आमचे लग्न कसे जमले शेवट पर्यंत बघा | Marathi Wedding Story 2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • नमस्कार मित्रानो
    आज आम्ही तुम्हाला आमचे लग्न कसे जमले ते सांगणार आहोत. त्यावेळी लग्नाचे किस्से कसे झाले मी पहिल्यांदा बघितल्यावर आणि कोणत्या गोष्टीवर तयार झालो. बायकोने काय प्रश्न विचारले? मी काय उत्तर दिलो. तिच्या काय अपेक्षा होत्या माज्या काय अपेक्षा होत्या सगळं त्या वेळचा एक्सपेरियन्स तुमच्या समोर आणतोय. विडिओ बघितल्यावर कसा वाटला हे जरूर कळवा.
    आणि मित्रानो तुमचा तुमच्या लग्नातला एक्सपेरियन्स कंमेंट मध्ये जरूर कळवा.
    Follow Below Links
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #marriagestory #weddingstory #wedding

КОМЕНТАРІ • 904

  • @Akshay-rf2zs
    @Akshay-rf2zs 3 роки тому +206

    किती मस्त आहात तुम्ही दोघेपण ... किती निर्मळ , किती सोज्ज्वळ प्रेम आहे . बरेचं काय शिकण्यासारखं आहे तुम्हा दोघांकडून ...love u both of u दादा आणि वहिनी 👌

    • @nitinmagdum2918
      @nitinmagdum2918 3 роки тому +2

      😂🙏

    • @nitinmagdum2918
      @nitinmagdum2918 3 роки тому +4

      छान आहेत तुमचे सर्व व्हिडिओ अम्हाला आवडले

  • @chaludevali4820
    @chaludevali4820 3 роки тому +40

    दादा तुम्ही सांगितलेला वहिनींचा प्रश्न आपल्या वडिलांच्या respect बद्दल वहिनी खरंच salute

  • @abhishekpatil6623
    @abhishekpatil6623 3 роки тому +13

    Kiti god smile aahe vaihini Chi.. She is so cute and beautiful. You both are the best couple seriously.. Kiti Chan bonding... Ek number Jodi.. Rab NE banadi Jodi.. 😍😍❤

  • @rahulraval2928
    @rahulraval2928 3 роки тому +10

    एवढे video पाहिले की मी रत्नागिरीला असतो पण आपण जसे बोलता तसेच मी देखील इचलकरंजीचा असून आपण कोठेही गेलो तरी एक प्रकारे दिलदार आणि इतरांची मन जिंकणारे असेच आपण असतो.आपली बोली भाषा जरी रांगडी असली तरी मन मोकळे आपण बोलतो.मला खरच वाटतंय की फक्त अभिनय हा नकली नसतो तो आपल्या असली जीवनावर असतो हे तुम्ही तुमच्या विडिओ तुन दाखवलात.नक्की आपली भेट होईल सध्या dockdown मुळे आपले विडिओ enjoy करतो आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Рік тому +10

    तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात . . . ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🚩 जय जिजाऊ, जय शिवराय ...🚩

  • @sachindhumal3797
    @sachindhumal3797 3 роки тому +59

    खरच 👌👌असेच जर तुमच्या सारखे सर्व नवरा बायको हसुन खेळुन संसार करु लागले तर खुप वाईट गोष्टी घडणार नाहीत 👍

  • @vaibhavshali01
    @vaibhavshali01 3 роки тому +16

    किती प्रेमाने बघताय दोघेही एकमेकांकडे!👌👌तुम्ही सांगितलेले प्रसंग खूप आवडले!! शुभेच्छा!💐

  • @shashikantsudarshani7684
    @shashikantsudarshani7684 3 роки тому +14

    कल्याणी वहिणी आणि धनंजय भाऊ.कोल्हापूरच नाव दिगंतात गाजवलं भावा.आई,बहिणी सर्वच खूप छान.याच्यात पप्पांना काही रोल नाही.सर्व पुरुषांचं प्रतिनिधित्व एकटा धनंजय करतोय. लयभारी ,कोल्हापुरी.

    • @milindmadhavpatil5565
      @milindmadhavpatil5565 3 роки тому

      भाऊ पप्पांला घेतलं तर मार खरंच खायला लागन..

