महाराजांनी तळकोकणात वास्तव्य केलेला "मनोहरगड"|Monsoon Trek To Manohargad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024
  • मनोहर मनसंतोष गड..!
    कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घटनामार्गानी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. यापैकी आंबोली घाटावर व कुडाळ वरून घाटावर जाणाऱ्या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोष गड हे किल्ले बांधण्यात आले. मनोहर-मनसंतोष गड हे जोड किल्ले त्यावरील अवशेषांसह आजही दिमाखाने उभे आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे या किल्ल्यावर 1 महिना वास्तव्य होते.
    इतिहास
    हा किल्ला कोणी व केंव्हा बांधला हे ज्ञात नाही, पण गडाच्या बांधणी वरून या गडाची डागडूजी / फेररचना शिवाजी महाराजांनी केली असावी. आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.
    पुढील काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला.१८३४ मध्ये गडावर गडकर्‍यांनी बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला, पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे, बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) स्वत: १९३६ साली गडावर चालून आले, त्यांनी गडकर्‍याला अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. १८३८ मध्ये छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) यांच्या निधना नंतर गडावर गडकर्‍यांनी पुन्हा बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला व बंडकर्‍यांना अभय दिले.
    इ.स. १८४४ मध्ये इंग्रजां विरुध्द झालेल्या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना जेरीस आणले. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज अनासाहेब यांना सावंतवाडीच्या राजवाड्यातून पळवून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात
    वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजां विरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी जनरल डेला मोंटी व कर्नल औट्राम यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. त्यांनी केलेल्या कुलपी गोळ्यांच्या मार्‍यात गडाच्या तटबंदीला भगदाड पडले. २६ जानेवारी १८४५ रोजी बंडकरी गड सोडून पळून गेले. इंग्रजांनी मनोहर- मनसंतोष गडाच्या पायर्‍या उध्वस्त केल्या.
    connect us on
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
    #manohargad #konkaniranmanus #ecotourism

КОМЕНТАРІ • 276

  • @saritadhond2296
    @saritadhond2296 Рік тому +1

    Thank you प्रसाद दादा मी याच गावची आहे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बालपणाच्या

  • @sudhirpendhari2689
    @sudhirpendhari2689 3 роки тому +1

    फार छान इतिहास डोळ्या समोरून तारळून गेला. गडाची छान माहिती मिळाली. गावकरी गड प्रेमी ना मुजरा. सरकार पासून वंचित असलातरी गड प्रेमिनी जमतशी निगा राखली आहे. बघून मन तृप्त झालो. 🚩🚩🚩🚩🚩

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 роки тому +2

    मित्रा प्रसाद, पुन्हा तुझ्या व्हिडिओ माध्यमातून एकदा नवी छान सफर घडविलीस शिवापूर व शिरशिंगे गावानजिकचा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला मनोहर गड.... नावाप्रमाणेच गड मनाला हरपून ठेवणारा आहे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य मन हरखून जाते.हिरवाई त्यावरील डौलदार वृक्ष धुकं,डोंगर-कडे व त्यावरुन ओघळणारे मोती... पावसातील विविधतेने नटलेल्या कोकणातील स्वर्गीय नजारा पाहून मन तृप्त झाले.कविता ताईचं गीत व तुझी कविता मनाला स्पर्शून जाते. सुंदर छायाचित्रण व माहितीपूर्ण असा व्हिडिओ अर्थातच डोळ्यांस अप्रतिम मेजवानी...👌👍👍🙏💐💐❤️

  • @anandtendulkar6547
    @anandtendulkar6547 3 роки тому +7

    खूप खूप छान व्हिडिओ ,अजून एक की शिवापूर गावातील गडकरी वाडीतील लोकांची जी मराठी बोली आहे ,ती फक्त त्याच वाडीत बोलली जाते .हे पण एक खास वेगळेपण आहे .
    माझी आज्जी आज 90 दि पार केलीय पण माहेरची मानस भेटली की जबरदस्त गडकरी भाषा बोलते.
    व्हिडिओ खूप आवडला, खुप छान.

