सर पहिल्यांदा तुमच्या कार्याला सलाम 🚩जे व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहेत ,ज्या व्यक्तींना परिस्थिती मूळे जाऊ शकत नाहीत ,जे व्यक्ती दिव्यांग आहेत अश्या प्रत्येक व्यक्तीच्या मन भरून गेले आहे सर ,,🚩🚩तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच इच्छा💐 happy journey your again vedios❤️❤️👍👍🏅🏅
धन्यवाद रानवाटा >>>>>>>>> *चरैवेती__चरैवेती__चऽऽरैऽऽऽवेऽऽऽऽती* "तू चाल गड्यारे तुला भीती कशाची, तरच अनुभवातीत होतील__अनंत रुपे या ब्रम्हांडातील विश्वाची___अविश्रांत पायपिटीच्या मोबदल्याचे__नाही मोल करता येत सोने_चांदीने________________ त्या अनमोल खजिन्याचे,शेवटच्या क्षणी__तोच रे ठेवा __निश्चिंतपणे निरोप घेण्या या बेगडी *श्रीमंतीचा* " 卐ॐ卐
एवढ्या कष्टातून, प्रॉब्लेम्स मधून तुम्ही हे सगळं आमच्या समोर मांडता याची आज आम्हाला जाणीव झाली आणि हे सगळं करण्या मागे तुमच्यातला आणि तुमच्या टीम मधील बाकी सदस्या मधला एक सच्चा प्रामाणिक कलाकाराची आज ओळख आम्हाला नव्याने झाली. ही गोष्ट ऐकतोय खूप छान वाटल, आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचनीना सामोरे जाण्याची एक नवी उमेद, प्रेरणा देणारी ही गोष्ट आयुष्यात नक्कीच कामी येईल. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.👍🙏🎉
खूप बदल अनुभवले तुम्ही, खुप त्रास सहन केला, पण सह्याद्रीच प्रेम काही कमी झाल नाही, 👌👌🙏🙏 'कोकणकड्यावर आलोय दरी मधे ढग अडकलेत मागे विजा चमकत आहेत " आणि वीज चमकते ह्या पेक्षा अप्रतीम साथ निसर्ग आणखी काय देणार 👌👌🙏🙏🚩🚩
सर तुमच्या जिद्दीला सलाम....! टीव्ही वर नाही झालं तरी पण इथे मात्र तुम्हाला मोठा प्रतिसाद नक्की मिळेल आणि आपले चॅनेल लवकरच 1M पूर्ण करेल आणि तुमची ही भन्नाट भटकंती सर्वांच्या मनात भरेल 💯😍
"रानवाटा" म्हंटलं तर प्रवास खडतर असणारच. पण जर आपल्या सारखे जिद्दी प्रवासी असतील तर प्रवास यशस्वी होतोच. तुमचे हे Teamwork असच बळकट राहो हिच प्रार्थना. आपल्या सर्वांच्या जिद्दीला मनापासून सलाम.
खूप छान स्वप्नील. २००८/९ ला मी पहिल्यांदा तुझी raanvata website पहिली होती. तेव्हापासून तुला पाहतोय. तिथपासून ते आत्तापर्यंतची तुझी आणि तुझ्या टीमची प्रगती उल्लेखनीय आहे. तुझा आवाज तर अगदी मनाला भिडतो. अशीच उत्तरोत्तर तुमची सर्वांची प्रगती व्हावी हीच सदिच्छा आणि एकदा तुझ्या भेटीचा योग यावा ही आशा.
सर जो खरा निसर्ग प्रेमी आहे, अस्स्सल ट्रेकर आहे... त्याला तुमची मेहनत न सांगता नुसत्या फोटो वरून दिसेल... सर तुमच्या सह्याद्री चे विडिओ पाहताना.. प्रत्येक्ष सह्याद्री फिरत आहोत, जगात आहोत, अनुभवत असं होतं...तुम्ही इतकं सुंदर कामं करत आहात..ते सगळं आम्हाला मंत्रमुग्ध करत असतं,सह्याद्री ते विलक्षण भुरळ घालणार रुप... आमच्या डोळ्याचं पारण फेडतं.... 🙏🙏तुमच्या कामाचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात... चालू ठेवा सर... तुमच्या कार्यातून तुम्ही आजच्या तरुण पिढीला निसर्गाच्या आणखीन जवळ नेत आहात.. आणि हे खूप प्रशंसनीय आहे. 👌👌👍👍
ट्रेकिंग भ्रमंती पर्यटन करणारे, हायटेक ग्याजेट्स वापरून त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर अपलोड करणारे आज भरपूर आहेत. त्यातल्या मॅक्सिमम लोकांचे विडिओ किंवा फोटो भन्नाट असतात पण त्याच्या जोडीला लागणारे वर्णन तेवढे प्रभावी नसते मग असे विडिओ अर्धवट बघितले जातात किंवा धावती भेट देत. पण तुमचे विडिओ एका यशस्वी स्टोरीटेलर सारखे खिळवून ठेवतात. स्टार्ट टू एन्ड बघितले जातात. योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीचे फळ अल्टीमेटच असते.👍👍👌👌
दादा सह्याद्री खऱ्या अर्थाने तू महाराष्ट्रासमोर मांडलास तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ... आणि खरंय सह्याद्री च सौंदर्य, रौद्र, भयाण, सौम्य, ह्या सगळ्या रुपात तू सह्याद्री दाखवला इतकाच नाही तर युरोप सारख्या देशात जाऊन तू आपल्या मराठी शैलीत तिथल्या देशांतील अनुभव आणि इतर सगळ्याच गोष्टी दाखवल्या... त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.. सलाम आहे तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींना.... तुझी आयुष्य जगण्याची कला काही औरच आहे .... मनमुराद... तुझ्याकडं बघूनच आज सह्याद्री च वेड मनाला लाऊन महाराष्ट्रभर आणि त्याबाहेर सुधा जाऊन प्रत्येक गोष्ट explore करत आहोत...
प्रत्येक video बघितल्यानंतर स्वतः फिरून आल्याची अनुभूती येते. खुपच छान👌 best wishes 👍👍 and I think your show don't need any TV celebrity because you are the only celebrity for Ranvaata subscribers/audience. ☺️👍
तुमचे सगळेच फोटोज, व्हिडिओज्,बोलणं ,माहिती देणं अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम आहे. खुप छान वाटतंय हे सगळे व्हिडिओ बघताना. मनातून खुप ईच्छा होती की महाराजांचे सगळेच गड आणि किल्ले बघावेत.पण नाही शक्य झाले ते. पण आता होतंय ...केवळ तुमच्यामुळेच. परमेश्वर आणि महाराज तुम्हाला खुप खुप यशस्वी करो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !!!🙏🙏🙏
आज महाराष्ट्राला अभिमान वाटेल की तुम्ही give up नाही केलं. अतिस्तुती नाही करत पण, सह्याद्रीच रुद्र रूप आणि त्याच तेवढ्याच अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दात वर्णनाची ही सांगड घालून तुम्ही महाराष्ट्राला एक अमूल्य भेटच दिलेली आहे. आम्ही सारे आभारी आहोत तुमचे आणि तुमच्या टीमचे.
....Sometimes in reality there is no story....but I know Every story has their own reality....As like your journey....All the best guys for your beautiful journey...🌿🍃😇
हे जे काही तुम्ही केले आहे, करताय आणी करणार आहात ते खूप मनापासून आणी प्रामाणिक आहे. दृक्श्राव्य माध्यमातून तुम्ही आम्हाला जी पर्वणी दाखवली आहे ती खूप अद्भुत आणी आणि ती बनवण्यामागे घेतलेल्या कष्टांना सलाम. आमच्यासाठी तुम्हीच celebrity आहात. निसर्ग हाच देव आणी त्यामधील असणारे गडकिल्ले ही आमची देवालये. डोळ्यांचे पारणे फिटले. 👍👍👍
आम्ही जो 15 मिनिटाचा व्हिडिओ बघतो आणि खूष होतो पण त्या मागे तुमचे किती कष्ट आहेत ते आज आम्हाला कळलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सह्याद्रीच वेगळं रूप दाखवत आहात तुम्ही. आवड असूनही सवड नसल्याने आम्ही तिथे जावू शकत नाही पण तुमच्या सारख्या दुर्गमित्रांमुळे हे सगळं घर बसल्या बघू शकतो.
