Це відео не доступне.
Перепрошуємо.

Reis Magos Fort : Goa Forts

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2022
  • कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. कॅन्डोलीम-नेरूळ-रीस मागोस गाव असा ३-४ किमी चा रस्ता आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी घेवून येतो.. या गावाजवळच किनाऱ्याच्या अलीकडे एका टेकडावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.. किल्ल्याच्या अलीकडे रीस मागोस चे मोठे चर्च आहे.. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.. मांडोवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास साधारण एक ते दिड तास पुरे.. इथे बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा, डागडुजी केलेले बूरुज आणि गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोवयाचा नजारा तर अफलातूनच.. या शिवाय गडाच्या मुख्य द्वाराच्या आत कमानीत दडलेले ‘डेथ होल’ म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच..
    गडाच्या मध्यभागी एक म्युझियम उभारले असून यात या किल्ल्याच्या पुनर्बांधणीची काही छायाचित्रे गडाचे पूर्वीचे आणि आत्ताचे रूप यातला बदल दाखवतात.. गडावरच्या तोफांना लाकडाचे गाडे बसविल्याने ते रुबाबदार वाटतात.. गडावरून पणजी शहराचा एक सुंदर नजरा आहे.. आणि पणजी शहराच्या दिशेने उतरत जाणारा दोन दगडी पायऱ्यांचा जिना आहे.. तो पाहायचा असल्यास किल्ल्याला पायथ्याने गाडीरस्त्याने डावीकडे वळसा मारून जावे लागते.. किल्ल्यावर तुरुंग, समुद्राकडे उतरणारे दोन समांतर जिने, प्रवेश दरवाजा, भक्कम बुरुज, त्यावर उभारलेले कॅप्सूल बुरुज, अधिकारी आणि सैनिकांच्या पहाऱ्यासाठी बांधलेल्या खोल्या आणि भक्कम तटबंदी असे अवशेष आहे.. पोर्तुगीज दुर्गबांधणी कौशल्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या किल्ल्याचा आलेख करायला हवा..
    #ReisMagosFort#Goa

КОМЕНТАРІ • 15

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Amazing.

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому

    गोव्यातील सर्वच किल्ले अगदी अपरिचित होते ; तुमच्या व्हिडियो मुळे गोव्याच्या भुमितील पराक्रमी इतिहास कळला . जो कधीच माहित नव्हता .. मनापासून आभार🙏🙏🚩 तीथल संवर्धन पण खुप छान आहे. खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ🙏🙏 .

  • @tanishqkharote652
    @tanishqkharote652 2 роки тому

    खूप छान माहिती..

  • @aprnayadav1453
    @aprnayadav1453 2 роки тому

    Khup chan

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Dada, sundar bandhanicha aani atishay susthitit aslela tyachbarobar nisargramya parisar aani tyamadhe tumhi sangitaleli gadachi sundar mahiti. Khupach chhan aahe. Goa sarkarla dhanyawad dile pahijet gadachi swacchata aani sundarta tikaun thevlyabaddal. Dada tumche dhanyawad Punha ekda eka changlya aani sundar gadachi mahiti karun dilyabaddal.

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 2 роки тому

    very nice

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 Рік тому

    Nice information and nice fort 👌👌

  • @samarthkatkar4087
    @samarthkatkar4087 2 роки тому

    👌👌👌

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому

    सुरेख किल्ला. खूप खूप धन्यवाद 🙏🙂

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому

    खुप सुंदर चित्रीकरण आणि थोडक्यात अतिशय महत्वाची माहिती. 👌धन्यवाद 🙏🚩🇮🇳