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 3 роки тому +1

    Kavita khup chan gate. Tumha sarvanche khup abhar. Kautuk.

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 2 роки тому +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @kiransamant
    @kiransamant 3 роки тому +21

    अत्यंत माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडियो. आज तुझ्या व्हिडियोला इतिहासाचा स्पर्श होता. खूप छान माहिती कळली मनोहर गडाची. मला एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे तुझ्या व्हिडियोज मध्ये एकही फ्रेम निरर्थक नसते. ताईचा आवाज गोड आहे. 'मायभवानी' तिच्या आवाजात ऐकताना आणि 'महाराष्ट्राला महानतेपर नेसी तू शिवराया' ही तू म्हटलेली कविता ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले. अर्थात शिवरायांचा परिस स्पर्श झालेली प्रत्येक गोष्ट अंगावर रोमांच आणतेच. खूप छान. पुढल्या वाटचालीकरता शुभेच्छा..

  • @smitabendre2392
    @smitabendre2392 3 роки тому +1

    अप्रतिम शब्द नाहीत व्यक्त व्हायला

  • @samitapratikdhond
    @samitapratikdhond 3 роки тому +1

    आमचं गाव आहे हे शिरशिंगे 🙏 धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला गाव बघायला मिळालं. दोन वर्ष गावी जायला नाही मिळालेलं ते आता जाऊन आल्यासारख वाटलं.

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar8993 3 роки тому +15

    पाऊस सुरू झाल्याने सर्व कोकणाने हिरवी शाल पांघरल्याने मुळातच अप्रतिम असलेल्या कोकणचे सौंदर्य खुलून आले आहे...

  • @vinayakkhochare894
    @vinayakkhochare894 3 роки тому +1

    खूप छान दर्शन घेतले माझ्या राजा चे गड

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 3 роки тому +1

    खूपच सुंदर vdo मनोहर गड पाहताना मस्त वाटलं

  • @rajarampatil5478
    @rajarampatil5478 3 роки тому +1

    जयशिवराय जयजिजाऊ जयधर्मवीर शंभूराजे जय भवानी. छान फारच छान आणी सुंदर निसर्गरम्य अशा मनोहर संतोष गडाचे छायाचित्रीकरण आवडले. छत्रपती शिवाजी महाराज याचे 34 दिवस वास्तव्याने हा किल्ला खरोखर पवित्र आहे.नक्कीच मला आवडेल या पवित्र ऐतिहासिक किल्ल्यावर जावून यायला.⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 3 роки тому +1

    गाण खुप सुंदर
    विडीओत रंग भरला

  • @ashishgawas4433
    @ashishgawas4433 2 роки тому +1

    Sunder voice

  • @anilkadam2406
    @anilkadam2406 3 роки тому +2

    वा...! खुपच सुंदर शब्दांकन प्रसादभाऊ, कविता ताईंचाही आवाज खुपच सुंदर ...! खुप छान..!
    ............गोठवेवाडी

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 роки тому +1

    खूप सुंदर वाक्यरचना दादा👍
    #SamreshVlogs

  • @santoshpadwal528
    @santoshpadwal528 2 роки тому +1

    Jay shiray

  • @manishajoshi4538
    @manishajoshi4538 3 роки тому +1

    खुपच छान वर्णन केलय. कविताचा आवाज गोड आहे.

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 3 роки тому

    खुप छान निसर्गरम्य परिसर आहे. मनोहर गडावर अतिशय सुंदर आहे परिसर आहे. असेच अनेक विडीओ पाठवत रहा. ही शुभेच्छा.

  • @sagaringale5616
    @sagaringale5616 Рік тому

    Tai...mast awaj..