तुझा कंटेंट खूप अप्रतिम आणि अडकवून ठेवणारा आहे त्यामुळे बघायला छान वाटत, तुझा बॅकग्राऊंड चा आवाज आणि व्हिडिओ छान कॉम्बिनेशन आहे. त्यात व्हिएतनाम, Scandinavia ने चार चांद लावले. तुझ्या प्रामाणिक कष्टाचं फळ नक्कीच तुला मिळायला सुरुवात झालीय, एक दिवस हेच चॅनल वाले तुझ्याकडे येतील ट्रॅव्हल शो साठी, कारण आता तूच एक सेलिब्रिटी आहेस. तेव्हा तोंडावर त्यांना तुझा नकार कळव आणि तुझ्या जगात हरवून जा. खूप खूप धन्यवाद छान व्हिडिओ साठी आणि शुभेच्छा भविष्यासाठी आणखी खूप काही बघायचेय रानवाटा च्या नजरेतून. बाकी ठाण्यात आल्यावर नक्की भेटायला आवडेल.
Swapnil सर, तुमच्या जिद्दीला, आणि मेहनतीला खुप खुप सलाम !!! तसेच तुम्हाला सहकारी सुद्धा जीवाला जीव देणारे मिळाले आहेत. त्यांच्या कामगिरीचा ही रानवाटा चया यशात मोठा वाटा आहे. सगळेच व्हिडिओ सुंदर आहेत.ते बनवण्यामागची खरी मेहनत आज कळून आली.तुमच्या या अद्वितीय कार्यास ईश्वरी आशीर्वाद मिळोत व तो तुम्हास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना !!! हरिश्चंद्रगड वरचा संध्याकाळ/ रात्रीचा ढगा मधून चमकणाऱ्या विजांचा शॉट खरेच अफलातून आहे. नजरेचे पारणे फेडणारा !!! तुमच्या सोबत ट्रेक करायला नक्कीच आवडेल. मी नासिकला राहतो. - सचिन जोशी -९८२२८७६७५३.
Amazing ! I don't know much about cinematography & editing but each and every view as well as visual captured and presented in this video gives immense satisfaction to the eyes and is just beyond the expectation. Best of luck for your future assignments.
अप्रतिम रे स्वप्नील ! तुमचा सर्वात पहिल्यांदा पाहिलेला व्हिडीओ म्हणजे सांदणदरी ! त्यानंतर आलेला तुमचा जवळपास प्रत्येक व्हिडीओ पाहिलेला आहे. हा व्हिडीओ देखील आवडला. तुम्ही तुमच्या प्रवासाचे प्रांजळपणे केलेले वर्णन भावले. विशेषतः तुमच्या मार्गात आलेल्या अडचणी आणि सेट बॅक्स सुध्दा व्यवस्थित हाताळुन तुम्ही तुमचा प्रवास चालु ठेवलाय ह्याबद्दल खरेच कौतुक वाटते. ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही एकेठिकाणी म्हणालात तसे की "अडचणी येत होत्या पण केलेल्या कामातुन आनंद मिळत होता !" हेच सर्वात महत्वाचे आहे ! मीही वय २४ पासुन ३२ पर्यंत नित्यनेमाने ट्रेक करत होतो आमच्या मिसळपाव.कॉम च्या ग्रुप सोबत , पण ३२व्यावर्षी करीयर मधील संधीमुळे फॉरेन ला जाण्याच्या योग आला अन सगळेच थांबले. अन परत आलो तेव्हा हा लॉकडाऊन . काय करणार . पण असो, मी आशावादी आहे, लवकरच परत ट्रेकिंग सुरु करता येईल ! कदाचित आपली कधीतरी भेट होईल असेच ट्रेक करताना , कदाचित राजगडाच्या बलेकिल्ल्यावरच !! पुढील प्रवास आणि प्रवासवर्णासाठी अनेक शुभेच्छा !
स्वप्निल तुझं आणि तुझ्या टिमच अप्रतिम videos साठी खुप सार कौतुक. अप्रतिम चित्रण, उत्तम editing, उत्कृष्ट अभ्यासपूर्ण लेखन, मनमोहक सादरीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवेदकाचा आवाज. Rick Steve's खेरीज दुसरा कोणताही Travel Vlog जवळपास देखिल नाही. मी एक रानवेडा, पण मध्यंतरी कौटुंबिक जबाबदाऱ्या मूळे भटकंतीत खंड पडला. आता मी पन्नाशीचा पण आता तुझी प्रवास वर्णने पाहून मी पुन्हा रानवाटा जवळ करणार. रानवाटाच्या टिमने जे महाराष्ट्र देशाचे निसर्ग वैभव समोर आणले आहे ते कौतुकास्पद. हा वारसा पुढच्या पिढी कडे जावा हिच सदिच्छा आणि रानवाटाच्या भविष्यातील सर्व उपक्रमांना लाख लाख शुभेच्छा.
तुमच्या जिद्दीला सलाम! tv show नसला तरीही UA-cam च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचलात हेच आमचे भाग्य. रानवाटा टिम आम्ही आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद!
अरे भावा आत्ता जे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला सुमार दर्जाचे विडिओ देऊन प्रसिद्ध होत आहेत सोकॉल्ड इंफ्लूएंजर्स त्यांच्या पेक्षा १००००० पटीने छायाचित्रण आणि स्टोरीलाईन उत्तम आहे राव तुमची ❤️❤️❤️❤️ सबमिट करा त्यांना विडीओ, मागे देखील बोललो होतो 🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼
दादा, तुमच्या ह्याच प्रामाणिक आणि मेहनती वृत्तीमुळे तुम्ही आज मराठीतील अग्रगण्य असे UA-camer आहात.. सलाम तुमच्या कष्ठाला आणि मेहनतीला.. पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा!!! 💐💐🙏❤🙏💐💐
सह्याद्री अप्रतिम आहेच... ह्यात वादच नाही... पण ज्यांनी सह्याद्री बघितला नसेल त्यांना तुमच्या नजरेतून सह्याद्री बघताना प्रचंड ओढ लागेल इथे येण्याची ...आणि ज्यांनी बघितला आहे त्यांच्या मनातला अभिमान लाख पटींनी वाढेल... मनापासून सलाम सह्याद्रीला... इथल्या मातीला 🙏🙏 आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा... असेच videos करत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा 👍👍
साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा वरदहस्त आहे तुमच्यावर. In 21st century everyone is thinking about there own future, आणि आपण भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगणं शिकवत आहात आणि जगत आहात.
जिद्द, श्रम आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणजे यश आणि मग त्यातून समोर हात जोडून उभं राहतं केल्या कामाचं समाधान आणि मिळणारा निर्भेळ आनंद!! तूम्हाला आणि तुमच्या सवंगड्यांना अगदी मनापासून नमस्कार आणि तुम्ही करत असलेल्या ह्या देवकार्यात तुम्हाला भरभरून यश आणि किर्ती प्राप्त होवो ही मनोमन देवबाप्पा चरणी प्रार्थना रूजू!!
खरंतर हा व्हिडीओ पाहून आपोआप डोळ्यातून हलके अश्रू आले जे आजवर मी अफाट चित्रीकरण सह्याद्री पहिला ते सर्व काही एवढ्या मेहनतीने सादरीकरण केले होते आणि त्या नंतर ही आलेले अपयश तरी ही तुम्ही काम सुरूच ठेवले खरच सलाम आहे ह्या जिद्दीला ज्या सह्याद्रीवर आपण बागडतो हिंडतो तिचाच कणखर पणा आपल्यात ही आला आहे ❤️ हल्ली सह्याद्रीत जातो तेव्हा तुझे प्रवासवर्णन Dialogues कानात घुमत असतात जसे की राजगडावर..बोललेले ते वाक्य हरलो जरी तरी ही..विंदा करंदीकर.. खडकतल्या झऱ्या आठवत ते हरिश्चंद्रगड रतनगड करताना 🙏 दादा तुम्ही महान आहात
या धावपळी च्या जगात वाट सम्पलेय असं वाटलं तर नक्की सह्याद्रीतल्या रानवाटा चोखाळाव्यात त्या नक्कीच मार्गदर्शक ठरतात. जय महाराष्ट्र जय शिवराय. 🙏 व्हिडिओ मधून संवाद साधता येतो याच उत्तम उधाहरण म्हणजे. तुम्ही आहात दादा.... 🙏💐🍬🍫
महाराष्ट्राचे इतक़े अनोखे सौंदर्य सर्वान पर्यंत पोहचवल्या बद्दल आभार आणि भविष्यात अश्याच नव नवीन रानवाटा आपल्या कडुन सर होवोत .अनेक शुभेच्छा - हर्षवर्धन , सांगली .