  • @pramodbaderao8005
    @pramodbaderao8005 3 роки тому +12

    मी देखील मार्च 2008 मध्ये मुलगी बघितली.मे2008 मध्ये सुपारी फोडली आणि 7 डिसेंबर 2008 ला माझ्या वयाच्या 23 वर्षे 1महिना 14 दिवसांनी लग्न झाले.मुलागी बघितल्यापासून 8 महिन्यांनी लग्न झाले त्यामुळे अरेंज कम लव्ह मॅरेजच झालं आमचे.👍👌

  • @ganeshdusunge909
    @ganeshdusunge909 3 роки тому +32

    खुप सुंदर केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची..
    लाजवाब..
    आई जितक्या कडक स्वभावाच्या दाखविल्या जातात तितक्या त्या बिलकुल नसणार.

  • @ashishjoshi7712
    @ashishjoshi7712 3 роки тому +26

    दादा काय मस्त व्हिडीओ आहेत तुमचे तुमच्या आई साहेबांची अँक्टिंग खरोखर अप्रतिम कुणालाच हे जमणार नाही

  • @kulkarni321
    @kulkarni321 3 роки тому +32

    Absolute pair may Panduranga bless u all the happiness in ur life guys,Jai Shivaray Jai Bhavani 🙏💐💐who love and respect the parents such woman’s always respect every elder that’s culture inculcated 🙏🙏

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 роки тому +9

    छान जोडी आहे..... गमती जमती ने वैवाहिक जीवना चा आनंद घेता... कल्याणी छान लाजतेस हा... 👌👌👌👌👍👍👍💐💐👏👏😊

  • @mrunalisworld1333
    @mrunalisworld1333 4 роки тому +172

    दादा आणि वहीणी तुमचे विडियो आमीही बघतो छान असतात,,टीकटोक विडियो आमीही बघायचो मजा यायची,,खुप छान,, धन्यवाद,,

  • @akshayjadhav7803
    @akshayjadhav7803 3 роки тому +15

    खर तर बोलायला शब्द नाहीत दादा आणि वहिनी❤️🙏 जिथे प्रेम आणि समजूदार पणा येतो तिथे माणूस कधी दुःखी नाही होत😘 तुमचा दोघाना खूप खूप शुभेच्छा🙏❤️

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 3 роки тому +317

    वहिनी किती गोड लाजत आहे..... अजूनही 😂❤️❤️

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 2 роки тому +3

    वहिनी किती गोड हसतीये😍🥰 दादा खुप नशिबवान आहेस बघ एवढी छान स्वाभावाची बायको मिळाली आहे तुला. God bless u both.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 3 роки тому +236

    धनंजय , बायको चांगली मिळाली तुम्हाला , नशिबवान आहात 👍

    • @dd_villain2732
      @dd_villain2732 3 роки тому +2

      Jai Maharashtra Jay bhim jay shivray aamhi tumche khup mothe fan aahot. Kharch tumche family khup chhan aahe aani tumche videos cha concept pn well done Dada

    • @dd_villain2732
      @dd_villain2732 3 роки тому +1

      Kadhi majha comment baghitla tr nakki reply kara faar br vatel

    • @NeElPaWaR2181
      @NeElPaWaR2181 2 роки тому +2

      पवार...the BRAND......
      उलट वहिणी पवारांच्या घरात आल्या... त्यांच नशीब.... ❤

  • @akshaymore299
    @akshaymore299 2 роки тому +3

    खरंच संस्कारी वैनी आहेत
    खूप गोड आहेत
    तुम्ही दोघे पण खूप छान आहात दादा

  • @kishorrakshe1952
    @kishorrakshe1952 3 роки тому +35

    DP आणि वहिनी खूप गोड जोडी आहे तुमची❤️
    असेच तुम्ही दोघे एकत्र राहा व आम्हाला नेहमी entertain करत राहा 🙏🙏

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 3 роки тому +27

    धनंजय खुप चांगली जोडी असेच आनंदी व सुखी हसत खेळत रहा दोघांना आशिर्वाद सप्रेम नमस्कार

  • @padmasinhchavan3021
    @padmasinhchavan3021 3 роки тому +3

    दादा आणि वहिनी तुमच्या दोघांची जोडी एक नंबर आहे.............. खूप खूप बरं वाटलं तुमच्या दोघांतील संवाद बघून ..... दादा किती किती समजवून घेता वहिनी ला......... वहिनी व किती चांगल्या आहेत.....☺️ एक नंबर

  • @bhimraoturukmane420
    @bhimraoturukmane420 3 роки тому +23

    धन्या बेटा तुला राधीका मिळाली म्हणून बरं झालं.नाही तर तुला शनयाच मिळायला पाहिजे होती तुझे १२ वाजवले असते.तु तसा काही कमी नाही.
    ...... परंतु छानच!

