Uk मालवणी माणूस Uk malvani manus
Uk मालवणी माणूस Uk malvani manus
  • 131
  • 107 617
यशवंत गड किल्ला || Yashwant gad Redi Fort 2024
Yashwant gad (Redi fort)
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्‍यावरील शेवटचा किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड. लोह, मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती ह्यामुळे प्रसिध्द असलेले रेडी गाव प्राचिन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिध्द होते. या गावात समुद्रकिनारी असलेला हा अप्रतीम किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडीमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला.
इतिहास :
इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजीमहाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती करुन किल्ला मजबूत बनविला. १८१७ मध्ये पोर्तुगिजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंड सावंतांकडून हार पत्करावी लागली
पहाण्याची ठिकाणे :
यशवंतगडाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची बांधणी व गडावरील मोठ्या प्रमाणात आस्तित्वात असलेले अवशेष होत. रेडी गावातून गडावर प्रवेश करण्यासाठी छोटेखाणी प्रवेशद्वार व त्याचे रक्षण करणारे बुरुज व तटबंदी नजरेस पडते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. पायवाटेने चालत गेल्यावर थोड्या उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या पुढे २० फूट खोल खंदक लागतो. हा खंदक पूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेला असून तो दगडांनी बांधून काढलेला आहे. खंदकाच्या पूढे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा पहिल्या दरवाजाच्या काटकोनात आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. पुढे थोड्या उंचीवर तिसरा दरवाजा(मुख्य प्रवेशद्वार) लागतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या डाव्या हाताच्या बुरूजात छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळण रस्ता (भूयार) आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे. गडावरील सर्व दरवाजांच्या कमानी शाबूत आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोर व उजव्याबाजूला पहारेकर्‍यांसाठी बांधलेल्या कमानदार खोल्या (देवड्या) आहेत. चौथा दरवाजा तिसर्‍या दरवाजाच्या काटकोनात असून त्यापूढे (अंदाजे ७ फूट लांब) बोगद्याप्रमाणे रचना केलेली आहे. आतमध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. या दरवाजाच्या बाजूने असलेली २० फूट उंच तटबंदी सर्व किल्ल्याला वेढते. बालेकिल्ल्यात आत शिरल्यावर आपल्याला राजवाडा आणि कचेरीची दुमजली इमारत दिसते. या इमारतीची रचना भुलभुलैयासारखी आहे. बालेकिल्ल्याचा १/३ भाग व्यापणार्‍या या इमारतीत फिरतांना आपण कुठल्या दालनातून कोठे आलो हे कळत नाही. इमारतीचा पहिला व दुसरा मजला शाबून नाही. पण तूळ्यांसाठी भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या व दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर असलेले दरवाजे, खिडक्या, कोनाडे, झरोके पाहाता येतात. या इमारतीच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झालेले आहेत. इमारतीच्या एका चौकात हौद किंवा तरण तलाव असून तो २०×२० फूट मापाचा आहे. त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. हौदाच्या काठावर दगडी स्तंभ असून त्यावर चुन्यात रेखलेली पानफूल आहेत. इमारतीच्या भूलभूलैयातून बाहेर पडल्यावर उत्तरेकडील व पूर्वेकडील तटात आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पहार्‍याच्या जागा पाहायला मिळतात. तटाच्या आत जाण्यासाठी चोर दरवाजांप्रमाणे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत. त्याच्या आत ३ फूट उंच भिंतीचा आडोसा केला असून त्या भिंतीच्या आड बसून दूर पर्यंतच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. उत्तर बुरुजावरुन अरबी समुद्र व रेडीची खाडी यांच्या संगमाचे अप्रतिम दृश्य दिसते. बुरुजावरील जंग्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या व्यतिरीक्त गडावर एक कोठारासारखी इमारत प्रवेशद्वारासमोर आहे. गडावर पाण्याच टाक, तलाव अथवा विहिरीचे अवशेष दिसत नाहीत. याशिवाय रेडी गावात स्वयंभू गणपतीचे मंदिर व माऊली मंदिर व रेडीचा समुद्रकिनारा पाहाण्यासारखा आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
रेडी हे गाव वेंगुर्ले शहरापासून २६ किमीवर आहे. मुंबई - कुडाळ - वेंगुर्ले - रेडी ह्या मार्गे किल्ल्यावर जाता येते. वेंगुर्ल्याहून रेडीला जाण्यासाठी बसची ठराविक अंतराने सोय आहे. रेडी गावात उतरुन १५ मिनिटे पायी चालत यशवंतगडावर जाता येते. गाडीने आल्यास गाडी थेट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. गावात रस्ता विचारत जाणे सोईचे पडते. रेडी पासून ७ किमीवर असलेला तेरेखोलचा किल्ला व यशवंतगड एका दिवसात पाहून होतात.
