बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणारे बरेच शेतकरी आहेत. श्री. ज्यो मच्याडो ह्यांचा उमेदीच्या काळातील बँकिंग क्षेत्रात घोडदौड करणारे बँकर ते वसई-विरार गौरव पुरस्काराने सन्मानित प्रगतशील शेतकरी हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा... - विक्रमी साडेसहा फूट उंचीच्या मिरचीच्या रोपांपासून केवळ चार महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न कसे मिळवले? - वसईत हापूस आंब्याचे पीक कसे घ्यावे? - गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात निर्मिती - परदेशी ब्रोकोली, झुकेणिचे पीक कसं घ्यावं? - अडीच टन तांदूळ कसा पिकवला? इतर कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: ज्यो मच्याडो अंकल व रिटा आंटी (९९२२९३३६०९) छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईतील भाजी शेती ua-cam.com/video/bmP8We3_hII/v-deo.html वसईचा केळीवाला ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html वसईतील पानवेल/विड्याची पानं ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी ua-cam.com/video/jgI_O6lOCvk/v-deo.html एक दिवस पर्यावरणाचा ua-cam.com/video/Hly80zfJfYk/v-deo.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html हरित वसईतील केळबागा ua-cam.com/video/nWk15qzfNoQ/v-deo.html वसईतील रताळ्यांची लागवड ua-cam.com/video/_oHx0AVhNlY/v-deo.html वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग ua-cam.com/video/zb4N7ERgmLQ/v-deo.html हरित वसईतील एक संध्याकाळ ua-cam.com/video/iHLV3HzMBQg/v-deo.html #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #bankertofarmer
सुनील दादा, तुमचे विडिओ अतिशय सुंदर असतात, विशेषतः तुम्ही ज्या विषयाचा विडिओ बनवता त्याची माहिती आणि चित्रीकरण सुद्धा अतिशय सुंदर असते, विशेषतः तुम्ही खूप खूप सुंदर मराठी बोलता, त्याचे खूपच कौतुक वाटते
Wow very superb video. I like to watch your video. खुप छान माहिती. पडवळ ची भाजी खुप छान लागते तुमची बायको वीडीओ खुप छान काढते तीची सुधा खुप मेहनत आहे. Always be together. Gooduck both of you
नमस्कार 🙏 सुनील जी आपण वसईची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ओळख करून देत आहात या साठी धन्यवाद! वसईची विविध व्यावसायिक शेती, सामाजिक बांधिलकी, मातीत रुजलेली विभिन्न पण मानवतावादी भावनेने एकत्र गुंफलेली संस्कृती यांचे दर्शन तुम्ही घडवता. असेच चांगले कार्य आपल्या हातून घडत राहो.
ज्यो मचाडो काका व सुनिल भाऊ यांचे शुद्ध मराठी संभाषण ऐकून खुप अभिमान वाटला. शेतीविषयी बांधिलकी, स्वत:ची संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसतो. शुभेच्छा आपल्या चॅनलला.
@@sunildmello वसई विषयी सर्व गोष्टी ज्ञात आहेत. वसईची खाद्य संस्कृती, हरित वसई, मराठी ख्रिस्ती समाजाने जोपासलेली संस्कृती, मराठी साहित्य क्षेत्रातील फादर फ्रांसिस दिब्रिटो यांचे योगदान या सर्व गोष्टी वसईच्या शिरपेचात शोभा आणतात.
धर्मावर ,जातीवर भाषा अवलंबून नसते. भाषा त्या प्रदेशावर अवलंबून असते म्हणूनच महाराष्ट्रात सर्व धर्मांचे, जातीचे लोक मराठी बोलतात व ते मराठी च आहेत. यांची मराठी इतर मराठी लोकांसारखीच चांगली आहे. फादर दिब्रिटो यांचं मराठी साहित्य तर लोकप्रिय आहेच. माझा एक या भागातील मित्र श्री. मार्शल कोरिया ज्ञानेश्वरी वर उत्तम बोलायचा. महाराष्ट्रातील राजपूत, मराठवाड्यातील रेड्डी, वेलमा अशा जातींना पण मराठी बांधव जाती मुळे अमराठी समजतात पण हे लोक मराठी भागात शेकडो वर्षांपासून राहतात, यांची मातृभाषा मराठी च आहे पण या जाती इतर राज्यात मोठ्या संख्येने आहेत म्हणून या जातीच्या मराठी लोकांना पण परप्रांतीय समजतात. सध्याच्या महाराष्ट्रात पुर्वी अनेक राज्य होती उदा. छत्रपती शिवाजीराजे यांच राज्य, आदिलशाही, जळगाव भागात मोगलाई , पोर्तुगीज राज्य. शिवरायांच्या राज्यात कानडी, तामिळ भाषिक भाग पण होते.तसेच आदिलशाही, मोगलाई, पोर्तुगीज राज्य मध्ये मराठी भाषिक व ईतर भाषिक भाग पण होते. आणि या राज्यात अनेक धर्मिय, जाती गुण्यागोविंदाने राहत होते. इतिहास जागरूक पणे समजून घेतल्या वर गैरसमज होत नाहीत. जोसेफ अंकल व रीटा आंटी यांच्या कौतुकास्पद कामाला शुभेच्छा . सुनील ,तुमचे विडिओ, मुलाखती उत्तमच आहेत. शुभेच्छा
खूपच छान...प्रेरणादायी काम...पाहताना तर आल्हाददायकही वाटले...अस उत्तम काम करणारे पाहिले की जग सुंदर वाटू लागत..तुमचंही खूप औतुक व आभार की तुम्ही असे लोक शोधून त्यांवर video करता...खूप शुभेच्छा तुम्हाला व ह्या सर्व गुणी माणसांना🙏
🌹जय जवान जय किसान 🌹अंकल व आंटी ना मानाचा मुजरा 🌹कोण म्हणेल शेतकरी म्हातारा होतो ,शेती व शेतकर्याला म्हातारपण येते नाही., फक्त हवे ठाम निश्चय,जिद्द, विश्वास आणि सुंदर विचारसारणी .....धन्यवाद.
