Це відео не доступне.
Перепрошуємо.

Sudhagad Fort | Part 1 | Chhatrapati Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2023
  • सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.
    शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलुख जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा.नारो मुकुंद सबनीस यांच्या कडे गड होता. शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
    इ.स. १६९४ साली याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.'
    गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
    #SudhagadFort

КОМЕНТАРІ • 21

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 Місяць тому

    Very nice sirji

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому +1

    महाराजांनी राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड केली ' हे कधि एकल नव्हत .. बराच अपरिचित इतिहास अभ्यासायला मिळाला . अतिशय सुंदर व्हिडियो🙏🙏👍👍🚩🚩🚩 केवढा भव्य - भक्कम बांधणीचा किल्ला आहे.

  • @Mivatsaru
    @Mivatsaru Рік тому

    अप्रतिम

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 10 місяців тому

    Khup chhan video👌👌

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx 11 місяців тому

    धन्यवाद सलाम शुभेच्छा.

  • @AnandShidture
    @AnandShidture Рік тому

    जय शिवराय 🙏 सर तुमचे व्हिडिओ लय भारी असतात.❤

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      जय शिवराय , खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mydriftwoodart
    @mydriftwoodart Рік тому

    Khupch chan 👌❤🎉

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Dada khupach chhan aani sundar aahe Sudhagad , tyavaril bhakkam buruj, chorwat,aani shaboot aslelya paayrya evdhya varshanantarhi shaboot aahe. He sarv pahun tya gadachi bhakkamta aani swarjyatil mahatva lakshat yete. 2nd part lavkar takavaa.

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 Рік тому

    Beautiful video bhaiii

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 Рік тому

    very nice

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    Good morning 🌄☕
    माणगाव मधे माणगड किल्ला आहे ; चालव भरपूर लागत आणि रस्ता जंगलातून आहे ; आपण एकदा ठरवून ग्रुपने जावूया का?
    कसा आहे माझा प्लॅन ..👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 місяці тому

      Mangad जावून आलो आहे, वीडियो येईल लवकरच

  • @snehawad3930
    @snehawad3930 10 місяців тому

    किती part आहेत म्हणजे या किल्ल्याचे किती व्हिडियो केले आहेत ...