Rahul Kulkarni मधली ओळ 63 : जीवन कसं जगावं कष्ट,हिंमत,भविष्याचा वेध घेणारे भास्कर मगर
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #Middleline #Osmanabad #Maharashtra #ABPMajha #monsoon2022 #MumbaiRain #VidhanSabha #EknathShinde #maharashtrapoliticalcrisis #marathinews #rahulkulkarni
Rahul Kulkarni मधली ओळ 63 :जीवन कसं जगावं कष्ट,हिंमत,भविष्याचा वेध घेणारे भास्कर मगर Abp Majha
मधली ओळ (Madhali Oal) देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचं सविस्तर विश्लेषण सोप्या भाषेत एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni ABP Majha) यांच्यासोबत. बातमी कोणतीही असो, त्या बातमीचा अर्थ आणि अन्वयार्थ काय? त्याचे समाजमनावर परिणाम काय? हे सर्व आपण मधली ओळमध्ये पाहू शकाल. राहुल कुलकर्णी हे एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार आहेत.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video credit : #Middleline #Osmanabad #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Onkar Andurlekar / Editor
व्याज व्यवसाय करू नये.हे सत्य आहे.कष्ट व नित्तीमता फार महत्वाचं असतं.अभिनंदन मगर साहेब.धन्यवाद कुलकर्णी साहेब.
आज हे ऐकल्यावर..अस वाटायला लागलय की आपले दुःख 0.1% सुद्धा नाहीत..ग्रेट माणसे...ऐकुन खुश झालो. कष्ट हाच देव..🙏
Inspiring मुलाखत! उत्तर प्रदेश, बिहारी असे अनेक लोक अशा पद्धतीने जगुन मुंबई मध्ये कमवुन श्रीमंत होतात हे जगप्रसिद्ध आहे. मराठी माणूस मेहनती नाही असा अपप्रचार पण केला जातो. अशा अपप्रचार करणार्यांना ही मुलाखत, मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांच जीवन हे उत्तर आहे. अशी मराठी माणसं बंगलोरला पण मी पाहिले आहेत.मी भारतात अनेक ठिकाणी काम केलं आहे व नेहमीच मी म्हणतो की मराठी माणूस पण कष्टात, जीवन संघर्षात कोठेच कोणापेक्षाही कमी नाही. फक्त मेहनती मराठी माणसाच्या स्टोरी मेडिया मध्ये येतं नाहीत. कुलकर्णी सर, ABP maza टीम, राजीव खांडेकर सर यांना धन्यवाद व अशाच positive कामासाठी खूप शुभेच्छा ! मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांना नमन व वंदन! डोळ्यात पाणी आणले तुम्ही सर्वांनी! मराठी असल्याचा अभिमान वाढवला !
सहमत
मराठी माणसात ठराविक कुटुंब मामा सारखे कष्टाने मोठी झालेली आहेत
आपण बिहारी,,. भैय्यांना नाव ठेवतो बाबांनी भैय्यांना ही लाजवले आहे.... किती हा जीव काढे पणा... मनुष्यजीवन हे एकदाच आहे बाबांचा आत्मा वैतागून गेला असेल तो पुन्हा परत मानव जन्मात येण्याचा विचारही करणार नाही आता.. जगज्जेता सिकंदर ही खाली हात गेला..
म्हणून मित्रांनो जीवन जगत असताना बुद्धांनी सांगितलेला सम्यक मार्ग अवलंबा.. धन्यवाद
सलाम यार मगर काकांना
मराठी पत्रकारितेचा दर्जा आपल्या सारख्या पत्रकारांमुळेच टिकुन राहील अशी अपेक्षा आहे... राहुल सर खुप सुंदर मुलाखती घेता आहात आपण 👌👌👌
राहुलसर ह्या असल्या माणसांच्या मुलाखती घेऊन तुम्ही पत्रकारांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करत आहॆ.... नाहीतरआज काल राजकारन्याच्या मुलाखती घेण्यातच धन्यता मानतात 💐🙏
Very good work
Khar bolat sir 👍🏻💯✌🏻
: :
Eakdam Chan sir
श्रमयेवजयते.