सलाम तुमच्या कार्याला. शालेय जीवनात आम्ही ही शेती करत तेव्हापडवळाचा भारा बांधण्यासाठी लागणारा वाक केळीच्या लोदा पासून,फरलाचेे बनवत,वेढणी,काढणी ,वात तोडणे सर्व कामे आम्ही लहान भावंडेच करत असू.तुमची बहरलेली शेती पाहून खुप आनंद झाला
हि व्हिडीओ खूप छान आहे. जोसेफ अंकलची शेती बघून डोळे दिपून गेले. आणि त्यांची मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडी आहे आहे. सुनील, तुलाही सलाम! खूप सारी माहिती आम्हाला घरी राहून मिळते🙏
सुनिल, फारच सुंदर विडिओ. सॅल्युट टू जोसेफ सर, सर जे काही करत आहेत, त्याचा फायदा हा तरुण पिढीला नक्कीच होईल, अधिकारी म्हणुन रिटायर झाल्यावर शेतीत रमलेले प्रगतिशील शेतकरी म्हणुन गौरविण्यात आलेले सर फारच कमाल. आणि लोक म्हणतात की fluent English बोलली जाते परंतु सुनिल, आपण तर fluent मराठीत काय छान बोलता. जोसेफ सर आणि फॅमिलीला सॅल्युट. धन्यवाद
खूप छान व्हिडिओ,खूप छान माहिती. जो साहेब आणि रिटा आंटी चे अभिनंदन. सेंद्रिय शेती चे महत्व काय आणि किती आणि त्याचे फायदे किती हे त्यांनी छान सांगितले आहे. मी सुद्धा गेले तीन चार वर्ष वर्षभर पुरेल इतकी सेंद्रिय हळद एक छंद म्हणून करतो. तुम्हाला आणि जो साहेब आणि रिटा मॅडम ना खूप खूप धन्यवाद 👌👍🙏
Recently I have subscribe your channel I watch your channel in free time in lockdown I lost my job I started my vegetables business but I was not knowing where to buy these vegetables so one day I was searching I saw your channel i saw your video where farmer was harvesting methi mulla and they sell in virar chandansar so I went there and I daily go there to buy vegetables I sell in mira road Thanks to your video I really get in cheap rate and get profit Thanks to your video
HATS OFF to UNCLE & AUNTY , really !!!! And offcourse , I am for the first time on your channel & I observed that you anchored the show very well in every manner..... THANKS VERY MUCH !!!!
सुनिल सर आणि जोसेफ अंकल यास अभिवादन....!!🙏🙏🙏 👍 बँकर ते शेतकरी हा श्री जोसेफ अंकल यांचा सदर क्षेत्रातील यशस्वी प्रवास वसईतील शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असाच. 👍 जोसेफ अंकल आणि सुनील सर यांचे सदर चित्रफिती मधील संवादात्मक भाष्य माहितीपूर्ण आणि संग्रही ठेवण्यासारखे असेच 👍सदर चित्रफिती मधील आशय अतिशय छान, अर्थ पूर्ण असाच. 👍पडवळ, गल्के, कोथमिर, या सर्व फळ भाज्या अप्रतिम, जीवनसत्व युक्त अश्याच 👍हापूस आंबा ५०-६० कलमे बहारदार 👍गांडूळखत आणि भात शेती याबद्दल माहिती रोचक रंजक अशीच. 👍सादरीकरण सर्वोत्तम अफलातून असेच 👍कालावधी सर्वोत्तम आणि इतकाच कालावधी आणि सदर बाबत माहितीपट आणि लघुपट येऊ देत. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास इंग्लंड संघाचा कर्णधार आणि शैलीदार फलंदाज डेव्हिड गॉवर याची खेळी सातत्याने तथा नेहमीच इंग्लंड संघाला विजयश्री द्यावयाची. सदर फलंदाजांचे शतक कधी व्हायचे ते प्रतिस्पर्ध्याला अवगत व्हायचे नाही आणि तदपूर्वीच इंग्लंड संघ सामना आणि मालिका खिशात घालायचा. तसे इथे सुनील सर कधी कोणती चित्रफीत, माहितीपट , लघुपट सादर करतील हे कुणालाही सांगता येणार नाही . 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
सुनिलजी, तुम्ही एक चांगले पत्रकार सुद्धा होऊ शकता. व तुमच्या सारख्या सकारात्मक स्वभावाच्या ,छान मराठी बोलणाऱ्या व समोरच्याला बोलतं करणाऱ्या माणसाची या क्षेत्राला गरज आहे असं मला वाटतं. .पण एकच माणूस काय काय करणार ! ....असो, खूप शुभेच्छा.
Sunil this is one of the superior video you have uploaded. Uncle and Aunty salute to your great work in agriculture. Really you are doing great inspirational job. You have shown after retirement what wonders can be possible. Lot of farmers and other service category people also can take inspiration from you.
I love the way you are taking to the tour of socio economic, cultural and the people of vasai. Can't believe it is happening so near Mumbai. So much down to earth. Request if you can arrange for his contact or arrangements for his visit. Personally all our agriculture land was lost to different government agencies it's nostalgic yet pain to realise once upon a time we were farmers and now we are no more farmers
@@sunildmello thanks a lot for your prompt reply. Particularly you have shared his mobile. It will be a gr8 pleasure for me to interact which such personality
Retirement नंतर माणसं आराम करतात पण काका काकूंच्या support ने शेती व्यवसायात परत उतरले आहात ते पण एज्युकेशन ghevun मानलं पाहिजे तुम्हाला काका.तुम्हाला मानाचा मुजरा. तरूण पिढीला लाजवेल असे काम करत आहात तुम्ही👏👏👏👏तरूण पिढी साठी तुम्ही आदर्श आहात🙏
असा शेतकरी वसईत होणे नाही...प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे...यांची मुलगी राज्य सेवा अधिकारी म्हणून कार्यरत होती...सध्या वास्तव्य विदेशात आहे...त्यांच्या शेतीप्रती असलेल्या कार्याला आमचा सलाम... व आपण हा व्हिडीओ बनवून युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन करता त्याबद्दल आपले मनापासून आभार..
Those people who upload videos of film celebrities should learn from the uncle...aunty and the anchor how to be guide to happy life. All of them speak excellent marathi. Hats off to all of three.
Sunillji tumhi josephjincha hirvyagar shetichi safar on line ghàdavlit tyabaddal dhanyavad. Josefji hats of you retirmentnanrar nusta aram n karta chan upkram rabavlat kautuk ahe sunilji khup chan vidio kelàt dabyavad
खूपच प्रेरणादायी व माहितीपूर्ण चित्रीकरण तसेच सादरीकरण होते. जो काकानी गांडूळ खताची दिलेली माहिती खूप छान दिली.अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी समजावले.सुनील जी तुम्हांला सलाम असे हे अवलिया शोधता आणि आम्हांला ही त्यांचे दर्शन देता.
निवृत्तीनंतरच्या आपल्या या सुंदर उपक्रमास जोसेफ उभयतांना माझा सलाम.हल्ली सुनीलच्या पारंपारिक विविधपूर्ण पाककृत्या त्यांच्या पध्दतींची माहिती फारच कौशल्याने छान मराठीतून समजावुन सांगताना आवड निर्माण झाली आहे तरी अश्या माहितीद्वारे आम्हास त्या संस्कृतीची ओळख करून देत रहा.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख हार्दिकशुभेच्छा.
