मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करावी याच्या खूप साऱ्या टीप्स | लीनाज सुगरणकट्टा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #पुरणपोळी #पक्वान्न #गोडपदार्थ #पुरण #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
    पुरणपोळी
    पीठ कसे मळावे?
    गव्हाचे पीठ १ वाटी
    तेल ३ ते ४ चमचे
    चिमूटभर मीठ
    १ वाटी गव्हाच्या पीठात चिमूटभर मीठ टाकून पाणी आणि नंतर तेलाचा वापर करून सैलसर कणिक मळून ठेवावी. ही किमान २ तास तरी तशीच झाकून ठेवावी.
    पुरण
    चणाडाळ २५० ग्रॅम
    गूळ २५० ग्रॅम
    साखर दीड चमचा
    जायफळ पूड १ चमचा
    हळद अर्धा चमचा
    साजुक तूप १ चमचा
    तेल १ चमचा
    चणाडाळ आधी स्वच्छ धुवून मग पाण्यात तासभर भिजत ठेवावी. नंतर त्यात हळद व एक चमचा तेल घालून कुकरमध्ये ठेवून कुकरच्या २ शिट्ट्या घ्याव्यात. कुकर उघडला की ही डाळ गाळून घ्यावी. डाळीतले पाणी कटाची आमटी करण्यासाठी वापरावे.
    आता एका जाड बुडाच्या कढईत ही डाळ काढावी. गॅस मोठा ठेवावा. वरुन कलथ्याने कढईतच ही डाळ चेचून घ्यावी, जेणेकरून ती बऱ्यापैकी एकजीव होईल. डाळ एकजीव झाली की मगच त्यात गूळ घालावा. सगळे परत नीट मिक्स करून घ्यावे. पुरण होत आले की मग त्यात थोडीशी साखर घालावी. पुरण व्यवस्थित होत आले की ते कढईत गोळा व्हायला लागते. कढईला चिकटत नाही. आता गॅस बंद करून मग त्यात जायफळ पूड घालून नीट मिक्स करून घ्यावे.
    आता पुरणाच्या जाळीवर हे पुरण काढावे. खाली एक पातेले ठेवावे. एका भांड्याच्या बुडाला साजुक तूप लावून त्याने हे पुरण दाबत दाबत राहावे, जेणेकरून खालच्या पातेल्यात आपल्याला मऊसूत पुरण मिळेल. या पुरणाला एक चमचा साजुक तूप लावून सगळे नीट मिक्स करावे. आता हे पुरण छान गार करण्यासाठी ठेवावे, मात्र ते झाकून ठेवावे, उघडे ठेवले तर ते कोरडे पडते. पुरण गार झाले की मग त्याचे गोळे करून घ्यावेत.
    पोळपाटाला एखादे सुती कापड लावून खालच्या बाजूने घट्ट बांधून टाकावे. पोळपाटावर हलकेच मैदा शिंपडून घ्यावा.
    कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करावी. कणकेच्या जवळपास तिप्पट पुरणाचा गोळा घेऊन तो पारीवर ठेवावा. हलक्या हाताने पुरण दाबत साईडने पारी वर वर आणावी. पूर्ण वर आली की पारी बंद करावी. आता मैद्यात हलकेच घोळवून हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. शक्यतो आधी कडेकडेने लाटावी. अजिबात जोर देऊन नये. हात हलका ठेवावा. नवशिक्यांनी आधी छोटी पुरणपोळी लाटावी. जसजशी प्रॅक्टिस होईल तसतशी मोठी पुरणपोळी लाटावी.
    तवा मध्यम गरम करून घ्यावा. लाटलेली पोळी तव्यावर घालावी. कलथ्याने कडेकडेला हलकेच दाब द्यावा. पोळीला फुगवटे आले की पोळी उलटवावी. दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शेकून घ्यावी. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकली की अलगदपणे ताटात काढून वरुन छान साजुक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावी.
    Mrs.Aasawari Gogate
    For all types of catering orders (Only Veg)
    (Only what's app)
    9890671930
    मऊसुत पुरणपोळीसाठी कणिक कशी मळावी?
    • मऊसुत पुरणपोळीसाठी कणि...
    Video shooting & editing:
    Varun Damle
    +91 95459 08040