  • @satampady675
    @satampady675 3 роки тому +5

    असेच हसत, खेळत रहा , सुखी , आनंदी, आरोग्यसंपन्न रहा.

  • @prashantkale7312
    @prashantkale7312 3 роки тому +7

    ताईला काय दिसल तुमच्यात पहिल्यांदाच पसंद कैल हरकत नाहापन जोडि छान आहे दादापन मस्त आहे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Рік тому +2

    तुमची जोडी खरोखरीच एकदूजेके लिए आहे असे वाटते. एकमेकांबद्दल चा आदर खूपच छान.

  • @ajaypress6885
    @ajaypress6885 3 роки тому +13

    तुम्ही दोघे धरतीवरील लुप्त होण्याच्या कगारावरील प्राणी.....

    • @FarmerBGM
      @FarmerBGM 3 роки тому

      Dadya mi ahe ithe🤣

  • @sandipshinde3102
    @sandipshinde3102 4 роки тому +118

    पहिला व्हिडीओ आसेल मार नाही खाल्ला डी पी ने😂😂😂😂😂

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite7958 3 роки тому +3

    नमस्कार,छान जोडा साक्षात लक्ष्मी तूमच्या घरी आहे.अनेक आशीर्वाद . धन्यवाद

  • @jilaniqadri2741
    @jilaniqadri2741 3 роки тому +24

    ईश्वर चरणी प्रार्थना करतो की,तुम्हा दोघांना कुणाची वाइट नजर लागू नये.

  • @anjalitayade2760
    @anjalitayade2760 3 роки тому +15

    नजर na लागो tumchya jodi la. God bless you

  • @arpitganorkar9929
    @arpitganorkar9929 3 роки тому +13

    6.05 खूपच मस्त विचार तुम्हा दोघांचे पण.. आवडलं आपल्याला ...वांडच नादखुळा एकदम😍💥

  • @rahul7546
    @rahul7546 3 роки тому +64

    23 वर्षाचा कोवळा मुलगा.
    इथंच तुमची विकेट गेली दादा

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar 3 роки тому +3

    दादा,वहिनी तुम्हि आपल्याबद्दलची सर्व माहिती अगदी मोकळेपणाने सांगितली. फार सुरेख वाटलं ऐकायला.अगदी घरातले मेंबर आहात असे वाटले.तम्हां उभयतास नमस्कार व शुभेच्छा.

  • @neminathdanole9661
    @neminathdanole9661 4 роки тому +8

    तुमचं योग तेथेच होता हे ईश्र्वर ला मान्य होत असेच सुखी रहा

    • @sayaliabpatil3616
      @sayaliabpatil3616 3 роки тому

      Khup chan jodi ahe doghanchi vahini khup sundar ahet disayala

  • @MK-rn4bz
    @MK-rn4bz 2 роки тому

    वहिनीसाहेब तुम्ही विचारलेला प्रश्न अगदीच अचूक..👌👌👌👍असेच सुखाने कायम परिवारासहित एकमेकांसोबत आयुष्याचा प्रवास सुरळीत चालत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व माझी सदिच्छा💐💐💐💐👏👏👏😊

  • @valmiknagare26
    @valmiknagare26 3 роки тому +4

    छान मस्त दोघांचा स्वभाव छान आहे ताई छान बोलतात

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 роки тому +2

    वहिनींचे स्मितहास्य त्यांच्याजवळची निरागसता दाखवते अत्यंत दिलखुलास कुटुंब

  • @rameshshinde973
    @rameshshinde973 3 роки тому +12

    वहिनी किती गोड हसत आहे killar 😍❤️❤️❤️❤️❤️

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 3 роки тому +2

    तुम्ही सर्व असेच सुखी रहा, ईश्वर चरणी हीच प्रार्थना...🙏🙏🙏

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 3 роки тому +11

    Aprtim Dada Tumcha Nirnay 👌yoghya Thikani Julal Tumch Tumchya Cutumbala Lakshy LakshyShubhechya 🙏🏻👍🏻