Thanks Machado uncle you are really progressive farmer and really mile stone for palghar dist farmer Thanks suna You are really explorer of farmers Life Waver hai to power hai🙏
hey ...so good to see joe machado sir....i know him since ...when he was an manager at bccb bank...papdy branch.....a very very humble human being...and was always in my mind and heart because of his humbleness and kindness......god bless u machado saheb....feeling so so good to see u on screen .....kudos to sunil for such an great and inovative video.....all the best always
Very nice ,very usefull information and inspiring interview. People always think to rest at time of retirement Joseph uncle is working .. Good inspiration to retired people too. Suni ji your questions were on good points.
Sunil bhau, hats off to your passion.. They way your asked questions.. Very good information. या अंकल आंटी नि जे शेती मध्ये काम केले आहे, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. गांडूळ खत प्रकल्प खूप आवडला..
Very well made video & presented. It will inspire the younger generation of Vasai Virar belt to cultivate every inch of vacant land by forming SHG's. The elected MLA & MP of the area should help in getting Government schemes with subsidy to this area farmers. I hope all will avoid Chemical fertilisers & pesticides & grow toxin free food for self & market.
Thanks Sunil, for making such informative video, and hats off to the determination of Joseph uncle and serving society , lastly Sunil have very good command on Marathi, enjoy hearing marathi. 🙏
very inspiring. From childhood when ever we got holidays in our villages we have helped our uncles/ aunties grand parents as we were having our subjects on such topics. This was like reviral . TKS to Sunil, Joe n Rita
सुनिल तू,अंकल आणि अंटींचे खूप खूप धन्यवाद.मी काही शेतकरी नाही.पण तुम्ही तिघांनाही माहिती त्याच्या अर्थशास्त्रासकट इतकी रोचक पध्दतीने दिली कि त्याला तोड नाही.आणि तुमचं तिघांचही मराठी तर इतक अस्खलित कि त्याला तोंड नाही.मी गंमत म्हणून शोधत होतो कधी तुम्ही मध्येच इंग्लिश शब्द वापरतां म्हणून.पण मी हरलो.😊😊😊😊 माझे मित्र मायकेल परेरा पण बॅंकर म्हणून निवृत्त झाले.ते पण वसईलाच असतात व त्यांची जास्वंदाची शेती आहे.एकदा जास्वंदीवर कार्यक्रम करा नं.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मायकल परेरांबद्दल अजून माहिती दिल्यास नक्कीच प्रयत्न करता येईल. धन्यवाद, श्रीकांत जी
Wow khup chan ahey Video Sunil, bharpur mahiti milali Sheti badal ani hey Kaka Yevdhya mothya Job varna retire hovun City madhli Poosh life na Jagta chan Pragatshil Shetkari mahnun jagne Pasand kartat, kharach khup abhiman Vatto aslya Avliyancha ani Tumhi tar Great ahatach karan amhala ghar baslya Yevdhi chan chan mahiti purvat asta ani Ti hi Pratek Veli Vegli
Congratulations Sunil and family! 50 K subscribers. Your dedication and hard work is simply amazing and I just cannot express it in words. Through your channel I have become aware about so many things happening in and around Vasai. You are highly eloquent in Marathi with a neutral accent. Attracting 25K subscribers in less than 4 months is nothing short of an achievement. God bless and best wishes to you and your wife for your future endeavours.
आदर्श उदाहरण. अंकल जोझेफ आणि रीटा खूप छान काम करत आहेत. सुनील नेहमीप्रमाणेच छान विडिओ सादर केलास. माझी जमीन, शेती नाही तरीही मला वाटू लागलं की आपण शेती करायला हवी.
सुनीलजी हा विडिओ बघून खूप समाधान वाटले... काही क्षण मला आमच्या कोकणातील आंबा, काजूच्या बागेत असल्या सारखे वाटले.... जो काकांना नमस्कार सांगा.. ग्रेट माणूस! तुमची बोलण्याची पद्धत,भाषा व शब्द हे सर्व आमच्या कोकणातील आहेत... i. e. उडवे वगैरे.... बैलगाडीची चाके उडव्याला लागून होती पण बैलगाडी दिसली नाही..! खरंच खूप छान.... खूप खूप धन्यवाद.... आणि हो तुमच्याकडून एक व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे ! 👍 चित्रीकरण छानच.......
What an amazing way to spend the retirement. Kudos to Joe Uncle and Rita Aunty. They should start "farm to table project" in Mumbai. Instead of selling it to the vendors, they can home deliver to the consumer. This way the consumer not only can get the freshest farm produce but also knows where and how it is grown. This concept is the most hottest food concept in the western countries as eating organic and locally grown gives the best nutrition. Thank you for bringing such as amazing information and god bless!!
Very nice video. Such a inspiring content. These people are living their life to fullest. @Sunil D'mello you are promoting local culture on a global platform, which is very good thing. Also the overall content on your channel is unique and useful. Also would love to see Terese (kitchen) Gardening videos on your channel. @उंकल अंटी आणि सुनील तुम्ही सच्चे पर्यावरण प्रेमी आहात. Thanks for this video 👍 I don't know anything about Vasai-Virar & it's culture. Your videos will help to know that.👍
सुनील डिमेलो, आपले खास अभिनंदन, ज्यो मच्याडो, हे कॅथोलिक बँकेत मॅनेजर होते, माझे ते जवळचे मित्र आहेत, मी काही शेतकय्रांसोबत दापोली तेथे गेलो होतो त्यावेळी चार दिवस आम्ही एकत् होतो. ओनील आल्मेडा सुध्दा होते. ज्यो यांना शेतीत फार इंटरेस्ट आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना व कुटुंबीयांना निरोगी उदंड आयुष्य मिळावे व त्यांच्या कडून भरघोस कार्य व्हावे. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. बावती स पेडिकर, नंदाखा ल.
सुनील मी तुमचे सर्व व्हिडिओ पहातो. फार छान असतात. तुम्ही पुष्कळ मेहनत घेता, style of प्रेझेंटेशन फार चागली आहे. मला आवडली. अभिनंदन. जो माचाडो ला नमस्ते सांगणे. आपल्या कार्यास शुभेच्छा.👍🙏
नमस्कार सुनील सर🙏 किती सुंदर मलाही खूप आवड आहे बाग कामाची इतकं लांब पडवळ मी पहिल्यांदाच बघितले आजच आपल्याला सबस्क्राईब केले खुप खुप शुभेच्छा 👍 मराठी छान बोलता आपण कांचन मुंबई
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer
वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणारे बरेच शेतकरी आहेत. श्री. ज्यो मच्याडो ह्यांचा उमेदीच्या काळातील बँकिंग क्षेत्रात घोडदौड करणारे बँकर ते वसई-विरार गौरव पुरस्काराने सन्मानित प्रगतशील शेतकरी हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
- विक्रमी साडेसहा फूट उंचीच्या मिरचीच्या रोपांपासून केवळ चार महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न कसे मिळवले?