  • @sanjeevarolkar6880
    @sanjeevarolkar6880 3 роки тому +1

    रानमाणसा, u r great...Hats off..🙏🙏🚩🚩

  • @अमीतम्हात्रे

    सगळीकडे फक्त हिरवळ अप्रतिम निसर्ग सोंदर्य
    मस्त प्रसाद

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 роки тому +1

    Khup sundar Madhav patil dist Latur 👌👌👍👍🚩

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 роки тому +1

    छान होता व्हिडिओ.छत्रपतींच्या चरणी नतमस्तक🙏🙏

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 роки тому +1

    सुंदर... अतिशय सुंदर! नयनरम्य निसर्ग, रिमझिमता पाऊस अन महाराजांची आठवण... मनोहरगड... खूप खूप सुंदर! हा हिरवगार परिसर तुमच्या कॅमेरातून जितका छान दिसतो त्याहीपेक्षा तो तुमच्या शब्दात जास्त खुलतो. निसर्गाची तुमची ओढ, जैव विविधता जपण्याची तुमची आंतरीक कळकळ अगदी पोहचते आमच्यापर्यंत. आम्हीही निसर्गप्रेमी आहोत आणि हा निसर्ग अस्पर्श राहावा, निदान विनाशकारी हातांपासून तरी असं आम्हालाही वाटतं आणि तो प्रयत्न आमचाही असतोच. ह्या pandemic मुळे घरात बसून आम्ही कोकणाचा स्वर्गीय प्रवास अक्षरशः जगतोय ते तुमच्यामुळे. एकदा वातावरण निवळले की हे अनुभवायला नक्की आवडेल. 🌹

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому

    Thank you so much 🌹🙏🇮🇳

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 роки тому +6

    खूपच छान सृष्टीसौंदर्य!....कविताने खूप सुंदर गाणं म्हंटलं!.....गडाची माहीतीही खूपच छान!...

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 роки тому +1

    खुप सुंदर छान गड आहे

  • @vaibhavhodawadekar4588
    @vaibhavhodawadekar4588 3 роки тому +4

    मनोहर गडावरून दिसणारे सौंदर्य खूपच भारी आहे.वर गडावर जाताना होणारी दमछाक,जगातील प्रवास खूप भारी वाटतो. गेल्यावर्षीच आम्ही स्वयंसेवक त्या गडावर जाऊन आलो होतो.

  • @arungosavi5261
    @arungosavi5261 3 роки тому +1

    🙏 मन संतोष झाले

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +1

    अप्रतिम निसर्ग दर्शन आणि महाराजांच्या पदस्पशाने पावन झालेल्या मनोहर गडाचे दर्शन करून दिले. महत्वाची गोष्ट म्हणजे गावकर्‍यांचे महाराजांच्या प्रती असलेली निष्ठा निदर्शनास आली ति म्हणजे गडावर जाण्यासाठी बनवलेली शिडी . खरचं अभिमान वाटतो

    • @sameerwaingankar7920
      @sameerwaingankar7920 3 роки тому +1

      Hi shidi 2020 madhe aamacya sindhusahyadri adventure club cya vatine aayojit kelelya 26 January 2020 roji 175 varshani aapala tiranga fadkvala tyaveli gramastani basvali shidi

    • @sachinkhambe3054
      @sachinkhambe3054 3 роки тому

      @@sameerwaingankar7920 great work

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 3 роки тому +1

    खूप खूप छान , माहिती पूर्ण व्हिडीओ आहे.तुमच्या माध्यमातून इतका मनोहर, सौन्दर्य पूर्ण किल्ला आणि परिसर दाखवला.मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +2

    prasad,
    tu manohar gdavrun dakhvilel
    manohar hirvgar koknch
    saundry hyala upmach deta yenar nahi.
    khup sunder, mst,aprtim
    nehmi prmanech
    swrgiy sukh denara vlog
    hota.
    amhala ghr bslya ha anand milto tujhyamule, tyabddl tujhe abhar manu tevhde
    kmi pdtil.
    dhanywad tujhya brobr asnarya nisrg premi mitr mndlinchehi.
    !! JAY BHAVANI !!
    !! JAY SHIVRAY !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @karuioe
    @karuioe 3 роки тому +1

    सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आकर्षक,मनमोहक आहे, निसर्गरम्य परिसर.🌧️🏞️😌

  • @rangshalaka6014
    @rangshalaka6014 3 роки тому +2

    खूप छान माहिती

  • @BLINK23510
    @BLINK23510 3 роки тому +1

    खूप सुंदर भावा...😊👌👌👌

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 роки тому +1

    व्हिडिओची सुरुवात छान केलीस प्रसाद.

  • @madhavgadekar6852
    @madhavgadekar6852 3 роки тому +1

    ताईचा आवाज अप्रतिम आहे

  • @siddheshtopare1859
    @siddheshtopare1859 3 роки тому +3

    निसर्गाच्या सानिध्यातील एक सुंदर गड, खरच भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्म घेतला

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 роки тому +2

    Apratim video. Nisarg ekdam bhari aahe. Gavkari khup kalji ghetat gadachi. Best effort. Manohar gad varun ek na pahilele kokan baghayla milale tuzhyamule. Thanks Prasad for this beautiful video.

  • @ravighadshi952
    @ravighadshi952 3 роки тому +1

    शुट अप्रतिम केले आहेस मिञा

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 3 роки тому +3

    Bhau Awaj lai bhari ahe tuza
    ...fan ahe mi tuzya utube channelchya
    1 no video 👍

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र🚩🚩..सुंदर सफर👌🏻👌🏻👌🏻

  • @nimishagawde2856
    @nimishagawde2856 3 роки тому +1

    Nice video of Manohar fort

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 3 роки тому +1

    Chaannnn vikas. Uttammm Darshan dakhvales

  • @sourabhm2709
    @sourabhm2709 3 роки тому +8

    दादा ...तुला एकदातरी भेटायला नक्की आवडेल😍

  • @pradeepchakane4534
    @pradeepchakane4534 3 роки тому

    सर्वप्रथम या दुर्लक्षित किल्ल्याबद्दल खुप छान , अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल प्रसाद तुला मनापासून धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खूपच अप्रतिम आहे आणि हा निसर्ग पाहून मला नाही वाटत की स्वर्ग या पेक्षा वेगळा असू शकतो. फक्त या निसर्ग रुपी स्वर्गाचे योग्य प्रकारे जतन होणे गरजेचे आहे आणि त्याची सर्व जबाबदारी आपली सर्वांची आहे.

  • @VirShri
    @VirShri 3 роки тому +1

    काय छान आवाज आहे

  • @samikshakotkar3816
    @samikshakotkar3816 3 роки тому

    हिरवेगार निसर्ग सौंदर्य पाहून डोळयाना सुखावह वाटते. तुमचे विडिओ खुपच सुंदर आणि माहितीपूर्ण असतात. जंगलात राहणाऱ्या आजी आजोबांसाठी तुम्ही जे कार्य केल,तोही विडिओ पाहिला,खरच अभिमान वाटतो कोकणी माणसाचा , यापुढील कार्यास तुम्हाला भरभरून यश मिळो हीच प्रार्थना. 🙏

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 роки тому +1

    खूप सुंदर

  • @geetabhandekar1918
    @geetabhandekar1918 3 роки тому +1

    सुंदर जय शिवाजी जय भवानी 🙏

  • @fidsm7558
    @fidsm7558 3 роки тому +9

    This truly is heaven !!! Maharashtra during monsoon is on another level .. nothing else comes close ❤️❤️❤️

