चोरट्यांनी दागिने नेलेlपतीला मारहाण केलीlएवढेच नाही तर माझी व माझ्या मुलीची आब्रू लुटण्याचा प्रयत्न.
Вставка
- Опубліковано 23 лис 2024
- #विघ्नहरटाइम्स
नारायणगाव:
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, पेमदरा परिसरातील कुंभार्डी येथे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोख रकमेसह सोन्याचा 1 (एक) लाख छत्तीस हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. यावेळी त्यांना प्रतिकार करताना दोन जण जखमी झाले असून ही घटना रविवार दिनांक पाच रोजी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची फिर्याद पुजा सुनिल गोफणे (वय 29) यांनी दिली असून यानुसार
रविवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याचे सुमारास आणे पेमदरा परिसरातील कुंभार्डी येथे राहते घरी फिर्यादी पुजा पती सुनिल खंडु गोफणे, संदीप खंडु गोफणे, कल्पना संदीप गोफणे, दिपाली संदीप गोफणे, अंजना खंडु गोफणे असे झोपलेले असताना एकूण पाच अनोळखी चोरटे घराचे पडवीचे बाहेर येवून घराचे बाहेरील लाईटची वायर कट केली. अंधाराचा फायदा घेत त्यांनी पडवीत झोपत असलेले सुनिल गोफणे यांना हातातील काठीने मारण्यास सुरवात केली असता फिर्यादी पुजा यांनी काठी धरली यात त्यांचे हाताला मार लागला असता यानंतर दोघांनी आरडाओरडा केला. आतील घरात झोपलेले सर्वजण बाहेर उठून पडवीत आले असता. एका चोरट्याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने संदीप गोफणे यांचे उजवे पायाचे नडगीवर मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर चोरट्यांनी चाकूचा धाक धाकवून धक्काबुक्की व दमबाजी करून पुजा गोफणे, कल्पना गोफणे, दिपाली गोफणे, अंजना गोफणे यांचे अंगावरील सोन्याचे पाऊण तोळे व अर्धा तोळे वजनाचे दोन मणी मंगळसुत्रे, एक ग्रॅम वजनाची कानातील रिंगा व अर्धी तोळे वजनाचे सोन्याचे मनी असलेली पोत असा एक लाख पंचवीस हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज घरातील कपाट लोखंडी रॉडने फोडून त्यातील रोख रक्कम 11 हजार तीनशे रूपये असा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.
दरम्यान या घटनेत जखमी संदीप गोफणे यांना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार, रागिणी कराळे व पोलिस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी भेटी देत तपासाच्या सुचना दिल्या. श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनाही पाचरण करण्यात आले होते. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर करत आहेत.
अतिशय वाईट घटना ह्या कुटुंबाला सध्या आधार देऊन,गाव त्यांचे पाठीशी उभे रहावे.
खूपच वाईट घटना त्या चोरट्यांवर चांगली कारवाई करा
काय चालू आहे प्रशासन काय करत आहेत, सोडू नका चोरट्या ना, वाणी साहेब याचा पाठपुरावा करा.
वानी सो आळे गावचे अतिक्रमण निर्मूलन
घ्या ना, पेड नका पेड, नाही असं आमचं समज आहे च
Khup vaait ghtna ahe
गरिबाला न्याय द्या
खूप वाईट घटना आहे.. कडक कारवाई झाली पाहिजे.
But butft
वाणी साहेब त्यांना काही मदत मिळावून द्या. खुप वाईट. तुम्ही पोलीस कडे पाठपुरावा करा. सापडेलवार tangadya तोडल्या पाहिजे.
खुप वाईट घटना
खूप वाईट वाटल हे सर्व पाहून..हे जर असच चालू राहील टर लवकरच आपल्याकडे बिहार होईल…हे कुठे तरि थांबल पाहिजे…😠😠
वाणी साहेब घटनेचा योग्य तो तपास लागला पाहिजे
वाणी साहेब हे प्रकार खूप वाढत आहेत.. आपल्या कडे... येणारे दरोडेखोर हत्यारबंद असतात... आपल्या कडे हत्यार असते तर प्रतिकार करता येईल...
न्यायव्यवस्था कुचकामी आहे.
वाणी साहेब या फायर कसा दाखल केलाय ते बघा कारण या फायर दाखल करताना दोन-तीनच चोरटी दाखल करतात
याचा छढा लागला पाहिजे. सदर ठिकाणी sp यांनी भेट दिली पाहिजे. दरोडा च्या वेळी त्यांनी विनयभंग देखील केला आहे. खूप गंभीर गुन्हा आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यवे प्रत्येक गावात
वाईट. छडा लागला पाहिजे. गंभीर कलम लागायला पाहिजे.
वचक नाही उरला तालुक्यात्
Yacha tapas zala pahijen
वादाटून नाही. This is absolute decoity. And it should be detected. If fail then these accused can be more active in next crimes
जाहीर निषेध 🤬 पोलिस च
प्रत्येक गावात कॅमेरे बसविण्यात आले तर फायदा होईल
पाळतच ठेवुन कार्यक्रम केला आहे.आस वाटत.😮😮😮😮
Patrkar voice rong dismis this membr
साहेब चोरी वाढली आहे प्रसासन काय करत आहे माझी 11 ला चोरी झाली बस्थानकावरून बीड मध्ये झाली आजून काहीच शोध नाही बॅग मध्ये हात घालून sadyapach तोळ बायका होत्या त्यानी चोरी केली
😢😢😢
🎉🎉🎉
Salana pakdam fansi Diya
Ty maulichy tondatun nighalele shabda kalij chirun gele