- वसईत हापूस आंब्याचे पीक कसे घ्यावे?
- गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात निर्मिती
- परदेशी ब्रोकोली, झुकेणिचे पीक कसं घ्यावं?
- अडीच टन तांदूळ कसा पिकवला?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार: ज्यो मच्याडो अंकल व रिटा आंटी (९९२२९३३६०९)
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईतील भाजी शेती
ua-cam.com/video/bmP8We3_hII/v-deo.html
वसईचा केळीवाला
ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
वसईतील पानवेल/विड्याची पानं
ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
ua-cam.com/video/jgI_O6lOCvk/v-deo.html
एक दिवस पर्यावरणाचा
ua-cam.com/video/Hly80zfJfYk/v-deo.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html
हरित वसईतील केळबागा
ua-cam.com/video/nWk15qzfNoQ/v-deo.html
वसईतील रताळ्यांची लागवड
ua-cam.com/video/_oHx0AVhNlY/v-deo.html
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
ua-cam.com/video/zb4N7ERgmLQ/v-deo.html
हरित वसईतील एक संध्याकाळ
ua-cam.com/video/iHLV3HzMBQg/v-deo.html
#vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #bankertofarmer
Kindly pin 📍 this comment so we can see it on top
@@vikasmalkar6675 Ji, thanks. Done.
@@sunildmello so nice of you ☺️
Uncle rahila kuthe??
@@aayushchaudhari2335 जी, अंकल गिरीजला राहतात. धन्यवाद
मराठीत प्रतिक्रिया देतांना, आणि व्हिडिओतील मधाळ मराठी ऐकताना खुपचं अभिमान वाटतोय.. खुप चांगलं काम आणि कौतुकास्पद कार्यकारिणी जो काका आणि काकी💐🎂👌👍🎂
खूप खूप धन्यवाद, किशु जी
सुनील दादा, तुमचे विडिओ अतिशय सुंदर असतात, विशेषतः तुम्ही ज्या विषयाचा विडिओ बनवता त्याची माहिती आणि चित्रीकरण सुद्धा अतिशय सुंदर असते, विशेषतः तुम्ही खूप खूप सुंदर मराठी बोलता, त्याचे खूपच कौतुक वाटते
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती.. प्रेरणादायी
धन्यवाद, सागर जी
जो अंकल आणि रीटा वैनी ह्यांना माझा मानाचा मुजरा. ह्या वयात सुध्दा ते एवढी मेहनत करतात.
सुनील साहेबांनी सुध्दा चांगला व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
Wow very superb video. I like to watch your video. खुप छान माहिती. पडवळ ची भाजी खुप छान लागते
तुमची बायको वीडीओ खुप छान काढते
तीची सुधा खुप मेहनत आहे. Always be together. Gooduck both of you
अगदी बरोबर बोललात, रोनित जी. खूप खूप धन्यवाद
नमस्कार 🙏 सुनील जी आपण वसईची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ओळख करून देत आहात या साठी धन्यवाद! वसईची विविध व्यावसायिक शेती, सामाजिक बांधिलकी, मातीत रुजलेली विभिन्न पण मानवतावादी भावनेने एकत्र गुंफलेली संस्कृती यांचे दर्शन तुम्ही घडवता. असेच चांगले कार्य आपल्या हातून घडत राहो.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शरश्चंद्र जी
खुप छान
आदर्श आणी अभिमान बाळगावा
अस सुंदर उदाहरण.
खुप खुप..... धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद, मंगेश जी
हिरवी गार शेती बघून अगदी प्रसन्न वाटलं
धन्यवाद, वैजयंती जी
फायदेशीर शेतीची खुप महत्वाची, ऊपयोगी व छान माहिती! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
धन्यवाद, जितेंद्र जी
खरंच माणसाने ठरवलं तर मेहनत करून यशस्वी होऊ शकतो ....अंकल कडून खरच खुप सकारात्मक विचार मिळत आहे
अगदी बरोबर बोललात, राजेश जी. धन्यवाद
ज्यो मचाडो काका व सुनिल भाऊ यांचे शुद्ध मराठी संभाषण ऐकून खुप अभिमान वाटला. शेतीविषयी बांधिलकी, स्वत:ची संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसतो. शुभेच्छा आपल्या चॅनलला.
आम्ही वसईकर मराठीच आहोत. धन्यवाद, सोपान जी
@@sunildmello वसई विषयी सर्व गोष्टी ज्ञात आहेत. वसईची खाद्य संस्कृती, हरित वसई, मराठी ख्रिस्ती समाजाने जोपासलेली संस्कृती, मराठी साहित्य क्षेत्रातील फादर फ्रांसिस दिब्रिटो यांचे योगदान या सर्व गोष्टी वसईच्या शिरपेचात शोभा आणतात.
@@sopanlabade6372 जी, वाह, खूप खूप धन्यवाद, सोपान जी
धर्मावर ,जातीवर भाषा अवलंबून नसते. भाषा त्या प्रदेशावर अवलंबून असते म्हणूनच महाराष्ट्रात सर्व धर्मांचे, जातीचे लोक मराठी बोलतात व ते मराठी च आहेत. यांची मराठी इतर मराठी लोकांसारखीच चांगली आहे. फादर दिब्रिटो यांचं मराठी साहित्य तर लोकप्रिय आहेच. माझा एक या भागातील मित्र श्री. मार्शल कोरिया ज्ञानेश्वरी वर उत्तम बोलायचा. महाराष्ट्रातील राजपूत, मराठवाड्यातील रेड्डी, वेलमा अशा जातींना पण मराठी बांधव जाती मुळे अमराठी समजतात पण हे लोक मराठी भागात शेकडो वर्षांपासून राहतात, यांची मातृभाषा मराठी च आहे पण या जाती इतर राज्यात मोठ्या संख्येने आहेत म्हणून या जातीच्या मराठी लोकांना पण परप्रांतीय समजतात. सध्याच्या महाराष्ट्रात पुर्वी अनेक राज्य होती उदा. छत्रपती शिवाजीराजे यांच राज्य, आदिलशाही, जळगाव भागात मोगलाई , पोर्तुगीज राज्य. शिवरायांच्या राज्यात कानडी, तामिळ भाषिक भाग पण होते.तसेच आदिलशाही, मोगलाई, पोर्तुगीज राज्य मध्ये मराठी भाषिक व ईतर भाषिक भाग पण होते. आणि या राज्यात अनेक धर्मिय, जाती गुण्यागोविंदाने राहत होते. इतिहास जागरूक पणे समजून घेतल्या वर गैरसमज होत नाहीत. जोसेफ अंकल व रीटा आंटी यांच्या कौतुकास्पद कामाला शुभेच्छा . सुनील ,तुमचे विडिओ, मुलाखती उत्तमच आहेत. शुभेच्छा
@@dhb702 वाह, ह्या अप्रतिम प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार.