सूचना :
१) खाजगी वहानाने मालवणहून निघाल्यास २५ किमी वरील निवतीचा किल्ला, तेथून ४० किमी वरील यशवंतगड व ७ किमी वरील तेरेखोल किल्ला पाहून परत मालवणला मुक्कामी किंवा ४० किमी वरील पणजीला जाता येते.
Переглядів: 204

Відео

श्री देव जैतीर घरोघरी जाऊन देतोय भक्तांना आशिर्वाद 2024 || Shri dev jaitir
Переглядів 736Місяць тому
श्री देव जैतीर घरोघरी जाऊन देतोय भक्तांना आशिर्वाद 2024 || Shri dev jaitir #2024 #shridevjaitir #jaitirutsav2024 #tulas #Jaitirmandir #umeshkumbhar #Ukmalvanimanus #Ukमालवणीमाणूस #jaitir #jaitirutsavvideo #gharoghari #vengurla #tulas
कोकणातील माळरान || आम्ही गेलो माळरानात फिरायला || koknatil malran2024
Переглядів 424Місяць тому
कोकणातील माळरान || आम्ही गेलो माळरानात फिरायला || #koknatilmalran #kokan #2024 #umeshkumbhar #kokanimanus #ukmalvanimanus #माळरान #malran #jangal #turism #kokandiaries
1k Subscriber complete I am very happy thanks guys for support me|1000 यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली
Переглядів 304Місяць тому
1k Subscriber complete I am very happy thanks guys for support me|1000 यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली. सर्वांचे मनापासून खुप खुप आभार मानतो मला सपोर्ट करताय खरच तुमच्या मुळे आज मी 1k अर्थात 1000 Subscribeer complete करू शकलो असचं प्रेम राहुदेत तुमच माझ्यावर माझ्या प्रत्येक विडिओ ओला या पुढे ही तुमचा चांगला प्रतिसाद हवा जेवढे मी विडिओ यूट्यूब वर अपलोड करणार ते नक्की पहा आणि तुमचा प्रेम रुपी आशीर्वाद ...
श्री देव जैतीर उत्सव ची कवळास उत्सवने सांगता 15 jun 2024 || jaitir kavlas utsav 2024
Переглядів 4,9 тис.Місяць тому
श्री देव जैतीर उत्सव ची कवळास उत्सवने सांगता 15 jun 2024 || jaitir kavlas utsav 2024 #shridevjaitir #kavlas2024 #tulas #kavalasutsav2024 #kavlasutsav2024 #तुळस #कवळास2024 #जैतीर2024 #vengurla #jaitir #jai #2024 #shridevkavlasutsav #umeshkumbhar #malvanimanus #kokan #sindhudurg #kokandairies #kokanimanus #tulaskavlasutsav #kokantourism #Ukmalvanimanus #uk #UKमालवणीमाणूस
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित २५ वे महारक्तदान शिबिर 2024 शिबिरात १०६ जणांनी केले रक्तदान
Переглядів 391Місяць тому
वेताळ प्रतिष्ठानच्या महारक्तदान शिबिरात १०६ जणांनी केले रक्तदान ३०० रक्तदात्यांचा आणि १० रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचा करण्यात आला विशेष सन्मान 'इमान ईथल्या मातीशी, माणूस नत्याशी' त्याचे ब्रीदवाक्य घेऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित २५ व्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी १०६ जणांनी उस्फुर्त रक्तदान करून प्रतिष...
