इरशाळवाडी - एक आठवण! | In memories of Irshalwadi | Raigad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2023
  • रानवाटा ने २०१२ मध्ये चित्रित केलेले इरशाळवाडी गाव आणि इरशाळगड नक्की बघा:
    • Irshalgad Fort | इर्शा...
    इरशाळवाडी गावावर दरड कोसळली ही घटना तीव्र वेदनादायी आहे. त्यात दुर्दैवाने ज्यांना आपले जीव गमवावे लागले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
    २०१२ साली किल्ल्यांचं शूटिंग करताना देवेशुच्या ओळखीमुळे इर्शाळ गड केला होता. त्यावेळी या वाडीत २ दिवस राहिलो होतो. गावकऱ्यांशी गप्पा मारल्या, तिथलं जीवन जाणून घेतलं, शूट केलं. आजपर्यंत माझ्यासारखे अनेक ट्रेकर्स इर्शाळ वाडीत राहून गेले असतील, त्यांनाही इथल्या गावकऱ्यांनी प्रेमाने निवारा दिला असेल..खाऊ घातलं असेल . आता त्याच्या फक्त आठवणी उरल्या आहेत.
    यातूनही जे आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करणार आहेत.. त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहूया!
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    UA-cam: / raanvata
    Swapnil Pawar Instagram:
    / the.lazy.backpa. .
    Camp on Hills Instagram:
    / camp_on_hills

КОМЕНТАРІ • 573

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Рік тому +306

    खुप निरागस लोक असतात ही,,sir लाईफ मध्ये खुप श्रीमंत पाहिली,,खुप श्रीमंत माणसं अनुभवली,, पण ती सगळी खोट्या मुखवटायची दुनिया च होती, 🤷🏻‍♀️कधीच मनाला शान्ति आणि समाधान वाटले नाही,, पण जेव्हा मी माझ्या फ्रेंड्स ग्रुप बरोबर पहिल्यांदा ट्रेक वर गेले,, या डोंगर भागात राहऱ्या या लोकवस्थी पहिली त्याच जण जीवन,, त्याचा मनाचा तो मोठे पणा पहिला तेव्हा मन कुठे तरी आनंदी प्रसन्न झाले,, आणि जीवनाचा खुप मोठा धडा शिकून गेले,,शहरातील ही स्वतःला श्रीमंत म्हणून घेणारी माणसं,, कितीही गरीब आहेत हे समजलं,, sir आज ही न्यूज आयकून खुप वाईट वाटले 🤷🏻‍♀️,,, देव चांगल्यात माणसांच्या मागे का लागतो,, हे च समजत नाही,, 🙏🏻😔

    • @bharatisalunke-uk1sn
      @bharatisalunke-uk1sn Рік тому +7

      होना... खरंय.... देवाला पण चांगल्या माणसांची गरज असेल 😔😔

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 Рік тому +1

      खर आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @aarzooaarzoo6993
      @aarzooaarzoo6993 11 місяців тому

      Yes you are ryt

    • @jayramwagh3168
      @jayramwagh3168 11 місяців тому +2

      खुपच छान चित्रण केले आहे . आज खरोखर खुपच वाईट वाटले अशी वेळ नको यायला होती .

    • @balasahebpatharut8053
      @balasahebpatharut8053 11 місяців тому

      100% true

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 Рік тому +291

    मृत पावलेल्या गावकर्यांना 'भावपूर्ण श्रध्दांजली' या गावातल्या वाचलेल्या लोकांना सावरायला बळ मिळो.

  • @anilmandani8501
    @anilmandani8501 Рік тому +68

    मोठे शहर पासुन लांब राहणारे हे ग़रीब कष्टकारी जीवन जगणारे निष्पाप लोक यांचा मरण या प्रकारे झाल्यांने मन उदास झाले। सदगत आत्मा यांना श्रद्धांजलि 🙏😢😢

  • @sachinlavatepatil0909
    @sachinlavatepatil0909 Рік тому +168

    त्या अप्रतिम गावाला त्या गावातील गोड माणसांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤😢

    • @ziva9779
      @ziva9779 11 місяців тому

      Bhavpurn shraddhanjali

  • @travellingbeardo3886
    @travellingbeardo3886 Рік тому +114

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या, प्रेमाने जेऊ घालणारी माणसं आणि त्याचे हसरे चेहरे डोळ्या समोर आले आणि आपसूक डोळ्यात पाणी आले. खूप वाईट घडलं. देव नेहमी साध्या, प्रेमळ, गरीब लोकांची परीक्षा घेतो असं वाटतं 😞😞😞

  • @bhagwanwakade4606
    @bhagwanwakade4606 Рік тому +18

    भावा, तुझे व्हिडिओज मी नेहमी पाहतो. तुझी फोटोग्राफी, कॅमेऱ्याचे अँगल्स, प्रवास वर्णन, माहिती हे सगळं अप्रतिम असतच पण यासोबतच तू गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या वस्त्या, तिथे राहत असलेले गोरगरीब लोक, महिला, लहान मुले, त्यांची पडकी घरे, तेथील लोकजीवन हे सगळं तू आवर्जून दाखवतोस. त्यांच्या घरचं आदरतीथ्य तू अतिशय प्रेमाने स्वीकारतोस, त्यांची चटणी भाकरी आनंदाने खातोस या सगळ्या गोष्टी मनाला खूप भावतात..
    आज इरशाळवाडी दुर्घटनेमुळे तुझ्या तेथील आठवणी जाग्या झाल्या आणि तू हा व्हिडिओ शेअर केला.
    इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि तसेच तुझ्यातील हा माणुसकीचा झरा असाच अखंड वाहत राहो ही सदिच्छा..

  • @udayniture
    @udayniture Рік тому +42

    😭जे कालवश झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जे वाचले त्यांना आई जिजाऊ उभं रहाण्याची ताकद देवो हीच प्रार्थना
    एका काळी हाच व्हिडिओ मनाला आनंद देतं होता पण आज हाच व्हिडिओ पाहून मन हेलावून गेले 😭😭

  • @Sandeep83836
    @Sandeep83836 Рік тому +75

    या निसर्गरम्य गावातील मृत पावलेल्या गावकर्‍यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢🙏

  • @manojguhe3753
    @manojguhe3753 11 місяців тому +38

    आमच्या आदिवासी लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 11 місяців тому +32

    दुर्घटनेत म्रुत्यु पावलेल्यां सर्व लोकांना भावपुर्ण श्रद्धांजली..

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Рік тому +32

    खुपच मनाला चटका लावणारी घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली रानवाटाकडे हे फुटेज असल्यामुळे हे आम्हाला पाहण्यास मिळाले पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sumitpawar3292
    @sumitpawar3292 Рік тому +60

    इर्शाळवाडीवर दरड कोसळली ही बातमी अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @vagheshwarharigramvlogs9684
    @vagheshwarharigramvlogs9684 11 місяців тому +30

    आमच्या आदिवासी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭

  • @govindwayal
    @govindwayal 11 місяців тому +13

    सर्व आदिवासी डोंगर दऱ्यात राहणारे लोक असेच प्रेमळ आणि निस्वारथी आसतात, आमच्या गावाला एकदा भेट द्या 40 उंबर्याच गाव आहे

  • @kusumkarvande6959
    @kusumkarvande6959 Рік тому +7

    तुमच्या सारखी मानसं हवी आहेत , आमच्या लोकांना साठी, तुम्हाला खुप आशिर्वाद सर राजकीय लोक फक्त समाज्याल दाखवण्यासाठी आहेत,plzसारकार कडुन येणारी मदत त्या प्रत्येका कडे पोहचवण्यासाठी प्रयत्न करा ,माझी कळकळीची विनंती आहे,ही सह्याद्रीच्या कुशीत वसलेली मानसं,खुप भावनिक असतात, शहरात ला माणूस त्यांच्या कडे गेली तर देव सारखी पुजतात,ते पटकी गोधडी घेऊन झोपी जातील पण तुम्हाला मात्र चांगली गोधडी देतील ,सर तुम्हाला खुप आशिर्वाद

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Рік тому +21

    मृत पावलेल्या गावकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. व आपण करीत असलेल्या सेवा कार्याबद्दल शुभेच्छा.🙏

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Рік тому +14

    भाऊ तू ही परमेश्वरी अंश आहेस. तुला या कार्यात उदंड आयुष्य लाभो.