खूपच छान...प्रेरणादायी काम...पाहताना तर आल्हाददायकही वाटले...अस उत्तम काम करणारे पाहिले की जग सुंदर वाटू लागत..तुमचंही खूप औतुक व आभार की तुम्ही असे लोक शोधून त्यांवर video करता...खूप शुभेच्छा तुम्हाला व ह्या सर्व गुणी माणसांना🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
म्हचोडो साहेब हे आमच्याकडे मोठे बाबांकडे येत होते म्हचोडो साहेब देवमाणूस आहेत आणला लोणसाठी मदत केली होती
खूप छान आठवण सांगितली... धन्यवाद, नागेश जी
'धरणी आईची माया, कश्शी जाईल वाया'
मचाडो काका खरोखर धरणी मातेचे पांग फेडत आहे.
दंडवत!
अगदी बरोबर बोललात, रामचंद्र जी. धन्यवाद
🌹जय जवान जय किसान 🌹अंकल व आंटी ना मानाचा मुजरा 🌹कोण म्हणेल शेतकरी म्हातारा होतो ,शेती व शेतकर्याला म्हातारपण येते नाही., फक्त हवे ठाम निश्चय,जिद्द, विश्वास आणि सुंदर विचारसारणी .....धन्यवाद.
अगदी बरोबर, प्रसाद जी. धन्यवाद
सलाम तुमच्या कार्याला. शालेय जीवनात आम्ही ही शेती करत तेव्हापडवळाचा भारा बांधण्यासाठी लागणारा वाक केळीच्या लोदा पासून,फरलाचेे बनवत,वेढणी,काढणी ,वात तोडणे सर्व कामे आम्ही लहान भावंडेच करत असू.तुमची बहरलेली शेती पाहून खुप आनंद झाला
वाह, आपल्या प्रतिक्रियेने जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच शिवाय विस्मृतीत गेलेल्या बऱ्याच शब्दांची उजळणी झाली. धन्यवाद, रश्मी जी
श्री सुनिल सर जोसेफ अंकल आपले खास अभिनंदन खुप सुंदर प्रेरणादायक सुंदर माहिती असा व्हिडिओ ऐक बँक अधिकारी असेते शेतकरी छानच
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
मुलाखत आवडली.
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
खुपच प्रयोगशील अनुभव व रिटायर्ड नंतर प्रेरणा दायक..सुंदर शेती ...सलाम तुम्हा
दोघांना ही...👍👍👌👌💐💐💐
धन्यवाद, विलास जी
सुनील दादा तुझे विडीओ खुप छानं असतात. विस्तृत पणे समजतो तू.
भविष्यातील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
जो अंकल फारच छाम कार्य करता तुम्ही , आणि सुनील तुम्हाला देखील जो अंकल करीत असलेल्या कार्यास आम्हा पर्यंत पोहचविण्यासाठी आभार 👍
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
हि व्हिडीओ खूप छान आहे. जोसेफ अंकलची शेती बघून डोळे दिपून गेले. आणि त्यांची मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडी आहे आहे. सुनील, तुलाही सलाम! खूप सारी माहिती आम्हाला घरी राहून मिळते🙏
खूब खूब आबारी, नैना मावशी
सुनिल, फारच सुंदर विडिओ. सॅल्युट टू जोसेफ सर, सर जे काही करत आहेत, त्याचा फायदा हा तरुण पिढीला नक्कीच होईल, अधिकारी म्हणुन रिटायर झाल्यावर शेतीत रमलेले प्रगतिशील शेतकरी म्हणुन गौरविण्यात आलेले सर फारच कमाल. आणि लोक म्हणतात की fluent English बोलली जाते परंतु सुनिल, आपण तर fluent मराठीत काय छान बोलता. जोसेफ सर आणि फॅमिलीला सॅल्युट. धन्यवाद
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
खूप छान व्हिडिओ,खूप छान माहिती. जो साहेब आणि रिटा आंटी चे अभिनंदन. सेंद्रिय शेती चे महत्व काय आणि किती आणि त्याचे फायदे किती हे त्यांनी छान सांगितले आहे. मी सुद्धा गेले तीन चार वर्ष वर्षभर पुरेल इतकी सेंद्रिय हळद एक छंद म्हणून करतो. तुम्हाला आणि जो साहेब आणि रिटा मॅडम ना खूप खूप धन्यवाद 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
कोणत्या ठिकाणी
@@vijaysathe9510 ओरस,सिंधुदुर्ग येथे
Through this vlog we have met two beautiful person who have inspired and inspiring others to go organic.
Thanks a lot, Kavita Ji
Recently I have subscribe your channel I watch your channel in free time in lockdown I lost my job I started my vegetables business but I was not knowing where to buy these vegetables so one day I was searching I saw your channel i saw your video where farmer was harvesting methi mulla and they sell in virar chandansar so I went there and I daily go there to buy vegetables I sell in mira road
Thanks to your video
I really get in cheap rate and get profit
Thanks to your video
This is amazing. Thanks a lot for sharing your story, Aliya Ji
HATS OFF to UNCLE & AUNTY , really !!!! And offcourse , I am for the first time on your channel & I observed that you anchored the show very well in every manner..... THANKS VERY MUCH !!!!
Thanks a lot for your kind words, Amit Ji
सुनिल सर आणि जोसेफ अंकल यास अभिवादन....!!🙏🙏🙏
👍 बँकर ते शेतकरी हा श्री जोसेफ अंकल यांचा सदर क्षेत्रातील यशस्वी प्रवास वसईतील शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असाच.
👍 जोसेफ अंकल आणि सुनील सर यांचे
सदर चित्रफिती मधील संवादात्मक भाष्य
माहितीपूर्ण आणि संग्रही ठेवण्यासारखे असेच
👍सदर चित्रफिती मधील आशय अतिशय छान, अर्थ पूर्ण असाच.
👍पडवळ, गल्के, कोथमिर, या सर्व फळ भाज्या अप्रतिम, जीवनसत्व युक्त अश्याच
👍हापूस आंबा ५०-६० कलमे बहारदार
👍गांडूळखत आणि भात शेती याबद्दल
माहिती रोचक रंजक अशीच.
👍सादरीकरण सर्वोत्तम अफलातून असेच
👍कालावधी सर्वोत्तम आणि इतकाच कालावधी आणि सदर बाबत माहितीपट आणि लघुपट येऊ देत.