मला वाटत जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याचे गोठलेलं रक्त सळसळ करून कष्ट करणारच.
खरंच आहे
,,,,,
सर
डथढयडयण
❤
मागील 25 दिवसातील राजकीय बातम्या मुळे वैतागून बातम्या बघणे बंद केले होते परंतु या मुलाखतीत मनाला बरं वाटेल व जीवनात उपयुक्त माहिती दिली व पुन्हा थोडं बातमी बद्दल बरं वाटलं
Yes absolutely
Right bro
तत्त्वांना धरून व कष्ट करून जे कमवालं तीच खरी आयुष्याची कमाई आहे..... निशब्द ✨✨👏
बाबा खुपचं भारी
कठोर परिश्रमाला पर्याय नाही पण या २१व्या शतकात कठोर परिश्रम स्मार्ट असले पाहिजेत 💯
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट 🚩बाबा सलाम तुमच्या मेहनतीला, माझं आयुष्य तुम्हाला लागो हीच देवाला प्रार्थना🙏🙏
फार छान मुलाखत घेतली आभारी सर
माझ्या महाराष्टात असा पत्रकार आहे याचा आम्हास गर्व आहे त्यांनी घेतलेल्या मुलाखती किंवा दिलेल्या बातम्या स्पष्ट आणि ऐकण्यास छान जणू काही आपण च त्या ठिकाणी आहोत छान
Rahul sir very very good mulakat
राहुल सर मुलाखत घेताना असे वाटत होतं की तुम्हाला सुद्धा त्याच्या बोलण्या मधून खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली कारण मुलाखत संपवताना शेवटी तुम्ही सुद्धा भावुक झालात
खूप खूप प्रेरणादायी आहेत हे बाबा.....खूप रडलो मी ही मुलाखत ऐकताना....जीवन जगणं हे किती सोपं आहे....साध्या सरळ गोष्टी प्रामाणिकपणे केल्या तर आयुष्यात काहीच अशक्य नाही हे समजले....कुलकर्णी साहेब तुमचेही खूप खूप धन्यवाद 👏👏👏
Qqaqqqqqqqqqqqqqqq1qqaqaqqqaqaqqaqqqaq
खरच कष्ट हा शब्द ही फिका आहे , या आजोबांसमोर
😭😭
माझे ही असेच झाले. रडतच होतो मुलाखत संपे पर्यंत.
ग्रेट मॅन.
सर्वप्रथम आजोबांचे कौतुक करेल एवढं कमीच आहे आणि त्यांच्या त्या परिस्थिती मध्ये साथ देणाऱ्या माउलीला माझा नमस्कार राहुल साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो असल्या आजोबांचे किंवा असल्या व्यक्तिमत्व वांचे विचार आमच्या पर्यंत पोहोचवा. उगाच उगड्या नागड्या बायका दाखवून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा तुमचे हे कार्य खुप छान आहे. पुनःश आपले आभार 👍👍 शेवटी कष्टाला पर्याय नाही 👏👏👏
आमच्या गावातील सांगवी काटी येथील भास्कर महादेव मगर यांची खरीच जिद्दीची प्रेरणादायी कहानी आज राहुल सरांनी घेतली त्याबद्दल धन्यवाद
🙏🙏
मी पण केमवाडी चा आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान राहुल सर, मी आज पर्यंत तुम्ही घेतलेल्या मुलाखती आणि जागेवर जाऊन केलेले रिपोर्टिंग पाहिले आहे असे वाटते की आपण पत्रकारी क्षेत्रांमधले उत्तम उदाहरण प्रस्तापित केलेले आहे गॉड ब्लेस यु
धन्यवाद सर तुम्ही अशा मुलाखत घेतल्याबद्दल बराच फरक पडणार समाजातील निराश व्यक्ती वर धन्यवाद राहुल कुलकर्णी सर
👌👌
Thanks
Nice
हो
🙏🙏🙏👍👍
अप्रतिम मुलाखत..
प्रत्येक चॅनलने अशा प्रकारच्या मुलाखती दाखवून समाजकार्य करावे.