КОМЕНТАРІ • 292

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 6 місяців тому +2

    खूप छान पुरणपोळी धन्यवाद ताई

  • @VibrantMindPod
    @VibrantMindPod 13 днів тому

    sundar....khup chan recipe ...leena aani aasawari

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 Місяць тому

    खूपच छान !👌👌

  • @roopakini823
    @roopakini823 6 місяців тому

    Good way of presentation

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 4 місяці тому +2

    बरोबर मस्तं टीप

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 6 місяців тому +3

    आजपर्यंत अनेकांनी पुरणपोळी चे व्हीडिओ केले पण मला अपेक्षित असलेली पू पो आज बघायला मिळाली

  • @sudhakardeshpande7407
    @sudhakardeshpande7407 6 місяців тому +1

    छान आहे पुरणपोळी चांगली झाली

  • @ratnamalagadkari2247
    @ratnamalagadkari2247 3 місяці тому

    खूप छान लुसलुशीत पुरणपोळी.

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 2 місяці тому +1

    खूपच सुंदर😊पुरण आणि पीठाचा गोळा वजनी किती घ्यायचा जेणेकरून ऑर्डरच्या पोळ्या एकसारख्या होतील

  • @rollno-36prarthanasanjayma89
    @rollno-36prarthanasanjayma89 6 місяців тому +1

    मी आजवर इतके विडिओ पाहिले परंतु मला परफेक्ट अशी पुरणपोळी जमत नव्हती मात्र हा विडिओ पाहिला आणि माझी प्रत्येक पुरणपोळी टम्म फुगत होती शिवाय मवूही तितक्याच. ताई तुम्हा दोघींचे मनापासून धन्यवाद 🙏 आणि खुप साऱ्या शुभेच्छा 👍

  • @shamalavalsangkar8918
    @shamalavalsangkar8918 5 місяців тому

    छान वाटली तुमची रेसिपी

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 7 місяців тому +5

    अतिशय सुरेख रेसीपी दाखवल्याबद्दल दोघींचेही मनःपूर्वक आभार

  • @chhayadoshi72
    @chhayadoshi72 6 місяців тому

    Leenatai puranpoli khupch chhan zali

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 7 місяців тому +3

    खूप सुंदर पुरणपोळी छान टिप्स सांगितल्या धन्यवाद दोघींना🙏🙏

  • @rohinipande
    @rohinipande 7 місяців тому +1

    अगदी perfect रेसिपी. माझं इतक्या वर्षात इतकं छान आणि झटपट पुरण पहिल्यांदा झालं. कंटाळून मी पुराण आळायला किंचित चुना घालत असे तुमची पद्धत खूपच आवडली . Thank you for sharing.

  • @jayashrikharat2324
    @jayashrikharat2324 6 місяців тому

    खूप च छान

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk 6 місяців тому

    अप्रतिम ❤

  • @vp_vinit7368
    @vp_vinit7368 6 місяців тому

    Tai खुप खूप छान माहिती दिली धन्यवाद❤

  • @priyajoshi6668
    @priyajoshi6668 7 місяців тому +3

    छान दिसतेय पुरणपोळी. आणि आसावरी ताई फक्त veg orders घेतात हे पाहून अतिशय आनंद झाला. धन्यवाद.

  • @sunitadhuri3963
    @sunitadhuri3963 6 місяців тому

    Khup chan

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt 6 місяців тому +1

    Tai Very very nice 🙏💐

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 7 місяців тому +1

    सुंदर सादरीकरण, मऊ लुसलुशीत, बघताच क्षणी खावीशी वाटेल, धन्यवाद दोघींनाही 🙏

  • @abhilashadhanvijay4502
    @abhilashadhanvijay4502 6 місяців тому

    Kolhapuri guda ch nav please share kara market madhe khup brands ahet
    Thanks khup sundar tips dilya badal❤

  • @Sarojkotwaliwale
    @Sarojkotwaliwale 7 місяців тому

    Both of you are very good & explanation is simple & easy Thanks

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 5 місяців тому

    पुरणपोळी ची हि अशीच खरी पद्धत आहे. आमच्याकडे माझ्या आजीपासून फक्त गव्हाच्या पिठाची तेही याच पद्धतीने पुरणपोळी बनते.