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास इंग्लंड संघाचा कर्णधार आणि शैलीदार फलंदाज डेव्हिड गॉवर याची खेळी सातत्याने तथा नेहमीच इंग्लंड संघाला विजयश्री द्यावयाची. सदर फलंदाजांचे शतक कधी व्हायचे ते प्रतिस्पर्ध्याला अवगत व्हायचे नाही आणि तदपूर्वीच इंग्लंड संघ सामना आणि मालिका खिशात घालायचा. तसे इथे सुनील सर कधी कोणती चित्रफीत, माहितीपट , लघुपट सादर करतील हे कुणालाही सांगता येणार नाही .
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
आपल्या ह्या अश्या प्रोत्साहनपर प्रतिक्रिया आम्हाला खूप खूप मदत करतात. खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
सुनिलजी, तुम्ही एक चांगले पत्रकार सुद्धा होऊ शकता. व तुमच्या सारख्या सकारात्मक स्वभावाच्या ,छान मराठी बोलणाऱ्या व समोरच्याला बोलतं करणाऱ्या माणसाची या क्षेत्राला गरज आहे असं मला वाटतं.
.पण एकच माणूस काय काय करणार !
....असो, खूप शुभेच्छा.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
नको राजकारण्यांच्या मुलाखती
Sunil this is one of the superior video you have uploaded. Uncle and Aunty salute to your great work in agriculture. Really you are doing great inspirational job. You have shown after retirement what wonders can be possible. Lot of farmers and other service category people also can take inspiration from you.
You are absolutely right, Ketan. They both are really inspiring. Thank you.
I love the way you are taking to the tour of socio economic, cultural and the people of vasai. Can't believe it is happening so near Mumbai. So much down to earth. Request if you can arrange for his contact or arrangements for his visit. Personally all our agriculture land was lost to different government agencies it's nostalgic yet pain to realise once upon a time we were farmers and now we are no more farmers
Thanks a lot for your kind words, Mahesh Ji. Joe uncle is reachable on 9922933609
@@sunildmello thanks a lot for your prompt reply. Particularly you have shared his mobile. It will be a gr8 pleasure for me to interact which such personality
@@maheshkoli8980 Ji, thank you
Wow. That padwal looks massive. It is great to see passion in farming of Mr Joe Machado😊
Thanks a lot, Doctor Ji
कमाल केली साहेब, खरोखरच मचाडो साहेबांची कमाल आहे
अगदी बरोबर, प्रफुल्ल जी. धन्यवाद
Retirement नंतर माणसं आराम करतात पण काका काकूंच्या support ने शेती व्यवसायात परत उतरले आहात ते पण एज्युकेशन ghevun मानलं पाहिजे तुम्हाला काका.तुम्हाला मानाचा मुजरा. तरूण पिढीला लाजवेल असे काम करत आहात तुम्ही👏👏👏👏तरूण पिढी साठी तुम्ही आदर्श आहात🙏
अगदी बरोबर बोललात, विजया जी. धन्यवाद
सुंदर माहिती. अतिशय उपयुक्त.
खूप खूप धन्यवाद, हेलन जी
असा शेतकरी वसईत होणे नाही...प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे...यांची मुलगी राज्य सेवा अधिकारी म्हणून कार्यरत होती...सध्या वास्तव्य विदेशात आहे...त्यांच्या शेतीप्रती असलेल्या कार्याला आमचा सलाम... व आपण हा व्हिडीओ बनवून युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन करता त्याबद्दल आपले मनापासून आभार..
एकदम बरबर, जॉय. आबारी
मुलाखत घेणाऱ्याचे शेतीसाठी चे knowledge काहीच नाही हे दिसते
@@anillimaye4615 जी, सुधारणा करायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
पुन्हा एकदा अफलातून माहिती तुमच्या द्वारे मिळाली, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, सईद जी
Those people who upload videos of film celebrities should learn from the uncle...aunty and the anchor how to be guide to happy life. All of them speak excellent marathi. Hats off to all of three.
Thanks a lot for your kind words, Asha Ji
Rice bag converts bhi ho sakte hai....just a thought
@@mamtasawant635 Ji, you might fine below video interesting. Thank you
ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html
सुनिल सर.... हि मुलाखत आणि व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. आपल्या वसईची नव्याने ओळख करून देत आहात... खुप खुप धन्यवाद सर! 🙏🙏🙏🌺
खूप खूप धन्यवाद, मांजरेकर जी
एकाच ठिकाणी अनेक उत्पादन घेतात .अनेक उत्पादनाची माहिती मिळाली .मलाही शेतीची आवड आहे आता नव्याने सुरूवात करत आहे या माहितीचा खूप उपयोग होईल
खूप खूप शुभेच्छा, जयश्री जी. धन्यवाद
Thanks Joseph uncle , तुम्ही खुप छान उपक्रम केला आहे. Very inspiring and informative. Thanks to u Sunil.
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@@sunildmello sir plz give number
@@sahilgadekar6151 Ji, Joseph uncle's number is mentioned in the description. Thank you
Sunillji tumhi josephjincha hirvyagar shetichi safar on line ghàdavlit tyabaddal dhanyavad. Josefji hats of you retirmentnanrar nusta aram n karta chan upkram rabavlat kautuk ahe sunilji khup chan vidio kelàt dabyavad
@@kkkarkhanis1149 जी, खूप खूप धन्यवाद
Thank you brother Sunil for the video. I also thank Mr and Mrs Joe for sharing his experience. Lord Almighty bless you all..keep it up...
Thanks a lot for your kind words, Joshua Ji
खूपच प्रेरणादायी व माहितीपूर्ण चित्रीकरण तसेच सादरीकरण होते. जो काकानी गांडूळ खताची दिलेली माहिती खूप छान दिली.अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी समजावले.सुनील जी तुम्हांला सलाम असे हे अवलिया शोधता आणि आम्हांला ही त्यांचे दर्शन देता.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
Feeling so positive after watching this video.
Thanks Sunil bhau.
Thanks a lot
That worm castings costs fortune here….uncle is doing a great job 👏🏼…he is making”Black gold”.
He is a true magician. Thank you, Nilima Ji
निवृत्तीनंतरच्या आपल्या या सुंदर उपक्रमास जोसेफ उभयतांना माझा सलाम.हल्ली सुनीलच्या पारंपारिक विविधपूर्ण पाककृत्या त्यांच्या पध्दतींची माहिती फारच कौशल्याने छान मराठीतून समजावुन सांगताना आवड निर्माण झाली आहे तरी अश्या माहितीद्वारे आम्हास त्या संस्कृतीची ओळख करून देत रहा.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख हार्दिकशुभेच्छा.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहास जी
Great work
Thank you, Ujwala Ji
great efforts by you to expose the local farmers and their conditions...thank you Mr.dem
Thanks a lot
Kharach khup pernadaee video ancle tumchyakadun khup shiknyasarkha ahe thank you so much
खूप खूप धन्यवाद, अमिता जी
Hi Sunil I am a big fan of you. Nice video's and coverage. Good Information and new ideas. I love farming.