  • @anujapatil8328
    @anujapatil8328 Рік тому +1

    अस्सं गोडी गुलामीने राहिलं पाहिजे...तरच लग्न संकल्पना यशस्वी होईल.
    टवाळखोर मुलाला आणि गोड समंजस मुलीला खूप खूप आशिर्वाद...
    दोघंही खूप आवडल्या बुवा...❤.😂

  • @sanjayhawal22990
    @sanjayhawal22990 4 роки тому +63

    साखरपुडा आणि लग्नाचा व्हिडीओ सुध्दा दाखवा...

    • @Rafiglove
      @Rafiglove 3 роки тому +3

      अजून काही???

  • @Apruthvi1920
    @Apruthvi1920 2 роки тому +2

    Love you both of you. ..😍💞 जे काय ते एकदम Natural असत तुमचं 👍👌👌👌आणि Natural च राहुद्या!!

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому +7

    खुप सुंदर स्टोरी, छान जोडी जमली दादा वहिनी👍👍💐💐

  • @eknathjadhav6137
    @eknathjadhav6137 3 роки тому +2

    दादा तु बोल ल्या सारख तु देवासारखा आहेस आणि वहिनी सुध्दा. . . .खुप छान जोडी.

  • @onkarkothari
    @onkarkothari 3 роки тому +19

    You are such lovable couple. God bless and keep entertaining us

  • @vilassakat4268
    @vilassakat4268 2 роки тому +1

    देवाने तुमाला घडवले व तुमची जोडी महाराष्ट्रात पाटवले ते. लोकाना हसवायला कारण टिवी पोगरम बघुन मि कंटाला आला पण आता विडीओ आफलातुन आणी एक नंबर देवाने करोना काळात देशात लोकांना तुमची टिम हसवते फार छान

  • @nandkumarasawant5689
    @nandkumarasawant5689 3 роки тому +15

    Everyone should learn from both of you......... God bless you!!

  • @anitabronkhurst866
    @anitabronkhurst866 15 днів тому

    Tumhi doghehi khup aaplese vatata. God bless ❤

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 3 роки тому +11

    Best couple , both are lucky , be happy , God bless you .

  • @purushsuktam7759
    @purushsuktam7759 2 роки тому

    वहिनी शेवटी जाताना भगवती देवीचे दर्शन घेतलात तुम्हास व तुमच्या संसारास तिचे कृपा आशीर्वाद लाभो हीच सदिच्छा, आमच्या भावाला सांभाळा

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 3 роки тому +14

    Couple made in heaven..

  • @deepakchabukswar1485
    @deepakchabukswar1485 3 роки тому +2

    तुम्ही दोघे ही खुप छान आहात, असेच छान रहा आणि सुखी रहा.

  • @akashshirsath9249
    @akashshirsath9249 3 роки тому +6

    Mala Khup aavadta tumchai life story God bless you 😊😊

  • @dhananjaykuchekar6360
    @dhananjaykuchekar6360 3 роки тому +1

    Khup chan story ahe tumchi....sgle vidio amhi bghto ..khup mst astat

  • @sushilrajguru3793
    @sushilrajguru3793 3 роки тому +3

    तुम्ही बोला मी बोला तुम्ही बोला मी बोला love story मस्त वाटली ,,,,,,

  • @samadhannagre4479
    @samadhannagre4479 Рік тому

    धनंजय भाऊ, मस्त इंटरेस्टिंग तुमची पूर्ण फॅमिली बेस्ट आहे, हसी मजाक

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Рік тому +5

    Lovely जोडी. तुम्हा दोघांना आणि पूर्ण परिवाराला अनंत शुभेच्छा 💐♥️💐

  • @vaibhavgothankar3919
    @vaibhavgothankar3919 3 роки тому +1

    दादा तु लईच काॅमेडी आहे . मस्त जोडी आहे दोघांची , खुप छान .