  • @jadhavhome9790
    @jadhavhome9790 7 місяців тому +1

    आसावरी ताईंनी खुप चांगल्य प्रकारे पुरणपोळी करुन दाखवली . मी पुरण शिजल्यावर तुप घालत होते पण आता ह्या पद्धतीने करुन बघेन . लीना ताई खुप धन्यवाद तुम्हाला . मी तुमच्या प्रकारे बिटाच्या काचर्या केल्या होत्या सगळ्यांना आवडल्या .

  • @VibhavariJoshi-w2c
    @VibhavariJoshi-w2c 6 місяців тому

    छान अभि नंदन

  • @smitaap15
    @smitaap15 7 місяців тому

    New tip,puranala tup lavaiche ,awsum ,helpful.

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 7 місяців тому +3

    मस्तच झाली पुरणपोळी छोट्या छोट्या टिप्स शिकायला मिळाल्या

  • @jayamane5005
    @jayamane5005 7 місяців тому +2

    लीनाताई आणि आसावरी ताई खूप छान रेसिपी 🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 6 місяців тому +2

    पुरणपोळी रेसिपी खूप छान मस्तच 👌👌❤️👍

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 7 місяців тому +12

    Pith pan kase bhijava ve he suddha tumhi dakhawale phahije hote. Video khup chhan aahe

    • @varundamle5977
      @varundamle5977 7 місяців тому

      ua-cam.com/video/uif8_0ZIAUk/v-deo.htmlsi=U2snKq2wg-IYsr5M

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 7 місяців тому +1

    खुप छान पुरणपोळी रेसिपी 👌🏻👌🏻🙏🏻

  • @suruchidamle1023
    @suruchidamle1023 7 місяців тому +1

    Khupach chan apratim Puranpoli. Chan tips pan milalya. Tya sathi Leena v Asavari Tai Dhanyawad.

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 7 місяців тому

    खुपचं सुंदर झाल्या आहेत पुरणपोळ्या..... 👍👌👌😋😋 धन्यवाद... 🙏🙏🌹

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 6 місяців тому

    😢 खूपच छान आहे रेसिपी

  • @swatimarathe-l6c
    @swatimarathe-l6c 7 місяців тому

    सुंदर पुरणपोळी , छोट्या छोट्या टिप्स छान 👌

  • @rashmideshpande7213
    @rashmideshpande7213 7 місяців тому +1

    मस्तच 👌👌👌😋😋😋

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 7 місяців тому

    खूप छान रेसिपी आवडली.❤❤❤❤ आम्हाला सगळ्या टिप्स दिल्या. खूप खूप धन्यवाद., शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 7 місяців тому

    Khup sunder apratim puran❤ manapasun namaskar v pranam charansparsh priyasawaritai🙏v leenatai🙏sunder mahiti😊

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 7 місяців тому

    Khupch chan zalaaahe 🎉😂❤

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 6 місяців тому

    ताई खूप छान दाखवली पुरणपोळी..फक्त कणिक वापरली आहे पण लाटताना तरी का मैदा?..आम्ही तांदुळाच पीठ सपीटाच्या चाळणीनी चाळून घेऊन वापरतो ...

  • @aditisalvi9935
    @aditisalvi9935 7 місяців тому +1

    वा... खुपच छान..

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 7 місяців тому +2

    खूप छान नवीन शिकायला मिळत 👌👌👌👌👌

  • @meenapatil7762
    @meenapatil7762 7 місяців тому

    मस्तच पोळ्या झाल्यात पुरणात तूप घालतात हे आज समजल लीना ताई तुमच्या सर्व रेसिपीज मी पाहते सोप्या असतात व समजून छान सांगता धन्यवाद ,,😊

  • @suchitrabiwalkar9673
    @suchitrabiwalkar9673 3 місяці тому

    खूप छान मी पण करीन अशी पूरणाला तूप लावून

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 6 місяців тому

    लीना keep it up

  • @aaradhyaacharya6588
    @aaradhyaacharya6588 4 місяці тому

    Aasawari taai che modak pn dakhva

  • @seemapurandare4405
    @seemapurandare4405 7 місяців тому

    Khup sunder. Dhanyawad Tai. Doghiche abhinandan

  • @reshmasalunkhe6561
    @reshmasalunkhe6561 7 місяців тому

    Khup sunder sagta ani nitnetke pan..