  • @maulienterprisesenterprise5932
    @maulienterprisesenterprise5932 Рік тому +12

    सर तुमच्या कार्यास माझा सलाम आणी त्या निसर्गातील देव माणसांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 Рік тому +8

    कीती जुनी आठवण सांभाळुन ठेवले आहे. हे आता बघता क्षणी डोळ्यात पाणी आले. आम्ही फक्त बघु शकतो. तुम्ही स्वतः तिथल्या गोष्टी ति लोक हा अनुभव किती गोष्टी शिकवून जातं.😔😢

  • @pankajkhotra7853
    @pankajkhotra7853 11 місяців тому +39

    सर्व मृत पावलेल्या माणसांना भावपूर्ण श्रदधांजली 🙏🙏

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 11 місяців тому +11

    आमच्या आदिवासी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली😮😮😮😮

  • @user-hf3bb3tq3h
    @user-hf3bb3tq3h 11 місяців тому +5

    अतिशय सुंदर देखणे गाव व गावातील ग्रामस्थ त्यांच्यावर खूप वाईट प्रसंग आला.😢...
    जे ग्रामस्थ ह्या संकटातून वाचलेले आहेत देव त्यांना जगण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना.

  • @ghatibheti
    @ghatibheti Рік тому +25

    ही लहान मुले पाहून काय परिस्थिती झाली असेल याचा विचार देखील मनाला थरकाप आनत आहे..😭😭 खुप वाईट..

  • @kailashgaikwad9387
    @kailashgaikwad9387 11 місяців тому +5

    ही निरागस्त्ता पाहून मन हेलावून गेल
    निरागस लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kundlikpatekar1411
    @kundlikpatekar1411 11 місяців тому +7

    माझ्या आदिवासी बांधवाना ईश्वरा आपल्या सेवेत घे... सर्व मृत्यू पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Рік тому +21

    किती सुंदर गाव होत अगदी गोष्टीत मधल्या गावा सारखं पण एका रात्रीत होत्याच नव्हतं झालं 😢

  • @suhasmane4863
    @suhasmane4863 Рік тому +11

    खरोखर सर कराव तितकं कौतुक सर
    या आठवणी तुम्ही दिल्यात.
    डोळे भरून आले सर
    लहान मुलांचं निरागस हसू मनाला चटका लावून जात!.
    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

  • @bharatikale591
    @bharatikale591 Рік тому +13

    भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमच्या सारखी माणसे अजून असावीत 🙏

  • @kokancashew247
    @kokancashew247 11 місяців тому +5

    अप्रतिम चित्रीकरण..... डोळ्यात पाणी आले.. भावपुर्ण श्रद्धांजली

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Рік тому +8

    खुप दुःख झाले आज. खर तर हे सगले माणस येणारा जाणारा माणसाला जेवण पाणी देत होते. आज फक्त आठवणीत राहतील. खुप प्रेमाणे बोलत आसे आवर्जून विचार पुस करत होते. दही दुध पिणार का विचार फुस करत होते. खुप प्रेमळ,कष्टकरी, ईमानदार होते. कधी कोणाला त्रास दिला नाही.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 11 місяців тому +9

    ईरशाळवाडीतील सर्व प्रेमळ निरागस माणसांना भावपूर्ण श्रद्धांजली😥💐💐💐

  • @dbandgarsspecialmathematic7913

    या गावातील लोकांचे शासनाने कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं पाहिजे... त्यांच्या मुलांना चंगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन प्रत्येक घरातील किमान एका तरी मुलाला सरकारी नोकरी मध्ये सामील करून घेतलं पाहिजे... आणि आता जी घटना झालेली आहे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या आठवणीसाठी स्मारक बनवलं पाहिजे

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Рік тому +6

    😢😢या गावातील निरागस निष्पाप मृत पावलेल्या गावकऱ्यांना
    Ilभावपूर्ण श्रद्धांजली ll🙏🙏💐💐

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n Рік тому +3

    जे झाले ते खूपच दुःखदायक आहे. वाचलेले आहेत त्यांचे पुनर्वसन तुमच्यासारखे तरुण करायला पुढे येतायत हे खरच खूप कौतुकास्पद आहे तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा . ईश्वर तुम्हाला बळ देवो.

