विमलेश्वराचे मंदिर (वाडा) देवगड, कोकण
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- विमलेश्वराचे मंदिर (वाडा) देवगड, कोकण Vimleshwar Mandir Wada Devgad Konkan
For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद काळे व अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे मूळ गाव होय.
विमलेश्वराच्या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी, तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे.
प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पाय-या चढताच भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच, 35 × 30 × 12 फूट क्षेत्रफळ असलेला सभामंडप लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या चित्काराने दचकायला होते. तेथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून गेते. तेथील गाभा-यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गढूळ होत असले, तरी झ-याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो.
मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेसाठी चि-यांनी घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे. धर्मशाळा व गावात पूर्वी होऊन गेलेल्या नेने नामक सत्पुरुषाचे समाधिस्थळही आहे. मंदिरात होणारा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा. माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत उत्सव असतो. एकादशीला जत्रा भरते. त्या दिवशी ग्रामदैवत रवळनाथाचे तरंग मंदिरात आणले जातात. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात आरती, कीर्तन, प्रवचन व भजने होतात. चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावातील उत्साहाला उधाण आलेले असते. अमावास्येच्या दिवशी सकाळी पालखीसह लोक समुद्रस्नानासाठी जवळ असलेल्या फणसे येथील समुद्रकिनारी जातात. रात्री लळिताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.
कोकणातील देवगड तालुक्यात ‘वाडे’ गावचे श्री देव विमलेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. या मंदिरात अत्यंत उत्सवपूर्ण वातावरणात महाशिवरात्र साजरी होते
या मंदिराचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे, मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बाराही महिने हा ओहोळ वाहत असतो.
या मंदिराचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचे पाणी गढूळ होते. त्यावेळी, मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झ-याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झ-याला प्रेमाने ‘गंगा आली’ असे म्हणतात.
या मंदिराचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे, संपूर्ण हिंदुस्थानात, उंचावर शिवलिंग वसलेले हे एकमेव मंदिर आहे. या शिवलिंगावर कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते.
या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव सात दिवस चालतो. माघ कृष्ण दशमी या दिवशी श्री विमलेश्वर पालखी मंदिरात आणली जाते. दशमीपासून अमावस्येपर्यंत रोज रात्री पालखीसोबत भक्तगण मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घातल्यावर कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मंदिरात दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू असतात. अमावस्येच्या दिवशी सर्व भक्त पालखीसोबत समुद्रस्नानाला जातात. अशा रीतीने महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न होतो. असे हे सुंदर शिवमंदिर प्रत्येकाने एक दा तरी पाहण्यासारखे आहे. मुंबईहून जाताना मुंबई-विजयदुर्ग एस.टी. बसने वाडे गावात आंबेडकर चौक येथे उतरून पाच मिनिटांत पोहोचता येते
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Har har mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻
मंदिर आणि धबधबा खूप छान आहे
खूप छान व्हिडिओ आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे खूप छान मंदिर आहे मला खूप मंदिर आवडली आहे खूप छान पाणी आहे मला खूप व्हिडिओ बघा आवडली आहे
फारच सुंदर
Om Namah Shivay
Saglyanka sukhi thev
Corona tujha payashi ghe re baba 🙏🙏🙏🙏🙏
Mast mazya aatyache gaon
अप्रतीम
Mast distos pragat
👌👌
Swargiy. Sundar. Konkan
खूपच छान.. मी गेलो आहे विमलेश्र्वरच्या मंदिरात.. आमचे मूळ गाव वाडे मुळबांध वाडी.. आणि कुलदैवत तेथील श्री क्षेत्र बांदेश्वर व आडिवरे येथील देवी श्री महाकाली...विमलेश्र्वर पुन्हा एकदा पाहून खूप बरे वाटले... प्रथम मला सुद्धा वटवागुळ पाहून आत जायची भीती वाटली होती परंतु मी तेथीलच एका लोकल व्यक्तीसोबत आत गेलो.. ओम् नमः शिवाय...🙏🙏🚩🚩👌👌
Dhanyavad Pragat. Maza parammitra kai. Pravin Gurav yache he gav. Tyachyabarobar mi ya mandirat jaun alo ahe. Aaj Pravin ya jagat nahi. Tyachi prakarshyane univ janavate. Dev vimleshwar tyachya atmyas shanti devo. Prachin mandirache aplyamule punha darshan ghadale .Dhanyavad.
प्रगत दादा विमलेश्वर मंदिर खुप छान होत तसेच आसपासचा परीसर छोट छोटाले धबधबे नदी पाण्याचे ते कुंड पाण्याचा तो खळाळणारा आवाज नारळी माडाची झाडे खरच शब्द नाहीत सांगण्यासाठी अमेझिंग
Majja yete khup aani chhan vat te bachaya kokan ..Thanku very much
Good video
मस्त, छान. अभिनंदन तुमचे प्रगत लोके
Pragat bhau mi mazya balpani ya mandirat gele hote. Aaj 25 varshananter ya devshanache darshan ghadvales . Mandir aani sabhovtalcha parisar pahun dole sukhavle. Khup khup dhanyavad. 🌺🌺
Seems magically mystic place.
कोंकणातील गणपती आगमन आणि विसर्जनाच्या विडिओ टाका
खूपच सुंदर
Dada...tumchy video mdhe last la camera smorun jo manua gela na...to mza kaka ahe...mza gav ahe parab wada....vimleshvar mandir Chy smor je ghar desat ahe ...tych line Chy end la mza ghar ahe ...