  • @sukhadaredkar342
    @sukhadaredkar342 7 місяців тому

    Khupach chaan sadarikaran dhanyawad leenatai

  • @satya5197
    @satya5197 7 місяців тому

    खूप छान झाली आहे पुरणपोळी

  • @vp274
    @vp274 7 місяців тому

    Explained in detail and I am sure it will turn out very good❤️👍

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 6 місяців тому

    लीना ताई खूप खूप छान टिप्स सांगितले

  • @CharulataBhosale-d2q
    @CharulataBhosale-d2q 7 місяців тому

    Khup chaan mahiti milali
    Thank you 😊

  • @jyotimagdum5365
    @jyotimagdum5365 6 місяців тому

    Asavari just amazing puranpoli,kuthe rahatat tya..

  • @urmilakulkarni9711
    @urmilakulkarni9711 6 місяців тому

    नमस्कार आसावरी ताई, आणि लीनाताई. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरण शिजवलं आणि पोळ्याही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केल्या. अतिशय सुंदर झाल्या पोळ्या. पुरण पण शिजताना अजिबात उडले नाही. 👌🙏

    • @parinitabagayatkar6858
      @parinitabagayatkar6858 6 місяців тому

      कणीक कशी मळायची ते पण दाखवा

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 7 місяців тому

    Khup chhan puranpolichi recipe.🙏

  • @smitaap15
    @smitaap15 7 місяців тому +1

    Leena mam,pls show th recipe fr brahmni masale bhaat ,paramparik padaticha

    • @leenasugran68
      @leenasugran68  7 місяців тому +1

      हो नक्की दाखवेन.

  • @JaishreeVyas-o3l
    @JaishreeVyas-o3l 4 місяці тому

    फारच छान शिकवलेत ताई

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 7 місяців тому

    छान दाखवली पोळी! गोल फिरणारी पोळीही बघायला आवडेल.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 7 місяців тому

    Khoop chhan

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 7 місяців тому

    Asavarimam khoopach chaan rec. Dakhavlit thanku

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 7 місяців тому

    Khup chan dakhawalat txs

  • @sangitadhuri6388
    @sangitadhuri6388 7 місяців тому

    खूप सुंदर बनवली आहे.❤

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 7 місяців тому

    Khup,chan,padhat,chan,samjavun,sangitale

  • @snehavalsangkar708
    @snehavalsangkar708 7 місяців тому +1

    खूपच छान मऊ लुसलुशीत

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 7 місяців тому

    Wow yummy khup chaan tips kaku

  • @bharatijawale7314
    @bharatijawale7314 7 місяців тому +8

    कणिक भिजवण्याची पद्धत हवी होती मस्तच पुरण पोळी

    • @jasminakhedkar5340
      @jasminakhedkar5340 7 місяців тому

      म्हणजे पीठाचे प्रमाण, मीठ टाकायचे कि नाही, आणि पीठ व पाण्याचे प्रमाण, म्हणजे कणीक किती सैल भिजवायची याचा अंदाज येतो

    • @ranisaheba1
      @ranisaheba1 7 місяців тому

      ​@@jasminakhedkar5340 मीठ नेहिमच्या कणकेपेक्षा किंचित जास्त घालायचे. छान तार येते आणि पोळीचा स्वाद वाढतो. करून बघा

    • @ultimatetransformation393
      @ultimatetransformation393 6 місяців тому

      कणीक कशी भिजवायची हे दाखवायला हवे होते

    • @vasundharasankhe1306
      @vasundharasankhe1306 6 місяців тому

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 7 місяців тому

    Tai, mastach recipe dakhvlit pan tai tumhi 1 cup dalila kiti pani ghatlat ani kiti shittya kadhlyat sangal ka? Mala karoon baghaychi aahe.mi kadhich kelinahi please sangal?

