पाकशास्त्रनिपुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बाबासाहेबांच्या अनोख्या पैलूविषयी सांगताहेत डॉ.आलोक जत्राटकर)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये असा कोणताही विषय नसेल की ज्याचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले नाही. पाककला हा विषय सुद्धा त्यांनी वर्ज्य मानला नाही. त्यांच्या संग्रहात जगभरातील पाककलेवरची पुस्तके तर होतीच, पण त्यापुढे जाऊन स्वतः उत्तम स्वयंपाक करण्यापर्यंत ही कला त्यांनी आत्मसात केलेली होती. जेव्हाही कधी वेळ मिळेल, तेव्हा स्वतःच्या हाताने बनवून आपल्या आप्तेष्ट, मित्रांना खिलवण्याचा आनंद ते घेत असत. बाबासाहेबांच्या याच अनोख्या पैलूविषयी डॉ. आलोक जत्राटकर माहिती देत आहेत...
    डिस्क्लेमर: सदर ध्वनीचित्रफीतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानपानविषयक विशेष आवडींचा वेध घेण्यात आला आहे. तथापि, त्यावरुन कोणी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. एक पाव आणि अर्धा ग्लास बोव्हरीन घेऊन परदेशातील आपले उच्चशिक्षण उपाशीपोटी पूर्ण करणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या समाजाच्या दैन्यावस्थेची पूर्ण जाणीव होती. आपले समाजबांधव आणि माता-भगिनींनी दिलेली भाजीभाकरी, चटणीभाकर हेच त्यांचे बहुतांश दौऱ्यावरचे खाणे असे. समाजात वावरताना खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची मौज त्यांनी कधी केली नाही. उलट आपल्या समाजबांधवांची करुण अवस्था पाहून त्यांचे डोळे आणि अंतःकरण भरून येत असे. त्यांची ही अवस्था पालटून टाकण्यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले. हा व्हिडिओ त्यांच्या पाकशास्त्रनिपुणतेची तोंडओळख करून देण्याचा केवळ प्रयत्नमात्र आहे.
    #drbabasahebambedkar #drambedkarfoodlove #chef #foodloverdrambedkar #cookinglover

КОМЕНТАРІ • 2

  • @VinayakSA
    @VinayakSA 4 місяці тому +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक वेगळा पैलू प्रथमच समजला. धन्यवाद

  • @drdnyanrajachighalikar3406
    @drdnyanrajachighalikar3406 4 місяці тому +1

    खूप छान उपक्रम सर