Mandu (Mandav) | Mandu Fort | Madhya Pradesh | मांडू (मांडव) | मांडू किल्ला | मध्य प्रदेश |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Mandu (Mandav) | Mandu Fort | Madhya Pradesh | मांडू (मांडव) | मांडू किल्ला | मध्य प्रदेश |
    नमस्कार मंडळी..
    आज महेश्वर येथून मी निघालो आहे आता मांडू अर्थात मांडव किल्ला किंवा मांडवगड ह्या ठिकाणी..
    आजचे मांडू,मांडव मांडवगड हे क्षेत्र नर्मदा परिक्रमा करणाऱ्या असंख्य भाविकांच्या परिक्रमा मार्गातील ऐक मोठे स्थान आहे, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना मदवगड मधे यावे लागते असे सांगितले जाते
    साधारण आठव्या शतकात परमार राजवंशाचे इथे साम्राज्य होते, परमार राजवांशनी सुमारे पाचशे वर्षे इथे राज्य केले आणि ह्याच काळात इथे शुर पराक्रमी, राजा भोज ह्यांची पण राजवट होती, राजाभोज ह्यांच्या काळात हा प्रदेश खूप समृद्ध होता तेव्हा त्यांची राजधानी ही मांडव पासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धार ह्या शहरात होती आणि मांडू ही त्यांच्या राज्याची सीमा मानली जात असे.
    पुढे कालांतराने इथे सतत आक्रमणे होत राहिली आणि नंतर मुघलांनी हा प्रदेश आपल्याल ताब्यात घेतला,पुढे पेशव्यांच्या अधिपत्याखाली मराठेशाही येताच त्यांनी मुघलांना इथुन हद्दपार केले आणि बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्य अटके पार घेऊन गेले हा इतिहास आहे..
    दिल्ली मधे अकबर चे शासन असताना मांडू प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता, आणि त्याचा म्हणजेच अकबराचा ह्या भागा करीता एक सेनापती होता ज्याचे नाव होते वाजीद आली खान, ह्याला सर्व लोक बाज बहदुर ह्या नावाने त्याला बोलवत असे कारण म्हणे वाजीद आली हा घारीच्या सारखा चपळ होता आणि अत्यंत चपळाईने शत्रूवर हल्ला करत असे
    वाजीद आली खान ला शिकारीची अवड होती तसेच त्याला गाणे,संगीत ह्यांची पण आवड होती ,एकदा तो शिकार करण्यासाठी धर्मपुरी नावाच्या गवावपशी शिकार करण्यासाठी गेला होता,त्यावेळी नर्मदा नदीच्या तटावर त्याला सुंदर गाण्याचा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं वाजीद आली गेला असता त्याला,तिथे तगाण्याची साधना करत असलेली रुपमाती दिसली,तिच्या मधुर आवाज ऐकून त्याने रुपामती ला मांडव मधे येऊन आपली कला सादर करण्यास सांगितले, त्यास रुपमतीचे घरचे लोक तयार झाले,पण त्यांनी एक अट ठेवली, ती अट होती की रानी रूपमती हि रोज सकाळी सर्वप्रथम नर्मदा मातेचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत असे आणि मांडव मधून नर्मदा मातेचे दर्शन होणार नाही,त्यामुळे राणी रूपमाती ह्यांनी मांडव मधे येणास असमर्थता दर्शवली,हे कळताच बाज बहादुर ने आपल्या लोकांना आदेश दिला की मांडू मधे जे सर्वोच्च शिखर अथवा स्थान असेल त्या ठिकाणी ताबडतोप असे मंडप उभारावे जिथे उभे राहून राणी रुपमती ला रोज सकाळी नर्मदा मातेचे दर्शन घेता येईल..आणि त्याच्या आदेशानुसार त्याच्या लोकांनी एकाच रात्रीत मांडू मधल्या सर्वत उंच ठिकाणि मंडप उभारला ज्याला आज रूपमति पॅव्हेलियन असे नामकरण करण्यात आले आहे...
    मित्रांनो ह्या माहिती व्यतिरिक्त अजून बरीच माहिती मी व्हिडीओ मधे दिलेले आहे,तर आपण सर्वांनी हा विडिओ नक्की बघावा
    Watch Entire Ujjain Omkareshwar series :
    • Trip to Ujjain Omkares...
    #मांडू
    #मांडवगड
    #मध्यप्रदेश
    Your queries
    mandu madhya pradesh
    mandu
    madhya pradesh tourism
    mandu tourist places
    mandu tourism
    mandu fort
    मांडू मध्य प्रदेश
    mandu mp tourism
    jahaz mahal mandu madhya pradesh
    history of mandu madhya pradesh
    mp tourism
    best places to visit in mandu
    madhya pradesh tourist places
    मांडू का इतिहास
    history of mandu
    रूपमती और बाज बहादुर की प्रेम कथा
    mandu tourist place
    mandu madhya pradesh tourist places