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w Рік тому +3

    झाडं तोडल्याने हा सर्व विनाश झाला आहे आणि एक सुंदर गाव नाहीसे झाले. सर्व मृत बंधू-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली !

  • @shrirammalunjkar1906
    @shrirammalunjkar1906 11 місяців тому +6

    सर्व गावकरयां ना भावपूर्ण श्रंद्धाजलि नाशिक जि😢😢

  • @swastiklad1738
    @swastiklad1738 11 місяців тому +1

    झाल्यानंतर सर्वच येतात मदतीला... पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते... पण तुमची जे कार्य आधी पासून करताय त्याला सलाम 🙏

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 Рік тому +4

    सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
    आपण सामाजिक बांधिलकी जपून जे काम करत आहेत. आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 Рік тому +1

    जे लोकं मृत पावली आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जी लोकं जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही जे समाज कार्य हाती घेतले आहे त्यामुळे तेथील लोकांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळेल.

  • @ramdasmore6913
    @ramdasmore6913 Рік тому +1

    दादा तुम्ही खुप छान काम केलं आहे..
    आज या माणसांना खुप गरज आहे.
    गरीब आणि गरिबी काय असते हे आम्हाला माहीत आहे.ज्यांना देव आज्ञा झाली त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.जे आहेत त्यांना देव सावरायला शक्ती देवो हीच प्रार्थना.
    कवी.रामदास मोरे.

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew Рік тому +5

    दादा तूम्ही देव दूत झाले आहे परमेश्वर त्यांना शांती शांती देवो

  • @shrisagare8771
    @shrisagare8771 Рік тому +1

    🙏💐खुप वाईट घटनां घडली.या निरागस लहान मुलांना पाहून खूप वाईट वाटतंय.या घटनेनत जे लोक बळी गेलेत. त्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏💐💐

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +5

    आश्रू अनावर झालेत लहानग्याःना पाहून..काळ खरच सोकावतोय..शब्दात व्यक्त करू शकत नाही अतीव वेदना होतायेत मनाला.😢भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 11 місяців тому +1

    सर तुमच्या या कार्याला माझा मनापासून सलाम,,, निसर्गाची नाळ जपणारी ही भोळी भाबडी माणस होती पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे मनं सुन्न झाले आपोआपच डोळ्यात 😭😭पाणी आले, देवा, देवासारख्या माणसाची अशी परीक्षा घेवू नको,👏 गरिबांनावर झोपेत 🌧️निसर्गाचा असा कोप होऊ देवू नकोस,,, माझ्या सर्व ह्या माता पिता बंधू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली 👏

  • @ghanetaraneHindisongs
    @ghanetaraneHindisongs 11 місяців тому

    खूप त्रास होतो, खूप वाईट वाटत. हे बघून, डोंगरात राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. साधी, सरळ, किती निरागस लोक आहेत.

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 11 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली, देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, इरशाल गड दूर्घतना प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tusharpatil6698
    @tusharpatil6698 11 місяців тому +1

    देवा थोडं तरी वाटू दे ...या निरागस मुलांवर संकट कोसळताना😢😢😢😢😢😢😢

  • @vishaljadhav4077
    @vishaljadhav4077 Рік тому +1

    ह्या सर्व गोष्टी कश्या मुळे घडत आहेत त्याचा मुळाशी जाऊन बघितल पाहिजे अणि त्यावर विचार करायला हवा

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 11 місяців тому +2

    खूपच गोड,हृद्य स्मृती,,,निरागस मृत गावकऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @amarsolkar6026
    @amarsolkar6026 11 місяців тому

    खूप वाईट झाल व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल खरच असा प्रसंग कोणावर ही येवो नये

  • @vidyabarangule5407
    @vidyabarangule5407 Рік тому +2

    आपण करत आहात ते कार्य फार मोलाचे आहे, त्यासाठी फार मोठ मन लागतं, सलाम तुम्हाला आणि टीम ला, देव करो तुम्हाला खूप यश मिळो 🙏🙏🙏🙏