रणवाटाच्या सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. असेच सहयाद्री मधील व्हिडिओ भविष्यातही सादर करीत रहा. आपल्या सारख्या भटक्यानसाठी हा सह्याद्री नेहमीच त्याचा पदर पसरून खुला आहे. 👍
लोभ हा राहिलंच आणि लाभही आम्ही परिपूर्णतेने घेतोच आहोत,तेही तुमच्या वर्णनातून,याची देही याची डोळा असा...कधीतरी कसेतरी कुठल्यातरी रानवाटेवर आपणांस भेटण्याचा योग यावा हा लोभ मनी साठवून पुढच्या रविवार च्या भागाची वाट बघू इच्छितो...💚💚💚
सर इतकी शूट करायची आणि महाराष्ट्र आम्हाला दाखवायची तेही इतक्या मस्त पद्धतीने हि तळमळ खूप कमी जणांत आहे आपल्या आतापर्यंतच्या टाकलेल्या सगळ्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा 🙌🏻👌🏻🙏🏻
खूप उत्सुकता होती कधी पुन्हा तुमच्या व्हिडिओ येतील, खरा महाराष्ट्र जो नजरेत असून कधी बघितला नाही तो तुमच्या नजरेतून बघता आला, ड्रोन हरवला तेंव्हा आमचीच काही गोष्ट हरवलीय आणि ती भेटत नाहीये याची चलबिचल होती, प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन काय बघायला मिळेल तुम्ही त्या साठी किती प्रयत्न केलेत हे सर्वच खूप भारी होत, तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि आम्हाला नवीन खुराक मिळेल याची अपेक्षा 😊🙏
स्वप्निल, तुम्ही शूट केलेले vdos आणि moments अप्रतिम आहेत. असा सह्याद्री कोणीच आधी दाखवलेला नाही. तुमच्या जिद्दीला आणि ध्येयाला सलाम. मी झपाटल्यासारखे तुझे जवळपास सगळे vdos पाहिले ७ दिवसात.
👍👌.. रानवाटा टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच..!! कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी घेतलेली मेहनत , साहस व चित्रीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न ह्या गोष्टींसाठी तुम्हां सर्वांना सलाम..🙏🙏🚩🚩 💐💐तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐💐🚩🙏👍
दादा... दोन कंमेंट निवडल्या... त्यात पहिली माझी... आयला.. स्वतःच रेंज ट्रेक करून आल्या सारख वाटल... बाकी तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ हे... कायमचे👍👍👍👍👍
स्वप्नील, तुझं आणि तुझ्या टीमचं मनापासून कौतुक. मला वाटतं तुम्ही लवकरच महाराष्ट्राचे नंबर १ travel youtuber बनाल. कारण तुझ्या व्हिडिओ मधला content, तुझी समजावण्याची भाषा/पद्धत, विषयावरची पकड आणि या सगळ्या मागचा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न. खूप खूप शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओची वाट पाहतोय. 😀👍
कितीही चांगल्यातला चांगला video असो,एक तरी dislike असतो, परंतु येथे एकही नाही!! आणि आत्तापर्यंत 1k likes हीच खरी पावती!! हॅट्स ऑफ!! तुमच्या या कष्टाचं वर्णन पाहताना काटा येतो अंगावर☺️👍
प्रथम अभिनंदन आपले आपण 30k subscriber चा आकडा पूर्ण केल्याबद्दल एखाद्या गड किल्ला एखादे ठिकाण थोडक्यात माहिती देऊन प्रेक्षकांन समोर कसे मांडता येईल हे तुमच्या विडिओ मार्फत दिसले अगदीच 4 , 5 मिनिटांच्या विडिओ मधून ही तुम्ही छान माहिती दिली या लॉक डाउनमूळे जरी भटकंती थंबली असली तरीही तुमचे काम सुरू असल्यामुळे आम्ही घरी बसून तुम्हाला आम्हाला Vietnam आणि Europe त्याच बरोबर महाराष्ट्रतील नष्ट होत चाललेली संस्कृती गड किल्ल्याची ओळख करून दिली यामध्ये तुमच्या टीमची मेहनत ही तेवडीच जास्त आहे आपल्या चॅनलला माझ्या शुभेच्छा तुमचे विडिओ आणखीन तळागाळातील लोकांना पर्यंत पोहचो हीच इच्छा
रतन गड ते हरिचंद्र गड ब्लॉग रात्री नव्हे पहाटे पर्यंत बघितलं . १९९५ ते २००५ पर्यंत बरेच ट्रेक केले . त्या वेळी आमच्या कडे (३ ते ६ जण Dombivali and myself from Ambernath ) साधा कोडॅक कॅमेरा असायचा .तसे आत्ता बरेच लोक youtube वर ब्लॉग टाकतात पण तुमची videography आणि वर्णन ऐकून ,परत एकदा रतनगड आणि हरिचंद्र गडावरचया आठवणी ताज्या जाहल्या . कीप इट अप . माझ्या सारखे नक्कीच तुमचे ब्लॉग like करतील
आपली वैयक्तिक ओळख नसताना देखील व्हिडिओ बघताना इतकी आपुलकी आणि प्रशंसा वाटली की उर भरून आलं... शिवाजी महाराजांचे नवीन मावळे तुम्ही.. प्रत्येक परिस्थितीवर मात करून असेच गड सर करावेत, अशी प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा.. हो.. आणि मनापासून आभार
अप्रतिम आहेत तुमचे व्हिडिओ. माझ्या सारख्या अनेक रुग्णांना जे किल्ल्यांवर जावू शकत नाहीत त्यांच्या साठी हा मोठा आनंदाचा तेव्हा आहे. किल्ले चढताना चा थरार परत एकदा अनुभवता येतो. धन्यवाद 🙏 God bless you
ट्रेकसाठी खूप वेगवेगळे youtube channels पाहिले, पण जे रूप तुम्ही दाखवलंत ते अप्रतिम आहे. विडिओ मधला तुमचा आवाज , बोलण्याचा ढंग आणि शब्दांकन सगळंच परफेक्ट. तुमचा हा प्रवास नेहमीच सुखकर होवो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सर माझ्या आयुष्यातील पहिला trek तुमच्याच वेबसाइट च्या माध्यमातून केला होता आणि त्याची फार मदत झाली। भीमाशंकर गणेश मंदिर मार्गाने चढलो होतो । धन्यवाद त्या साठी ।
*Hopefully you will read this comment* आमची मैत्री फार जुनी आहे. गेले ६-७ वर्ष कदाचित जरी बोलत नसलो तरी या चॅनेल ला मी एक secret viewer आणि subscriber नक्कीच आहे. आज फार मन झालं comment करायला. मी हा सगळा प्रवास 2010 पासून पाहत आलो आहे. ह्यात खूप struggle आहे स्वप्नील आणि सगळ्या टीम चा. कामाला आणि content ला कधीच तोड नाही. तुम्ही UA-cam वरचा प्रवास असाच सुरु ठेवा, Great work always prevails !
तुमची मेहनत खरंच दिसते आहे , कधी वाटलं नव्हता की एका विडिओ मागे इतकी मेहनत असते आणि इतकी माणसं असतात , चित्रीकरण , माहिती , आवाज सगळ्या गोष्टी इतक्या सुरेख जुळून आल्या आहेत सगळ्या व्हिडिओस मधेय , खूप आनंद वाटतो मनाला नेहमीच एक अभिमान पण वाटतो तुम्हाला नक्कीच याचा श्रेय मिळेल आणि लवकर स्पॉन्सर मिळोत हीच सदिच्छा
तुमचे खरे तर आभार मानायला हवे. कारण ज्या ठिकाणी आम्ही पोहोचु शकत नाही अश्या ढिकाणि जाता अगदी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन .तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटते. अस निसर्ग रम्य द्रुश्य बघायला मिळत। नाही.तुमच्या पुठिल वाटचालीला खूप खूप सुभेच्छा.
मी आज तुमचा एक व्हिडिओ पाहिला मला तो व्हिडिओ खूप आवडला, मी तुमचा channel subscribe केला, तुमच्या channel ला जास्तीत जास्त subscribe मिळावे म्हणून मी 400 जणांना तुमचा व्हिडिओ forward केला, मला ही सह्याद्री खूप आवडतो मी तुमच्या channel माध्यमातून सह्याद्री पाहायला मिळाला
मी खुप व्हिडीओ बघीतलेत माझा आवडीचा छंद ट्रेकर्स ने शुट केलेला सह्याद्री बघणे परंतु आपण केलेल्या शुटला तोड नाही "अप्रतीम " आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🌹🙏🌹💐💐🚩🙂
सह्याद्रीचे सौंदर्य आणि ह्विडीओ मधले शॅाटस् बघुन मजा वाटते पण त्या मागे किती मेहनत घ्यावी लागते. हे आज समजल आणि तो धोडप रवळ्या जवळ्या चा किस्सा ऐकुन तर मन एकदम धस्स झाल… #respect 🙌🏻
खूप सुंदर व्हिडिओ शूट केले आहे सर तुम्ही आणि तुमच्या टीमनी, तुमच्या बरोबर ट्रेक करायला आवडेल आणि तुम्ही जे ट्रेक करता त्याची खूप माहिती मिळते आमच्या सारख्या नव्या पिढीला नव बळ मिळते सह्याद्री मध्ये ट्रेक करायला... तुमचे मनापासून all the best तुमच्या पुढच्या वाटचाली साठी...