Bara watla. All the best.
Thank a lot for your kind words, Peter Ji
Khup chaan mahiti dili dada ani Joseph Uncle ne.. Khup khup dhanyavaad ☺ Awaiting for your next video ❤
खूप खूप धन्यवाद, चेतन जी
Jo is very good man and he is succeed in farming my friend
Thanks a lot, Francis Ji
अनिल जाधव,मुंबई
खूप छान माहिती दिलीत,
माचाडो uncle ग्रेट आहेत,सर्व तरुण पिढीने त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे
अगदी बरोबर बोललात, अनिल जी. धन्यवाद
Thanks Machado uncle you are really progressive farmer and really mile stone for palghar dist farmer
Thanks suna
You are really explorer of farmers Life
Waver hai to power hai🙏
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
Sunil zabardast 👍 Machado uncle saarkhe avliya greatach❤️ keep it up 🙏
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
VERY INSPIRING AND TRUE EXAMPLE OF A COUPLE WITH PASSION FOR FARMING AND NATURE.AGE IS NO BARRIER 👍💐
Absolutely, thank you, Kanchan Ji
Thankyou for sharing this clip. Really very inspiring. Very nice farming information .Good vedio.
Thanks a lot, Shobha Ji
सुनिलजी तुम्ही छान बोलता आणि छानच माहिती सांगत असता.
धन्यवाद, रमेश जी
hey ...so good to see joe machado sir....i know him since ...when he was an manager at bccb bank...papdy branch.....a very very humble human being...and was always in my mind and heart because of his humbleness and kindness......god bless u machado saheb....feeling so so good to see u on screen .....kudos to sunil for such an great and inovative video.....all the best always
Thanks a lot for the lovely comment, Satish Ji. I'll convey this to Joe uncle.
Hi Satish Ji, Joe uncle was looking for your contact number. Could you share it here or email me at dmellosunny@gmail.com
Thank you
तरूण शेतकरी याना खूपच प्रेरणादायी
अगदी बरोबर, बाळासाहेब जी. धन्यवाद
Very nice ,very usefull information and inspiring interview. People always think to rest at time of retirement Joseph uncle is working .. Good inspiration to retired people too. Suni ji your questions were on good points.
Thanks a lot for your kind words, Silviya Ji
सुनील जी आज चा विडीयो फार छान होता खुपच प्रेरणादायी आहे आजचा विडीयो.
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
Awesome! Love watching the farm videos. Fresh organic vegetables, growing up always took it for granted. Uncle Aunty are so humble and cute 👍🏻👍🏻
Thanks a lot, Linnet Ji
खुप छान शेती दाखवता य सर तुम्ही अंकल तर रिटायरमेंट नंतर खुप छान महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत त्यांना नमस्कार
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
Sunil bhau, hats off to your passion.. They way your asked questions.. Very good information. या अंकल आंटी नि जे शेती मध्ये काम केले आहे, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. गांडूळ खत प्रकल्प खूप आवडला..
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रोहन जी
Wah. Sundar. Very inspirational. Sunil... Great job.
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
Atishay preranadayi upakram .. congratulations to Jyo uncle and Rita aunty .... also special thanks to sunil for making this video
Thanks a lot, Devashree Ji
अगदी नेमके प्रश्न विचारून छान मुलाखत घेतलीय तुम्ही. जोसेफना तुम्ही बोलतं केलं.
धन्यवाद, भारती जी
Very well made video & presented. It will inspire the younger generation of Vasai Virar belt to cultivate every inch of vacant land by forming SHG's.
The elected MLA & MP of the area should help in getting Government schemes with subsidy to this area farmers. I hope all will avoid Chemical fertilisers & pesticides & grow toxin free food for self & market.
Yes, a very good thought, Raj Ji. Thank you.
वाह!किती समृद्ध आहे आपली वसई.
अगदी खरं, शोभा जी. धन्यवाद
Great work, salute to Uncle🙏🏻🙏🏻
Thank you
खूपच प्रेरणादायी प्रवास ! ज्यो अंकल यांच्या शेताला नक्की भेट द्यायला आवडेल ! 🙏🏼
नक्की भेट द्या, मनाली जी. धन्यवाद
Excellent , keep it up.👍👍👍
Thanks a lot, Nelson Ji
Thanks Sunil, for making such informative video, and hats off to the determination of Joseph uncle and serving society , lastly Sunil have very good command on Marathi, enjoy hearing marathi. 🙏
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
very inspiring. From childhood when ever we got holidays in our villages we have helped our uncles/ aunties grand parents as we were having our subjects on such topics. This was like reviral . TKS to Sunil, Joe n Rita
Thanks a lot for your kind words, Dorothy Ji
Zucchini is called Courgette also but it's pronunciation is different here
@@MariaFernandes-bd5fg Ji, thanks a lot for the information.
सुनिल तू,अंकल आणि अंटींचे खूप खूप धन्यवाद.मी काही शेतकरी नाही.पण तुम्ही तिघांनाही माहिती त्याच्या अर्थशास्त्रासकट इतकी रोचक पध्दतीने दिली कि त्याला तोड नाही.आणि तुमचं तिघांचही मराठी तर इतक अस्खलित कि त्याला तोंड नाही.मी गंमत म्हणून शोधत होतो कधी तुम्ही मध्येच इंग्लिश शब्द वापरतां म्हणून.पण मी हरलो.😊😊😊😊
माझे मित्र मायकेल परेरा पण बॅंकर म्हणून निवृत्त झाले.ते पण वसईलाच असतात व त्यांची जास्वंदाची शेती आहे.एकदा जास्वंदीवर कार्यक्रम करा नं.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मायकल परेरांबद्दल अजून माहिती दिल्यास नक्कीच प्रयत्न करता येईल. धन्यवाद, श्रीकांत जी
नक्की
Wow khup chan ahey Video Sunil, bharpur mahiti milali Sheti badal ani hey Kaka Yevdhya mothya Job varna retire hovun City madhli Poosh life na Jagta chan Pragatshil Shetkari mahnun jagne Pasand kartat, kharach khup abhiman Vatto aslya Avliyancha ani Tumhi tar Great ahatach karan amhala ghar baslya Yevdhi chan chan mahiti purvat asta ani Ti hi Pratek Veli Vegli
काका आणि काकूंना खरोखर सलाम. लंडनला मुलीकडे असतानाही त्यांच्या मनात शेतीचेच विचार होते...धन्यवाद, माया जी
शेती बद्धल खूप सुंदर माहिती
धन्यवाद, आमोद जी
Congratulations Sunil and family! 50 K subscribers. Your dedication and hard work is simply amazing and I just cannot express it in words. Through your channel I have become aware about so many things happening in and around Vasai. You are highly eloquent in Marathi with a neutral accent. Attracting 25K subscribers in less than 4 months is nothing short of an achievement. God bless and best wishes to you and your wife for your future endeavours.