तुळस येथील भक्तांच्या पाठीशी राहणारा श्री देव जैतीर उत्सव Shri dev jaitir utsav 6 jun 2024
Переглядів 3,1 тис.Місяць тому
तुळस येथील भक्तांच्या पाठीशी राहणारा श्री देव जैतीर उत्सव Shri dev jaitir utsav 6 jun 2024
कोकणातील सर्वात मोठे रील फेस्टीवल #2024 कोणाला मिळाल #1लाख #50हजार #25हजार च बक्षीस या विडिओत पहा
Переглядів 3662 місяці тому
कोकणातील सर्वात मोठे रील फेस्टीवल #2024 #reel_shahana Shahana #reelfestival #2024 #kokan #sindhudurg #virlreel # #reelsvide #umesh #vengurla #kokan #kokanimanus #nileshgurav #mandarshetye #sainathjalvi #amarprabhu #ranmanus #koknibaylmanus #umeshkumbhar #viralvideo #viralvideo2024 #reels
कोकण चा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा
Переглядів 2433 місяці тому
कोकण चा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा कोकणचा कॅलिफोर्निया #reel_shahana #reel_शहाणा #rellshahana #reels #kokanimanus #kokaniranmanus #kokan #California #sindhudurg #maharashtra #dashavatar #dashavatarinatak #turism #turist #2024 #umesh #kumbhar #umeshkumbhar #kokantourism #kokanturs #kokantourism🌊कोकण🌴🌊 Please share, Subscribe, like comment या विडीओ साठी तुमचा एक लाईक, शेअर माझ्यासाठी खूप मह...
फणस बाहेरून जरी काटेरी असला आतुन मात्र गोड रसाळ सुगंधी आहे तसा कोकणी माणूस आतुन मात्र प्रेमळ आहे
Переглядів 1563 місяці тому
फणस बाहेरून जरी काटेरी असला तरी आतुन मात्र गोड रसाळ आणि सुगंधी आहे जसा कोकणी माणूस बाहेरून जरी काटेरी वाटला तरी आतुन मात्र प्रेमळ आहे. #jackfruit #kokanimeva #2024 #kokan #sindhudurg #vengurla #sawantwadi #fanas #viralvideo #viral #views #umesh #umeshkumbhar #umeshkumbharukmalvanimanus #kokani #kokanimulga #kokanimanus
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचा बारस उत्सव 14 वर्षांनी पार पडला #2024 #Matond #vengurla #baras
Переглядів 3723 місяці тому
कुंभार समाजास असतो सर्वात मोठा मान वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचा बारस उत्सव 14 वर्षांनी पार पडला #2024 #Matond #vengurla #barasutsav #kokan #sindhudurg #maharashtra #kokansanskruti #umesh #kumbhar
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव #2024 #sangeligirobautsav2024 #sangeli
Переглядів 923 місяці тому
#सांगेलीगीरोबाउत्सव #2024 #sangeligirobautsav2024 #sangeli #giroba #utsav #2024 सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा विश्वास दृढ आहे. गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त क...
तुळस कुंभारटेंब येथील पाच दिवसीय धुळवड शिमगोत्सव नक्की पहा आम्ही कशी धम्माल #shimgotsav #शिमगोत्सव
Переглядів 5614 місяці тому
तुळस कुंभारटेंब येथील पाच दिवसीय धुळवड शिमगोत्सव नक्की पहा आम्ही कशी धम्माल #shimgotsav #शिमगोत्सव #umesh #vengurla #Tulas #2024
तुळस गावातील उत्तम कुंभार बांदेकर चाकावर मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय आजही सांभाळत आहेत
Переглядів 3254 місяці тому
तुळस गावातील उत्तम कुंभार (बांदेकर) कित्येक पिढ्यांपासून चालत आलेला कुंभार कलेचा व्यवसाय आजही त्यांनी जपुन ठेवलाय. आपल्या कुंभार कलेच्या आधारावर ते आज आपल कुटुंब चालवतात.अशा आमच्या कुंभार समाज ला आधार ध्या आपल्या कोकणातील कुंभार च्या मातीच्या भांड्याच्या दुकानांना नक्की भेट द्या आणि खरेदी करा आमचा पत्ता- #तुळस #कुंभारटेंब #तालुका - #वेंगुर्ला जिल्हा- सिंधुदुर्ग #umeshkumbhar #umesh #UmeshKumbha...