स्वप्निल दादा रतन हरीश च्या गोष्टी आडून तुझ्या या खडतर प्रवासाचीच गोष्ट ऐकायला मिळाली. रानवाटा ची टॅग लाईन खरच सार्थ केली आहेस तू.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ....
तुमच्या समूहाचा आजवरचा प्रवास खरच जबरदस्त आणि थक्क करणारा आहे, तुम्ही केलेल चित्रण हे नेहमीच कमालीच आणि निसर्गाचा भरभरून आनंद देणार असत आणि आम्हा भटक्या साठी तुमचे हे व्हिडीओ नेहमीच मेजवानी असतात, तर तुमचा हा प्रवास असा अखंडित चालू राहो आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा - साद सह्याद्रीची
सुंदर, अप्रतिम व्हिडिओ बघताना आमच्या अंगावर ही शहारे आले... तुमच्या सुंदर व्हिडिओ अन प्रवास वर्णन खूपच रोमांचक आहे अन तितकाच संघर्ष ही. अन आम्हाला सहयाद्री ची सैर करून आणण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद 🙏 आपल्या प्रति आमचा लोभ अन उत्साह कायम राहील. 🙏
Yala boltat marathi bana tu khup pudhe jaa dada ekha prekshakane tula dislike nahi kela ahe tu ani tuzya team ne sarvancya manat ek vegali jaga Nirman keli ahe tuzya hya pravasat amhi sadaiva sobat ahot love from dombivali ❤
सगळ्यात सर्वोत्तम आज मी तुमचे विडिओ पाहिलेत. मी आजपर्यंत रानमाणूस प्रसाद ह्यांना खुप लाईक करतो कारण तुमचे आणि त्यांचे विडिओ सारखेच असल्याचे जाणवते .पण तुमच्या विडोये मध्ये काहीतरी वेगळा अनुभव बघायला मिळतो आहे. खूप छान विडिओ आहेत. कष्ट करत राहा फळ मिळणार. माझा खूप विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी
महाराष्ट्रत जन्म घेतल्याचा अभिमान काय आहे, तुम्ही याचा साक्षात्कार घडवलात दादा!.😊 तुमचे व्हिडिओ बघताना मन अगदी मोहरून जात! इंद्रवज्र!!😍 अवघ्या महाराष्ट्रला हा आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव तुम्ही दिलात 🙏🙏 खूप खूप आभार त्यासाठी घेतलेले कष्ट आणि ध्यास याला सलाम 👍👌👌
👍 अपेक्षेप्रमाणे सुंदर... श्री प्रवीण भोसल्यांचे मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक आणि व्हीडिओ पाहताना जाणवलं की त्याला थर्ड डायमेन्शन आणि कथेची जोड मिळाली तर नेटफ्लिक्स सारखी सीरीज तयार होईल... इतिहासाचं सोनं होईल. आणि कदाचित तुमची पुढची कथा तयार होईल...
तुम्ही केलेला प्रवास, प्रयत्न आणि सातत्य याचे खरेच कौतुक करावे तितके कमी आहे,.. कोकणकडा आणि एकणुच गडावर आलेले अनुभव आमच्या साठी केवळ आकल्पनिय आहेत, तुम्ही शूट केलेले व्हिडिओ अप्रतिम असतात ! 🌄👌👌 ... शक्य असल्यास मोबाईल फोटोग्राफी चा ही workshop सुरु करावा ! 🙏
तुमचा प्रवास खूपच चढ उतारांचा होता...आणि तेवढाच प्रेरणादायी सुद्धा दादा...तुम्ही हा प्रवास मध्येच थांबवला नाहीत म्हणून आज हे वैभव आम्हाला पहायला मिळतंय...😇😍👌...तुमच्या सोबत रेंज ट्रेक करायची खूप इच्छा आहे नक्की आम्हावरही लोभ असू द्यावा...😇🙏
कमाल भाऊ कमाल ❤️ keep going... किती काय काय लपलंय या कॅमेऱ्या मागे. मेहनत येणार कामी नक्कीच. आणि मागच्या वेळेस राजगड ला तुम्हाला भेटायची संधी हुकली पण या पावसाळ्यात नाय हुकणार.. अशी जिवंत माणसं पहिली कि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन अजून सकारात्मक होतो 🥰 भेटू कुठल्यातरी रानवाटेवर ❤️
आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत खूप छान काम करतात तुम्ही आम्हाला तुमच्या डोळ्यानी स्वर्गीय नेत्रदीपक सौंदर्याचा घरबसल्या अनुभव घेता येतो खूप खूप धन्यवाद
प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ उशिरा का होईना पण ते नक्कीच मिळतं. पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐
ua-cam.com/video/9CTa4ro-6zs/v-deo.html
वीडियो आवडला तर लाइक करा , शेयर करा .
चॅनेल वर नविन असाल तर चॅनेल ला सब्सक्राइब करायला विसरु नका
सर पहिल्यांदा तुमच्या कार्याला सलाम 🚩जे व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहेत ,ज्या व्यक्तींना परिस्थिती मूळे जाऊ शकत नाहीत ,जे व्यक्ती दिव्यांग आहेत अश्या प्रत्येक व्यक्तीच्या मन भरून गेले आहे सर ,,🚩🚩तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच इच्छा💐 happy journey your again vedios❤️❤️👍👍🏅🏅
तुमच्या संपूर्ण टीम च्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे हे शक्य झालं...
सलाम तुमच्या कार्याला 👏👏🙏
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद रानवाटा >>>>>>>>>
*चरैवेती__चरैवेती__चऽऽरैऽऽऽवेऽऽऽऽती*
"तू चाल गड्यारे तुला भीती कशाची,
तरच अनुभवातीत होतील__अनंत
रुपे या ब्रम्हांडातील विश्वाची___अविश्रांत पायपिटीच्या मोबदल्याचे__नाही मोल करता
येत सोने_चांदीने________________
त्या अनमोल खजिन्याचे,शेवटच्या क्षणी__तोच रे ठेवा __निश्चिंतपणे निरोप घेण्या या बेगडी *श्रीमंतीचा* " 卐ॐ卐
Jeevan kadam peksha khup jast mast ahe tumcha channel..#keep going#we will support#👍👍
मनातलं बोललास भावा..
@@chaudharyumesh Ho kharach Karan ata Jeevan kadam cha content kahi bhaltach asta Ani nusta gongat vayfal music cha
एकदम मनातलं
जीवन कदम ची quality खूप ढासळली आहे..
True
लॉकडाउन लागला नसता तर आम्ही या आणि अशा अनेक उत्कृष्ठ कलाकृतींना मुकलो असतो. यापुढेही असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्याची संधी देत रहा.
एवढ्या कष्टातून, प्रॉब्लेम्स मधून तुम्ही हे सगळं आमच्या समोर मांडता याची आज आम्हाला जाणीव झाली आणि हे सगळं करण्या मागे तुमच्यातला आणि तुमच्या टीम मधील बाकी सदस्या मधला एक सच्चा प्रामाणिक कलाकाराची आज ओळख आम्हाला नव्याने झाली. ही गोष्ट ऐकतोय खूप छान वाटल, आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचनीना सामोरे जाण्याची एक नवी उमेद, प्रेरणा देणारी ही गोष्ट आयुष्यात नक्कीच कामी येईल. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.👍🙏🎉
खूप बदल अनुभवले तुम्ही,
खुप त्रास सहन केला,
पण सह्याद्रीच प्रेम काही कमी झाल नाही,
👌👌🙏🙏
'कोकणकड्यावर आलोय दरी मधे ढग अडकलेत मागे विजा चमकत आहेत "
आणि वीज चमकते ह्या पेक्षा अप्रतीम साथ निसर्ग आणखी काय देणार
👌👌🙏🙏🚩🚩
सर तुमच्या जिद्दीला सलाम....! टीव्ही वर नाही झालं तरी पण इथे मात्र तुम्हाला मोठा प्रतिसाद नक्की मिळेल आणि आपले चॅनेल लवकरच 1M पूर्ण करेल आणि तुमची ही भन्नाट भटकंती सर्वांच्या मनात भरेल 💯😍
"रानवाटा" म्हंटलं तर प्रवास खडतर असणारच. पण जर आपल्या सारखे जिद्दी प्रवासी असतील तर प्रवास यशस्वी होतोच. तुमचे हे Teamwork असच बळकट राहो हिच प्रार्थना. आपल्या सर्वांच्या जिद्दीला मनापासून सलाम.