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Рік тому

    सुंदर जीवन होतं यार
    तुम्ही केलेल्या प्रयत्ना मुळे
    शाळा झाली व आज त्यातली काही जन वाचले
    पण
    या दुःखद घटने मुळे मन हेलवून गेलं

  • @snehalatakumbhar9266
    @snehalatakumbhar9266 11 місяців тому +12

    Salute you all sir,n भावपूर्ण श्रद्धांजली

    • @dattatraynanavere8724
      @dattatraynanavere8724 11 місяців тому

      Bhawapuran saradhanjali 💐💐💐jay jiwant aahet tyana sawaranyas bal milo

  • @SP_Patil1992
    @SP_Patil1992 Рік тому

    ही लहान मुलं पाहितले आणि मनात एक विचार आला की या निरागस मुलांनी काय गुन्हा केला की, त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचं वय तर आता कोठे खेळण्याचे होते.

  • @yogeshanilvasane5664
    @yogeshanilvasane5664 Рік тому +4

    भूतकाळाला सर्व गावकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जळगाव जिल्हा

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 11 місяців тому

    खूप छान माहिती आहे, ही माणसं अगदी मनापासून प्रेम करतात निःस्वार्थ असतात कोणताही हेतू नसतो, तुमच काम खरंच कौतुक करण्यासारखा आहे

  • @maxboy9450
    @maxboy9450 Рік тому +1

    खूप वाईट झाल देवा अका केलस
    थोडी शी सुधा दया नाही आली का रे देवा
    इतका कठोर का झालास रे देवा
    ज्यानी आजुन आई वडिल देखील ओलखता नाही रे आल अस लहान मुलाची देखील दया नाही का रे आली
    इतका का कठोर झालास रे देवा का झालास 😭😭😭😭

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 11 місяців тому

    अशी घटना पुन्हा घडू नये .ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 Рік тому +5

    🙏🏼🙏🏼 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @premnathpotkule
    @premnathpotkule 11 місяців тому

    tumcyasarkhe changle manse aahet ajun ,thankyou so much

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Рік тому +1

    छान अगोदरच शुटिंग, खूप गरीब , प्रामाणिक निरागस माणसं .,या वाडी चे चांगल्या जागेत पुनर्वसन व्हावे ही सदिच्छा.

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Рік тому

    Dada ya video madhun tya lokanchi khup mothi aathvan tu share keli tyanche, gav, sadhi rahni, tyanche ayushacha pravas kiti kathin asto he dakhavle. Thanks ani ya ghatnetil sarvana bhavpurvak shardhanjali. 🙏🙏

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 11 місяців тому +4

    स्वर्गवासी गावकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @vishallovanshi1215
    @vishallovanshi1215 11 місяців тому +3

    रडु आवरत नाही साहेब... भावपुर्ण श्रद्धांजली... कर्जत- रायगड...

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Рік тому

    भाऊ आपलीं जबाबदारी अजुन वाढली आहे आता त्या अनाथ मुलांच्या पाठीशी आपण नक्कीच खंबीर पणे उभं राहून त्यांना मायेचा आधार द्याल हिच खरी ईश्वर सेवा आहे 😢😢😢😢😢😢

  • @satishbhamre320
    @satishbhamre320 11 місяців тому +2

    😭😭😭😭😭😭 मित्रा ते मुल आणि गाव बघूण डोळ्यात पाणी आल 🙏🏻

  • @bhaskarkalekar3159
    @bhaskarkalekar3159 Рік тому +1

    सर, सलाम आपल्या समाज कार्याला.

  • @yashwanttambade3086
    @yashwanttambade3086 11 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली, अतिशय मन हेलावून टाकणारी घटना

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 11 місяців тому

    मृतात्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏आपल्या स्तुत्य कार्यक्रमास वंदन.

