ग्रंथयात्रा भाग ३३ - मर्ढेकरांची कविता (मराठी) Granthyatra Episode 33 - Mardhekar's poetry (Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठीतील नवकवितेचे जनक मानलं जातं. परंपरागत कविसंकेत आणि प्रतिमा झुगारून त्यांनी कोणत्याही चौकटीत न बसणारी एक स्वतंत्र प्रवृत्तीची कविता लिहिली. वाचकांना वस्तुस्थितीचे भान यावे आणि त्यातून जीवनातील मंगल, शाश्वत मूल्यांकडे मानवाची वाटचाल व्हावी ही मर्ढेकरांची कवितेमागील प्रेरणा होती.१९४७ मध्ये त्यांचा ‘काही कविता’ हा संग्रह प्रकाशित झाला आणि यातील कवितांनी वाचकांच्या संवेदनशीलतेला प्रचंड हादरा दिला. कशी होती ही नव्या वळणाची कविता? पाहूया या व्हिडिओमध्ये. अक्षयकुमार काळे यांच्याकडून ऐकूया या कवितेवर उमटलेली प्रतिक्रिया.
    डिजिटल पुस्तक वाचण्यासाठी लिंक: ia801608.us.ar...
    #बाळसीताराममर्ढेकर #मर्ढेकर #कवीमर्ढेकर #काहीकविता #मर्ढेकरांचीकविता #नवकविता #आधुनिकमराठीकविता #पिपांतओल्यामेलेउंदीर #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #अर्चना #मिरजकर #अर्चनामिरजकर #मराठीकविता #मराठीसाहित्य #१००पुस्तकं #मराठीपुस्तकं #AkshayKumarKale #Mardhekar #Granthyatra #MardhekaranchiKavita
    Facebook: / arushisinghmemorialtrust
    Twitter: / archana_mirajka

КОМЕНТАРІ • 25

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 роки тому +1

    मनापासून धन्यवाद 👍💯 अशीच अजून कविता, आणि माहिती ऐकायला आवडेल 🙏

  • @madhuramirajkar6287
    @madhuramirajkar6287 3 роки тому +2

    ओघवती भाषा शैली वापरून कविता संग्रहाची छान ओळख करून दिली

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 роки тому

    अप्रतिम👌👌

  • @avinashmerekar9462
    @avinashmerekar9462 Рік тому

    छान! आवडले!

  • @गाणेमनातले-ल8म

    सुंदर.

  • @hindustanidil2.0m47
    @hindustanidil2.0m47 3 роки тому

    Nice 👌👌

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Рік тому

    1960च्या काळात शाळेत हा चर्चेचा विषय होता,

  • @hindustanidil2.0m47
    @hindustanidil2.0m47 3 роки тому +1

    Keep going 👌👌

  • @anjalimoholkar1149
    @anjalimoholkar1149 Рік тому

    👌👍

  • @sayalichyakavita6500
    @sayalichyakavita6500 3 роки тому

    खुप छान काव्यसंग्रह अणि सुंदर निवेदन

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 3 роки тому

    too good

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 роки тому

      Thanks for being one of the first to watch

    • @shrikantbhatkar5013
      @shrikantbhatkar5013 3 роки тому

      @@Granthyatra mam,i m thank full 2 u,for selecting all my fav poems

  • @Taakra92
    @Taakra92 Рік тому

    अचेतनांचा वास कोवळा, सचेतनांचा हुरूप शीतल
    हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा।

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 Місяць тому

    मर्ढेकर नवकवितेचे जनक कसे? केशवसुत हे नवकवितेचे जनक मी ऐकले वाचले होते. प्लिज सांगावे.

    • @Granthyatra
      @Granthyatra  Місяць тому

      केशवसुत हे नवकवितेचे जनक आहेतच. म्हणजे मध्ययुगीन मराठी कवितेचे त्यांनी आधुनिकीकरण केले. कवितेला आत्मनिष्ठ, नव्या अनुभवांची आणि नव्या भावनांची साक्षी केले. परंतु त्यानंतरच्या, विशेषतः दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतरच्या काळात माणसाला जे उध्वस्त जगणे अनुभवाला येत होते, जीवनातील मूल्ये हरवल्याने जो यांत्रिकिपणा आला होता, त्याची अभिव्यक्ती करणारी आधुनिक कविता मर्ढेकरांनी लिहीली. म्हणजे केशवसुतांनी मराठी कवितेचे पहिले आधुनिकीकरण केले तर मर्ढेकरांनी काही दशकांनंतर दुसरे आधुनिकीकरण केले असे म्हणता येईल.

  • @ratnaprabha7666
    @ratnaprabha7666 3 роки тому +1

    मर्ढेकरांचीच्या कविता कळायला तशा अवघड,पण समजावून सांगण्याची तुझी खूबी, हातोटी छान.... खूप आवडली *फलाटदादा* कविता-बॅकग्रांउंड *अनुपम*👌👌👏👏

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 роки тому

      धन्यवाद

    • @madhavigokhale9255
      @madhavigokhale9255 Рік тому

      या कार्यक्रमात मला सहभागी व्हायला आवडेल विचार करावा .ही नम्र विनंती .

  • @arunprabhune2164
    @arunprabhune2164 3 роки тому

    'ग्रंथयात्रे'चा 'मर्ढेकरांची कविता' हा 33 वा भाग बघितला. मराठी कवितेच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आता आपली यात्रा पोहोचली आहे. सोप्या, ओघवत्या भाषेत, समर्पक उदाहरणे देत देत आपण रसाळ भाषेत निवेदन करून मर्ढेकरांच्या कवितांचा आणि काव्यवैशिष्ट्यांचा परिचय करून दिलात. ऐकताना चांगले वाटत होते.