  • @sumeetsatam261
    @sumeetsatam261 3 роки тому +1

    कविता ताईंनी खूप छान गायले 👌

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 3 роки тому +1

    मस्त वीडियो 👌🏻👌🏻

  • @revatinaik1038
    @revatinaik1038 3 роки тому +1

    sunder chitrikaran

  • @shobhaparab2576
    @shobhaparab2576 3 роки тому +1

    Khup chan ahe mitra👌👌👌👌

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane1972 3 роки тому +1

    खुप छान... ह्य़ा सुंदर पावसामध्ये हया लेण्या / किल्ले ह्यांचे मनमोहक द्रुष्य बघण्या लायक आहे....♥

  • @rekhamparab2064
    @rekhamparab2064 3 роки тому

    खूप छान माहिीपूर्ण व्हिडियो आहे. मनोहर गडावरील दृश्य नावाप्रमाणे खूप मनोहर होत. स्थानिक ऐतिहासिक ठेवा जपत आहेत बघून छान वाटले . 🙏👍

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому +1

    Khupch Chan vlog Prasad ani tuni mahiti pn khup Chan dilis ....
    जय शिवराय 🚩

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 роки тому +10

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @vaibhavghaware1788
    @vaibhavghaware1788 3 роки тому +1

    निसर्ग सौदर्याने नटलेला मनोहर मनसंतोष गड आणि माझा गाव❤️❤️खरच खूप छान व्हिडिओ बनवली भावा..🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @rajeshdalvi326
    @rajeshdalvi326 3 роки тому +2

    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🚩🚩

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 роки тому +1

    शेवटी कवितेचे वाचनही अप्रतिम.....

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 роки тому +1

    👍👌💐 खूप शुभेच्छा...ज्या प्रकारे तू वर्णन केले ना तेही तितकेच अप्रतिम👍👍☺️...

  • @saikalambe1313
    @saikalambe1313 3 роки тому +1

    Khupp chaan video prasad da 🙏🏻👌🏻👌🏻

  • @aambatgodmarathitadka3304
    @aambatgodmarathitadka3304 3 роки тому +1

    अप्रतिम video, व्हिडिओ खूप आवडला, खुप छान.

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 роки тому +1

    Good work.kharch khup chan.The great shivaji..😍

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 3 роки тому +1

    वाह, प्रसाद खूप छान दृश्य तु तुझ्या कॅमेऱ्यात टिपली आहेत.
    या स्वर्गाचे रक्षण करणं ही सुद्धा आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

  • @varshanalavade8571
    @varshanalavade8571 3 роки тому +1

    शिरशिंगे माझ्या बहिणीचं गाव आहे. या वर्षी आम्ही जाणार होतो पण लोक डाऊन मुळे राहील. पण प्रसाद तुझ्यामुळे गाव आणि मनोहरी किल्ल्याचं मनोहर दर्शन झालं. 👍 धन्यवाद 🙏

  • @sks4510
    @sks4510 3 роки тому +2

    किती सुंदर निसर्ग आहे खरंच स्वर्गच जणू....👌या किल्ल्याबद्धल माहिती दिल्याबद्दल तुझे आभार मित्रा....👍

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 роки тому +1

    कोकणातील गड व निसर्ग अतिशय मनोहारी दृश्य टिपले आहे. तुम्ही म्हटलेले काव्य अप्रतिम आहे

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому +2

    खुप छान
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @manoharpatil2077
    @manoharpatil2077 3 роки тому +1

    खूप छान,ताई तुझा आवाज खूप गोड आहे.

  • @sagarmore3590
    @sagarmore3590 3 роки тому +2

    गडावरच निसर्ग खुप सुंदर आहे. ताईचा आवाज सुद्धा असेच नव नवे विडिओ बनवत राहा

  • @santoshkoilkar1908
    @santoshkoilkar1908 3 роки тому

    Masta khupach sunder aavdala video.

  • @foodsurfersnupursumukh8502
    @foodsurfersnupursumukh8502 3 роки тому +1

    सुरेख!!

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 роки тому

    गडावरच निसर्ग खुप सुंदर आहे.

