Barki Waterfall kolhapur | शाहूवाडी चा नायगारा बर्की धबधबा | रांगड्या मातीतलं रांगडं शाहूवाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शाहुवाडीचा नायगारा बर्कि धबधबा
    पावसाळ्यातले चार महिने येथे निसर्ग प्रेमींच्या गर्दीचा महापूर येतो.आभाळातून बरसणाऱ्या पावसापेक्षा तिनशे फुटांवरुन कोसळणाऱ्या धबधब्याचे पर्यटकांना मोठे अप्रूप.शाहुवाडी तालुक्यातील बर्की येथिल शाहुवाडीचा नायगारा म्हणून ओळखला जाणारा बर्कीचा धबधबा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.
    हिरव्या गार वनराईने नटलेला हा परीसर जरी मनाला सुखावणारा असला तरी त्याला प्रतिक्षा आहे ती फर्यटकांची आणि पुन्हा जोरदार मोसमी पावसाची.
    कोल्हापूर हून बाजार भोगाव-करंजफेन येथून व मलकापूर-मांजरे-मोसमा येथून बर्कीला जाता येते.सुरुवातीला छोटे छोटे धबधबे लक्ष वेधून घेतात.सुळाचा,आसुळणे,निकार्गे हे धबधबे तर मुख्य तोपरा धबधबा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो.
    कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं बर्की हे छोटस गाव.पावसाळ्यात येथे कोसळणारे नयनरम्य धबधबे यांमुळे हे गाव राज्याच्या नकाशावर प्रसिद्धीस आले.
    मुख्य तोपरा धबधब्याचे सौंदर्य नयनमनोहर आहे.धबधबा सुद्धा असाच आहे भरगच्च ,रांगडा,अंगावर धाऊन येणारा,चिंब चिंब भिजवणारा.तीनशे फुटावरुन पाण्याचा प्रवाह जिथे कोसळतो तिथे धबधबा पायथ्याशी प्रचंड डोह तयार झाला आहे.ज्याला भौगोलिक भाषेत प्रपातगर्ग आस म्हटलं जाते.हौशी पर्यटक व पर्यावरणप्रेमी जलधारांत चिंब चिंब भिजण्याचा आनंद लुटतात.
    तीन कि.मी जंगलात असलेला डोळ्याचे पारणे फेडणारा हा शाहूवाडीचा नायगारा बर्की धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.कोरोनामुळे भटकंतीस अडचण होत असल्यामुळे स्थानिक नागरिक पर्यटकांच्या अभावी अडचणीस तोंड देत आहेत.गेल्या वर्षी सुद्धा कोरोनामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम झाला होता चालू वर्षी सुद्धा तीच स्थिती आहे.
    #waterfallwednesday #waterfall_lover #falls #chasingwaterfalls #waterfallhike #waterfallsfordays #waterfalllovers #waterfallsofinstagram #waterfallphotography #waterfall

КОМЕНТАРІ • 41