मालवणी समालोचक साहिल खोबरेकर || #cricket #commentry by Sahil khobrekar contact #Sahil 9130907160
Переглядів 3,7 тис.4 місяці тому
मालवणी समालोचक साहिल खोबरेकर || #cricket #commentry by Sahil khobrekar contact #Sahil 9130907160
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील नवोदित समालोचक दत्ताराम कामतTennis Cricket commentry|| Dattaram kamat
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील नवोदित समालोचक दत्ताराम कामतTennis Cricket commentry|| Dattaram kamat
भाग 2 || माझा मुलगा जियांश नामकरण सोहळा 20/02/2024 Jiyansh Naming Ceremony
Переглядів 3465 місяців тому
भाग 2 || माझा मुलगा जियांश नामकरण सोहळा 20/02/2024 Jiyansh Naming Ceremony
माझा मुलगा जियांश चा नामकरण सोहळा भाग 1 Jiyansh Naming Ceremony 20/02/2024
Переглядів 7175 місяців тому
माझा मुलगा जियांश चा नामकरण सोहळा भाग 1 Jiyansh Naming Ceremony 20/02/2024
जियांश नामकरण सोहळ्याचे फोटोज
Переглядів 2665 місяців тому
जियांश नामकरण सोहळ्याचे फोटोज
अयोध्या वारी प्रभु श्रीराम लल्लांच दर्शन BJP माजी आमदार प्रमोद जठार साहेबांन सोबत #ayodhyarammandir
Переглядів 3515 місяців тому
अयोध्या वारी प्रभु श्रीराम लल्लांच दर्शन BJP माजी आमदार प्रमोद जठार साहेबांन सोबत #ayodhyarammandir
वेंगुर्ला मासे मार्केट Vengurla Fish 🐟 Market #Vengurla #Fishmarket #sindhudurg #maharashtra
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
वेंगुर्ला मासे मार्केट Vengurla Fish 🐟 Market #Vengurla #Fishmarket #sindhudurg #maharashtra
माजगांव महिषासुर मर्दिनी श्री देवी सातेरी वार्षिक जत्रोत्सव #Majgaon #Saterijatra2024 #january2024
Переглядів 5086 місяців тому
माजगांव महिषासुर मर्दिनी श्री देवी सातेरी वार्षिक जत्रोत्सव #Majgaon #Saterijatra2024 #january2024
श्रीदेव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव 2024 #ravalnath #jatra2024 #tulas #jaitirmandir #Vengurla
Переглядів 4686 місяців тому
श्रीदेव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव 2024 #ravalnath #jatra2024 #tulas #jaitirmandir #Vengurla
वेंगुर्ला तुळस श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता पुन: प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा 2024
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
वेंगुर्ला तुळस श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता पुन: प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा 2024
अंकुश आणि शलाका साखरपुडा सोहळा #Engagement Ceremony #Ring Ceremony #3january #2024Engagement
Переглядів 5457 місяців тому
अंकुश आणि शलाका साखरपुडा सोहळा #Engagement Ceremony #Ring Ceremony #3january #2024Engagement
कोकणातील दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग नक्की पहा #kokanatil #dashavatar #natak #jatra2023
Переглядів 9017 місяців тому
कोकणातील दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग नक्की पहा #kokanatil #dashavatar #natak #jatra2023
सिंधुदुर्ग वेंगुर्ला तुळस देऊळवाडी येथील रवी पेडणेकर यांचं घर शॉर्टसर्किट मुळे जळून खाक
Переглядів 7647 місяців тому
सिंधुदुर्ग वेंगुर्ला तुळस देऊळवाडी येथील रवी पेडणेकर यांचं घर शॉर्टसर्किट मुळे जळून खाक
३६० चाळ्यांचा अधिपती सरसेनापती श्री देव घोडेमुखचा वार्षिक जत्रोत्सव वेंगुर्ला मांतोड पेंडूर 2023
Переглядів 2,1 тис.7 місяців тому
३६० चाळ्यांचा अधिपती सरसेनापती श्री देव घोडेमुखचा वार्षिक जत्रोत्सव वेंगुर्ला मांतोड पेंडूर 2023
दशावतारी लंगारनृत्य स्पर्धेतील मुलींनी सादर केलेले नृत्य || हर्षदा गावकर आणि मित्तल सावंत
Переглядів 6177 місяців тому
दशावतारी लंगारनृत्य स्पर्धेतील मुलींनी सादर केलेले नृत्य || हर्षदा गावकर आणि मित्तल सावंत
तुळस श्री देवी सातेरी जत्रा|| Vengurla Tulas shri devi Sateri jatra 2023
Переглядів 1,9 тис.7 місяців тому
तुळस श्री देवी सातेरी जत्रा|| Vengurla Tulas shri devi Sateri jatra 2023

КОМЕНТАРІ