खूप छान स्वप्नील. २००८/९ ला मी पहिल्यांदा तुझी raanvata website पहिली होती. तेव्हापासून तुला पाहतोय. तिथपासून ते आत्तापर्यंतची तुझी आणि तुझ्या टीमची प्रगती उल्लेखनीय आहे. तुझा आवाज तर अगदी मनाला भिडतो. अशीच उत्तरोत्तर तुमची सर्वांची प्रगती व्हावी हीच सदिच्छा आणि एकदा तुझ्या भेटीचा योग यावा ही आशा.
सर जो खरा निसर्ग प्रेमी आहे, अस्स्सल ट्रेकर आहे... त्याला तुमची मेहनत न सांगता नुसत्या फोटो वरून दिसेल... सर तुमच्या सह्याद्री चे विडिओ पाहताना.. प्रत्येक्ष सह्याद्री फिरत आहोत, जगात आहोत, अनुभवत असं होतं...तुम्ही इतकं सुंदर कामं करत आहात..ते सगळं आम्हाला मंत्रमुग्ध करत असतं,सह्याद्री ते विलक्षण भुरळ घालणार रुप... आमच्या डोळ्याचं पारण फेडतं.... 🙏🙏तुमच्या कामाचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात... चालू ठेवा सर... तुमच्या कार्यातून तुम्ही आजच्या तरुण पिढीला निसर्गाच्या आणखीन जवळ नेत आहात.. आणि हे खूप प्रशंसनीय आहे. 👌👌👍👍
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ट्रेकिंग भ्रमंती पर्यटन करणारे, हायटेक ग्याजेट्स वापरून त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर अपलोड करणारे आज भरपूर आहेत. त्यातल्या मॅक्सिमम लोकांचे विडिओ किंवा फोटो भन्नाट असतात पण त्याच्या जोडीला लागणारे वर्णन तेवढे प्रभावी नसते मग असे विडिओ अर्धवट बघितले जातात किंवा धावती भेट देत. पण तुमचे विडिओ एका यशस्वी स्टोरीटेलर सारखे खिळवून ठेवतात. स्टार्ट टू एन्ड बघितले जातात. योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीचे फळ अल्टीमेटच असते.👍👍👌👌
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं...
खूप खूप धन्यवाद!
दादा सह्याद्री खऱ्या अर्थाने तू महाराष्ट्रासमोर मांडलास तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ... आणि खरंय सह्याद्री च सौंदर्य, रौद्र, भयाण, सौम्य, ह्या सगळ्या रुपात तू सह्याद्री दाखवला इतकाच नाही तर युरोप सारख्या देशात जाऊन तू आपल्या मराठी शैलीत तिथल्या देशांतील अनुभव आणि इतर सगळ्याच गोष्टी दाखवल्या... त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.. सलाम आहे तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींना.... तुझी आयुष्य जगण्याची कला काही औरच आहे .... मनमुराद...
तुझ्याकडं बघूनच आज सह्याद्री च वेड मनाला लाऊन महाराष्ट्रभर आणि त्याबाहेर सुधा जाऊन प्रत्येक गोष्ट explore करत आहोत...
प्रत्येक video बघितल्यानंतर स्वतः फिरून आल्याची अनुभूती येते. खुपच छान👌 best wishes 👍👍 and I think your show don't need any TV celebrity because you are the only celebrity for Ranvaata subscribers/audience. ☺️👍
तुमचे सगळेच फोटोज, व्हिडिओज्,बोलणं ,माहिती देणं अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम आहे.
खुप छान वाटतंय हे सगळे व्हिडिओ बघताना.
मनातून खुप ईच्छा होती की महाराजांचे सगळेच गड आणि किल्ले बघावेत.पण नाही शक्य झाले ते.
पण आता होतंय ...केवळ तुमच्यामुळेच.
परमेश्वर आणि महाराज तुम्हाला खुप खुप यशस्वी करो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !!!🙏🙏🙏
We need 1 million subscribers for this channel ...!!!!
Great content
लोभ असु द्या...!!!
आज महाराष्ट्राला अभिमान वाटेल की तुम्ही give up नाही केलं.
अतिस्तुती नाही करत पण, सह्याद्रीच रुद्र रूप आणि त्याच तेवढ्याच अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दात वर्णनाची ही सांगड घालून तुम्ही महाराष्ट्राला एक अमूल्य भेटच दिलेली आहे.
आम्ही सारे आभारी आहोत तुमचे आणि तुमच्या टीमचे.
....Sometimes in reality there is no story....but I know Every story has their own reality....As like your journey....All the best guys for your beautiful journey...🌿🍃😇
Thank you so much!
हळु हळु चांगला प्रेक्षकवर्ग चांगल्या काँटेंटकडे वळत आहे , पण अजूनही जेवढे फेसबुक लाईक बटणवर क्लिक्स होतात तेवढे युट्युबवर झाले तर अजुन छान ,🙏🏼
Swapnil dada tumchasobt trek kraycha ahe ...😍 please arrangement kra
Agree👍 Dada kara kahitari!!
होऊन जाऊदया या पावसाळयात दादा ⛈🚩
हे जे काही तुम्ही केले आहे, करताय आणी करणार आहात ते खूप मनापासून आणी प्रामाणिक आहे. दृक्श्राव्य माध्यमातून तुम्ही आम्हाला जी पर्वणी दाखवली आहे ती खूप अद्भुत आणी आणि ती बनवण्यामागे घेतलेल्या कष्टांना सलाम. आमच्यासाठी तुम्हीच celebrity आहात. निसर्ग हाच देव आणी त्यामधील असणारे गडकिल्ले ही आमची देवालये. डोळ्यांचे पारणे फिटले. 👍👍👍
Stunning cinematography and your pure and genuine efforts are visible in your work..❤️❤️❤️
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना खूप यश भेटो...👌
आम्ही जो 15 मिनिटाचा व्हिडिओ बघतो आणि खूष होतो पण त्या मागे तुमचे किती कष्ट आहेत ते आज आम्हाला कळलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सह्याद्रीच वेगळं रूप दाखवत आहात तुम्ही. आवड असूनही सवड नसल्याने आम्ही तिथे जावू शकत नाही पण तुमच्या सारख्या दुर्गमित्रांमुळे हे सगळं घर बसल्या बघू शकतो.
6:52 चा Drone shot ने डोळ्याचे पारणे फिटले🙌
तुम्हीच आता सगळे एक Celebrities झाले आहात अस म्हणू शकतो😍❤️
खूप सुंदर❤️
तुझा कंटेंट खूप अप्रतिम आणि अडकवून ठेवणारा आहे त्यामुळे बघायला छान वाटत, तुझा बॅकग्राऊंड चा आवाज आणि व्हिडिओ छान कॉम्बिनेशन आहे. त्यात व्हिएतनाम, Scandinavia ने चार चांद लावले. तुझ्या प्रामाणिक कष्टाचं फळ नक्कीच तुला मिळायला सुरुवात झालीय, एक दिवस हेच चॅनल वाले तुझ्याकडे येतील ट्रॅव्हल शो साठी, कारण आता तूच एक सेलिब्रिटी आहेस. तेव्हा तोंडावर त्यांना तुझा नकार कळव आणि तुझ्या जगात हरवून जा.
खूप खूप धन्यवाद छान व्हिडिओ साठी आणि शुभेच्छा भविष्यासाठी
आणखी खूप काही बघायचेय रानवाटा च्या नजरेतून.
बाकी ठाण्यात आल्यावर नक्की भेटायला आवडेल.
This channel deserve millions of subscribers. More power to you guys🔥🙏🏻
Swapnil सर, तुमच्या जिद्दीला, आणि मेहनतीला खुप खुप सलाम !!! तसेच तुम्हाला सहकारी सुद्धा जीवाला जीव देणारे मिळाले आहेत. त्यांच्या कामगिरीचा ही रानवाटा चया यशात मोठा वाटा आहे. सगळेच व्हिडिओ सुंदर आहेत.ते बनवण्यामागची खरी मेहनत आज कळून आली.तुमच्या या अद्वितीय कार्यास ईश्वरी आशीर्वाद मिळोत व तो तुम्हास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना !!! हरिश्चंद्रगड वरचा संध्याकाळ/ रात्रीचा ढगा मधून चमकणाऱ्या विजांचा शॉट खरेच अफलातून आहे. नजरेचे पारणे फेडणारा !!! तुमच्या सोबत ट्रेक करायला नक्कीच आवडेल. मी नासिकला राहतो. - सचिन जोशी -९८२२८७६७५३.
Amazing ! I don't know much about cinematography & editing but each and every view as well as visual captured and presented in this video gives immense satisfaction to the eyes and is just beyond the expectation. Best of luck for your future assignments.
स्वप्नील दादा आणि प्रणव दादा म्हणजे आम्हा भटक्या ऐतिहासिक वेड असलेल्या लोकांसाठी एक पर्वणीच राहील.
Glad to know the story behind such visual treats !
अप्रतिम रे स्वप्नील !