  • @tusharetam7670
    @tusharetam7670 3 роки тому +9

    changl bharich zal ki mag perfect aahet tumhi dogh pan ekmekansathi 👍

  • @Nazir7788
    @Nazir7788 3 роки тому +2

    Aap dono ki jodi No.1.hai Aap dono bhi bahot achhe videos banate ho ..mast ..,👌
    Aise hi banate rahiye videos aour ham like karte rahenge.💐💐💐💐💐👍👍👍👍👌👌

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 3 роки тому +12

    छान जोडी व स्टोरी दादा वहिनी 👍. यावरून आठवलं कि आमच्या लग्नाची story सुद्धा अशीच आहे. वाक्य न वाक्य तेच.पण मी न पाहता होकार दिला होता 😁व नवरोबानं पाहून होकार दिला.एक महिण्यात लग्न झालं १२वर्षे संसार छान चालू आहे.😁

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому

    खूप छान होती तुमच्या लग्नाची एक गोष्ट। पण भाऊ वहिनी खुप छान लाजत होत्या तुमची कहाणी सांगतांना खूप सुंदर आहे तुमचा संसार हेवा वाटतो असंच खुष रहा

  • @rekhaudawant7149
    @rekhaudawant7149 3 роки тому +6

    Kalyani tai khup goad bolate khupach laghavi aahes tu 😘

  • @sonaligurav4369
    @sonaligurav4369 2 роки тому

    खुप सुंदर जोडी ..नवरा बायकोच्या नात हे विश्वास sharing आणि मैत्री नेच सुखी होत

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 3 роки тому +4

    खूप natural...... खूप सुंदर
    God bless you so much...

  • @punamsweetlife2628
    @punamsweetlife2628 2 роки тому +1

    खुप छान दादा आणि वयनी तुमची जोडी अशीच हासत राहो

  • @chetang6799
    @chetang6799 3 роки тому +13

    Very simple and open discussion..... always love to watch ur videos

  • @rashmiinamdar397
    @rashmiinamdar397 2 роки тому +2

    Khupch chan.tumche videos baghun kharch dokytun sagl tension jaty,dp bhu ani vahini.keep it up,

  • @madhurijagtap2402
    @madhurijagtap2402 3 роки тому +3

    Dada 1nb mla tumchi comedy khup aavdte😍

  • @rupalishinde8464
    @rupalishinde8464 Рік тому

    खूप छान स्टोरी आहे तुमची आणि जोडी तर एक नंबर आहे तुमची दादा आणि वहिनी तुमच्या पुढील आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @afroztamanna960
    @afroztamanna960 3 роки тому +3

    Cute couple ho aap dono 👌👌 so sweet kafi interesting hai aap ki story arrange kam love marriage zyadi hai

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 3 роки тому +1

    दादा. आणि. वहिनी. यांची. परमेश्वरान. दिलेली. जोडी. आहे 🙏🙏🙏🙏खूपच. सुंदर. जोडी

  • @parshuramardalkar2414
    @parshuramardalkar2414 3 роки тому +3

    DP भावा एक नंबर नाद खुळा तुझा आणि वहिनीचा

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 3 роки тому

    तुमची जोडी खूप छान आहे,तुमच्या जोडीला कुणाचीही दृष्ट न लागो,आयुष्यतील समस्या चर्चेने नक्कीच सुटतात,तुमच्या उर्ववीत आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा नि आशीर्वाद

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 4 роки тому +11

    अहो दादा... छान वाटले... तुमची प्रेम कहाणी..... तुमची जोडी खूप छान...... मस्त मस्त.......
    संदीप पोवार..
    मुंबई...

  • @sonalgajbhar7720
    @sonalgajbhar7720 Рік тому

    छान आहात दोघे. खूप प्रामाणिक सांगितलंत सगळं. ओरिजिनल acting वाटते दादा चे. आणि त्यांचं पाहिलं प्रेम खरं सांगितलं. णी वैनी त्यावर काहीच रिऍक्ट केले नाहीत. ते छान वाटलं. मस्तच. असेच रहा ओरिजिनल ❤

  • @PRASAD_FARTADE
    @PRASAD_FARTADE 3 роки тому +4

    सुंदर मन हीच खरी संपत्ती

  • @neetaotari8842
    @neetaotari8842 3 роки тому +1

    कल्याणी आणि धंनजय .नमस्कार तुमची काँमेडी सगळ्या कुठूबाची जी आहे ती धमाल .बेभान जबरदस्त आहे. खुप खूप तुम्ही सगळे हसवता. मनावरचा टेन्शन दडपण सगळं काही विसरून ऐकदम फ्रेश होऊन जात. खरच तुम्हाला खुप खूप शुभेच्छा असच हसवत रहा. धन्यवाद

  • @altafshaikh5463
    @altafshaikh5463 3 роки тому +3

    कुठे तरी कॉम्प्रमाईज करावं लागत ......
    मी पण केलं... खूप छान!!