खूप चांगली पॉझिटिव्ह बातमी सांगितली सर यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे कुठे आजी कुठे आजच्या बायका मला हे नाही मला ते नाही पुन्हा बोलतात मेल्याच्या संसारात सुखच नाही खूप छान माहिती आहे सर बाबांना खूप कष्ट केला आहे
हो , अगदी बरोबर
एकदम खर बोललास मित्रा
आत्तापर्यंत बघितलेली सर्वोत्तम मुलाखत.....धन्यवाद राहुल कुलकर्णी सर
बाबा तुमची स्टोरी ऐकल्यावर अस वाटलं की आमचं दुःख या जगात एक छोटासा बिंदू आहे
🙏🙏
🙏
🙏🙏🙏
काय आजोबा तुमच्या शब्दात धमक तेव्हडीचं व पुढील माणसाला अंतःकरणातून भावुक करणारी तुम्ही हाताळ लेली परिस्थिती सलाम तुमच्या मेहनतीला
देवापाशी एवढीच इच्छा की तुमची आणी माझी भेट नक्की होवो
1 नंबर च मगर साहेब, तुमच्या या संवादातून आम्हा तरुण लोकांना खूप मोठी प्रेरणा मिळाली.आणि विशेष आभार राहुल साहेब अशा लोकांकडून आपण महाराष्ट्राची चेतना जागवताय.👌👍
अगदी बरोबर
साहेब आम्ही हेच। दिवस भोगुन तीस एकर जमीन घेतली तीन भाऊ राम कृष्ण हरी
सत्य किती सुंदर असते. प्रामाणिकपणा किती समाधान देतो. कष्टाला पर्याय नाही. प्रयत्न आणि कष्ट यातच परमेश्वराचा शोध. राहुल सर आपण पत्रकारितेमधील एक नवा मानदंड केला आहे. आपले खूप खूप आभार. कष्ट करून प्रामाणिकपणे आपले कुटुंब उभे केलेले अनेक माणसं या महाराष्ट्रात आहेत त्यांची ओळख करून देणारे आपण! धावपळीच्या जगात मूल्य रुजवणारी अमूल्य मुलाखत असे वर्णन या मुलाखतीचे करावे लागेल. इतके कष्ट करून जीवनात नम्रपणा ठेवणे खरंच अवघड गोष्ट आहे. गोष्टी जेवढ्या सोप्या तेवढ्या करायला अवघड असतात. पण जीवनात त्याच कराव्या लागतात हे आज उत्तम प्रकारे कळाले! महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या अशा मुलाखती बातम्या टीव्हीवर झळकल्या तर तरुणांना एक दिशा मिळेल! इंटरनेटच्या वापरामुळे दिशाहीन झालेल्या तरुणाईला या मुलाखतीतून संदेश मिळेल! मला याची विशेष वाटते कुलकर्णी साहेबांना असे विषय सुचतात आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किती प्रयत्न घेतात कष्ट घेतात! माणूस शिकून मोठा होतो पैसे मिळवतो आपल्या मागील आठवणी काढत नाही किंवा आठवत नाही परंतु आता शिकून सवरून चांगले पैसे मिळवलेल्या लोकांनी गावाकडच्या लोकांमध्ये मिसळले पाहिजे याची जाणीव झाली!
धन्यवाद कुलकर्णी साहेब आपले मनःपूर्वक आभार! मगर आजोबा आपले सुद्धा मनःपूर्वक आभार!
राहुल सर तुम्ही हिची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे एखाद्याला कष्ट किती असावं किंवा कष्ट किती करावे, यालासुद्धा मर्यादा असाव्यात, परंतु अशा व्यक्तीची तुम्ही जी मुलाखत घेतली त्या व्यक्तीचा आदर्श नेहमीच समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, आणि खऱ्या अर्थाने तुमच्या पत्रकारितेचे सुद्धा वेगळेपण तुम्ही सिद्ध केलेलं आहे, सलाम तुम्हा दोघांना..❤❤
आयुष्यामध्ये नाउमेद झालेल्यांना हा विडिओ खूप प्रेरणा देइल...हा विडिओ तर आवडलाच परंतु राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही खूप महान पत्रकार आहात...तुमचा प्रत्येक विडिओ पाहतो...त्यातील कोणत्याच विडिओ मध्ये अतिश्योक्ति नसते....जे खरं आहे तेच तुम्ही तुमच्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवता.....Ur great sir....🚩🚩
आज नसीबच म्हणाव जिवनात पार खचलेलो असताना आज नशीबाने हा विडीओ समोर आला. परत एक नवीन जिवन जगण्याची प्रेरणा मिळाली.. 🙏🙏🙏🙏🙏
कष्ट हेच भांडवल खूप छान आणि प्रेरणादायी अनुभव ऐकून फार आनंद झाला.