Thanks a lot for your kind words and constant support. Thank you!
Interview ekdum bhari...je prashn vicharne garjeche aste,te achuk prashn vicharta....joseph uncle aani aunty👍
खूप खूप धन्यवाद, रुपेश जी
Sunil sir tumhi khup Chan mahiti detat. I love vasai and vasaikar.
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
Sunilbhau,
Very interesting subject discussed. Finance to agriculture journey describe by you is very useful to the new generation.
Hates up. 🎩
Thanks a lot for your kind words, Arvind Ji
आदर्श उदाहरण. अंकल जोझेफ आणि रीटा खूप छान काम करत आहेत. सुनील नेहमीप्रमाणेच छान विडिओ सादर केलास.
माझी जमीन, शेती नाही तरीही मला वाटू लागलं की आपण शेती करायला हवी.
खूप खूप धन्यवाद, सरत जी
Great work 👍👍salut to uncle🙏🙏🙏
Thank you, Chhaya Ji
सुनीलजी हा विडिओ बघून खूप समाधान वाटले... काही क्षण मला आमच्या कोकणातील आंबा, काजूच्या बागेत असल्या सारखे वाटले.... जो काकांना नमस्कार सांगा.. ग्रेट माणूस! तुमची बोलण्याची पद्धत,भाषा व शब्द हे सर्व आमच्या कोकणातील आहेत... i. e. उडवे वगैरे....
बैलगाडीची चाके उडव्याला लागून होती पण बैलगाडी दिसली नाही..! खरंच खूप छान.... खूप खूप धन्यवाद.... आणि हो तुमच्याकडून एक व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे !
👍 चित्रीकरण छानच.......
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी. कृपया मला कोणता व्हिडीओ अपलोड करायचा आहे त्याचे स्मरण करून घ्या.
@@sunildmello सुनीलजी सोमवंशी ब्राह्मण व सोमवंशी ख्रिस्ती..... हा व्हिडिओ बाकी आहे.... धन्यवाद... TC
@@manoharbhovad जी, हो सामवेदी ब्राम्हण ह्या माहितीपटावर काम सुरू आहे. धन्यवाद
@@sunildmello हो वाट पाहतोय.....
Very good 👍🏽 super, so encouraging to us .
Thanks a lot
I also like your bottle masala 👍🏽
@@rboftmh.awakened.8463 thank you
What an amazing way to spend the retirement. Kudos to Joe Uncle and Rita Aunty. They should start "farm to table project" in Mumbai. Instead of selling it to the vendors, they can home deliver to the consumer. This way the consumer not only can get the freshest farm produce but also knows where and how it is grown. This concept is the most hottest food concept in the western countries as eating organic and locally grown gives the best nutrition.
Thank you for bringing such as amazing information and god bless!!
Thanks a lot for the brilliant idea. I'll definitely convey this to Uncle. Thank you, Bina Ji
Khupach upyukt mahiti dilyabddal dhanywad. Uncle he pragatshil ani prayogshil shetkari ahet. Nivruti nantar pan khupch chhan kaam kartahet.
अगदी बरोबर बोललात, समीर जी. धन्यवाद
खुप छान आहे . या विषयावर अधिक माहिती हवी आहे
आपण ज्यो अंकलना खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद, सेल्विना जी
९९२२९३३६०९
Very nice video. Such a inspiring content. These people are living their life to fullest.
@Sunil D'mello you are promoting local culture on a global platform, which is very good thing. Also the overall content on your channel is unique and useful. Also would love to see Terese (kitchen) Gardening videos on your channel.
@उंकल अंटी आणि सुनील तुम्ही सच्चे पर्यावरण प्रेमी आहात. Thanks for this video 👍
I don't know anything about Vasai-Virar & it's culture. Your videos will help to know that.👍
Thanks a lot for your kind words, Vikas Ji
इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे आणि जोसेफ काकांचे आभार....तुमच्या नवीन व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघतो .....🙏🏽
खूप खूप धन्यवाद, हृषीकेश जी
सुनील डिमेलो, आपले खास अभिनंदन,
ज्यो मच्याडो, हे कॅथोलिक बँकेत मॅनेजर होते, माझे ते जवळचे मित्र आहेत, मी काही शेतकय्रांसोबत दापोली तेथे गेलो होतो त्यावेळी चार दिवस आम्ही एकत् होतो. ओनील आल्मेडा सुध्दा होते. ज्यो यांना शेतीत फार इंटरेस्ट आहे.
परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना व कुटुंबीयांना निरोगी उदंड आयुष्य मिळावे व त्यांच्या कडून भरघोस कार्य व्हावे.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
बावती स पेडिकर, नंदाखा ल.
बावतीस पेडिकर अंकल आपले खूब खूब आबार!!
सुनील मी तुमचे सर्व व्हिडिओ पहातो. फार छान असतात. तुम्ही पुष्कळ मेहनत घेता, style of प्रेझेंटेशन फार चागली आहे. मला आवडली. अभिनंदन.
जो माचाडो ला नमस्ते सांगणे.
आपल्या कार्यास शुभेच्छा.👍🙏
@@bavtispedikar6375 अंकल, माकून एकदा खूब आबार. ज्यो अंकलला नमस्कार कळविले.
खूप छान माहिती मिळाली , आपल्याच गावी आल्यासारखं वाटलं , धन्यवाद !
धन्यवाद, प्रशांत जी
Very nice video nice topic you cover encourage us a lot great job
Thanks a lot, Aliya Ji
नेहमीच नवीन आणि माहितीरूप विडीओ असतात.सलाम
आबारी, रॉयल
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again
Thanks a lot for your kind words, Donald Ji
नमस्कार सुनील सर🙏
किती सुंदर मलाही खूप आवड आहे बाग कामाची इतकं लांब पडवळ मी पहिल्यांदाच बघितले आजच आपल्याला सबस्क्राईब केले खुप खुप शुभेच्छा 👍 मराठी छान बोलता आपण
कांचन मुंबई
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कांचन जी
सुनील, धन्यवाद इतकं उत्तम मराठी कार्यक्रम सादरीकरणासाठी! तुमच्या कडे वसईत माकडांचा त्रास होतो का शेतीला?
वसई पश्चिम भागात माकडांचा त्रास नाही. धन्यवाद
Great person. Nice information u give us. Whole sale rate suddha reasonable. 👍👍👍🙏
धन्यवाद, नीलम जी