  • @vijayawatve1241
    @vijayawatve1241 6 місяців тому +1

    अशाच वेगवेगळ्या रेसिपी आणा प्लीज 🙏

  • @anjalidivekar673
    @anjalidivekar673 7 місяців тому

    खूप छान सांगितले आहे

  • @mrinalpatil9117
    @mrinalpatil9117 7 місяців тому +3

    छान, मऊ पुरणपोळी झाली आहे , पुरणाला तूप लावायचे हे आज समजले 😊
    Thanks 👍

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 7 місяців тому

    लीना ताई खुप खुप धन्यवाद

  • @sangeetaarolkar3773
    @sangeetaarolkar3773 7 місяців тому

    Khupach sundar

  • @vrishalijoshi3602
    @vrishalijoshi3602 7 місяців тому +6

    पुरणाला तुप लावतात हे आज कळले छान

  • @AkashYadav-fw4rb
    @AkashYadav-fw4rb 6 місяців тому

    खूप समजेल असच व्यवस्थित सादर केल आहे ,पण कणीक कशी तयार केली,याचा video टाका ना ताई , please

    • @leenasugran68
      @leenasugran68  6 місяців тому

      आहे त्याचा पण विडीओ

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 7 місяців тому

    Puran zallyavar tyat those tup ghalaiyche he aaj Kalale dhanywad❤

  • @sumitaborkar8773
    @sumitaborkar8773 2 місяці тому

    कणीक कशी मळायची, हे जर दाखवल असत तर बरं झालं असतं. That is so important for a perfect puran poli.

    • @leenasugran68
      @leenasugran68  2 місяці тому

      ua-cam.com/video/uif8_0ZIAUk/v-deo.htmlsi=RoTJECLH2PQ6ugyt

    • @sumitaborkar8773
      @sumitaborkar8773 2 місяці тому

      @@leenasugran68 Thank you so much for your prompt reply 🙏😊

  • @archanathakar7817
    @archanathakar7817 6 місяців тому

    Maida kashala pahije ?kanik ani tandul pithi mix Kara

  • @vandhanatandel5647
    @vandhanatandel5647 7 місяців тому

    Khup chhan..❤

  • @saritaogale1444
    @saritaogale1444 7 місяців тому

    Khup chhan

  • @savitriputage9212
    @savitriputage9212 7 місяців тому

    khup chhan mam

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 6 місяців тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 7 місяців тому

    खूप छान ताई

    • @chhayarane9330
      @chhayarane9330 7 місяців тому

      तुम्हाला फोन केला होता त्या ताई श्री स्वामी समर्थ

  • @vidyakulkarni5161
    @vidyakulkarni5161 7 місяців тому

    छान माहिती दिलीत. पुरणाला तूप लावायची माहिती मिळाली. मैद्या एईवजी तांदूळ पिठी लावली तर चालेल का

  • @anjanapatil7694
    @anjanapatil7694 7 місяців тому

    खूपच छान रेसीपी

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 7 місяців тому

    खूप छान!

  • @shailajak3734
    @shailajak3734 4 місяці тому

    अॅल्यूमिनीयम कढईत च पुरण करायला हवे का ?
    नॉनस्टिक अनोडाईज किंवा ट्रायप्लाय कढईत व्यवस्थीत होते का ?

    • @leenasugran68
      @leenasugran68  4 місяці тому

      कुठल्याही भांड्यात करा फक्त जाड बुडाच्या भांड्यात करा.

  • @lalitagandale7247
    @lalitagandale7247 7 місяців тому

    खूपच सुंदर छान 👌

  • @sujatapande801
    @sujatapande801 7 місяців тому

    Sunder

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 7 місяців тому

    खुप सुंदर 👌👌

  • @LeenaFalnikar
    @LeenaFalnikar 7 місяців тому +1

    Excellent 😊

  • @anita.kale_entrepreneur
    @anita.kale_entrepreneur 7 місяців тому

    👌👌

  • @आरसा-ख3द
    @आरसा-ख3द 7 місяців тому +1

    महत्त्वाचे तपशील सांगितल्याने
    पुरणपोळी अचूक होईल 🙏🏻

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 7 місяців тому

    Nice tips 👌👌

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 7 місяців тому +1

    छानच पोळी दिसत्ये❤

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 7 місяців тому +10

    खुप छान डाळ व गुळ सम प्रमाणात घ्यायचं आणि एक तास डाळ भिजत घालायची पुरणाला तूप लावायच माहिती मिळाली

  • @deepalithakur7624
    @deepalithakur7624 7 місяців тому +1

    छान पुरण पोळी

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 місяців тому

    Chan puranpoli