तुमचा सर्वात पहिल्यांदा पाहिलेला व्हिडीओ म्हणजे सांदणदरी ! त्यानंतर आलेला तुमचा जवळपास प्रत्येक व्हिडीओ पाहिलेला आहे. हा व्हिडीओ देखील आवडला. तुम्ही तुमच्या प्रवासाचे प्रांजळपणे केलेले वर्णन भावले. विशेषतः तुमच्या मार्गात आलेल्या अडचणी आणि सेट बॅक्स सुध्दा व्यवस्थित हाताळुन तुम्ही तुमचा प्रवास चालु ठेवलाय ह्याबद्दल खरेच कौतुक वाटते. ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही एकेठिकाणी म्हणालात तसे की "अडचणी येत होत्या पण केलेल्या कामातुन आनंद मिळत होता !" हेच सर्वात महत्वाचे आहे !
मीही वय २४ पासुन ३२ पर्यंत नित्यनेमाने ट्रेक करत होतो आमच्या मिसळपाव.कॉम च्या ग्रुप सोबत , पण ३२व्यावर्षी करीयर मधील संधीमुळे फॉरेन ला जाण्याच्या योग आला अन सगळेच थांबले. अन परत आलो तेव्हा हा लॉकडाऊन . काय करणार . पण असो, मी आशावादी आहे, लवकरच परत ट्रेकिंग सुरु करता येईल ! कदाचित आपली कधीतरी भेट होईल असेच ट्रेक करताना , कदाचित राजगडाच्या बलेकिल्ल्यावरच !!
पुढील प्रवास आणि प्रवासवर्णासाठी अनेक शुभेच्छा !
Thank you so much for sharing Journey of this Series..
Kudos to you and your team's efforts.
Keep it going... Hardwork always pay off 👍
स्वप्निल तुझं आणि तुझ्या टिमच अप्रतिम videos साठी खुप सार कौतुक. अप्रतिम चित्रण, उत्तम editing, उत्कृष्ट अभ्यासपूर्ण लेखन, मनमोहक सादरीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवेदकाचा आवाज. Rick Steve's खेरीज दुसरा कोणताही Travel Vlog जवळपास देखिल नाही. मी एक रानवेडा, पण मध्यंतरी कौटुंबिक जबाबदाऱ्या मूळे भटकंतीत खंड पडला. आता मी पन्नाशीचा पण आता तुझी प्रवास वर्णने पाहून मी पुन्हा रानवाटा जवळ करणार. रानवाटाच्या टिमने जे महाराष्ट्र देशाचे निसर्ग वैभव समोर आणले आहे ते कौतुकास्पद. हा वारसा पुढच्या पिढी कडे जावा हिच सदिच्छा आणि रानवाटाच्या भविष्यातील सर्व उपक्रमांना लाख लाख शुभेच्छा.
Watching this made me feel alive.. You guys had amazing experience. All the best for all your journey ahead:)
Thank you so much
तुमच्या जिद्दीला सलाम!
tv show नसला तरीही UA-cam च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचलात हेच आमचे भाग्य.
रानवाटा टिम आम्ही आपले मनापासून आभार मानतो
धन्यवाद!
Dont loose Hope's this sentence was perfectly matching to your story sir , You are such a inspiration to us , Veryy veryy quality content 😍😍
Thank you so much!
अरे भावा आत्ता जे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला सुमार दर्जाचे विडिओ देऊन प्रसिद्ध होत आहेत सोकॉल्ड इंफ्लूएंजर्स त्यांच्या पेक्षा १००००० पटीने छायाचित्रण आणि स्टोरीलाईन उत्तम आहे राव तुमची ❤️❤️❤️❤️ सबमिट करा त्यांना विडीओ, मागे देखील बोललो होतो 🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼🤞🏽🙌🏼
सर जी कोल्हापूर ला या
हो नक्की..
दादा, तुमच्या ह्याच प्रामाणिक आणि मेहनती वृत्तीमुळे तुम्ही आज मराठीतील अग्रगण्य असे UA-camer आहात.. सलाम तुमच्या कष्ठाला आणि मेहनतीला.. पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा!!!
💐💐🙏❤🙏💐💐
सह्याद्री अप्रतिम आहेच... ह्यात वादच नाही... पण ज्यांनी सह्याद्री बघितला नसेल त्यांना तुमच्या नजरेतून सह्याद्री बघताना प्रचंड ओढ लागेल इथे येण्याची ...आणि ज्यांनी बघितला आहे त्यांच्या मनातला अभिमान लाख पटींनी वाढेल... मनापासून सलाम सह्याद्रीला... इथल्या मातीला 🙏🙏
आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा... असेच videos करत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा 👍👍
साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा वरदहस्त आहे तुमच्यावर.
In 21st century everyone is thinking about there own future, आणि आपण भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगणं शिकवत आहात आणि जगत आहात.
जिद्द, श्रम आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणजे यश आणि मग त्यातून समोर हात जोडून उभं राहतं केल्या कामाचं समाधान आणि मिळणारा निर्भेळ आनंद!!
तूम्हाला आणि तुमच्या सवंगड्यांना अगदी मनापासून नमस्कार आणि तुम्ही करत असलेल्या ह्या देवकार्यात तुम्हाला भरभरून यश आणि किर्ती प्राप्त होवो ही मनोमन देवबाप्पा चरणी प्रार्थना रूजू!!
खरंतर हा व्हिडीओ पाहून आपोआप डोळ्यातून हलके अश्रू आले जे आजवर मी अफाट चित्रीकरण सह्याद्री पहिला ते सर्व काही एवढ्या मेहनतीने सादरीकरण केले होते आणि त्या नंतर ही आलेले अपयश तरी ही तुम्ही काम सुरूच ठेवले खरच सलाम आहे ह्या जिद्दीला ज्या सह्याद्रीवर आपण बागडतो हिंडतो तिचाच कणखर पणा आपल्यात ही आला आहे ❤️
हल्ली सह्याद्रीत जातो तेव्हा तुझे प्रवासवर्णन Dialogues कानात घुमत असतात जसे की
राजगडावर..बोललेले ते वाक्य हरलो जरी तरी ही..विंदा करंदीकर..
खडकतल्या झऱ्या आठवत ते हरिश्चंद्रगड रतनगड करताना 🙏
दादा तुम्ही महान आहात
खूप खूप धन्यवाद!
या धावपळी च्या जगात वाट सम्पलेय असं वाटलं तर नक्की सह्याद्रीतल्या रानवाटा चोखाळाव्यात त्या नक्कीच मार्गदर्शक ठरतात.
जय महाराष्ट्र जय शिवराय. 🙏
व्हिडिओ मधून संवाद साधता येतो याच उत्तम उधाहरण म्हणजे. तुम्ही आहात दादा.... 🙏💐🍬🍫
महाराष्ट्राचे इतक़े अनोखे सौंदर्य सर्वान पर्यंत पोहचवल्या बद्दल आभार आणि भविष्यात अश्याच नव नवीन रानवाटा आपल्या कडुन सर होवोत .अनेक शुभेच्छा - हर्षवर्धन , सांगली .
आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहोत!
खूप खूप धन्यवाद!
स्वप्नील, ह्या सुंदर व्हिडिओस मागे किती अथक परिश्रम आहेत हे आज कळाले. तुमची अशीच प्रगती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना💐
रणवाटाच्या सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
असेच सहयाद्री मधील व्हिडिओ भविष्यातही सादर करीत रहा.
आपल्या सारख्या भटक्यानसाठी हा सह्याद्री नेहमीच त्याचा पदर पसरून खुला आहे. 👍
लोभ हा राहिलंच आणि लाभही आम्ही परिपूर्णतेने घेतोच आहोत,तेही तुमच्या वर्णनातून,याची देही याची डोळा असा...कधीतरी कसेतरी कुठल्यातरी रानवाटेवर आपणांस भेटण्याचा योग यावा हा लोभ मनी साठवून पुढच्या रविवार च्या भागाची वाट बघू इच्छितो...💚💚💚
अप्रतिम.... घराची परिस्थिती जेमतेम असल्याने कधीचं आवड जोपासता नाही आली, तुमच्या चॅनल मुळे व्हिडिओ बगुन मन खूष करतो...... असच व्हिडिओज येऊंदे ❤️🙏
सर इतकी शूट करायची आणि महाराष्ट्र आम्हाला दाखवायची तेही इतक्या मस्त पद्धतीने हि तळमळ खूप कमी जणांत आहे आपल्या आतापर्यंतच्या टाकलेल्या सगळ्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा 🙌🏻👌🏻🙏🏻
खूप उत्सुकता होती कधी पुन्हा तुमच्या व्हिडिओ येतील, खरा महाराष्ट्र जो नजरेत असून कधी बघितला नाही तो तुमच्या नजरेतून बघता आला, ड्रोन हरवला तेंव्हा आमचीच काही गोष्ट हरवलीय आणि ती भेटत नाहीये याची चलबिचल होती, प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन काय बघायला मिळेल तुम्ही त्या साठी किती प्रयत्न केलेत हे सर्वच खूप भारी होत, तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि आम्हाला नवीन खुराक मिळेल याची अपेक्षा 😊🙏
खुप छान. आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत त्यातून मार्ग काढताना नवीन काही शिकायला मिळते.
