जगप्रसिद्ध सावंतवाडीची लाकडी खेळणी|| Wooden Toy Market Sawantwadi 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2023
  • सावंतवाडी मधील लाकडी खेळण्यांची बाजारपेठ | Sawantwadi Wooden Toy Market | Chitar Ali | India
    Sawantwadi
    सावंतवाडी मधील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची बाजारपेठ. भारतातील लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट.
    महाराष्ट्रतील सावंतवाडी तालुक्यात असलेली हि जगप्रसिद्ध बाजारपेठ, चितार अळी.
    सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा यापासून चालत फक्त ५ ते १० मिनिटे अंतरावर आहे, ही चितार अळी. येथे पांगारा लाकडा पासून खेळणी आणि वस्तू बनवले जातात.
    सावंतवाडी संस्थानाला ३५० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. जवळ जवळ तेव्हा पासूनच हि कला येथे जोपासली जात आहे. सावंतवाडीच्या मालसावंत भोंसले घराण्याने नेहमीच कला आणि शिक्षणाला प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला आहे.
    आधी या वस्तूंचा वापर दैनंदित जीवनात होत असे. लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना, त्याकाळी अशा लाकडी वस्तू, भेट म्हणून देण्याची परंपरा होती.
    लाकडापासून बनवलेली फळं एवढी खरी वाटत असतात कि लोकांना ती खाण्याचा मोह झाला नाही तर नावलच. पांगारा झाडाची लाकडं वनामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. पावसात भिजवून नंतर वर्षभर उन्हामध्ये सुकवली कि हि लाकडं हलकी होतात. त्यानंतर कारागीर आपल्या कौशल्याच्या सहाय्याने वेगवेगळी फळं, खेळणी आणि वस्तू बनवतात. चितारअळी पासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर याचे कारखाने आहेत.
    या लाकडी वस्तूंच्या बाजारपेठेमुळे सावंतवाडीचे नाव जगभर पसरले आहे. आता जवळ जवळ चौथी ते पाचवी पिढी हि कला येथे सांभाळत आहे. आजकालच्या लहान मुलांना मोबाइल हे एकच खेळणे माहीत आहे. त्यांना या सर्व वस्तू ओल्ड फॅशन वाटतात. पण इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण नक्कीच होईल.
    सध्या चिनी खेळण्यांची घुसखोरी, नवीन मशिनरी, कारीगरांची कमतरता या सर्वांना तोंड देत हि चितारअळी आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे . म्हणून जर कधी कोकणात आलात तर सावंतवाडीला या चितारअळीला जरूर भेट द्या.
    कोणाला खेळण्यांची ऑर्डर द्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
    If you want to order toys, contact the number given below.
    pramod ramdas chitari- 9420742719 , 8550966585.
    Pallavi Chitari- 8975664275, 02363 - 274713.
    Manjunath Gudigar - 9673741009, 9420144846.
    Manavi Gudigar - 9422174613.

КОМЕНТАРІ • 9

  • @rajatbabadi8405
    @rajatbabadi8405 8 місяців тому +1

    खुप छान..खूप खूप धन्यवाद...सुंदर वाडी मधील सुंदर वस्तू दाखवल्या बद्दल🙏🙏

  • @user-wv1ke3et1p
    @user-wv1ke3et1p 8 місяців тому +4

    Umesh Sir tumhi khup chan video banvat asat khup kahi nav navin baghayla milt amhala ekdam Jhakkas sir 👍👌

  • @sainathparab4672
    @sainathparab4672 8 місяців тому +1

    खूप सुंदर भावा..

  • @manmansi4181
    @manmansi4181 8 місяців тому +1

    खुप खुप छान
    मनोज तुळसकर
    मुंबई
    गाव तुळस
    तालुका वेंगुर्ले