  • @manishakarhate2091
    @manishakarhate2091 Рік тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐💐

  • @madamkavathekar5200
    @madamkavathekar5200 11 місяців тому

    असला प्रसंग कुणावर ही येऊ नये आदिच तेच्या नशिबी गरिबी आणि हा प्रसंग लहान मुलाचे खुपच वाईट वाटते 🙏🙏🙏 भावपुर्ण श्रध्दाजली

  • @tejas7337
    @tejas7337 11 місяців тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली ❤😢

  • @saishreeutube3302
    @saishreeutube3302 11 місяців тому +1

    खूपच दुःखद घटना 😔😔😔❤️भावपूर्ण श्रद्धांजली 😕😕😕😢😢😢

  • @IndianRouter
    @IndianRouter Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshpawar3398
    @santoshpawar3398 11 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि गोड कष्टकरी यांना 🙏

  • @MrAvinashlad
    @MrAvinashlad 11 місяців тому

    नाही ईच्छा झाली पुर्ण बघायची, आता कुठे असतील हाच विचार मन सुन्न करतो.

  • @pravin1122
    @pravin1122 Рік тому +1

    अतिशय दुःखद घटना.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @krishnaborade3485
    @krishnaborade3485 11 місяців тому

    दादा तुमि खूप छान कार्य करत होते आणि आजून पण करता धन्यवाद दादा ❤️👏👏

  • @kamleshraut2759
    @kamleshraut2759 11 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

  • @balushid
    @balushid 2 місяці тому

    खूप खूप आभार तुमचे जुनी आठवण दाखवली सुंदर गाव असेल

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 Рік тому +1

    मन विषण्ण करणारी घटना घडली. निष्पाप जीव गेले. भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @krantivartak2282
    @krantivartak2282 Рік тому +1

    खुप चांगले कार्य करत आहेत

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 11 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली😢 सरकार आणि चुकीच्या पद्धतीने झाडाची तोड मुलेच हे रुद्र रूप निसर्ग ने घेतले हे कधी थांबणार

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 11 місяців тому

    खरोखर हृदयद्रावक,मन हेलावून टाकणारी दृश्य पहिलं की वाटत हाच आपला भारत देश का ? की इतकी असमानता दिसून येते,त्या आत्म्यांना शांती मिळोत,त्यांच्या नातेवाईकांना परमेश्वर ताकत देवो

  • @sambhajipashte-wt2mq
    @sambhajipashte-wt2mq Рік тому

    खूप वाईट झालं नाही बघवत ही व्हिडिओ.

  • @darshv86
    @darshv86 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @user-kt3ej9vd9m
    @user-kt3ej9vd9m 11 місяців тому

    दुःखातून लवकर सावरा हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 Рік тому +2

    खूपच दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 11 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 11 місяців тому

    सारखा सारखा रान वाटा चा हा विडिओ बगतो ही वाडी वाडीतील माणसं परत ही वाडी अशीच उभी राहूदे हीच पार्थनाकरतो देवा कडे

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 Рік тому +4

    ती घर, ती माणस, ती लहान मुल, ते निरागस चहर्यावरील भाव कही काही नाही राहील 😢😢. राहील्या त्या फक्त आठवणी.

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 11 місяців тому

    किती सुंदर काम केलं तुम्ही🙏🙏👍 great work

  • @amolrakhunde3308
    @amolrakhunde3308 Рік тому

    अतिशय वाईट झाले अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये .....

  • @mahadevkolse7557
    @mahadevkolse7557 11 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @MT-xl7xu
    @MT-xl7xu 11 місяців тому

    Bhavpurn sradanjali 💐💐💐💐

  • @Aruadivashi
    @Aruadivashi 11 місяців тому

    कुठलाही गर्व नसलेला माणूस म्हणजे आदिवासी माणूस❤

  • @santoshsargar2200
    @santoshsargar2200 11 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली शिवरा राहिलेल्या सर्व लोकांना चांगलं सुखदायी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @MajleshaharDalviwastiShe-fz5re

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐💐😭😭

  • @maulikhade5392
    @maulikhade5392 Рік тому

    हाच साधेपणा मनातला हिंदोळे देण्यासाठी भाग पाडतो किती निरागस चेहरे आहेत निसर्ग इतका कसा कठोर झाला असेल बोलण्यासाठी शब्द नाहीत

  • @rupalijitendra
    @rupalijitendra 11 місяців тому

    bhavpurn shradhanjali