अपयशातून काही नाही मिळले तरी नवीन अनुभव मिळतो हे नक्कीच. 👍👍👍👍
स्वप्निल, तुम्ही शूट केलेले vdos आणि moments अप्रतिम आहेत. असा सह्याद्री कोणीच आधी दाखवलेला नाही. तुमच्या जिद्दीला आणि ध्येयाला सलाम. मी झपाटल्यासारखे तुझे जवळपास सगळे vdos पाहिले ७ दिवसात.
👍👌.. रानवाटा टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच..!! कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी घेतलेली मेहनत , साहस व चित्रीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न ह्या गोष्टींसाठी तुम्हां सर्वांना सलाम..🙏🙏🚩🚩
💐💐तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐💐🚩🙏👍
खूप खूप धन्यवाद
दादा तुमच्या प्रयत्नांना आणखीन यश मिळो....
"आता त्या लाखो रुपयांची अपेक्षा नाही..."
👌👌
दादा... दोन कंमेंट निवडल्या... त्यात पहिली माझी... आयला.. स्वतःच रेंज ट्रेक करून आल्या सारख वाटल... बाकी तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ हे... कायमचे👍👍👍👍👍
दादा, रानवाटा ह्या चॅनल सारखा content कुठेच नाही मिळणार, तुमच्या मेहनतीला सलाम! 🚩🙏🏻❤️
तुमचे व्हिडिओ बघून माझी गडकिल्ले फिरण्याची आवड आजुन वाढले धन्यवाद एवढे सुंदर व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचवले त्यासाठी
जय शिवराय 🙏
जय रुद्रशंभू 🙏
खूप मस्त या सगळ्यात तुम्ही जो काही वेळ घालवला तो तुम्ही खऱ्याखुऱ्या स्वर्गात घालवला , ढग ,पाऊस , वीज , गडगड , थंडी हवा यात हरवून जाण म्हणजे प्रेम । ❤️
खूप खूप धन्यवाद
स्वप्नील, तुझं आणि तुझ्या टीमचं मनापासून कौतुक. मला वाटतं तुम्ही लवकरच महाराष्ट्राचे नंबर १ travel youtuber बनाल. कारण तुझ्या व्हिडिओ मधला content, तुझी समजावण्याची भाषा/पद्धत, विषयावरची पकड आणि या सगळ्या मागचा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न. खूप खूप शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओची वाट पाहतोय. 😀👍
प्रणव महाजन यांचे नाने घाट ट्रेक नंतर आज दर्शन झाले
कितीही चांगल्यातला चांगला video असो,एक तरी dislike असतो, परंतु येथे एकही नाही!! आणि आत्तापर्यंत 1k likes हीच खरी पावती!! हॅट्स ऑफ!! तुमच्या या कष्टाचं वर्णन पाहताना काटा येतो अंगावर☺️👍
प्रथम अभिनंदन आपले आपण 30k subscriber चा आकडा पूर्ण केल्याबद्दल एखाद्या गड किल्ला एखादे ठिकाण थोडक्यात माहिती देऊन प्रेक्षकांन समोर कसे मांडता येईल हे तुमच्या विडिओ मार्फत दिसले अगदीच 4 , 5 मिनिटांच्या विडिओ मधून ही तुम्ही छान माहिती दिली या लॉक डाउनमूळे जरी भटकंती थंबली असली तरीही तुमचे काम सुरू असल्यामुळे आम्ही घरी बसून तुम्हाला आम्हाला Vietnam आणि Europe त्याच बरोबर महाराष्ट्रतील नष्ट होत चाललेली संस्कृती गड किल्ल्याची ओळख करून दिली यामध्ये तुमच्या टीमची मेहनत ही तेवडीच जास्त आहे आपल्या चॅनलला माझ्या शुभेच्छा तुमचे विडिओ आणखीन तळागाळातील लोकांना पर्यंत पोहचो हीच इच्छा
सर तुम्ही फिल्म फिल्म शूट करायला पाहिजे तुम् च् amezing छित्रफित् पाहुन् मन हेलवुन् टाकतंय.I salute your works.
एकदम झकास सर
पुढच्या प्रवासाला शुभेच्छा...!
युरोप पेक्षाही आपल्या सह्याद्रीच्या कुशीत हजारो सुंदर सुंदर पर्यटन स्थळे आहेत.........
रतन गड ते हरिचंद्र गड ब्लॉग रात्री नव्हे पहाटे पर्यंत बघितलं . १९९५ ते २००५ पर्यंत बरेच ट्रेक केले .
त्या वेळी आमच्या कडे (३ ते ६ जण Dombivali and myself from Ambernath ) साधा कोडॅक कॅमेरा असायचा .तसे आत्ता बरेच लोक youtube वर ब्लॉग टाकतात पण तुमची videography आणि वर्णन ऐकून ,परत एकदा रतनगड आणि हरिचंद्र गडावरचया आठवणी ताज्या जाहल्या . कीप इट अप . माझ्या सारखे नक्कीच तुमचे ब्लॉग like करतील
आपली वैयक्तिक ओळख नसताना देखील व्हिडिओ बघताना इतकी आपुलकी आणि प्रशंसा वाटली की उर भरून आलं... शिवाजी महाराजांचे नवीन मावळे तुम्ही.. प्रत्येक परिस्थितीवर मात करून असेच गड सर करावेत, अशी प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा.. हो.. आणि मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम आहेत तुमचे व्हिडिओ. माझ्या सारख्या अनेक रुग्णांना जे किल्ल्यांवर जावू शकत नाहीत त्यांच्या साठी हा मोठा आनंदाचा तेव्हा आहे. किल्ले चढताना चा थरार परत एकदा अनुभवता येतो. धन्यवाद 🙏 God bless you
ट्रेकसाठी खूप वेगवेगळे youtube channels पाहिले, पण जे रूप तुम्ही दाखवलंत ते अप्रतिम आहे. विडिओ मधला तुमचा आवाज , बोलण्याचा ढंग आणि शब्दांकन सगळंच परफेक्ट. तुमचा हा प्रवास नेहमीच सुखकर होवो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सर माझ्या आयुष्यातील पहिला trek तुमच्याच वेबसाइट च्या माध्यमातून केला होता आणि त्याची फार मदत झाली। भीमाशंकर गणेश मंदिर मार्गाने चढलो होतो । धन्यवाद त्या साठी ।
*Hopefully you will read this comment*
आमची मैत्री फार जुनी आहे. गेले ६-७ वर्ष कदाचित जरी बोलत नसलो तरी या चॅनेल ला मी एक secret viewer आणि subscriber नक्कीच आहे. आज फार मन झालं comment करायला.
मी हा सगळा प्रवास 2010 पासून पाहत आलो आहे. ह्यात खूप struggle आहे स्वप्नील आणि सगळ्या टीम चा. कामाला आणि content ला कधीच तोड नाही. तुम्ही UA-cam वरचा प्रवास असाच सुरु ठेवा, Great work always prevails !
स्वर्ग आकाशात असतो म्हणतात..
पण स्वर्गाचे दार तर इथूनच पाहायला मिळते..!
सखा सह्याद्री😘
खूप छान लिहिलय❤️
@@vijayshinde7315 khup chan
मानल पाहिजे सर तुम्हाला मी आज पर्यंत हरीचंद्रा गडावर २ ३ वेळा गेलो आहे पण असा हरीचंद्रगड पहिल्यांदा पाहिला thank you रणावरा team
तुमची मेहनत खरंच दिसते आहे , कधी वाटलं नव्हता की एका विडिओ मागे इतकी मेहनत असते आणि इतकी माणसं असतात , चित्रीकरण , माहिती , आवाज सगळ्या गोष्टी इतक्या सुरेख जुळून आल्या आहेत सगळ्या व्हिडिओस मधेय , खूप आनंद वाटतो मनाला नेहमीच एक अभिमान पण वाटतो
तुम्हाला नक्कीच याचा श्रेय मिळेल आणि लवकर स्पॉन्सर मिळोत हीच सदिच्छा
थक्क करणारं निसर्ग वेड!
तुम्ही सारे निसर्गाईचे लाडके सुपुत्र आहात! मनोनित उपक्रम-प्रकल्पांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!
