साखळदंडाच्या मार्गे शिवनेरी | अर्थात दुर्गश्री -किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • थोडा रोडव्हील राणे अर्थात प्रथमेश दादा सारखा व्हिडिओ वाटला असेल ते त्याच पूर्ण श्रेय त्यांच्या महत्वपूर्ण व्हिडिओ ला जाते. त्या सतत बघत राहिल्याने थोडा शैली वर प्रभाव पडणारच...
    शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत.
    शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या 2 मुख्य वाटा आहेत. त्यातील पायरी मार्ग अनेकांना माहीत असेल आणि आपण त्याने जातो देखील मात्र दुसरा साखळी मार्गाने खूप कमी पर्यटक जातात. या मार्गावर आता रेलिंग लावलेली असल्याने मार्ग तसा सुरक्षित आहे मात्र या आधी या मार्गावर जेव्हा साखळी पकडुन जावे लागायचे तेव्हा अनेकांना प्राण देखील गमवावे लागले होते.
    या मार्गावर लेणी समूह देखील आहे. याच लेणी समूहातील गोष्टी दाखविण्याचा आणि पायरी मार्गाने न जाता साखळदंडाच्या मार्गाने कसे जाता येईल हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
    पुढील भागात आपण शिवनेरी किल्ल्याच्या उत्तर पठारावर आणि नंतर बालेकिल्ल्यावर जाणार आहोत.
    गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    शिवनेरी किल्ला गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.g...
    शिवनेरी किल्ला साखळी मार्ग गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.g...
    (chain road नावाने तुम्हाला हा मार्ग गुगल मॅप वर दिसेल. महालक्ष्मी लॉन पासून तुम्हाला या मार्गाकडे जाता येते.)
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #शिवनेरी #दुर्गश्री #किल्ले_शिवनेरी #Shivneri #ShivneriFort #ShivneriTrekkingRoute #SakhaliMargShivneri #NikhilMhaskeVlogs
    How to reach Shivneri fort?
    how to Trek on Sakhali Marg to Shivneri?
    Shivneri via old trekking Route
    How to start Sakhaldand Hard Trek to Shivneri?

КОМЕНТАРІ • 37

  • @minakashidhengle
    @minakashidhengle 2 місяці тому +2

    साखळदंड मार्ग बंद केला आहे ना, नक्की त्याची एक map image दिली असती तर बरे झाले असते, आम्ही पण गेलो असतो , माझ्या 8 वर्षाच्या मुलाला खुल आवड आहे, गड किल्ल्याची

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      किल्ल्याच्या या मार्गाला भिंत बांधून बंद केलेलं आहे हे मी सुरुवातीला दाखवलं आहे. मात्र तिथून चढून जाता येत.
      साखळदंड मार्ग बंद केला होता मधील काळात कारण तिथून काही गिर्यारोहक जाताना मृत्युमुखी पडले होते. मात्र आता तिथे चांगल्या प्रकारे रेलिंग लावल्या आहेत. त्यामुळे थोडा सुरक्षित मार्ग झाला आहे.
      मॅप इमेज मी लवकरच कम्युनिटी पोस्ट मध्ये upload करेल. ज्यामध्ये तुम्हाला नक्की मार्ग कसा आहे हे समजेल.
      तुमच्या मुलामध्ये ही गड किल्ल्यांची आवड आहे ऐकून छान वाटलं. त्याच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
      जय शिवराय

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      ua-cam.com/users/postUgkxlSUfCLxIMeDHvUT9MEP2cKZEzvpEiclU?si=nxfUv3lkDkMKndek इथे तुमच्यासाठी मॅप टाकला आहे.

  • @vedantbhor-ps1yq
    @vedantbhor-ps1yq 2 місяці тому +2

    love from Junnar

  • @Krishnabhakt24
    @Krishnabhakt24 Місяць тому +1

    खूपच सुंदर दादा🎉

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 2 місяці тому +1

    Aaapratim sir❤❤

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      धन्यवाद सर,
      असाच पाठिंबा असू द्या, जय शिवराय🚩

  • @gauravchaudhari2929
    @gauravchaudhari2929 2 місяці тому

    अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... सर🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      धन्यवाद सर
      असाच पाठिंबा असू द्या, जय शिवराय🚩

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 2 місяці тому

    दादा माहित नसलेली माहिती आपण दिली आभारी आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      धन्यवाद,
      आपला प्रतिसाद असेल तर अजूनही अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू!

