कृषिभूषण नामदेव साबळे यांचा भारतभर गाजलेला "साबळे फार्म "अवश्य बघा | Namdev sable farm |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2022
  • कृषिभूषण नामदेव साबळे यांचा भारतभर गाजलेला "साबळे फार्म "अवश्य बघा | Namdev sable farm |
    #yuvashetkarivag #Sablefarm #कृषिभूषण_नामदेव_साबळे
    #युवाशेतकरीवर्ग #goatfarming #शेळीपालन
    नमस्कार मित्रांनो शेळी पालन कुकुटपालन सेंद्रिय गूळ बोकड पालन अशा विविध शेतीपूरक व्यवसायात देशभरात गाजलेले कृषिभूषण नामदेव साबळे यांचा संपूर्ण फार्म आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे .
    नामदेव साबळे यांच्या फार्म वरती कोणकोणत्या गोष्टी पाहायला आहेत या खालील मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेऊ.
    1.नामदेव साबळे यांनी पहायला आलेल्या पर्यटक किंवा शेतकरी मित्रांसाठी छोटेसे गेस्ट हाऊस तयार केलेले आहे येथे वेगवेगळे बियाणे वेगवेगळे फलक सेंद्रिय गुळ अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात कृषिभूषण नामदेव साबळे यांनी हाऊस म्हणून आत्ता चालू वर्षी पांढरा शुभ्र घोडा घेतलेला आहे तसेच त्यांच्या शेडमध्ये गिर जातीचे दोन बैल पाहायला मिळतात.
    2.शेडच्या आत एक तारा चा कप्पा करून त्यात कोटा जातीचे दोन #बोकड अन पाळलेले आहेत एका बोकडाचे वजन साधारणतः 80 ते 85 व एकाचे 70 ते 80 यादरम्यान वजन आहे ते दोन बोकड त्यांनी ब्रीडिंग साठी पाळलेले आहेत
    3. #शेळीपालन व्यवसायात कृषिभूषण नामदेव साबळे यांना 35 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या फार्म वरती शेळीपालन व्यवसायाकरिता मोठे शेड उभारले आहे त्यांच्या शेडची दिशा पूर्व-पश्चिम अशी आहे शेळ्यांच्या वयानुसार त्यांनी शेळ्यांचे व बोकडांचे विभाजन केलेले आहे उदाहरणार्थ गाबन शेळी रोगट शेळी बोकड त्यांच्याकडे प्रामुख्याने कोटा आणि जमुनापारी या दोन जातीच्या शेळ्या पाहायला मिळतात.
    4. शेळ्यांसाठी उपयुक्त असणारा चारा त्यांनी चार एकर क्षेत्रात केलेला आहे त्यामध्ये दशरथ घास शेवरी सुबाभूळ शेवगा तुती बदाम वड हदगाव अशा वेगवेगळ्या एकवीस प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत.
    5. शेळ्यांसाठी लावलेल्या चाऱ्यामध्ये 1000 गावरान कोंबड्या सोडले आहेत त्या कोंबड्या बाहेर जाऊ नये म्हणून चारही बाजूने जाळीचे कंपाऊंड केलेले आहे त्या जाळीची ला वरच्या बाजूने माशाचे जाळे बसवलेले आहे जेणेकरून कोंबड्या बाहेर येणार नाही.
    6. नामदेव साबळे यांना कृषिभूषण हा पुरस्कार ज्या गोष्टीमुळे मिळालेला आहे ती गोष्ट म्हणजे इथला सेंद्रिय गुळ आपल्या स्वतःच्या शेतामध्ये बिना रासायनिक खताचा उपयोग करता ऊस लावून त्यापासून सेंद्रिय गूळ तयार करतात व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात तसेच वेगवेगळ्या राज्यात हा गूळ पाठवतात यांच्या गुळाला भरपूर मागणी आहे.
    7. कृषिभूषण नामदेव साबळे यांच्या फार्म वरती शेळीपालन कुकुट पालन शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन सेंद्रिय गुळ बोकड पालन कबुतर पालन अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात प्रत्येक गोष्टीची आपल्याला जर सविस्तर माहिती पाहायचे असल्यास त्यांचा साबळे फार्म या नावाने यूट्यूब चैनल आहे त्याला भेट देऊन आपण नक्की व्हिडीओ पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे
    *- / sablesfarm
    टीप:- साबळे फार्मला भेट देण्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क
    साधावा.
    साबळे फार्म पत्ता ;- भालेवाडी तालुका #करमाळा जिल्हा सोलापूर
    विशेषता धन्यवाद
    युवा शेतकरी वर्ग टीम
    कृषिभूषण नामदेव साबळे फार्म
    छायाचित्रण -सागर परदेशी संकेत खोसे
    एडिटिंग -अनिल परदेशी ऋतुराज खोसे
    For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
    चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि.
    अहमदनगर
    👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
    मो.7745806846, 88961473
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 55