КОМЕНТАРІ • 16

  • @rishikeshans
    @rishikeshans 29 днів тому +1

    khup sunder pravas.......sarva mahiti apratim......specially Mandu fort 🤩

  • @jaykisanpsm5999
    @jaykisanpsm5999 День тому +1

    मस्त माहिती दिली sir🙏🙏

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  День тому

      नमस्कार..
      आपले मनापासून धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @TravKedar
    @TravKedar 29 днів тому +1

    आपली शुद्ध वाणी ऐकायला खूप छान वाटते
    🙏
    ह्या सुंदर चलचित्रासाठी आभार
    🙏🌹🙏

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  28 днів тому

      नमस्कार सर..
      आपण नेहेमीच मला खूप प्रोत्साहन देत असतात ज्यामुळे मला काम करण्याचा हुरूप येतो..
      आपले असेच स्नेह मिळत रहावे ही विनंती.,
      Stay Connected 👍🏻

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 28 днів тому +2

    मांडवगड इथे पाहण्यासारखी खुप प्रेक्षणिय स्थळे आहेत.घळीत दडलेले हे निलकंठेश्वर महादेव मंदिर फारच छान व रमणीय आहे.आसपासच्या परिसराचे वर्णन तुम्हि सविस्तर व उत्तम केले आहे.तुमचे व्हिडीओ व सांगण्याची पद्धत यामुळे पाहण्याचे समाधान मिळते. राणी रूपमयी पॅवेलियन, हिंडोल महल, जहाज महल यांची महिती व त्याच्या कथा यानी सम्रुद्ध असा हा भाग खुप माहिती देउन जातो.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  27 днів тому +1

      नमस्कार..
      आपण केलेल्या कमेंट नेहेमी खूप छान असतात आणि,मी केलेले काम आपल्या दृषटीकोनातून कसे झाले आहे हे समजायला पण खूप मदत होते.. ह्यामुळे मला माझ्या कामात काही त्रुटी असेल तर ती देखिल आपल्या सुंदर कॉमेंट मधून लक्षात येते..
      आपले कायम असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती..🙏🏻

  • @aniruddhapanse8113
    @aniruddhapanse8113 Місяць тому +2

    सर सुंदर ऐतिहासिक वर्णन एवढी माहिती कुठून तुम्हाला मिळते..... सुंदर वास्तू....... सर सध्या मुक्काम कुठे आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому +1

      नमस्कार साहेब.
      इतिहासाची ही माहिती सार्वजनिक उपलब्ध आहे,आणि काही गोष्टी प्रवासात तर काही माहिती आपण त्या त्या भागात प्रत्यक्ष भेट दिल्यावर मिळते..

  • @aniruddhapanse8113
    @aniruddhapanse8113 Місяць тому +2

    सर एकदा तुळजापूर,अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि कोल्हापूर अशी दोन ते तीन दिवसांची ट्रीप काढा प्रसन्न वाटेल.मी वर्षातून एकदा जातोच.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому +1

      नमस्कार साहेब
      आपण दिलेली कल्पना छान आहे..
      पुढे भविष्यात असा प्रवास केला तर नक्की त्यावर पण माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की करेन..
      Till Then Stay Connected 👍🏻

  • @svGA01
    @svGA01 28 днів тому +2

    7:01 गुंज

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  28 днів тому +1

      नमस्कार सर
      मागील वेळी "सात्विक संताप" समजला होता ..
      हे समजले नाही🙏🏻
      कृपया ह्या बाबतीत अजून थोडा विस्तार केला तर समजण्यास मदत होईल..
      धन्यवाद 🙏🏻

    • @svGA01
      @svGA01 28 днів тому +2

      ​@@explorewithcarlekarI think the red seeds that the woman is selling are called "gunj" गुंज in Marathi

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  26 днів тому

      Thank you sir..
      Great abservation..👍🏻
      Even I missed this point..Thanks again