  • @AmhiKastkar
    @AmhiKastkar 2 місяці тому +1

    भारी व्हिडिओ 🚩 जय शिवराय 🙏

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      धन्यवाद... जय शिवराय🚩

  • @anujyeole3188
    @anujyeole3188 2 місяці тому

    दुर्गश्री शिवनेरी
    खूप सुंदर अनुभव. उत्सुकता पुढील सिरीज ची . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      नक्कीच... नवीन सिरीज रेकॉर्डिंग तू आला की करूयात सुरू!

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 2 місяці тому

    🚩🚩🚩🚩

  • @Nomaanpatel77
    @Nomaanpatel77 2 місяці тому +1

    अतिशय छान व्हिडिओ... सर्वांनी काळजी घ्यायला हवी, तेव्हाच आपले गड किल्ले चांगले राहतील...❤

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому +1

      हो... आपली संपत्ति आपणच जपायला हवी🚩

  • @ashokv6565
    @ashokv6565 2 місяці тому +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhangiyeole1840
    @shubhangiyeole1840 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत...असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      कार्य तर सुरू राहीलच... आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने प्रेरणा भेटत राहो🚩..
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @aumcreations8215
    @aumcreations8215 2 місяці тому +1

    Torna Adhi Lal Mahalat Raje Barach Kaal Hote. Tymule Adhi Lal Mahal Karun Mag Torna Kelat Tarach Maharajanchya Pravasachi Suruvat Mhanata Yeil.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      नक्कीच यात अजून सुधारणा करता येतील भरपूर... प्रयत्न तर असेल की जितकं शक्य आहे तितका त्या मार्गाने जावं

  • @avinashjamdar6649
    @avinashjamdar6649 2 місяці тому +1

    एकदम मस्त ...
    तुमचे व्हिडिओज इतके भारी असतात की ,तुमच्या ह्या व्हिडिओ ची जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा माझा नेट पॅक संपला होता ..तर विशेष हा व्हिडिओ पाहण्यासाठी मी एस्ट्रा पॅक मारला ..
    खरच खूप मस्त असतात तुमचे vlogs

  • @vedantbhor-ps1yq
    @vedantbhor-ps1yq 2 місяці тому +1

    मी दर आठवड्याला साखळी मार्गाने शिवनेरीवर जातो

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      वाह... भारीच!
      पूर्व लेण्यांमधील काही लेणी माझ्या बघायच्या बाकी आहेत. तुम्हाला माहित असेल तर मला Instagram वर थोडी मदत करा.

    • @vedantbhor-ps1yq
      @vedantbhor-ps1yq 2 місяці тому

      @@nikhilmhaskevlogs dada mi insta handel nahi karat pn 1 sangu shakato ki junnar la tracking sathi khup changale spout ahet ajun

    • @vedantbhor-ps1yq
      @vedantbhor-ps1yq 2 місяці тому

      @@nikhilmhaskevlogs mi pn sarva caves nahi bagitalya karan sakhali route ne jatana bibatychi bhiti aste tu jya caves bhagitalyana tithe sudha asto bibatya

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 місяці тому +1

    भावा तुझे आभार,पण काळ्जी घेऊन शूट कर‌.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      हो, काळजी घेतो.
      धन्यवाद, जय शिवराय🚩

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 2 місяці тому

    Dada tujhi mahiti uttam asach bhairav gad chi pan mahiti de

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      महाराष्ट्रात भैरवगड खूप आहेत. कोणता भैरवगड तुम्हाला अनुभवायचा आहे सांगा... नक्कीच पुढील काळात तिथे भेट देतो

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 місяці тому

    चांगल्या - निर्दयी एडिटिंग ची प्रचंड आवश्यकता आहे या व्हिडिओ ला !
    एकूण २३+ मिनिटांचा हा व्हिडिओ सहज ७ ते ९ मिनिटांचा होऊ शकला असता.
    निखिल यांनी स्वतः उल्लेखलेल्या कॉमेंट नुसार खरंच स्वतःची आणि अनावश्यक कॉमेन्ट्री खूप जास्त आहे तसच सोबतींना दिलेल्या सूचना सुद्धा अनाकलनीय कारणास्तव फायनल व्हिडीओत ठेवल्या आहेत.
    क्रियाटरने स्वतःच्या भावना व्यक्त करायलाच हव्यात पण Try not to get ovwrly preachy ..
    प्रामाणिक सल्ला आहे - hope u take it positively.
    पुढील कामासाठी शुभेच्छा !