @dhanashrijoshi8726 6 годин тому

    जास्त तिखट वाटते

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  39 хвилин тому

      नाही रंग मात्र लाल आला आहे तूम्ही कमी तिखट करू शकता