  • @naveenchougule8602
    @naveenchougule8602 3 роки тому

    खुपच छान. तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत.

  • @kbatwe55
    @kbatwe55 3 роки тому

    अत्यंत सुंदर आवाजात केलेले वर्णन.

  • @anandtendulkar6547
    @anandtendulkar6547 3 роки тому +2

    तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने बघते,निसर्ग प्रेम,अभ्यासू वृत्ती,खूप छान..,👍👍

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 роки тому +1

    फार सुंदर माहिती 👌👌👌

  • @gadkari524
    @gadkari524 3 роки тому

    खूप छान वर्णन केलस मित्रा तू माझ्या ह्या गावाचे आणि गडाचे ..... धन्यवाद ..... जय शिवराय

  • @sachinsawant8490
    @sachinsawant8490 3 роки тому +5

    फारच सुंदर दादा या गडाबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हते माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @kshiprabirari9359
    @kshiprabirari9359 3 роки тому +3

    निसर्ग सौदर्याने नटलेला मनोहर गड... अप्रतिम व्हिडिओ ❤️

  • @maheshrawal9834
    @maheshrawal9834 3 роки тому +1

    मस्त विडिओ माझा पुढचा जन्म झाला तर कोकणात च होऊ दे हिच देवा कडे प्रार्थना

  • @SK-hf3md
    @SK-hf3md 3 роки тому +2

    Very nice.. I like all your videos Mitra .. i will say real Kokani Ranmanus. I am from Vasoli/Shivapur. Happy to see this nice video for Manohar gad. Thank you very much for your efforts and this very nice high quality video. Khoop chan vatale pahun.
    Keep doing such nice videos of Konkan, this will really help for Kokan Tourism. Thanks Again. Satish Kadav

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 3 роки тому +4

    अप्रतिम सौंदर्य गडावर दिसत आहे, जय भवानी जय शिवाजी 🙏🙏

  • @subhashbarje6394
    @subhashbarje6394 3 роки тому +2

    भावा तुझा आवाज खूप छान आणि गंभीर आहे👍

  • @nitinshinde3279
    @nitinshinde3279 3 роки тому +1

    मस्त कँमेरा

  • @ashokkumbhar8247
    @ashokkumbhar8247 3 роки тому

    अप्रतिम!!!
    उत्कृष्ट कथन शैली!!!

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 3 роки тому +2

    प्रसाद, खुपच सुंदर माहिती दिलीस, इतिहासातील एक लक्षणीय व दुर्मिळ गड ज्यांची नावे सुद्धा माहित नसतात त्यांपैकी एक गड, तुझे आणि तुझ्या मित्रांचे खुप कौतुक व अभिनंदन 💐💐👍🏻 ऑल द बेस्ट 👍🏻

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 роки тому +1

    Mast gate kavita tai

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    amazing khupach sundar vlog dada............ ❤️

  • @aratig8997
    @aratig8997 3 роки тому

    फारच सुंदर 👌👌, एकदम उत्तमरीत्या इतिहास सांगितला आहे 👍👍, कविता चा आवाज पण सुंदर आहे 👌.. पुढील प्रवासा साठी खुप शुभेच्छा 🎉

  • @Prasadsanam11
    @Prasadsanam11 3 роки тому +2

    खुप सूंदर 😍❤👌👌🙏⛳

  • @rajeshkhavale7161
    @rajeshkhavale7161 3 роки тому +1

    जय भवानी जय शिवाजी जय लहुजी खुप छान दादा

  • @sidchavan7360
    @sidchavan7360 3 роки тому +2

    खूप छान आणि खूप महत्वपूर्ण माहिती दिली दादा,,,,जय भवानी जय शिवराय

  • @somnathgajane5311
    @somnathgajane5311 3 роки тому +1

    Khup sundar mahiti dilis bhava

  • @jigarjoshi3568
    @jigarjoshi3568 3 роки тому +1

    Superb Location Prasad. 👌