Hi , Mi Padavanyat Rahto
Hiii प्रगत आम्ही आताच देवगड ला गेलो होतो आणि ह्या मंदिरा मध्ये ही जाऊन आलो खुप छान आहे मंदिर आणि मंदिराचं परिसर पण खुप छान आहे.👌👍
Sunder mandir aahe
वाहत्या पाण्याचा मधुर स्वर ...👌👌👌😇😇😇
O n:m shivay he mandir sampurn dagadat koral ahe ani ya mandirachi back side video madhe dakhavlis nahi ti dakhavlis asti tar ajun khup maja aali asti thanx
Masta!! Mazya babancha ajol ahe.
दादा अप्रतिम असे व्हिडीओ असतात तुझे😊
नमस्कार, मी दिगंबर दत्तात्रय घाडी
धन्यवाद साहेब,आमच्या गावातील हे प्रसिद्ध मंदिर आपण दाखवल्याबद्दल,मी ह्याच गावचा ,वरच्या गुरव वाडीत आमचं घर आहे.
Kharach khup Chan watla,mi devgad chach aahe
Hey mhanje ekdam Satyam Shivam ani Sundaram aahe. Kiti naisargik.
मस्त, प्रगत तुझा उत्साह & संवाद कौशल्य उत्तम आहे
khupach sundar
Tiprala yeva
Temple with divine beautiful surrounding!
Khup sundar mandir ahe tuzyamule dada amhala gharbaslya darshan gheta yete thanks 🙏🙏
Waaah ...Kiti sundar ..prachin shiv mandir aahe...sabhovtalcha parisar pan khupach chaan aahe...Tx mitra
Hoy maharaja
Khup proud feel karte ki me kokanchi ahe ☺ amche devasthan shetra vimleshwar
Nice👌👌👌👌👌
He any season visit deu shkto ka apan eth
Asach video banavat java...very good places
Khupach Chan Bhai
Khup Chan
🙏🙏🙏thankyou Dada...ambala chhan darshan karun dilaya baddal
छान... माझ्या मामांचे गाव आहे हे.
धन्यवाद प्रगत माझ्या गावचे हे प्राचीन मंदिर दाखवल्या बद्दल।हे मंदिर पांडवांनी बांधले अशी आख्यायिका आहे।
देवगड तालुक्यातील बरीचशी ठिकाणी दाखविलल्याबद्धल धन्यवाद.
Kokanatil mandir kupch sundar astat
Sir khup Chan mahiti details tumhi Sindhudurgat rahunahi mahit nasaleli thikane samajatat.
Om namah shivaya
ऑक्टोबर मध्ये असेच वाहते पाणी आणि हिरवळ असते का..???
एक विशेष गोष्ट दोन हत्ती मधली मी ऐकली ती म्हणजे या मधील एक हत्ती नर आणि एक मादा आहे
Tu Varun road Varun veiw dakhavlas nahi mandiracha ?
Ek one piece dagadaat he mandir paach pandvani eka ratri korleyla ahey.
माझे गाव !👍
Tummies kokantil banda village dakhava
Punyache hi subscriber ahet.tr punyahun kase yayche he hi sangt ja plzz.baki khupch Chan Mandir ahe.bajucha parisar man mohun takto.as vatat ki amhi pn tithchlech asto tr khup br zal ast .thnq khup Chan mahiti detos tu.amhi khup vat bght asto tuzya vlogchi.
सर, देवगड पुणे ST बस सेवा आहे. देवगड डेपो मधून विजयदुर्ग गाड़ी पकड़ली तर विमलेश्वर मंदिर स्टॉप वर उतरून पायी चालत मंदिराकडे जाता येते. राहण्याची सोय स्थानिक लोकांकडे होऊ शकते. गुरव वाड़ी, परब वाड़ी बाजूला च आहे. एक नीरव शांतता आहे इथे. महाशिवरात्रि ला रात्रीची पालखी प्रदक्षिणा अप्रतिम. ढोल ताशा वाजत असताना साक्षात कैलाश पर्वतावर आहोत की क़ाय असे वाटते.
Devgadla chira gharbadhnaysathi vaprtath to kasa bnvila jatho yavar ekha video banvava hi vinathi
नमस्कार, शुभ सकाळ. मी तुला सांगणारच होती विमलेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर पण दाखव. नेमकं तु ते दाखवलंस. धन्यवाद
Jithe shankarache mandir aste thite pani astech
Seema K Ubale. Pragat. Amhala Tilakacha gaon ani sane Guruji Ghar tasech. Ladghar dakhav na. Vinleshwar Mandir Chan ahe
Sir ozarch bramhanand swamicha math pan dakhavat na.
Yes khup chhan place ahe ..Achra Kandalgaon ani Malwan Road var..
I liked ur video very much can you please shoot the Hanuman temple which is next to a river and can be easily viewable from the bridge. I'm not sure is it wadatar.
Mitra khrach tuza heva vatto. Kokan firyala milat Tula.
Video mst banvtos bhava but tya mandir cha itihaas sangitla astas tr ajun majja ali asti. Baki mst astat tuze video. ☺
you need better camera....
Dada..You are doing very good... But can I request U to please do have some coaching, or online training, or u can just learn on You tube also.."How to handle camera" i.e. basics of cinematography ... It will really add tramandous value to your hard work... Tu camera khup fast firavtos..from left to right or right to left ..or up n down .. specially when u wan show audience panorpmic views. Te tula necked eyes ni think vatat ani disat ..pan for viewers it's just poor view and we miss a lot.. which u actually wan show us... Hope u got my point.. Baki... Thanks..n all d best....
दाडी कैली आत्ता जरासे मानसात आला