पूर्वजांचा आपल्या आयुष्यावर घडणारा परिणाम त्यांनी केलेले चांगले वाईट कर्म गत वैभव प्राप्त करण्यासाठी केलेले अपार कष्ट खूप खूप प्रेरणादायी व अशा प्रेरणादायी उदाहरणं दाखवल्याबद्दल राहुल कुलकर्णी सरांचे हि खूप खूप आभार
फक्त देवाला एकच म्हणणें कि ज्या म्हाताऱ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून मुलंबाळं यांचा संसार उभारला घरभार बनविला त्या मुलानी आणि नातंवाणी त्या वृद्ध आई वडिलांना घराबाहेर किंवा अपमानाची वागणूक देऊ नये. तुम्हाला सुद्धा तुमची पोर घराबाहेर काढतील.
इतके कठीण दिवस ,त्यात मुलाची ,पत्नीची उत्तम साथ आणि अपार कष्ट ,मुलांचे बंगले ,स्वयःची चाळीस एकर जमीन ,पूर्ण लागवड ,कमाल आहे. नमस्कार.
पाहीले राहुल सरांचे धन्यवाद
आजची समाजाची परिस्थिती पाहता..गरिबीत राहुन कष्ट करून कोणाला ही श्रीमंत होयचे नाही.. direct श्रीमंत लोकांशी लग्न करून,ऐश आरामाचे जीवन जगायचे आहे..सलाम त्या एकनिष्ठतेला आणि, त्या माऊली ला आपल्या पतीबरोबर खंबीरपणे उभा राहुन...नशीबाला सुद्धा झुकवले...सलाम❤
ऐकदम बरोबर लिहलस मित्रांना
सर मी कमी वयेचा आहे पण खरोखर खूप प्रेरणा दायेक गोष्ट आविष्य साठी घेण्यासारखी आहे नविन पिढीसाठी खूप प्रेरणा देणारी आहे
नमस्कार राहुल सर
राहुल सर , अतिशय प्रेरणादायी मुलाखात आहे
खुप साऱ्या नाउमेद झालेल्या लोकांसाठी एक नवीन उमेद आणणारी मुलाखात आहे
मगर साहेब आम्हा नवयुवकांना आपला सार्थ अभिमान आहे आम्ही आपल्या विचारानी खुपच प्रेरीत झालो आहोत
भविष्यात तुमची अजुन अशीच प्रगती करो तुम्हाला आरोग्यदायी निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
सकाळी सकाळी ही मुलाखत बघितली. आमच्या काकांनी , वडिलांनी 42 लोकांचं खटला एकत्र वागवलं. लोकांची साल महिन भरले. जमिनी घेतल्या.
खरच आहे मेहनतीनंतर फल मीलतौ
Kharach... कष्टाला पर्याय नाही.. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,.. या जोडीला प्रणाम...
अतिशय सुंदर मुलाखत
आपला भारत देश अशा कष्टकरी लोकानी उभा केलेला आहे .महाराष्ट्र मध्यऐ आज असे अनेक आजोबा आहेत ज्यांच्या कथा एकुन नवीन पिढ़ीला प्रेरणा मिलते .या आजोबाना व त्यांची कथा जगा समोर सांगनारया प्रत्रकारितेला प्रणाम ।
खरंच आजोबा आताच्या तरुण पिढीला तुमचं जीवन प्रेरणादायी आहे परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो मनापासून प्रार्थना
अनिल कवडे पाचेगाव खुर्द तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
मगर काका तुमचा हा व्हिडिओ खरंच आम्हा सर्वासाठी प्रेरणादायी व स्फूर्ती देणारा आहे, आणि सगळ्यात आधी धन्यवाद देतो,आमचे गुरुवर्य आदरणीय दादांना की तुमच्या मुळे मी मगर काकांच्या या प्रेरणादायी व्हिडिओ पर्यंत पोहोचलो.