तुमचे खरे तर आभार मानायला हवे. कारण ज्या ठिकाणी आम्ही पोहोचु शकत नाही अश्या ढिकाणि जाता अगदी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन .तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटते. अस निसर्ग रम्य द्रुश्य बघायला मिळत। नाही.तुमच्या पुठिल वाटचालीला खूप खूप सुभेच्छा.
मी आज तुमचा एक व्हिडिओ पाहिला मला तो व्हिडिओ खूप आवडला, मी तुमचा channel subscribe केला, तुमच्या channel ला जास्तीत जास्त subscribe मिळावे म्हणून मी 400 जणांना तुमचा व्हिडिओ forward केला, मला ही सह्याद्री खूप आवडतो मी तुमच्या channel माध्यमातून सह्याद्री पाहायला मिळाला
काही लोक इतिहास लिहितात पण तुम्ही इतिहास जिवंत करताय सॅल्यूट आहे तुम्हाला
मी खुप व्हिडीओ बघीतलेत माझा आवडीचा छंद ट्रेकर्स ने शुट केलेला सह्याद्री बघणे परंतु आपण केलेल्या शुटला तोड नाही "अप्रतीम " आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🌹🙏🌹💐💐🚩🙂
खूप खूप धन्यवाद
सह्याद्रीचे सौंदर्य आणि ह्विडीओ मधले शॅाटस् बघुन मजा वाटते पण त्या मागे किती मेहनत घ्यावी लागते. हे आज समजल आणि तो धोडप रवळ्या जवळ्या चा किस्सा ऐकुन तर मन एकदम धस्स झाल…
#respect 🙌🏻
खूप सुंदर व्हिडिओ शूट केले आहे सर तुम्ही आणि तुमच्या टीमनी, तुमच्या बरोबर ट्रेक करायला आवडेल आणि तुम्ही जे ट्रेक करता त्याची खूप माहिती मिळते आमच्या सारख्या नव्या पिढीला नव बळ मिळते सह्याद्री मध्ये ट्रेक करायला... तुमचे मनापासून all the best तुमच्या पुढच्या वाटचाली साठी...
खूप खूप धन्यवाद
स्वप्निल दादा रतन हरीश च्या गोष्टी आडून तुझ्या या खडतर प्रवासाचीच गोष्ट ऐकायला मिळाली. रानवाटा ची टॅग लाईन खरच सार्थ केली आहेस तू.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ....
खूप खूप धन्यवाद
असंच प्रेम राहुद्या..
तुमच्या समूहाचा आजवरचा प्रवास खरच जबरदस्त आणि थक्क करणारा आहे, तुम्ही केलेल चित्रण हे नेहमीच कमालीच आणि निसर्गाचा भरभरून आनंद देणार असत आणि आम्हा भटक्या साठी तुमचे हे व्हिडीओ नेहमीच मेजवानी असतात, तर तुमचा हा प्रवास असा अखंडित चालू राहो आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा - साद सह्याद्रीची
खूप खूप धन्यवाद!
असेच आशीर्वाद राहूदेत..
सुंदर, अप्रतिम व्हिडिओ बघताना आमच्या अंगावर ही शहारे आले... तुमच्या सुंदर व्हिडिओ अन प्रवास वर्णन खूपच रोमांचक आहे अन तितकाच संघर्ष ही. अन आम्हाला सहयाद्री ची सैर करून आणण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद 🙏 आपल्या प्रति आमचा लोभ अन उत्साह कायम राहील. 🙏
अप्रतिम !! मनापासून केलेल्या हया प्रयत्ना मुळे तुम्ही अनेकांना त्या त्या ठिकाणी फिरुवून आणलेय.
धन्यवाद ! तुमच्या टीमला. 🙏👍
Yala boltat marathi bana tu khup pudhe jaa dada ekha prekshakane tula dislike nahi kela ahe tu ani tuzya team ne sarvancya manat ek vegali jaga Nirman keli ahe tuzya hya pravasat amhi sadaiva sobat ahot love from dombivali ❤
नवीन जोमाने, नवा उत्साह घेऊन पुन्हा होऊन जाऊ द्या....रानवाटा. खूप खूप शुभेच्छा !
सगळ्यात सर्वोत्तम आज मी तुमचे विडिओ पाहिलेत. मी आजपर्यंत रानमाणूस प्रसाद ह्यांना खुप लाईक करतो कारण तुमचे आणि त्यांचे विडिओ सारखेच असल्याचे जाणवते .पण तुमच्या विडोये मध्ये काहीतरी वेगळा अनुभव बघायला मिळतो आहे. खूप छान विडिओ आहेत. कष्ट करत राहा फळ मिळणार. माझा खूप विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी
खूप खूप धन्यवाद
असंच प्रेम असुद्या..
महाराष्ट्रत जन्म घेतल्याचा अभिमान काय आहे, तुम्ही याचा साक्षात्कार घडवलात दादा!.😊
तुमचे व्हिडिओ बघताना मन अगदी मोहरून जात!
इंद्रवज्र!!😍
अवघ्या महाराष्ट्रला हा आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव तुम्ही दिलात 🙏🙏 खूप खूप आभार त्यासाठी घेतलेले कष्ट आणि ध्यास याला सलाम 👍👌👌
खूप खूप धन्यवाद!
गड किल्ल्यांची छान माहीती मिळते तसेच छायाचित्रण ही खुप छान आहे अजुन सह्याद्री चे छान छान व्हीडीओ अपलोड करा
👍
अपेक्षेप्रमाणे सुंदर...
श्री प्रवीण भोसल्यांचे मराठ्यांची धारातीर्थे हे पुस्तक आणि व्हीडिओ पाहताना जाणवलं की त्याला थर्ड डायमेन्शन आणि कथेची जोड मिळाली तर नेटफ्लिक्स सारखी सीरीज तयार होईल...
इतिहासाचं सोनं होईल. आणि कदाचित तुमची पुढची कथा तयार होईल...
तुम्ही केलेला प्रवास, प्रयत्न आणि सातत्य याचे खरेच कौतुक करावे तितके कमी आहे,.. कोकणकडा आणि एकणुच गडावर आलेले अनुभव आमच्या साठी केवळ आकल्पनिय आहेत, तुम्ही शूट केलेले व्हिडिओ अप्रतिम असतात ! 🌄👌👌 ... शक्य असल्यास मोबाईल फोटोग्राफी चा ही workshop सुरु करावा ! 🙏
खूप खूप धन्यवाद!
हो नक्की..mobile photography आणि इतर बऱ्याच विषयांवर online course लवकरात लवकर सुरू करण्याचा विचार आहे..
अप्रतिम सर
हि vdo ची मालिका ह्या पुढे पण अशीच सुरू राहू द्या हीच विनंती
अप्रतिम. आपल्या संघर्षाला भरपूर यश मिळो. त्या कव्हर फोटो मध्ये तुम्ही भर पावसळ्यात कोकणकड्याच्या edge वर बसला होतात. प्लीज इतकी रिस्क घेऊ नका 🙏
तुमचा प्रवास खूपच चढ उतारांचा होता...आणि तेवढाच प्रेरणादायी सुद्धा दादा...तुम्ही हा प्रवास मध्येच थांबवला नाहीत म्हणून आज हे वैभव आम्हाला पहायला मिळतंय...😇😍👌...तुमच्या सोबत रेंज ट्रेक करायची खूप इच्छा आहे नक्की आम्हावरही लोभ असू द्यावा...😇🙏
मानलं राव तुम्हाला..२३ वर्षाच्या आत १५० गड किल्ले सर करणं खायचं काम नाही..अप्रतिम..खरं तर शब्द सुचेना तुम्हा सर्वांची तारीफ करायला..🔥🙌
धन्यवाद
कमाल भाऊ कमाल ❤️ keep going... किती काय काय लपलंय या कॅमेऱ्या मागे. मेहनत येणार कामी नक्कीच. आणि मागच्या वेळेस राजगड ला तुम्हाला भेटायची संधी हुकली पण या पावसाळ्यात नाय हुकणार.. अशी जिवंत माणसं पहिली कि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन अजून सकारात्मक होतो 🥰 भेटू कुठल्यातरी रानवाटेवर ❤️
अप्रतिम....मी गोनीदांबरोबर ट्रेक्स केलेत,त्यावेळी अशी फोटोग्राफी नव्हती,त्यामुळे तुमचे सह्याद्री प्रेम आणि वेड ही आवडले.
खूप शुभेच्छा.
गोनीदां सोबत ट्रेक केलाय म्हणजे खरंच भाग्यवान आहात!
तुमचे अनुभव ऐकायला आवडतील...
@@Raanvata07 नक्कीच सांगेन.
आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत खूप छान काम करतात तुम्ही आम्हाला तुमच्या डोळ्यानी स्वर्गीय नेत्रदीपक सौंदर्याचा घरबसल्या अनुभव घेता येतो खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद..
असंच प्रेम असुद्या..