ग्रंथयात्रा भाग ६२ - माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह - Maze Vidyapeeth (Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • मोलमजुरी करून शहरात जगणार्‍या लोकांचे अनुभव अत्यंत पारदर्शकपणे नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मांडले. सामान्य माणसाच्या कार्यशक्तीवर, शोषितांच्या संघटित शक्तीवर त्यांचा विश्वास आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेपासून साम्यवादी कवितेची नवी परंपरा सुरू झाली, त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये पहा या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक विवेक खरे यांच्याकडून ऐका सुर्वे यांच्या कवितेचे साम्यवादी पैलू.
    #नारायणसुर्वे #माझेविद्यापीठ #गिरणीकामगार #साम्यवादीकविता #मराठीकविता #आधुनिकमराठीकविता #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #अर्चनामिरजकर #१००पुस्तकं #मराठीपुस्तकं. #विवेकखरे
    नारायण सुर्वे यांच्या आवाजात ऐका त्यांच्या कविता: कवी शब्दांचे ईश्वर • Kavi Shabdanche Ishwar...
    Facebook: / arushisinghmemorialtrust
    Twitter: / archana_mirajka

КОМЕНТАРІ • 12

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 7 місяців тому

    खुप सुंदर उपक्रम ताई.. धन्यवाद 🙏

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 2 роки тому

    thnx 2 u mam,ppl r nw reading surve poems on y-tube

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 2 роки тому +1

    सूर्वे नारायणाच्या काव्यकीरणांचा प्रकाश
    सर्वत्र मराठी काव्यविश्वात कसा पसरला याचे
    सुंदर निवेदन आपण केले. मराठी काव्याविश्वाला
    एका नव्या आशयाची सुर्व्यांनी ओळख करून दिली.

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 2 роки тому

    mam,bhakricha chandra---- this most touching poem,jz missing

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 роки тому

      Not in this collection, Sir.

    • @shrikantbhatkar5013
      @shrikantbhatkar5013 2 роки тому

      @@Granthyatra may be,he ws my fav poet,staying at parla;i meet hm personally.n my fav poem --ek ghar kar,ws recited by my friend to him

  • @vidyadharshukla3224
    @vidyadharshukla3224 2 роки тому +1

    नारायण सुर्वे बालभारतीमध्ये मराठी भाषेच्या समितीमध्ये असताना माझ्या वडिलांबरोबर एकदा घरी आले होते. त्यावेळी त्यांचे मोठेपण समजण्याचे आमचे वय नव्हते. पण त्यांना आमचे नाना खूप सन्मानाची वागणूक देत होते हे आम्हाला जाणवले. मुंबईसारख्या माणसाचे चेहरे हरवून जाणाऱ्या महानगरीत भणंग आयुष्य जगताना त्यांनी केलेली दर्जेदार साहित्याची निर्मिती केवळ आश्चर्यकारक आहे. त्यांच्या काही कविता वाचून माहित होत्या. पण या एपीसोडमुळे साम्यवादी कवितेची नवी परंपरा निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कविते त होते ही वेगळी माहिती मिळाली. या भागाचा आशय, तुमची अधिकाधिक सहज होत चाललेली मांडणी / निवेदन पार्श्वदृश्ये, तांत्रिक भाग सर्वच अंगांनी हा भाग सरस वाटला.

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 роки тому

      धन्यवाद. तुमचे अभिप्राय फार मोलाचे आहेत.

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 2 роки тому +1

    मॕम सर्वप्रथम धन्यवाद..मी आपले प्रत्येक ग्रंथाचे रसग्रहण ऐकले..ग्रंथ अजून नव्या आणिव्यापकतेने समजले.काही ग्रंथांचे विवेचन आपल्यामार्फत ऐकण्याची इच्छा आहे.ते ह्या ग्रंथ यात्रेचे भाग होतील का?
    १.एकेक पान गळावया(गौरी देशपांडे )
    २.जन हे वोळतू जेथे
    ३.जेव्हा मी जात चोरली होती
    ४.संध्याकाळच्या कविता-ग्रेस
    ५.जाहिरनामा
    ६.या सत्तेत जीव रमत नाही
    ...🙏🏻कळावे

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 роки тому

      ग्रेसच्या 'संध्याकाळच्या कविता' या पुस्तकावर मी नुकताच एक भाग प्रकाशित केला. तो आपण पाहिलाच असेल. आपण सुचवलेल्या यादीतील काही पुस्तके घेणार आहे.

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 2 роки тому

    mam,my friend has written poem on surve,when he passed away,if u want ,i will forward it to u.

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 роки тому

      That's wonderful. Please post it here.