राहुल कुलकर्णी म्हणजे brand aahe brand त्यांनी मुलाखत घेतली आणि ती काळजावर घाव घातला नाही अस होताच नाही...सलाम तुमच्या कार्याला....
आणि ते बाबा म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे सांगणार एक मोठं व्यक्तिमत्व बाबा ना पण सलाम...
रडायचं नाही तर लढायच
जय शिवराय 🙏
Asi manasearashan magat nahit hemamasarkhe khane kapadekinva
Arasshanahitar he rojgardenare
खूप मेहनती कुटुंब.. कष्ट हेच भांडवल समजून घरातील सर्वांनी जिम्मेदारीने अहोरात्र कष्ट केले.. खूप प्रेरणादायी. 👍..पण आजच्या या 21 व्या शतकात हेच कष्ट, मेहनत स्मार्ट वर्क प्रामाणिक पणाने करूनच पुढे जाता येईल.. 🙏🙏
ग्रेट माझ्या वडिलांनी पण असं शून्यातून जग निर्माण केले केलेला आहे
अंगावर काटा आला.....
आयुष्यात कधी चहा विकत नाही घेतला,
12 वर्ष कपडे नवीन विकत नाही घेतले.....
Salute for हार्ड वर्क....
Salute या माणसाला , कुलकर्णी साहेब तुम्ही ग्रेट अशा तळागाळातल्या माणसाची मुलाखत घेता आणि हे सत्य जगासमोर आणता .
राहुलजी हे ऐकून अक्षरशः रडलो ,सलाम मगर काकाच्या कष्टला आणि तुम्ही आजपर्यंत केलेल्या मधल्या ओळीतील सर्वोत्कृष्ट भागाला
कष्ट हेच देव ...बाबा खुप प्रेरणा मिळाली ...खुप प्रेरणादायी कहानी ....अविस्मरणीय मुलाखत
राहुलजी आयुष्यातली मधली ओळ आज तुम्ही मगर बाबाच्या रुपात शोधली अन ती सादर केल्याबद्दल खूप अभिनंदन व बाबांचे केवळ अशक्य वाटणारे कष्ट अन जिद्द यांचे श्रमसाफल्य अप्रतिम व प्रेरणादायक
खरंच खूप great man ahet .. सलाम आजोबा... आणि राहुल भाऊ तुम्ही हे जाऊन तिथे सत्य दाखवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏
राहुल कुलकर्णी पत्रकार कमी पण ग्रामीण प्रेक्षकांना घरातील व्यक्ती वाटतात. असेच जमीनीशी जुळुन रहा .
काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣
Mast
हो , अगदी बरोबर
नंबर 1 पत्रकार राहुल सर
तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम आहे तुमच्या पासून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली आहे
माझे आजोबा ढाकूनाईक राठोड यांच्याकडे 1 गुंठा जमीन नव्हत्ती तर 200 एकर जमीन कमवली आणि गावाला 5एकर जमीन दान दिली म्हणून आमच्या गावाला नाव दिले ढाकूनाईक तांडा 🙏
तुमचं नाव काय जिल्हा कोणता
@@akshayjadhav9328 नांदेड तालुका कंधार
@@RK-xu9eqठाकू नाईक यांना प्रनाम भाऊ 🙏🏻🚩... असे व्यक्तिमत्व असते म्हणून आपला आणि गावचा विकास होतो
खूपच छान 👌
Very good
खूप मेहनती करून इथपर्यंत पोहोचले बाबा आपण खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला साहेब आपल्या महाराष्ट्र समोर अशा घटना आल्याच पाहिजेत आपले खूप खूप आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र
कुलकर्णी सर, आपण जीवनातील सत्य स्थिती जाणून घेतली व त्यांनीही निःसंकोचपणे आपल्याला आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न ,सर्व काही अप्रतिम
पहिल्यांदा राहुल सर तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार ...🎉🎉🎉🎉🎉
आपल्यामुळे भास्कर मगर या ग्रेट माणसाची स्टोरी कळाली.