  • @deepakdalvi3492
    @deepakdalvi3492 3 роки тому +1

    भाऊ नशीब काढलेत एवढी छान सुंदर समजूतदार बायको मिळाली

  • @maheshhodage518
    @maheshhodage518 3 роки тому +4

    Good... चांगली गोष्ट आहे... DP भाऊ मला पण अशी गोड बायको👍👍

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 Рік тому

    धनजय भाऊ आणि वहिनी तुम्ही दोघेही खरच खूप छान कपल आहात ..

  • @diptikakade7973
    @diptikakade7973 4 роки тому +11

    Mi 2-3 episode pahile tumche ani kharach itke Sundar presentation ani bolnyachi assal kolhapuri paddhat khupach avdli.tumhi doghehi khupach Chan kam kartay ek prakarchi apulki ani gharatlech vatat ahat 👌👌👌💝👌 mustac 💝 💝💝
    From pune

  • @neeleshlokhande5960
    @neeleshlokhande5960 2 роки тому

    DP दा.. आणि वहिनी मस्त जोडी आहे... तुमची.... एकमेकांना समजून घेताय....
    खूप छान... 👍👍👍👍

  • @sanjayhawal22990
    @sanjayhawal22990 4 роки тому +9

    इचलकरंजी मध्ये खुप ठिकाणी तुमच्या व्हिडीओ ची चर्चा होते।खुप छान व्हिडीओ बनवता आपण दोघे.
    आपली जोडी अशीच छान रहावी.
    हासत रहा आणि हासवत रहा.

  • @akshayajoshi9521
    @akshayajoshi9521 3 роки тому +1

    Doghe khup ch chan ahat👍 doghancha swabhav khup nirmal ahe.

  • @ravsahebgilbile3788
    @ravsahebgilbile3788 3 роки тому +4

    भाऊ मी पण गडहिंगलजचा आहे त्यामुळे जगात भारी आम्ही कोल्हापूररी

  • @tusharmude175
    @tusharmude175 2 роки тому

    Khub chhan yek nbr vn jodi🙏🙏👨‍👩‍👧‍👧💐💐✅

  • @loveindia4634
    @loveindia4634 3 роки тому +3

    Vahini tumcha prashna kharach apratim hota..❤️

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 3 роки тому

    असंच संसार सुखात जावो दे ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +7

    जोडी 👌 👌 ❤️ ❤️ पवार साहेब

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 3 роки тому +1

    खुप छान ! एकदम बिनधास्त मनमोकळी जोडी नंबर वन 👌👌

  • @sachinsawakhande660
    @sachinsawakhande660 4 роки тому +12

    Be Eternal Forever.....
    Nice Couple be Happy

  • @rohidaschavan6998
    @rohidaschavan6998 3 роки тому +2

    आम्ही गडहिग्लजकर तुमचे व्हिडिओ फार आवडतात आम्हाला खुप छान

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +11

    dada kesacha jaudya rav..
    nahitar vahini manlya ka 6 pack body phajhe mahun...

  • @manupatil1127
    @manupatil1127 2 роки тому

    दादा तुमची जोडी खूप छान आहे
    वहिनी तू खूप गोड आहेस
    दादा तू खूप भारी बोलतोस
    आणि आपली खरी खुरी भाषा बोलतोस ह्याचा अभिमान आहे
    तू असेच खूप व्हिडिओ बनव पण सगळ्या व्हिडिओ मध्ये वहिनी हवीच

  • @kambleshubham0425
    @kambleshubham0425 3 роки тому +3

    (दादा वहिणी ) १. नंबर जोडी आहे तुमची ❤❤

  • @sushantsuryawanshi2708
    @sushantsuryawanshi2708 3 роки тому +1

    अतिशय सुंदर झाली तुमची मुलाखत,तुमची ही सुंदर जोडी अशीच आयुष्यभर हसत-खेळत राहो हीच प्रार्थना करतो,नेहमीच असच आनंदात रहा,एकमेकांची काळजी घ्या...