आपण पत्रकारितेचा योग्य वापर करत आहात आम्हास आपला अभिमान वाटतो .
आशा आहे की इतर पत्रकार आपला आदर्श घेतील..
आपण मगर भाऊसाहेबांची मुलाखत फार चांगली घेतली मगर भाऊ साहेबांनी भरपूर मेहनत करून कमावलेला पैशाचा योग्य उपयोग घेतला इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपला जीवन बदलून टाकाव
श्री गाढे पाटील परिवार येवला नाशिक खुप खुप धन्यवाद ए बी पी माझाचे आम्हाला एका कष्टकरी शेतकरी ओळख व माहिती दिली आम्ही नक्कीच यातून खुप काही शिकलो आहेच नवीन व्हिडिओ व माहिती देत जा धन्यवाद
आयुष्यात जो प्रामाणिक पणे रक्तच पाणी करून कष्ट करतो त्यालाच देवही आशीर्वाद देतो, रोज फक्त देव देव करणे, आणि कुठल्यातरी बाबाच्या नादाला लागणे अश्याने प्रगती होत नाही, मगर आबांच्या सारखी खूप कमी माणसे असतात जे आपले काम धर्म म्हणून करतात.ह्या जगात कष्टाला पर्याय नाही आणि त्याच फळ नक्की मिळणार. खूप छान मुलाखत.
प्रेरणादायी जिवन कहानी कष्टातून मोती
आभारी आहोत ! ही मुलाखत आताच्या पिढीसाठी महत्वाची आहे. या पुढील आपले जीवन याच प्रमाणे येणार आहे. त्यासाठी हे मार्गदर्शक आहे.
खुप प्रेरणादायी, हृदयस्पर्शी मुलाखत ऐकली
आणि कष्ट ,जिद्द,सातत्य चे अनुकरण करून असाध्य ते साध्य होऊ शकते हे शिकायला मिळाले.
काका व काकूंच्या मेहनतीला मानाचा मुजरा...!
धन्यवाद राहुल साहेब 🙏🙏🙂
अत्यंत छान मुलाखत....
तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळाली आत्ताच्या काळामध्ये थोडे थोडे गोष्टीला खचून न जाता
पूर्वीच्या काळी किती कष्ट किती सहनशीलता ,किती जिद्द ,मनामध्ये ठेवून एक निष्ठेने व इमानदारीने लोक काम करायचे याचे वास्तव चित्र मगर आजोबा यांच्या माध्यमातून आम्हा दाखवून दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार......!🌅🙏🏻
राहुल जी आजची ही मुलाखत, खरोखर डोळ्यात अंजन घालणारी आहे. मगर दादा आणि त्यांच्या कुटुंबाला खुप खुप धन्यवाद.
मगर कुटुंबियांच्या आजपर्यंतच्या अपार मेहनतिला, जिद्दीला , संयमाला आणि तत्वांना सलाम..🙏🙏🙏🙏🙏
खरंच मी आज फार ऊदास होतो.श्री.मगर ना ऐकुन नवी प्रेरणा मीळाली.धन्यवाद राहुल तु असे हिरे शोधून काढले आहेत.प्रणाम.
छान झाला interview.. असंच realistic बघितलं की अजून हुरूप येतो..
🙏
धन्यवाद माऊली
भास्कर मगर बाबा, 👏👏🙏💪 डोळ्यात तेज, हजर जबाब, सत्यवाचा,कठोर परिश्रम,जिद्द,जीवनात अवलंबलेला सरळ मार्ग, सलाम आहे तुम्हाला.
राहुल जी खूप खूप धन्यवाद खूप खूप सलाम तुम्हाला आणि मुलाखत देणाऱ्या कुटुंबातील या आदर्श आई व बाबा घाणेरड्या राजकारणाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही प्रेरणादायी कथा आपल्या सर्वांसमोर आणत आहात मनःपूर्वक धन्यवाद.
आत्महत्या करन्याच मनात येणार्रा माणसांनी अवश्य एकदा पहाव शेवटी कष्टाला पर्याय नाही सलाम आपल्या जिद्दिला आणि कष्टाला अपणास दिर्घआयुष्य आरोग्य लाभो
दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है....हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येकाला वाटेल की, आपल्याला आयुष्यात जे काही मिळालं आहे तेच खूप आहे....आणि आपणच सर्वात सुखी आहोत...
सत्यावर चालणारे हे बाबा. आसे अगोदर अनेक लोक होऊन गेले आहेत. पण हे सत्यात उतरणारे तुम्हाला सलाम कुलकर्णी साहेब
कष्ट केले तर फळ नकीच मिळणार आहे
आजोबा सलाम आहे तुमच्या कष्टाला
देवाला सुद्धा मजबूर केले आहे 😢
राहुल सर फार छान मुलाखत घेतली तुम्ही,महाराष्ट्रातील अनेक लोक या मुळे प्रेरणा घेतील.राजकारणी लोकांच्या बातम्या देण्या पेक्षा अश्या मुलाखती फार फायद्याच्या आहेत.
राहुल सर आपण घेतलेल्या मुलाखती या सर्वसामान्यांमधून व इतर पत्रकारांपेक्षा ह्या अप्रतिम असतात त्यामुळे मी आपल्या मुलाखती आवडीने पाहतो आपल्यासारख काम करणारे फार दुर्मिळ आहेत त्या महाराष्ट्रात.
बापू सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला
आमच्या वडिलांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केले एक वेळ खायला भाकर नव्हती आम्हाला पण आज शेती आहे बागायती, गाड्या, बंगले सारं काही आहे पण कष्ट खूप केला हो
ज्यांची मुलखात घेतली त्या महान व्यक्तीचं दर्शन आपल्यामुळे झालं . राहुल sir तुम्ही खरच मनाला भावलेले पत्रकार आहात. ह्या मुलाखतीतून भेडसावणाऱ्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणि शेवटी एक लक्षात आलं कष्टाला पर्याय नाही. आणि कष्टाचं फळं ही गोडच असतात
Great भेट with भास्कर मगर यांचे गांव सोलापूर पासून 15 - 20 KM अंतरावर आहे.... जबरदस्त संघर्ष सुखी जीवन
खरोखरच बाबांच्या आयुष्यात कष्टाच चिज करून दाखवले आहे . बाबा च्या कष्टाला व यशस्वी जीवनाला मानाचा मुजरा!!!!
****ओम नमोशिवाय****
राहुलसो हीच खरी पत्रकारीता, अशा लोकांनाच लौकिक मिळवुन द्या.🙏🔝
कष्ट हिच संपत्ती.
Many things to learn from Rahul Kulkarni sir too! Thank you Rahul Kulkarni sir!
राहुल sir ग्रेट आहात तुम्ही,, काकाची मुलाखत घेऊन समजला एक चांगला संदेश दिला,,,,good
👍🏻.. वास्तव व प्रेरणादायी मुलाखत...
राहुल सर आपले खूप खूप धन्यवाद, ... खरी पत्रकारिता काय असते हे उसाचे प्रश्न व या आजच्या व्हिडिओ तून दाखवून देत आहात...🙏🙏✌️
खुप छान मुलाखत होती धन्यवाद आपल्याला.कुलकर्णी साहेब . महाराष्ट्रातील तमाम शेतकरयांना प्रेरणा देणारी मुलाखत होती. खर्च कमी बचत जास्त स्वताशी प्रमाणिक राहणे आवश्यक ते करणे दुसर्यांना न दुखवता जगणे स्वप्न मोठी पाहणे त्यासाठी कष्ट घेणे हे ज्यांना जमते त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही . बाबांना साथ देणारे त्यांचे कुटुंबीय हे ही तितकेच महत्त्वाचे आहे सर्वांना धन्यवाद 🙏💐
सुप्रभात नमस्कार. !!अप्रतिम!! .!!श्रद्धा और सबुरी!! .जबरदस्त आत्मविश्वास!! कष्ट!!
खरेच कुलकर्णीजी साहेब आपण
मगरजी काकांची मेहनत प्रामाणिकपणा.
नैतिकता.हेच कष्टाला यशस्वी करतो ...
काकांचे एक एक शब्द हे प्रेरणादायी आहेत
आपल्या मुळे आम्हाला काकांचे दर्शन झाले...
कुलकर्णी साहेब सर्वात प्रथम तुमचं मनापासून आभार का तुम्ही विषयच असे निवडता कम मनाला छेदून जातात आणि हा विषय आजचा इतका गंभीर आणि विचार करायला होणार आहे की एखाद्या अपयशी व्यक्तीने जिद्दीने कसं पुढे जायचं यातून खूप काही त्या व्यक्तीला शिकायला मिळेल आणि मगर काकांचं मनापासून अभिनंदन
जबरदस्त.... प्रेरणादायी 👍👍
धन्यवाद ओ कुलकर्णी साहेब.... सतत वेगळं पण शोधून काढणारे आपण महाराष्ट्रतील एकमेव "पत्रकार "..... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏
Rahul sir,
Salute to your innovative gernalism.👍 Great 🙏
जिद्दीने आयुष्यातील जीवनाला कसे सामोरे जायचे..हे सांगणारी हे आजी आजोबा ..मनात भरून राहिले..त्यांच्या कष्टमयी प्रवासाची ही कहाणी खरे दुःख पचवून कसे ताठ मानेने जगायचे ते शिकविते..राहुलजी..तुमचेही असे हिरे आणि हिरकणी शोधल्याबद्दल मनापासून आभार..
धन्य आहेत असे लोक. हा कष्टाळू पणं सर्व महाराष्ट्रातील सर्व तरुणांच्या मध्ये येवो. पांडुरंग ! पांडुरंग ,!!
आज मला पण प्रेरणा मगर बाबा कड़ून भेटली आपण आणि एबीपी माझाची मधली ओळचे आभार
जबरदस्त व्यक्तीमत्व.....श्रमाची इज्जत समजून घ्या.....श्रमाची ताकत समजून घ्या......
लहान लहान उद्योजक तरुणाच्या मुलाखती घ्या गावातील तरुणांना उद्योग करण्याची जिद्द निर्माण होईल राहुल सर आपण घेतलेल्या मुलाखतीमुळे तरुण वर्ग फार उत्साहीत होत असल्याकारणाने तो उद्योगाला लागेल
राहूल साहेब...
ऐक पत्रकारितेचा मापदंड म्हणून हि मुलाखत किंवा हितगुज खरंच मनाला आनंद आणि नविन उभारी देण्यासाठी मदत होईल, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन!!! आजोबांना दीर्घायुष्य लाभो! त्यांच्यामुळे हजारो लोकांच्यात नवचैतन्य निर्माण होणार हे निश्चित!!! आजोबा हे खरे आपले चैतन्य मूर्ती आहेत. धन्यवाद!!!
नक्कीच सर तुमच्या या मुलाखतीतून किती तरी लोकांना जगण्याची प्रेरणा मिळेल 👍👍👌
कुटुंबाची दयनीय अवस्था करून कमावलेली इस्टेट काय उपयोगी
@@amartupe8904 पण काही लोक पैसै नसल्या त वाईट वळणाला लागता पण त्या माणसान तस काही केल नाही
भाऊ मि पन लय कष्ट केल माझी आई83। मधये वारली माझा जन्म 79 मधये झाला आज। पर्यन्त कष्ट करत आहे मस्त झोप लागते
आता पर्यंतची सर्वात 1 no मधली ओळ
कुळकर्णी सर धन्यवाद तुम्ही त्यांचा कष्टाला आज खरं अर्थ दिला आणि आम्हाला नवीन मार्ग आणि हिम्मत 🙏🙏🙏💐💐💐💐
खुपच ग्रेट भेट राहुल सर आमच्या सारख्या करमाळ्यातील पत्रकारांना मगर काकांचा व तुमचा खुप अभिमान वाटतो
खरंच आजच्या घडीला अशा विचाराची गरज आहे या पिढीला एबीपी माझा ला माझा धन्यवाद अशी संघर्ष मे जीवनाची कथा घेऊन येत राहावी